..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मो की मी यांच्या कोड्यात 'मेरी' शब्द असेल? पहिल्या चित्रातली बॉक्सर मेरी कोम नाही>>>>

मेरी आहे पण मेरी कोम नाही

बागेश्री, माधव बिंगो!!!!! Happy

चित्रकोडे : ००३/७९
ये जीना है अंगूर का दाना
कुछ कच्चा है कुछ पक्का
जितना खाया मिठा था
जो हात न आया खट्टा है
खट्टा मिठा

कोडे: ००३/८१

आता मिळवलेल्या पैश्यातून पोरांची शिक्षणं त्यांच भवितव्याची जडण- घडण अवघड दिसायला लागली, तेव्हा देवा-विठा नं, रात्रपाळीचेही कामं करण्याची तयारी केली.
शहरात फ्लायओव्हरचे काम काढले होते, तिथे दिवस-रात्र कामं सुरू होती, देवा- विठाने आता दिवसभरात सकाळचे ६ ते १०, अशी ४ तासांची विश्रांती घ्यावी नी बाकीच्या वेळात फक्त कामं उपसावी- दमत रहावं! पोटच्या पोरांना घडवण्यासाठी हे मोठं पाऊल त्यांनी उचललं. स्वतःच्या श्रमातून घडणारे जीवन त्यांच्यातील प्रेम वृद्धिंगतच करत होते... अशीच कामे संपवून, उजाडाताना, दोघे घरी निघाले असताना, विठाच्या श्रमत्यागावर भुलून देवा गाणं गातो-आणि विठाची कळी खुलते- कोणतं?

बागे, मराठी गाणं हाय का?
जर असेल तर

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव
तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव
....दिस जातील दिस येतील...

मराठी असतं तर हे फिट्टं होत, पण हिंदी गाण्याला मनात धरून मी हे कोडं टाकलंय
आणि तुझं चित्रकोडं "मेड इन इंडिया" आहे का? Wink

येस माधव, बुल्ज आय! Happy

कोडे: ००३/०८१
उत्तर : रात के हमसफर थक के घर को चले
झुमती आ रही है सुबह प्यार की....

पू-कार Lol

माझं कोडं ओळखताय की उत्तर देऊ?
००३/०७६ : अजितच्या तपश्चर्येला अखेर फळ आले. आपल्या नव्या कोर्‍या कारने घरापर्यंत सोडतो, अशी त्याच्या ऑफिसातल्या दीपालीला, त्याने दिलेली ऑफर तिने स्वीकारली. पण शेजारी दीपाली बसलेली असताना नीट लक्ष देऊन ड्राइव्ह करणे सोपे का होते? फ्लाय ओव्हर, सब वे,वन वे , नो लेफ्ट टर्न अशा घोळात त्याने एक वळण चुकवले आणि तिचे घर मागे टाकून भलतीकडेच जाऊ लागला. चाणाक्ष दीपालीच्या हे लगेच लक्षात आले. अजितची चूक तिने कोणत्या गाण्यातून लक्षात आणून दिली असेल?
क्लू : १ चित्रपटातील व्यक्तिरेखांची नावे कोड्यात आहेत
२. संगीतकार माधवच्याच कोड्यातले पण गायिका त्याची नेहमीची नाही.
३: ती त्याला यू टर्न घ्यायला सांगते

चला मी आता दोन तास ट्रेनिंग द्यायला जातोय. नंतर कुणी असेल तर भेटुच. Happy

००३/८० चा क्लु:

हेच कोडे दिनेशदांनी भाग १, २, ३ पैकी एकात विचारले होते त्याचेच मी चित्रकोडे केलंय. (आता बसा शोधत "....तर्/तो कुठलं गाण....."ची ४०००-४५०० पानं). Happy Happy

००३/०८० सात समुंदर पार से गुडियों के बाजार से
अच्छीसी गुडिया लाना गुडिया चाहे ना लाना पप्पा जल्दी आ जाना

००३/०७६ -
पलट मेरी जान तेरे कुर्बान ओ तेरा ध्यान किधर है
उंचे निची टेढी मेढी प्यार कि डगर है, जाता किधर है, रस्ता इधर है

स्निग्धा पर्फेक्ट तुम्हाला गारेगार पन्हे

००३/०७६ : अजितच्या तपश्चर्येला अखेर फळ आले. आपल्या नव्या कोर्‍या कारने घरापर्यंत सोडतो, अशी त्याच्या ऑफिसातल्या दीपालीला, त्याने दिलेली ऑफर तिने स्वीकारली. पण शेजारी दीपाली बसलेली असताना नीट लक्ष देऊन ड्राइव्ह करणे सोपे का होते? फ्लाय ओव्हर, सब वे,वन वे , नो लेफ्ट टर्न अशा घोळात त्याने एक वळण चुकवले आणि तिचे घर मागे टाकून भलतीकडेच जाऊ लागला. चाणाक्ष दीपालीच्या हे लगेच लक्षात आले. अजितची चूक तिने कोणत्या गाण्यातून लक्षात आणून दिली असेल?
क्लू : १ चित्रपटातील व्यक्तिरेखांची नावे कोड्यात आहेत
२. संगीतकार माधवच्याच कोड्यातले पण गायिका त्याची नेहमीची नाही.
३: ती त्याला यू टर्न घ्यायला सांगते

पलट मेरी जान तेरे कुर्बान ओ तेरा ध्यान किधर है
उंचे निची टेढी मेढी प्यार कि डगर है, जाता किधर है, रस्ता इधर है

ओये जनता, माझी २ कोडी पेन्डींग आहेत. प्रयत्न करताय का उत्तर देऊ? धाग्याचा वेग पहाता आजच्यानंतर पेंडिंग ठेवण्यात मतलब नाही.

