समीर सरवटे यांना भेटण्यासाठी मुंबई गटग

Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झारा, शांत व्यक्तिमत्व नवर्‍याच्या भूमिकेत शांत नसतं एरवी त्यांना संत ही पदवी देता येत असेल तरीही.. Happy
(अगदीच समजू शकते गं! Wink )

हा संपूर्ण आठवडा आदित्य पुण्याला गेल्यामुळे इथे मी आणि नवरा दोघंच आहोत. मी काल सकाळपासून वाट पाहत होते, की नवरा म्हणेल "गटगला नको जाऊस, आपण दोघं कुठेतरी बाहेर भटकू या, बाहेरच जेवू या..."
पण, तो तसं काही म्हणालाच नाही... शेवटी मी गटगला जाण्याचंच ठरवलं Proud

अ‍ॅडमिननी आणणेल्या चाकलेटांच्या कागदांच्या आत निरनिराळे संदेश लिहिलेले होते. मी पोचले तेव्हा श्री व सौ भिडे ते वाचण्याच्या कामी दंग होते. मला पाहिल्या पाहिल्या अ‍ॅडमिननी आधी चाकलेटांची पिशवी पुढे केली आणि "आणलेली आहेत!! आता लक्षात ठेव, गेल्यावेळसारखं विसरू नकोस..." असं अप्रत्यक्षपणे बजावलं. Proud (त्यातलं ५०% बजावणं नीरजाकडे ट्रान्सफर करण्यात येईल, कारण तिलाही वाटतंय, की गेल्या वर्षी अ‍ॅडमिननी चाकलेटं आणली नव्हती :फिदी:)
बाकी, मी खाल्लेल्या चाकलेटाच्या कागदावरचा संदेश कैतरीच होता बै Blush

'नेहमीचे यशस्वी गटग सदस्य' उत्साहाने हजर होते. (साताक्रा वगळून...)

मेधीचं पिल्लू नेहमीप्रमाणे भाव खाऊन गेलं. यावेळी ते भाव खाणं संगीतमय होतं. त्याच्या ताना ऐकण्यासाठी एकदा एक खास गटग करायला हवं Lol (बाकी, त्याला "अलेऽऽ गुंड्या..." असं कसं म्हणायचं - ही समस्या अजूनही मला सतावते आहेच :फिदी:)

विनयनं ऑर्डर देताना मला "दही-ललित हवंय का?" असं विचारलं. Lol

एकट्या मोनालीची रवा-मसाला-डोसाची ऑर्डर हॉटेलवाल्यांनी उशीरा पूर्ण केली. दरम्यान तिनं लोकांच्या गव्हाच्या सत्त्वांच्या पाकिटांच्या ऑर्डरी पूर्ण केल्या. त्या देवघेवीदरम्यान मला एकीकडून गुपचूप प्रश्न विचारण्यात आला - "लले, ही पाकिटं म्हणजे नक्की कशाची आहेत?" Lol (कुणी विचारला ते आठवत नाहीये.)

मंजू-कन्यारत्न आणि प्राची-कन्यारत्न अधूनमधून एकमेकींच्या आयांच्या गळ्यात पडून आई प्रकाराच्या व्हरायटीची काही अनुभूती मिळतेय का हे पाहत होत्या.

प्राची आणि चिंगी यांना मी प्रथमच भेटले.
माझ्या नजरेसमोर प्राचीची जरा निराळीच इमेज होती (आर्मी ऑफिसरची बायको - या दृष्टीने, बहुधा) पण ती त्याच्या बरोबर उलट निघाली. (म्हणजे आपल्यातलीच एक वाटली Happy )

एकंदर नेहमीप्रमाणे मजा आली.

