चला तर.. कोकणी शिकुया.

Submitted by अनिलभाई on 15 March, 2012 - 10:12

चला तर, हांगासर येयात, कोकणी शिकुगं जाय जाल्यार. Happy
तुमका किरे कोकणीन विचारुंग जाय जाल्यार माका सांगा.
हाव शिकयता.

ह्यो लिंक पळयात.

प्रीमो कोचिंग क्लासेस - प्रीतमोहर
http://www.maayboli.com/node/33658

कोचिंग क्लासेस - २ - - ज्योति_कामत
http://www.maayboli.com/node/34121

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिलभाई | 15 March, 2012 - 09:42
पेटय हे कारवारीत आहे का?.
धाड हे कोकणीत आहे.
तुझ्या चेड्याक(चल्याक) धाडुन दि. (तुझ्या मुलाला पाठवुन दे.)
तुझ्या चेडवाक(चलीक) धाडुन दि. (तुझ्या मुलीला पाठवुन दे.)
संपादनप्रतिसादअनिलभाई | 15 March, 2012 - 09:40
बाय बाय ला काय म्हणतात कोंकणीत? >> बाय बाय चं.
संपादनप्रतिसादबिल्वा | 15 March, 2012 - 09:42
भाई

शीर्षक ध्रर्म का दिलयं? पुढे सगळीकडे धर्म असं लिहीता आलयं.
प्रतिसादस्वाती_आंबोळे | 15 March, 2012 - 09:43
चेडवा! हा एक शब्द ओळखीचा आहे त्या गाण्यामुळे.
प्रतिसादअनिलभाई | 15 March, 2012 - 09:51
कोकणीत पण आदरार्थी बहुवचन असतं का?>> फार कमी वापरतात. सासर्‍याला, अनोळखी मोठ्या माणसाना वगैरे.
'तु' किरे(किदे) करताय. च्या ऐवजी 'तुमी' किरे(किदे) करतात.
हांगा यो. च्या ऐवजी हांगा येयात.

बाबा,मामा,काका,मवशी,आत्या,आजोबा,आजी, सगळ्याना एकजात अरे तुरे.
संपादनप्रतिसादस्वाती_आंबोळे | 15 March, 2012 - 09:48
>> 'तु' किरे करताय
म्हणजे 'तू काय करतोस' का?

'किती वाजले'ला काय म्हणतात? खंय म्हणजे 'कुठे' ना?
प्रतिसादसायो | 15 March, 2012 - 09:49
चेडवा हा मुलांकरता वापरतात.
प्रतिसादसायो | 15 March, 2012 - 09:50
हांग यो म्हणजे इकडे ये. माझ्या कोंकणी आणि मँगलोरी कोकणी मैत्रिणींमुळे कानावर पडतं.
प्रतिसादअनिलभाई | 15 March, 2012 - 09:52
चेडवा हा मुलीसाठी
चेड्या हा मुलासाठी.

सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
संपादनप्रतिसादअनिलभाई | 15 March, 2012 - 09:53
'किती वाजले'ला काय म्हणतात? >> कितीली वाजली?. (किरे टाईम जालो?.)
संपादनप्रतिसादस्वाती_आंबोळे | 15 March, 2012 - 09:54
आणि 'हांगा पळें' हे मालवणी का?
प्रतिसादअंजली | 15 March, 2012 - 09:59
नमस्कार.
कसे असां? (बरोबर ना भाई?)
प्रतिसादअनिलभाई | 15 March, 2012 - 10:04
हांगा पळय ('हांगा पळें') हे कोकणी.
कसो आसा. (कशे आसात-आदरार्थी).
संपादनप्रतिसादनीधप | 15 March, 2012 - 10:04
तुझ्या चेड्याक(चल्याक) धाडुन दि. <<
झीलाक नाही का?

बाई ते कोकणी आहे.
हांगा पळे चं मालवणी हयसर बघा

बरोबर ना हेडमास्तर?
प्रतिसादसायो | 15 March, 2012 - 10:06 नवीन
आज एकदम कोंकणी किडा का चावला पब्लिकला?
प्रतिसादअनिलभाई | 15 March, 2012 - 10:06 नवीन
झील हे मालवणी.

तुझ्या चेड्याक(चल्याक) धाडुन दि. (तुझ्या मुलाला पाठवुन दे.)
तुझ्या चेडवाक(चलीक) धाडुन दि. (तुझ्या मुलीला पाठवुन दे.)

कोकणीत पण आदरार्थी बहुवचन असतं का?.
फार कमी वापरतात. सासु,सासर्‍याला, अनोळखी मोठ्या माणसाना वगैरे.
'तु' किरे(किदे) करताय. च्या ऐवजी 'तुमी' किरे(किदे) करतात.
हांगा यो. च्या ऐवजी हांगा येयात.

बाबा,मामा,काका,मावशी,आत्या,आजोबा,आजी, सगळ्याना एकजात अरे तुरे.

चेडवा हा मुलीसाठी
चेड्या हा मुलासाठी.

सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
झील हे मालवणी.

'किती वाजले'ला काय म्हणतात? >> कितीली वाजली?. (किरे टाईम जालो?.)

हांगा पळय ('हांगा पळें') हे कोकणी.
कसो आसा. (कशे आसात-आदरार्थी).

हि बस खंय वैता.
माका पणजी वोचोंग(वचुंग) जाय.
पणजी खंयची बस वैता.

किरे सायबा, किरे खबर.
बरे मु.

नी,
एकदम फॉर्त.
घट मगो.
आणि किरे नविदात? (आणखी काय नविन खबर.)

विचारा रे. जमता तसे सांगता. माका येयना जाल्यार बायलेक विचारुन सांगता. Happy

समिर खंय रवलो ? ताकाय आपेयात हांगा ( समीर कुठे राहिला ? त्यालाही बोलवा )
आनि, ललिताताई स्वित्झर्लंडाची, तिकाय आपेयात हांगा ( स्विस ललिताताई , तिलाही बोलवा इथे )

वा वा कोकणी शिकवणी!! हाव येतलय भाईमास्तरानु Happy माका कोकणीत उदीक जाय मरे आणि एक बांडूक होता मरे ही दोनच वाक्या बरीशी येतत बाकी बोंब आसा. Proud

नी.. बरे बरे. तू घट मगो ? ( मास्तरांनी बरे मुं? च्या पुढे काय बोलतत लिवला नाय म्हणून अंदाजाने बोलतय ) Proud
>ए फुर्रर्रर्र.>> ता माका वाट्ला तू चाय बशीतून पितस की काय

Pages