स्निग्धा, हे घे कोडी आणि क्लूजः

कोडं क्र. ०३/०६४

घनश्याम आणि संध्याचं प्रेम कॉलेजपासूनचं. दोघं लग्न करणार असं जवळजवळ सगळेच धरून चालले होते. पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि दोघे विभक्त झाले. घनश्याम परदेशात निघून गेला आणि संध्याने दक्षिण भारतातल्या एका छोट्यश्या खेड्यात एनजीओसाठी काम सुरु केलं. निलगिरीच्या कुशीत वसलेलं ते गावं तिला इतकं आवडलं की तिथेच तिने आपलं एक घरकुल उभारलं आणि त्याला नाव दिलं ते निलगिरीच. तिचं काम लोकांना इतकं आवडलं की पंचक्रोशीत लोक तिला ओळखू लागले. दिवसा गर्द झाडीतून उतरणारी, जमिनीवरच्या सावलीशी खेळणारी उन्हं, खळाळत वाहणारा झरा, डोंगरमाथ्याशी उतरलेले ढग ह्यांच्या सोबतीनेच तिने उरलेलं आयुष्य काढायचं ठरवलं.

आणि घनश्याम? काही वर्ष परदेशात काढल्यावर त्याने भारतात परतायचा निश्चय केला. आल्या आल्या त्याने संध्याचा पत्ता शोधला. काही कॉमन मित्रांच्या मदतीने त्याला ती दक्षिण भारतात असल्याचं कळलं. विमान, कार असा प्रवास करर करत तो जवळच्या शहरात पोचला. आता त्याला त्या गावाचा ठिकाणा शोधायचा होता. पण मधल्या प्रवासाच्या शिणाने आणि संध्या भेटेल की नाही ह्या काळजीने तो गावाच नाव विसरला. पण संध्या त्या भागात प्रसिध्द असल्याचं त्याला ठाऊक होतं म्हणून त्याने तिचाच पत्ता विचारला. एका गावकर्‍याने चक्क हिंदी गाणं म्हणून त्याला तो पत्ता सांगितला तो इतका अचूक की काही मिनिटातच घनश्याम संध्याच्या घरी जाऊन पोचला.

मग पुढे? अहो, मी काय रोमॅन्टिक सिनेमाची गोष्ट सांगतेय का? कोडं आहे हे. समजून घ्या ना राव. हिंदी पिक्चरप्रमाणे सगळं गोडच झालं शेवटी. पण तुम्ही त्या गावकर्‍याने म्हटलेलं हिंदी गाणं ओळखताय ना?

क्लू: ह्या गाण्यातला एक महत्त्वाचा शब्द तीन दिवसांपूर्वीच्या एका कोड्यात होता.

कोडं क्र. ०३/०६५

इन्स्पेक्टर रवी धर्माधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिध्द होता. त्याला दिलेली कामगिरी पार पडणारच असा त्याचा नावलौकिक होता. मागच्या वर्षीपासून दर ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन कोणी गाडी चालवत नाहिये ना हे पाहण्याची जबाबदारी त्याने वरिष्ठांकडून मागून घेतली होती. अनेकांना ह्यचं आश्चर्य वाटलं. पण फक्त १-२ लोकांनाच माहित होतं की २ वर्षांपूर्वी रवीचा बालमित्र अश्याच निष्काळजी ड्रायव्हरच्या चुकीमुळे गेला होता.

ह्या वर्षीही शहरातल्या रहदारीच्या नाक्यावर रात्री ११ वाजता रवीने आपली व्हॅन उभी केली. आत्तापर्यंत तपासलेल्या १० वाहनातले सगळेच्या सगळे ड्रायव्हर्स टाईट होते. सगळ्यांची रवानगी तुरुंगात करायचे आदेश त्यांना हाताखालच्या अधिकार्‍यांना दिले होते. 'साहेब आता वाईट मूडमध्ये आहेत. पुढच्या गाडीतल्या ड्रायव्हरचं काही खरं नाही' असं ते आपापसात बोलत होते.

एव्हढ्यात एक लाल रंगाची टोयोटा वेगात आली. झालं! रवीच्या सहकार्‍यांनी ती थांबवली. ड्रायव्हिंग करणारी तरूणी जेव्हा गाडीबाहेर पडली तेव्हा सगळेच बघतच राहिले इतकी ती सुंदर होती. पण रवीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याने सहकार्‍याला तिची breath analyze करयला सांगितलं. त्यात काहीही आढळलं नाही. मान वर न करताच रवी गुरकावला 'चालून दाखवा सरळ रेषेत'. ती तरुणी मुकाटपणे चालायला लागली आणि तेव्हाच रवीने मान वर केली.

मग काय झालं माहित नाही. ती चालत होती ती रेषा भूमितीच्या कुठल्याही व्याख्येनुसार सरळ नव्हती. पण रवी बघतच राहिला. कळस म्हणजे त्याने त्या तरुणीला नुसती तंबी देऊन सोडून दिलं.

दुसर्‍या दिवशी त्याच्या युनिटमधल्या पोलिसांच्या तोंडी एकच गाणं. ओळखा पाहू.

क्लू: खोटयाच्या कपाळी गोटा

भरत बरोबर Happy

००३/०८०

सात समुंदर पार से गुडियों के बाजार से
अच्छीसी गुडिया लाना गुडिया चाहे ना लाना पप्पा जल्दी आ जाना

Pages