राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंद्ररास- मेष.
लग्नरास- धनू
सूर्यरास - मकर.

सांगा हो मास्तुरे. कित्येक वर्षापूर्वी लिंब्याला आख्खी कुंडलीच पाठवलेली. त्याने काहीच सांगितले नाही!

वेबवर मूनसाइन कॅलक्युलेटर आहेत त्यावर वेगळीच रास येते. (याची चर्चा मागे कुठे असेल तर सांगा.)

>>> आणि कुंभ नि वृश्चिक असे नवराबायको असले तर???

अ‍ॅग्रेसिव्ह, स्वावलंबी व प्रचंड आत्मविश्वास असलेल्या दोन व्यक्ती एकत्र रहात असल्या तर गरमागरम मतभेद होतात, पण दोघेही एकमेकांना भक्कम पाठबळ देतात. कोणत्याही प्रसंगात डगमगून न जाता व दैवावर अजिबात अवलंबून न राहता ते केवळ स्वप्रयत्नाने व स्वकर्तृत्वाने त्यातून मार्ग काढतातच.

मास्तुरे, थोडसं चुकतंय Happy माझा नवरा कुंभ आहे पण अतिशय शांत आहे स्वभावाने. नि गरमागरम मतभेद कधीच नसतात. कारण भांडायला दोन बाजू लागतात. त्यांना आवाज चढवलेला पण आवडत नाही(कोणीच- अगदी स्वतःसुद्धा) तर वाद काय होणार कप्पाळ?

माझ्या निरिक्षणाप्रमाणे कुंभ रास ही विचारी, शांत, (अर्थात शांत चा अर्थ दुबळा मुळीच नाही. भले भले घाबरतील अशा प्रसंगात सुद्धा अविचल असतात हे लोक) अशी असते. पण कमालीची फर्म नि धीट असते.

अ‍ॅग्रेसिव नाही पण आत्मविश्वास खूप असतो.
<<<<कोणत्याही प्रसंगात डगमगून न जाता व दैवावर अजिबात अवलंबून न राहता ते केवळ स्वप्रयत्नाने व स्वकर्तृत्वाने त्यातून मार्ग काढतातच.<<< हे मात्र अगदी खरे.

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

निंबेच्या प्रस्तावनेतल्या या वाक्यावरून "तिचे वय" ओळखा बरं कोणीतरी Proud

राशी काय सगळेच ओळखतायत......... थोडा आयडिया मे चेंज Wink

भुंगा, धन्यवाद.

माझे आजोबा पुण्यात हेच काम करायचे. (आता ते हयात नाहीत) तेव्हा त्यांची वाचलेली टिपण्णे गंमत म्हणून, तर कधी बाजूला बसून ते जे लोकांना सांगत ते एकून.
बर्‍याच पत्रीका अश्याच हाताळण्याचा फक्त छंद होता... माझा विश्वास तर बिलकूल नाही. Happy

काही निरिक्षणे:
गुरु जर स्वराशीत असेल ( मीनेचा गुरु व चंद्र ग्रह असेल तर ) तर लोकं चंचल असतातच... निर्णय घेताना. हळवी सुद्ध असतात. अगदी "पक्की" लक्षणे आहेत आहेत.
पत्रीकेत जर रवी सोबतीला असेल तर बरा निर्णय घेतात. बुध उच्चीचा असेल तर बोलण्यात हुशार्(विनोदी कल)

सिंह चंद्ररास + लग्नरास मेष वगैरे खतरनाक कॉम्बो : त्यात रवी जर स्वराशीत(सिंह म्हणजे आकडा ५ असेल तर) तडफदार असतात. तापट, रंगाने लालसर वगैरे.

