..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही, माधव. आता सांगून टाकते. गंमत तर कळली आहेच.

कोडं क्र. ०३/०९७

रियाचं रीतेशवर भारी प्रेम. पण रीतेशला ती आवडतच नसते. आणि आवडत असती तरी तो तिच्यावर प्रेम करू शकत नसतो कारण त्याचं एक सिक्रेट असतं. रीतेशचे वडील एक जादुगार असतात. त्यांनी रीतेशचं हृदय काढून एका क्रीस्टल बॉलमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे जर रीतेशचं हृदय जिंकायचं असेल तर तो क्रीस्टल बॉल पळवून नेणे हाच उपाय असतो. रीयाला कुठूनतरी हे सिक्रेट कळतं. एके दिवशी ती हळून रीतेशच्या खोलीत शिरते, त्याचं कपाट उघडते आणि क्रीस्टल बॉल घेऊन पळून जाणार तितक्यात रीतेश तिथे येतो. त्याला ती तशीही आवडतच नसल्याने, तो तिला हा क्रीस्टल बॉल घेऊन जायला मनाई करतो आणि तिला तेथून जायला सांगतो. कसं?????????

उत्तर :

Go Riya, चुरा ना मेरा जिया
Go Riya, चुरा ना मेरा जिया Proud

गो-रिया चुरा ना मेरा जिया

माधव आणि श्रद्धा यांच्या खांद्यावर चढून हंडी फोडली.

धन्यवाद, लोक्स! Happy

आता मीच जाऊन नॅचरल्सचं शहाळ्याचं आईस्क्रीम खाऊन येते. पण माधव आणि श्रद्धाला एक स्कूप विभागून देण्यात येईल. Proud

ईना मीना डिका, माका नाका नाका
चिका फिका रिका, रोला रिका रोला रिका
राम फाम फो.................... स्वप्नाला हवीत ती नावे यात आहेत का Happy

कोडं क्र. ०३/०९८
गो मामे बरोबर Happy

दुनिया में ऐसा कहा सबका नसिब है
कोई कोई अपने पिया के करीब है

जिप्सी, कंजूषपणा सोड. आता एक घसघशीत बक्षीस दे. मला ते भमंना देखिल द्यावं लागेल. त्यांनी सगळे शब्द लिहून माझं काम एकदम सोप्पं केलं.

जिप्स्या....

मामीला आंबे पोहोचवायचे असतिल, किंवा आयस्क्रीम द्यायच असेल, तर मी आहेच पवईत. तुझ्या ऑफिस मधे येते ४ बिल्डींग सोडून तर आहे.

मामी तुझे बक्षिस मी घेते...... एकही कोडं न सोडवल्या बद्दल खरं तर तु ते मलाच द्यायला पाहिजेस... आणि आपल्या दोघींचे नाव पण सेम आहे की नाही..... मग ही मीरा काय नी ती मीरा काय...

जिप्स्या.... कुठल्या तरी मीराला गीफ्ट दिल्याशी कारण.....काय!!!!!

मोकिमी तुच ये, पण १२:३० नंतर मी आता घरीच आहे Happy

( हा हा हा...अत्ता जिप्स्याची दानत कळेल...)>>>>>बिनधास्त ये Wink खाली ड दुकानात हापूस आलेच आहे. Wink

कोडं क्र. ०३/०९९

रसायनशास्त्राचा तास सुरू असतो. विषय असतो : पाणी. पाण्याबद्दल सगळी माहिती देऊन झाल्यावर सर विद्यार्थ्यांना काय म्हणाले?

>>पण १२:३० नंतर मी आता घरीच आहे

लकी रे जिप्सी......निदान कांदाभजी तरी करून खा आम्हा सगळ्या ऑफिसमधे असणार्‍यांच्या वतीने

एकदम करेक्टवा, माधव!

कोडं क्र. ०३/०९९

रसायनशास्त्राचा तास सुरू असतो. विषय असतो : पाणी. पाण्याबद्दल सगळी माहिती देऊन झाल्यावर सर विद्यार्थ्यांना काय म्हणाले?

उत्तर :
ये जीवन है, इस जीवन का
यही है , यही है, यही है रंगरूप

कोडं नं ००३/१००

एकदा एक कोळी जाळं विणत असतो. जाळ्यात एक माशी अडकते. ती माशी खुप तडफड करते. पण काही सुटता येत नाही. तेवढ्यात मीसेस कोळी येते. ती पकडलेली माशी बघुन खुप खुश होते. आणि माशी खायला तिच्या दिशेने यायला लागते. कोळी भडकतो. आणि बायकोशी भांडायला लागतो. त्यांची मारामारी होते. ते बघुन ती माशी कोणतं गाणं म्हणेल?

मोकीमी, हिंदीच गाणं आहे ना?

मला मार दिया जाये के छोड दिया जाय आठवतंय. पण ते माशी कशी म्हणेल?

नाही मामी...

क्लु १. हे गाणं एकदम टुकार आहे
२. सीनेमा एकदम गाजलेला आहे
३. हे गाणं जी हीरवीण म्हणते ती ही टुकार आहे ( आणि हो तिरळी पण आहे)

मला वाटतं शेवटचा क्लु महत्वाचा आहे.

Pages