Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42        
      
    मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
शिवरंजनी रागातलं असेल हे
शिवरंजनी रागातलं असेल हे गाणं.
मी पण भाजप म्हणून चिखलातल्या
मी पण भाजप म्हणून चिखलातल्या कमळाचा शोध घेतला.
शिवरंजनी रागात बांधलेलं गाणं असेल.
एलपीचे आणखी एक गाणे आवडले.
या रागातली रडकी गाणीच जास्त
या रागातली रडकी गाणीच जास्त वाजली, त्या मानाने हे सुंदर गाणे मागे राहिले.
बावर्ची मधले, तूमबीन जीवन कैसा जीवन.. हे मन्ना डेचे गाणे पण याच रागातले.
शिवरंजनी रागातलं असेल हे गाणं
शिवरंजनी रागातलं असेल हे गाणं >> ओह!! असा विचारच केला नाही
माझे अजुन एक "मासूम" कोडे.
माझे अजुन एक "मासूम" कोडे.
चित्रकोडे: ००३/९२
 क्लु:
क्लु:
०१ गाणे हिंदी आहे.
०२ गाण्यात एक हिर्वीन आहे आणि एक हिरो.
०३ हिर्वीनीचे बोल गायिका गाते आणि हिरोचे बोल गायक गातो.
०४ हे चित्रकोडे आहे त्यामुळे चित्रांचे संबंध जुळवून कोडं सोडवा,
०५ गाण इस्टमन कलर मध्ये आहे.
पुणेरी तळटिपः
१. वर एक सोडुन भाराभर ५ क्लु दिले आहे (चिंधी असले तरी). त्यामुळे अजुन एखादा क्लु मागु नये. मागितल्यास कडक शब्दात कानउघाडणीकरण्यात येईल.
२. कोड्याचे उत्तर पहिल्याच प्रयत्नात ओळखल्यास ६ हापूस आंबे देण्यात येईल.
३. दुसर्या तिसर्या प्रयत्नात ओळखल्यास बाटलीबंद आमरस देण्यात येईल.
४. पहिल्याच प्रयत्नात उत्तर ओळखणार्याने बक्षिस घेण्यास येतेवेळेस कापडाची पिशवी आणावी आमच्या इथे पिशवी मिळणार नाही.
५. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पिशवी कापडीच आणावी प्लास्टिकची पिशवी दिसल्यास दोन आंबे वजा करून फक्त चारच देण्यात येईल.
६. एकही आंबा नासका निघाल्यास आमची जबाबदारी नसणार, मागाहुन कटकट केलेली खपवून घेतली जाणार नाही.
७. बक्षिस घेण्यास कोडं ओळखल्यानंतर पाच मिनिटाच्या आत संपर्क साधावा. सहाव्या मिनिटाला संपर्क साधल्यास बक्षिस मिळणार नाही.
८. हापूस आंबे घेण्यास सकाळी १० ते १ आणि संध्याकाळी ४ ते ६ याच वेळेत यावे. १ ते ३ आमची वामकुक्षीची वेळ असते (ऑफिसात असलो तरी).
९. तटि वाचण्यापेक्षा कोडं सोडवण्यात जास्त वेळ द्या, नाहीतर दुसराच कुणीतरी हापूस आंबे घेऊन जाईन.
पलट मेरी जान, तुझपे कुर्बान
पलट मेरी जान, तुझपे कुर्बान तेरा ध्यान किधर है?
उंची निची तेढी मेढी प्यारकी डगर है
नाही स्वप्ना
नाही स्वप्ना
चित्रकोडे: ००३/९२ उत्तरः हजार
चित्रकोडे: ००३/९२
उत्तरः
हजार (हज + आर) राहे जो मूड के देखी
कहीं से कोई सदा ना आयी
बडी वफा से निभाई तुमने
हमारी थोडी सी बेवफाई
अक्षरी, बरोबर वाटतंय पण इमेज
अक्षरी, बरोबर वाटतंय पण इमेज १ आणि ३ चा संदर्भ नाही लागला. इमेज ३ कय आहे?
जिप्सण्णा ओ पण तुम्ही
जिप्सण्णा
ओ पण तुम्ही कानउघाडणी करणार नाही असे चित्रात सांगितले आहे ना? मग तळटीपेत अशी पलटी का मारली आहे?
अक्षरी जिप्सी ५ मिनीटे तरी उत्तर बरोबर आहे असे म्हणणार नाही. (त.टि. ७) तू त्याच्या आधीच त्याला संपर्क कर.
तिसरे चित्र कसले आहे? अशी धूसर चित्रे देऊन कोडे घातल्यास त्याला ६ आंब्यांचा दंड होइल - माम्कुमावरून!
स्वप्ना, इमेज एक दोन चित्रं
स्वप्ना, इमेज एक दोन चित्रं एकत्र करून ही एक इमेज आहे : आर (पार वर कट मारलाय). म्हणजे हज + आर
जी तुला इमेज तीन वाटतेय ती इमेज दोन आहे बघ. चुटकी ("चुटकी भर सिन्दूर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू" )/ pinch ( of salt) = थोडी सी
००३/९३: जीवनकडे एक पश्मीना
००३/९३: जीवनकडे एक पश्मीना लोकरीचा सुंदर स्वेटर असतो. त्यात दोन ढेकुण (तो आणि ती) रहात असतात. दोघांचे एकमेकांवर ख्प प्रेम असते. जीवन एकदा तो स्वेटर सुक्या स्वच्छतावाल्याकडे देतो. तेंव्हा ती-ढेकुण मरते तर तो-ढेकुण कुठले गाणे म्हणेल?
अक्षरी, तुला __/\__ ग बायो
अक्षरी, तुला __/\__ ग बायो
मी पण मी पण पण नंतर दाढ
मी पण