माझ्या निरिक्षणाप्रमाणे कुंभ रास ही विचारी, शांत, (अर्थात शांत चा अर्थ दुबळा मुळीच नाही. भले भले घाबरतील अशा प्रसंगात सुद्धा अविचल असतात हे लोक) अशी असते. पण कमालीची फर्म नि धीट असते<<<

होय. कुंभ रास विचारी, शांत असतेच. पक्के असतात विचारांशी. कधी कधी वेळ लागतो त्यांचे विचार बदलताना त्यामुळे.

कुंभ रास अग्रेसीव तेव्हाच असते जेव्हा पत्रीकेत मंगळाची साथ असेल. नीचेचा बुध असेल तर फटकळ पणे बोलतात कधी कधी.

लोला, ही तुमची रास आहे का?

चंद्ररास- मेष.
लग्नरास- धनू
सूर्यरास - मकर

मला वाटले सन्साईन केप्री आहे म्हणून(१६ जान) Happy

झंपे, व्हय. वर लिहिलंय, मागच्या एका पानावर पण लिहिलंय पण कुणी काही सांगतच नाही. Uhoh
घाबरु नका.

सानी,

>> गा.पैं ची पोस्ट वाचतांना तुमचीच वाचतेय, असा भासही होतो क्वचित.

माझ्या लेखनाची दिनेशदांच्या लेखनासोबत तुलना होणे याला मी माझ्या लेखनाचा गौरव समजतो! Happy
धन्यवाद!!

आ.न.,
-गा.पै.

प्रशासकांना विनंती : वरील लेखातील www.maayboli.com/node/32704?page=7#comment-1898559 हा दुवा नीट दिसत नाहीये. संपादनात योग्य पत्ता दिला तरीही! जरा लक्ष घातलंत तर बरं होईल. Happy

लोला,
चंद्ररास- मेष.
लग्नरास- धनू
आहे ना, हे घ्या..

मेष राशी मंगळाच्या अधिपत्याखाली येते. मंगळ हा पराक्रमी ग्रह मानतात. तो उच्च असेल तर चांगला फायदा असतो. तो कुठल्या घरात, कोणाबरोबर असेल तर फायदे/तोटे बदलतात. तरी साधारण असे असते,

बोलण्यात थेट असतात.

  • निर्णय कधी कधी तडकफडक घेतात(पण तुम्हाला धनूची साथ आहे तेव्हा हा परीणाम कमी असेल.. तडकाफडकीचा). बिंधास्त असतात. कचरत नाहीत.. हे असे आहे... ते असे पाहिजे तर चांगले अश्या रीतीने मांडण्यात. आवाजात धार (pitch) असते. किरकिरा नसतो व बारीक पण नसतो पण एक प्रकारचा pitch असतो. धनूची साथ असल्याने मंगळाचा जो काही कडकपणा असतो तो जरा कमी होतो इथे.

    धनू गुरुच्या अधिपत्याखाली येते. धनूचे गुण वरती लिहिलेतच कुणीतरी. तरी लिहिते,
    वैचारीक स्वातंत्र्य आवडते.
    देव- देव ज्यास्त नाही पण योग्य प्रमाणात दिसतेच(नास्तिक नाही पण मीनेचा गुरु देव-देव,पोथ्या पुराण, पूजा वगैरे करतो बर्‍यापैकी तसे धनूचे नाही),
    नीट काम करायची वृती असते(कामात ऑर्गनाएज्ड),
    लीड करायला आवडते/करतात चांगले(त्यात मेषेचा परीणाम) म्हणजे लीड करणार संधी घेवून.
    एकप्रकारचा धुर्त पणा असतो वागण्यात/बोलण्यात. आपले निर्णय आधीच जाहीर करत नाहीत, योग्य वेळ आली की मगच स्पष्ट पणे मांडून मोगळे होतील. (धुर्त पणा असला तरी पण कपटीपणा नसतो धनू मध्ये, मंगळ नीच असेल तर मग कपटी), बुध साथीला असेल तर विनोदी स्वभाव.
    बोलता बोलता फटकारतील विनोदाच्या नावाखाली.

