रवा बेसन लाडू

Submitted by सशल on 21 October, 2011 - 16:59
rava besan ladoo
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक रवा २ वाट्या
बेसन १ वाटी
साजूक तूप १ वाटी
साखर दोन वाट्या
पाणी (पाकासाठी) एक वाटी
भरपूर केशर आणि वेलची

क्रमवार पाककृती: 

तूपावर रवा भाजून घ्या खमंग ..

मग त्यातच बेसन घालून भाजा, खमंग, हाताला अगदी हलकं लागेल, रंगही बदामी यायला हवा ..

भाजून झाल्यावर हीट बंद करा ..

मग दुसर्‍या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करा ..

पाक झाला की तो रवा-बेसन मिश्रणात घाला, बरोबर केशर आणि वेलची पूड घाला ..

हे मिश्रण जसजसं गार होईल तसतसं आळत(?) जातं .. संपूर्ण गार झालं की लाडू वळा .. वळताना एक केशराची काडी लावा .. असं केलं तर फार सुंदर दिसतात लाडू ..

वाढणी/प्रमाण: 
छोट्या आकाराचे २०-२५ लाडू होतील
अधिक टिपा: 

सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..

ह्याच पाकाला काकू शेपूट येणारा पाक म्हणते म्हणजे चमच्याने पाक टेस्ट केला की तो भांड्यात पडताना शेपूट येतं .. Happy

ह्या रेसिपीने माझे लाडू आतापर्यंत कधीही फसलेले नाहीत, काकूने रेसिपी देताना फसणार नाहीत अशी ग्वाही दिली होती .. Happy

माहितीचा स्रोत: 
काकू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिता आणि sonalis धन्यवाद. वर्षा पाझरलेल्या खडकाचे लाडू वळून झाले की मग solid achievement केल्याचा फील येतो मात्र. ( हा..हा.. हसणारी बाहुली)

Pages