चला तर.. कोकणी शिकुया.

Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12

चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार. Happy
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.

ह्यो लिंक पळयात.

प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658

कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा- तुम्हि बेष्टे शब्द ऐकला का? त्याचा अर्थ काय? - असा प्रश्न विचारलाय का?
हि कोकणी माझ्या पार डोक्यावरुन जातेय. माझ्या साबा वेगळिच बोलतात? आता इथे प्रश्न विचारुन घरी जावुन बोलायला हवे, (बिच्च्यार्‍या साबा खुष होतील)

ओके. बरें Happy

हय अन्जलि, तशेच बरयला (लिहिले) हांवे. तू हांगा बरय (लिही) तुगेली माय (सासू) कशे उलयता तें. मागिर सांगच्या जाता, खयची कोकणी की मालवणी ते. Happy

>तेका बरे बाशीन शिकोनी. >> तू आसा नी अनिलभाई शिकौच्या बरे क(रु)न्न. हांव गजाली करच्या येतां, तू नाका म्हळ्यार येना. Happy

मी मालवणी, सासुमाय म्हापुसा. पण माहेरी कुणिहि मालवणी बोलत नाहि अगदि गावावरुन कुणी आले तर बाबा, काका बोलतात. सासरी हि तिच गत.

भाई हाव बरी असा.

रागार गो बाय माझेर. माका सगळीजाणा जाय गो हांगासर. सगळ्यानी मेळोन शिकौया.
अंजली,
हांव उलैता ती म्हापशेची कोंकणी. Happy

शैलू सुशेगात यो!

सुशेगात = आरामात्/सावकाश, दनपारा = दुपारी, सानचें = संध्याकाळी, सकाळी =सकाळी, रातचें =रात्री , फातोडे = पहाटे
फाल्ल्या = उद्या, काल =काल, आयज = आज, आवनु = या वर्षी, पोरु = गेल्या वर्षी, फुडल्या वर्सां =पुढच्या वर्षी

ज्योतितै, सुशेगात यो, म्हटल्यावर सगळे सुट्टि घेवुन बसले काय? आज कोणीच नाहि?

ज्योती .. खूप मदत करत आहेस.. Happy
बाप्रे.. आत्ता वेळ मिळाला इकडे यायला.. आता चार पानं मागची वाचून नवे शब्द लिहून घेतलेत..
प्रीमो..चार्ट ची वाट बघत आहे.. ( हे कसं म्हणायचं .. वाट पाहात आहे..)

वाट पाहात आहे. = हाव रावता (ज्योतीतै बरोबर ना?)

हे जर चुक असेल तर हाव रावता म्हणजे काय? केव्हा हे वापरायचे??? ते सांगा.

हांगा थंय भोवून येतां (इकडे तिकडे फिरून येते!) तुम्ही कोण ना म्हणून!

वर्षू, "चार्टाची वाट पळयतां आसां."

अन्जली, वाट बघते=वाट पळयतां. थांबते=रावतां.

रावतां ही रहाणे थांबणे या दोन्ही अर्थाने वापरात आहे. म्हणजे
१. तू खंय रावतां? तू कुठे रहातेस?
२. तू वचून यो. हांव रावता. =तू जाऊन ये. मी थांबते.

चार्ट येता... वाटेर आसा.

१. येवप= येणे
२.वचप=जाणे
३.खावप=खाणे
४.पिवप्=पिणे
५न्हिदप्=झोपणे
६चलप्=चालणे
७करप्=करणे

ह्याच्या व्यतिरिक्त अजुन कोणती क्रियापदं हवी आहेत?

अरे इथे टेबल नाही टाकु शकत मी. आणि टॅब्स/स्पेसेस टाकले तर ते गायब होताहेत प्रतिसाद पुर्वदृश्य मधे. Sad

नाही होत आहे.... मी पेण्ट मधे करुन टाकायचा प्रयत्न करते. पण ते लवकर होइलस वाटत नाही.

लै लै काम आहेत Sad

हे उत्तर कन्नडा

धनपारा = दुपारी; सांजे , तिनकात्रेर = संध्याकाळी; सकाळी =सकाळी; रातचें =रात्री ; फांत्यार , सक्काळीफुडें = पहाटे
फाल्ल्या ( साउथ कॅनरामधे फायी ) = उद्या, काल =काल, आज = आज, अवंदु, औंदु = या वर्षी, पोरु = गेल्या वर्षी, मुकारी , मुकावैल वर्स =पुढच्या वर्षी

Pages