    आता हे ग्रह एकटे असतील पत्रीकेत व आपल्या स्वराशीत तर नेहमीच चांगले गुण असतात. राहू, केतु ,नीच बुध असतील तर जरा खतरनाक.;)

    मंगळ पत्रीकेत तिसर्‍या घरात खूप पराक्रमी बनवतो व्यक्तीला. पाचव्या स्थानात खेळात विजय वगैरे.. (बहुधा सचिनचा असावा, मला माहित नाही)

    लग्नरास गुरुच्या प्रभावाखाली(धनू, मीन) असे असेल तर दिसायला चांगले पण जाड, रुंद बांधा असतो बहुतेकांचा. (सचिन तेंडूलकर बघा हे एक उदाहरण). पटकन जाड होतात गुरु राशीचे लोक.

    बरीच भटगिरी केली आजच्या दिवसात. Proud

    आवाजात धार (pitch) असते. हे एकदमच पटलं झंपी Happy
    आणि रास मेष आणि लग्न कर्क असेल तर काय होतं? म्हणजे स्वभावाचं म्हणते मी.

    मग लाजो, "थोडं मीठ घाला, अंदाजाने." हे वाक्य तुझ्या पाककृतीत सापडलं तर काय करायचं?<<< मंद्या, माझ्या रेसिपीत असं नाही लिहीत मी... 'चवीप्रमाणे' किंवा 'चवीनुसार' असे लिहीते...

    आणि लिहीलच कधी तर तो जो 'अंदाज' असेल ना, तो अंदाज माझ्यासाठी पर्फेक्टच असेल...... Happy मीठ कमी नाही की जास्त नाही .... पर्फेक्ट प्रमाण Happy

    बादवे, किती रेसिप्या वाचल्या आहेस रे माझ्या???? एकाही रेसिपीवर कधी तुझी प्रतिक्रिया आलेली आठवत नाही..... असो Happy

    मस्त धागा आहे Happy

    आता माझ्याविषयी - मी आणि बायकोचं षडाष्टक योग (प्रीती) आहे.
    माझी राशी - कर्क (आश्लेशा) चंद्ररास, सिंह - लग्न रास, मीन - सूर्यरास..
    बायकोची राशी - धनु (पूर्वाषाढ) - चंद्ररास, मिथून - लग्न रास, वृश्चिक - सूर्यरास

    -चला ओळखा स्वभाव! झंपीताई/ लिंबूदादा/ दिनेशदा/ मास्तुरेजी आणि नवोदित

    निंबेच्या प्रस्तावनेतल्या या वाक्यावरून "तिचे वय" ओळखा बरं कोणीतरी
    वृषभेच्या मुलींचे (महिलांचे म्हणणार होतो पण जीव प्यारा आहे ;)) वय ओळखणे हे डूआयमागचा चेहरा ओळखण्याइतके अवघड असते!!! Wink

    अरे व्वा, दिनेशभौ, मास्तुरे, झम्पी, मस्त सान्गताय की तुम्ही Happy प्लिज कन्टिन्यु!
    एक सहज म्हणून सान्गु पहातो, बघा पटतय का ते....
    मिथुन चन्द्र रास, ही बडबडी, उतावीळ्/चंचल, तुलनेत "बाल/तरुण" मानली जाते.
    जर बडबडीचा विचार करायचा तर,
    द्वितीयात कर्क रास, तिचा स्वामी चंद्र, द्वितीय स्थान वाचेचे स्थान.
    अर्थात द्वितीय भावाप्रमाणे, मिथुन व्यक्तिच्या वाचेवर चंद्राचा प्रभाव कायम असणार, चंद्राच्या कलेप्रमाणे बदलणार्‍यामुड्स प्रमाणे यान्चे बोलायचे विषय जसे बदलणार, तसेच बोलण्याची "तर्‍हा" देखिल बदलणार, व ती "समोर कोण आहे" यावर अवलम्बुन नसुन, "यांचा चंद्र" बोलते वेळेस काय स्थितीत आहे यावर असणार. हा झाला एक प्रकार.
    पण जास्त करुन काय बोलणार? कसे बोलणार? कोणते विषय हाताळणार? याकरता मात्र पुन्हा मागे लग्न राशीकडे जाऊन, लग्नकुन्डलित चंद्र कोणत्या स्थानी पडला आहे, त्या स्थानगत भावाप्रमाणेचे आधिक्य यांचे बोलण्यात आढळेल. पण यात डीपली जाणे खूप किचकट आहे, मेन्दुला झिणझिण्या आणणारे आहे, सबब केवळ विचारार्थ हे मुद्दे मान्डले असे.
    बाकी तुमचे चालुद्यात, मजा येत्ये वाचताना

