कांदा कैरी चटणी

Submitted by अंजली on 18 March, 2012 - 22:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी: साल काढून चिरलेल्या कैरीच्या फोडी
१/२ वाटी: चिरलेला कांदा
दोन-तीन चमचे दाण्याचं कूट
तिखट
मीठ
गूळ
नेहमीची फोडणी: जिरे, मोहरी, हिंग, हळद

क्रमवार पाककृती: 

कैरीच्या चिरलेल्या फोडी, कांदा, तिखट, मीठ सर्व एकत्र करून उखळ असेल उखळात कांडा. उखळ नसेल खलबत्ता आणि खलबत्ता नसेल तर फूडप्रोसेसर मधे ओबडधोबड बारीक करून घ्या. वरून दाण्याचं कूट घाला. आवडीनुसार गूळ घाला. किंचित गोड, तिखट, आंबट अशी चव यायला हवी. वरून गार केलेली फोडणी घाला.

IMG_0781.jpg

माहितीचा स्रोत: 
सौ. आई, काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पाभा, सोशेंच आणि ही कैकांच पण..... सह्हीच गं अंजली... अजुन काही दडलय का पोतडीत? Happy

मी अशीच करते, फक्त दाण्याचा कूट न घालता. आता अशी करुन पाहीन.

एक प्रश्न, या चटणीकरिता कैरी किती कच्ची असावी?

एकदम कच्ची कैरी असते ती घे. पाड लागलेली नको. कधी कधी चिरल्यावर पाड लागला आहे कळतं. अशावेळेस गूळ कमी घाल.

कसला टेंपटिंग फोटो आहे. करुन बघणार. ही सोलापुरी स्पेशॅलिटी आहे का?

आम्ही अस कैरी कांद्याच लोणच करतो . कैरी आणि कांदा बारीक चिरुन घ्यायचा. लाल तिखट,गुळ,मीठ आणि शेंगदाण्याचा कुट घालून कालवायच. आणि वरुन हिंग मोहरीची फोडणी. फार सुरेख लागत हे लोणच पण.

एकदम तोंपासु!
माझी आई अगदी अश्शीच पण कैरी च्या ऐवजी चिंच आणि दा.कु. ऐवजी ओला नारळ अशी पण चटणी करते. ती ही फर्मास लागते अगदी. Happy

अरे मी रेसिपी वाचण्याआधीच म्हणजे कालच केली आहे ही चटणी अशीच पण गूळ न घालता. पुढ्च्या वेळी गुळ घलून करीन.

अशक्य रंग, अशक्य वर्णन , अशक्य शीर्षक आणि अशक्य हावरेपणाची भावना

तुम्हाला 'भावना भडकाविणे' या कलमाखाली आंतरजालीय अटक होऊ शकते याची नोंद घ्या

कैरी घरात होतीच म्हणून रेसिपी वाचून लग्गेच चटणी केली आणि मगच लिहायला आले Happy . स्लर्पर्पर्प Happy . थँक्यू Happy .

माझी मामी अशीच करते पण दाण्याचं कूट आणि फोडणी नसते .

संपदा, आमच्यात ज्या त्या पदार्थात दाण्याचं कूट ढकलतात. अगदी झुणक्यातही. सोलापूरच्या लोकांचं जेवण होत नाही त्याशिवाय.

या चटणीची मजा ओबडधोबड असण्यातच आहे. आमच्याकडे कुक कृपेने एकदम पेस्टसारखी व्हायची त्यात ती मजा येत नाही. फूड प्रोसेसर मधे ओबडधोबड करायची असेल तर आधी नुसती कैरी फिरवून घ्यावी, कारण खूप कच्ची असेल तर कडक असते. सगळं एकदम टाकलं तर कैरीचे तुकडे रहतात अन कंसिस्टंसी सारखी येत नाही.
कैरी मात्र आंबटच हवी.
मी जिरेपूड पण घालते. हळद घालत नाही. दाण्याचं कूट नसेल तर तिळाचं कूट घालते.

अंजली, मस्त लागते की चटणी. फोटो एकदम तोंपासु. इथे पण आल्या आहेत कच्च्या कैर्‍या ..
मी पण परवाच केली, मस्त झाली होती फक्त त्यात शेंगदाण्याचा कुट नाही टाकला पण फोडाणी मात्र होतीच आणि सोबतीला होतं पिठलं-भाकरी Happy