तात्पर्य - २ दशकांनंतरही नवरा हा प्राणी अपेक्षाभंग करू शकतो, पण माबो-गटग मात्र कधीच दगा देत नाही Proud

माझ्या नजरेसमोर प्राचीची जरा निराळीच इमेज होती (आर्मी ऑफिसरची बायको - या दृष्टीने, बहुधा) पण ती त्याच्या बरोबर उलट निघाली. (म्हणजे आपल्यातलीच एक वाटली स्मित ) >>> ऑऽऽ.. Uhoh
ही कॉम्प्लीमेंट समजायची का? Proud

चिंगी आली तेंव्हा हीच का सावली असा प्रश्न मला आणि विनयला पडला (ईतरांना देखील पडला असावा) पण सावली इतकी लहान असेल का? ह्या कोणाच्यातरी प्रश्नावर 'दुपारचे १२ वाजत आलेत ना, सावली लहानच असणार' असे मी हजर जबाबी उत्तर दिले.. Wink

ललीने लिहिले आहेच पण ती यायच्या आधीचे हे काही..

सकाळी १०:४५ लाच सुरज व्हेजला शमिका बरोबर पोचलो तेंव्हा अ‍ॅडमिन, कट्याचे मालक विनय आणि त्यांच्या पत्नी, माबोवरील रायगड किल्ले अभ्यासक नील वेद आणि आनंदमैत्री असे ५ जण हजर होते. आल्याच अ‍ॅडमिन यांच्याशी ओळख झाली. विनयने अरे किती बदललास, केस कित्ती वाढवलेस, चांगला जाड झाला आहेस वगैरे शेरे मारले पण शमिकाने त्याला अरे आता कुठे जरा बारिक होतोय मध्ये अजुनच जाड झाला होता असे त्याला सांगितल्याने माझ्या अंगावर मुठभर मास चढले... Proud

५ जणांच्या कसल्यातरी गहन चर्चा सुरु होत्या. त्यात शिरायचा प्रयत्न केला पण तो विनय आणि नील यांनी हाणुन पाडला. Proud तो वेळ मी आणि शमिकाने मोसंबी ज्युस पिउन सार्थकी लावला. मंजूडी छोट्या नीरजाला घेउन आल्याबरोबर समीर भाउंनी चॉकलेट्चे पाकिट तिच्या समोर केले आणि तिला उघडायची विनंती केली पण तिने विनंती दुर सारत ते पाकिट थेट मंजुडीच्या पर्स मध्ये सरकायचा अयशस्वी प्रयत्न केला. Proud प्रत्येक चॉकलेटच्या कागदामागे कसलेसे मेसेज होते ते प्रत्येकजण वाचून बघत होता. ते पाहून मला मी रेल-वे स्टेशनवर वजन चेक करत तर नाहीये ना असा क्षणभर भास झाला... Lol (आठवा वजन तिकीटाची मागची बाजू.. :P)

बर्यापैकी लोक जमल्यावर आता खायला मागवूया अशी विनंती खुद्द समीर यांनी केली. त्याप्रमाणे फटाफट ऑर्डरी सुटल्या. पावभाजी नंबर १ वर होती. त्यामागोमाग रवा मसाला. कोणीतरी कलिंगड ज्यूस मागवला होता. पण तो कोण हे काही २-३ मिनिटे सापडत नव्हते. तो ज्यूस मी ताब्यात घेणार इतक्यात कॅमेरा बाजूला सारून आनंद याने तो मीच या अविर्भावात तो ग्लास पटकावला.. Lol

प्राची यांच्याशी नीट भेट / बोलणे होऊ शकले नाहे. तसेच अमृता (बहुदा मंजूडी घ्यायला गेली होती) आल्या तेंव्हा मी निघत होतो. निघालो तेंव्हा विनय गायब होता त्यामुळे त्याला बाय करायचे राहून गेले. एकंदरीत धमाल आली. अजून वेळ थांबता आले असते तर अजून आनंद वाटला असता... Happy

समीरने काहीच खाल्ले नाही Sad राम यांनी गटग व्हायच्या आधी एक सूचनावजाकाडी टाकल्यामुळे की काय, ते खरोखरच घरून व्यवस्थित खाऊन आलेत की काय अशी एकसारखी कुशंका मनात येत होती.