    माझ्या आई-बाबांचा पण 'प्रितिशडाष्टक' योग आहे . . आई त्यावर म्हणते - " तो योग फक्त लग्नाच्या मूहुर्ताच्या वेळेलाच होता . . गुरुजी तेव्हडे सांगायचे विसरले. . " . .
    आई - वृश्चिक & बाबा - मेष Happy

    माझी चंद्ररास मेष आणि लग्नरास कन्या आहे. ह्या मिश्रणाचा नक्की अर्थ लावता येईल?

    मकरेबद्दल थोडं विस्तारून सांगा राव कुणीतरी

    आणि

    मकर-वृश्चिक काँम्बीनेशनबद्दलही सांगा

    >>> मी वृषभ आणि माझा नवरा तुळ..
    खूपच छान कॉम्बिनेशन आहे हे. दोन्ही शुक्राच्या राशी. एकीकडे रसिकता तर दुसरीकडे कलाप्रियता असते.>> धन्यवाद, मास्तरजी Happy

    limbutimbu | 16 February, 2012 - 22:58 >>>>> अगदी पटतंय

    >>>> चंद्ररास मकर आणि सौररास सिंह ह्यात स्वभाववर्णन करण्याकरीता कसा संबंध लावता येईल? <<<<
    अवघड आहे! नै म्हणजे, सिंहेत रवी असताना, आत्यन्तिक शिस्तबद्ध, हुकुमशाही, मोठमोठ्या कामान्ची स्वप्ने, अधिकारक्षेत्राबद्दल पराकोटीची जागरुकता वगैरे वगैरे सगळे आचरणात आणण्याचे "मनात/बुद्धित" असताना, प्रत्यक्षात त्याविपरीत, मकरेचा चंद्र, एकाजागी खिळवुन ठेवतो, गतीहीन करतो अशा वेळेस पराकोटीची नैराश्यावस्था येऊ शक्ते, मात्र त्यातुनही मकर "मकर आहे" म्हणुन तरुन जाते.
    या लोकान्च्या नादाला कुणी लागू नये, विनाकारण दुखाविण्याच्या भानगडीत पडू नये, कारण हे कॉम्बिनेशन, "सूड घेतल्याप्रमाणे" कितीही का वेळ लागेना, किरण साधून, समोरच्याला बेसावध खिन्डित पकडून, समोरच्याच्या खणखणीत कानफटात मारुन सव्व्याज परतफेड करुन उट्टे काढणार्‍यान्चे आहे.
    पण अदरवाईज, डिवचले नाहीत, तर यांचेसारखे कष्टाळू मित्रही मिळणे अवघड!

    लिंबूदा धन्यवाद!!

    नवीन काहीतरी माहीती मिळाली. वागण्याचे विश्लेषण करता येईल यापुढे.......

    माझी काही स्वभाव वैशिष्ठ्ये सांगतो, मकरेला सुट होतात का सांगा...

