बारीक रवा २ वाट्या
बेसन १ वाटी
साजूक तूप १ वाटी
साखर दोन वाट्या
पाणी (पाकासाठी) एक वाटी
भरपूर केशर आणि वेलची
तूपावर रवा भाजून घ्या खमंग ..
मग त्यातच बेसन घालून भाजा, खमंग, हाताला अगदी हलकं लागेल, रंगही बदामी यायला हवा ..
भाजून झाल्यावर हीट बंद करा ..
मग दुसर्या भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करा ..
पाक झाला की तो रवा-बेसन मिश्रणात घाला, बरोबर केशर आणि वेलची पूड घाला ..
हे मिश्रण जसजसं गार होईल तसतसं आळत(?) जातं .. संपूर्ण गार झालं की लाडू वळा .. वळताना एक केशराची काडी लावा .. असं केलं तर फार सुंदर दिसतात लाडू ..
सगळं जुळून आलं तर फार मस्त लागतात हे लाडू ..
ह्याच पाकाला काकू शेपूट येणारा पाक म्हणते म्हणजे चमच्याने पाक टेस्ट केला की तो भांड्यात पडताना शेपूट येतं ..
ह्या रेसिपीने माझे लाडू आतापर्यंत कधीही फसलेले नाहीत, काकूने रेसिपी देताना फसणार नाहीत अशी ग्वाही दिली होती ..
..... असं तर लक्षात ठेवेन.>>>
..... असं तर लक्षात ठेवेन.>>>>+१
अभेद्य खडक...खडकाला पाझर....
अभेद्य खडक...खडकाला पाझर....
लाडू वलायचा कंटाळा आला तर
लाडू वलायचा कंटाळा आला तर वड्या पाडा
अस्मिता आणि sonalis धन्यवाद
अस्मिता आणि sonalis धन्यवाद. वर्षा पाझरलेल्या खडकाचे लाडू वळून झाले की मग solid achievement केल्याचा फील येतो मात्र. ( हा..हा.. हसणारी बाहुली)
हो हो नक्कीच येत असेल.
हो हो नक्कीच येत असेल.
दिवाळीनिमित्ताने धागा वर
दिवाळीनिमित्ताने धागा वर काढतेय. सशलची एक खूप छान पाककृती. मस्त लागतात हे लाडू.
Pages