त्यांनी कलिंगड ज्युस घेतला होता हे नक्की.. त्याआधी एक चॉफी देखील झाली होती.>>>>आणि आम्ही गेल्यानंतर आईस्क्रीम. Happy

आणि चॉफी???????????????>>>>>चहा आणि कॉफी एकत्र कि क्वॉय??? Uhoh

नाशीकला राहायला आलो तेव्हाच दोन वर्षात पुणे आणि मुंबई येथील कमीत्कमी एक तरी गटग अटेंड करायचं असं ठरवलं होतं. पुणेकरांना दोनतीनवेळा भेटून पीडून झाले आहे. आता मुंबईकरांना पिडण्याची संधी शोधत होते.
तेवढ्यात, ठाण्याला समीर यांना भेटायला गटग होणार असल्याचे वाचले. खूप दिवसांत घराबाहेर न पडल्याने मला आणि लेकीला जरा रुटीनमध्ये बदल हवाच होता. त्यात, माबो गटग असल्याने अगदी दुधात साखर पडली. मी लगेच मुंबईतल्या ड्रायवरशी (चेतन) संपर्क साधून तो उपलब्ध असल्याचे नक्की कळल्यावर मुंबईला यायचे नक्की केले.

माबो गटग म्हटले की लेक माझ्यापेक्षा जास्त उत्साहात असते, त्याप्रमाणे ती (रविवार सकाळ असूनही) लवकर उठून तयार झाली. घरातले प्रत्येक घड्याळ वेगवेगळी वेळ दाखवत असल्याने मी जामच गडबडीत आवरून तयार झाले. त्या गोंधळात कानात आणि गळ्यात काही घालायचे राहूनच गेले. म्हणूनच मी जरा अजागळ वाटले असेन हो ललिताला. एरवी मी तशी ठाकठीक असते. Proud

गाडी येणे, दादरला पोहचणे, तिथून ठाण्याला येणे विनासायास पार पडले आणि आम्ही साधारण ११.१५ला सुरजमध्ये शिरलो. तिथे आधीच एका कोपर्‍यात दंगा चालू होता. मंजू, विनय-मधुरा यांना मी आधी भेटले असल्याने मी लगेच माबोघोळका ओळखला आणि त्यांना सामील झाले.
मिहिका आणि नीरजाची अगदी 'कबके बिछडे....' स्टाइलने गळाभेट झाली. मग मी निर्धास्तपणे माझ्या भेटींना लागले.

समीर, नीलवेद यांना फेसबुकावर फोटो पाहिले असल्याने मी लगेच ओळखले. चिंगी नावाप्रमाणेच चिंगी आहे. Happy
सेनापती आणि शमिका माझ्या समोरच बसले होते. शमिकाने ती होती तोपर्यंत मिहिका आणि नीरजा यांना छान बिझी ठेवले. तिचे आभार मानायचे राहिले खरं. Happy

ललिताप्रिती अगदी मस्त साडीबिडी नेसून तयार होऊन आली होती. त्याचे कारण, तिने लिहिलेला वृत्तांत वाचल्यावर कळले. Happy

जिप्सी आणि मी तेवढ्यातल्या तेवढ्यात लेह ट्रीपबद्दल बोलून घेतले.

क्रमश:

त्या गोंधळात कानात आणि गळ्यात काही घालायचे राहूनच गेले. >>> म्हणूनच तू मला माझ्यासारखी वाटलीस गो... Lol
कालचा माझा अवतार हा माझा डु-आय होता, नाहीतर एरवी मी तुझ्यासारखीच असते Wink

ललिताप्रिती अगदी मस्त साडीबिडी नेसून तयार होऊन आली होती. <<
ललिच्या शब्दात 'टळटळीत सव्वाष्ण!' वगैरे? Wink

लली साडी नेसून आली होती? खरंच तिने नवर्‍यावर फारच आशा लावल्या होत्यासं दिसतंय.

हे म्हणजे, श्रीदेवीच्या जुदाई पिक्चर मधल्या सारखं वाटलं मला वाचून, आधी ती श्रीदेवी तिच्या नवर्‍याकडे (अनिल कपूर) अजिबात लक्ष देत नसते, पैसाच तिच्यासाठी महत्त्वाचा असतो (ललीच्या केस मधे पैशाच्या जागी माबो घ्यावं :फिदी:) आणि जेव्हा तिला उपरती होते तेव्हा खूssssप उशीर झालेला असतो, नवरा तिच्याशिवाय आपलं जग बनवायला शिकलेला असतो, तसं काहीसं अजयचं झालेलं तर नाही? Uhoh Proud

Pages