    १. एखाद्याविषयी बनलेले प्रतिकूल मत सहसा बदलीत नाही

    २. आयुष्याकडून जे मिळाले आहे त्याबद्दल काहीच तक्रार नाही आणि अती महत्वकांक्षाही नाही

    ३. अती स्पष्टवक्तेपणा

    ती आत्मविश्वास वाल्यांची कोणती रास? सगळेच अमरीक बहुतेक त्याच राशीचे असतात.
    कितीही चूकीचे बोलायचे झाले तरी आत्मविश्वासाने बोलतात. हॉस्पीटल्स अडीचच दिवस उघडे असल्याने असे होत असावे बहुतेक.

    बादवे, तुमची रास सांगतांना सिझेरीयन होते का ते ही सांगावे त्याने बराच फरक पडतो असे काही लोकांना वाटते.

    फक्त १२ प्रकार नाही काही, वास्तुशास्त्राचेही नियम ध्यानात घ्यावे लागतात. हॉस्पीटल उत्तराभिमूख होते का? डॉक्टरांची रास कोणती वगैरे. म्हणुन तर इतके वैविध्य.

    तुमच्या राशीवरुन जर तुमचा व्यवसाय ठरत असेल तर सर्व ज्योतीषी एकाच राशीचे का?

    मला नाही वाटत राशीवरुन तुमचा व्यवसाय ठरत असेल .. हो पण त्यातली आवड , यश यावर मात्र नक्किच परिणाम होत असणार.

    >>>१. एखाद्याविषयी बनलेले प्रतिकूल मत सहसा बदलीत नाही
    हा गुण सिंह व मकर दोन्हीमधे आहे. फक्त सिंह स्वतःच्या "अधिकाराच्या जरबेत" एकदा बनवलेले मत लादण्याच्या भुमिकेत असल्याने बदलत नाही. तर मकर एकदा बनविलेले मत, बदलण्याकरता "पुनर्विचार करण्याचाच कण्टाळा" करते.

    >>>२. आयुष्याकडून जे मिळाले आहे त्याबद्दल काहीच तक्रार नाही आणि अती महत्वकांक्षाही नाही
    हे लक्षण मकरेचे आहे. व "सिंहेच्या महत्वाकांक्षी" धोरणाच्या एकदम विरुद्ध आहे. (म्हणुनच तर मी वर "अवघड आहे" असे म्हणले)

    >>>३. अती स्पष्टवक्तेपणा
    हा गुण सिंहेचा आहे. (मात्र हे स्पष्टवक्तेपण, आपल्या "अधिकाराची जाणिव" दुसर्‍यास करुन देण्याकरता जरी नसले तरी पराकोटिच्या "अस्मितेतुन" नक्कीच उद्भवलेले असते. सिंहेची लोक, अमक बोलल्याने अमक्यास काय वाटेल अन तमक बोलल्याने तमक्यास काय वाटेल असला विचार कधीच करत नाहीत. जे असेल ते खाडकन बोलुन मोकळे होतात. मात्र तरीही, सिंहेबाबत, द्वितियस्थानी कन्या(बुधाचि) रास असल्याने, बोलताना "व्यावहारीक चातुर्य" देखिल दृगोच्चर होते.

    वा वा, एक्स्पर्ट कमेंटस.
    लिंबूजी नाऊ माय टर्न प्लीज

    माझी काही स्वभाव वैशिष्ठ्ये सांगते, वृषभाला सुट होतात का सांगा... Happy

    १) आत्मविश्वास, कितीही अवघड गोष्ट असेल, तरीही नेऊ आपण निभाऊन असाच अ‍ॅटिट्यूड
    २) संपुर्ण झोकून देण्याची वृत्ती (त्याबाबत मी कन्विन्स्ड असायला हवे फक्त) नात्यातली कमिट्मेंट असो वा प्रोफेशनल जबाबदार्‍यांतील
    ३) मनातून उतरलेल्या व्यक्तीला पुन्हा स्थान देणे, महत्त्व देणे- अशक्यच.
    ४) निवांत वेळेच्या शोधात, तो मिळाला की एकट्याने घालवायला जास्त आवडतो
    ५) अ‍ॅग्रेसिव्ह, प्रोटेक्टिव्ह, केअरिंग

    Pages