मी पण
पण नंतर
दाढ काढल्यामुळं गाणी म्हणता येईनात
माधव, जीवनके सफरमे राही?
माधव, जीवनके सफरमे राही?
००३/९३: जीवन ने धोका दिया
००३/९३: जीवन ने धोका दिया टाईप्स असणार .... काय बरं .....
'मी पण मी पण' असे चार शब्द
'मी पण मी पण' असे चार शब्द म्हणता आलेच ना? मग 'गाणी' हा एकच शब्द म्हणता येऊ नये?
स्वप्ना बरोबर. तुला
स्वप्ना बरोबर. तुला ठाणा-हापुसची एक पाटी बक्षीस.
००३/९३: जीवनकडे एक पश्मीना लोकरीचा सुंदर स्वेटर असतो. त्यात दोन ढेकुण (तो आणि ती) रहात असतात. दोघांचे एकमेकांवर ख्प प्रेम असते. जीवन एकदा तो स्वेटर सुक्या स्वच्छतावाल्याकडे देतो. तेंव्हा ती-ढेकुण मरते तर तो-ढेकुण कुठले गाणे म्हणेल?
उत्तरः जीवनके स-फर मे राही मिलते है बिछड जाने को
पण ते ड्रायक्लिनिंग न म्हणता
पण ते ड्रायक्लिनिंग न म्हणता सुका स्वच्छतावाला म्हटलंय त्यात काहीतरी गोम दिसतेय
सुका स्वच्छतावाला >>> हे रेड
सुका स्वच्छतावाला >>> हे रेड हेरींगच निघालं का!
माधवा, आता पश्मिना स्वेटर मला
माधवा, आता पश्मिना स्वेटर मला कोणी फुकट दिला तरी मी घेणार नाही रे. मला तुझे ढेकूण आठवतील हापूसबद्द्ल धन्स
 हापूसबद्द्ल धन्स
मामी, पोस्टी झाल्यात ९८१ (ही धरून) आणि कोडी ९३. कोड्यांची शंभरी आणि पोस्टींचे १०००+ झाले की टाळं ठोका इथे.
घरून कापडाची पिशवी घेऊन गेलीस
घरून कापडाची पिशवी घेऊन गेलीस का गं? जिप्सी लै आखडूपणा करून र्हायलाय सध्या! का रे श्रीनगरला जाणारेस की पुण्याला शिफ्ट होतोयस? आँ?????
हम्म्म्म .... चांगलीये
हम्म्म्म .... चांगलीये कल्पना. चला कामाला लागा पटापट ...
कोडं क्र. ००३/९४ समशेरसिंगचं
कोडं क्र. ००३/९४
समशेरसिंगचं जसपिंदरकौर वर प्रेम असतं. पण पुढे तो सैन्यात जायचं ठरवतो आणि ट्रेनिंगला निघून जातो. इथे जस्सी त्याची वाट बघत बसलेली असते. पण तो तिला एक 'मला विसरून जा' टाईप पत्र पाठवून त्यात लिहितो की आता ट्रेनिंग संपल्यावर त्याला कुठे जावं लागेल ते माहित नाही. पण तो नेहमीच तिची आठवण ठेवेल. कोणतं गाणं लिहितो तो त्या पत्रात?
सगळेच अक्षरी बरोबर हापूस
सगळेच


अक्षरी बरोबर
हापूस आंबे घेऊन जाणे.
चित्रकोडे: ००३/९२
हजार राहे मूड के देखी
कहीं से कोई सदा ना आयी
बडी वफा से निभाई तुमने
हमारी थोडी सी बेवफाई
चित्रांबद्दल बरोब्बर माहिती दिल्याबद्दल अक्षरी यांना अजुन ६ हापूस आंबे बक्षिस देण्यात येते. (येताना कापडी पिशवी घेऊन येणे).
 (येताना कापडी पिशवी घेऊन येणे).
००३/९४ >> इतना ना मुझसे तू
००३/९४ >> इतना ना मुझसे तू प्यार बढा की मै एक बादल आवारा
कैसे किसी का सहारा बनू के मै खूद बेघर बंजारा ?
शेवटच्या दशकात आपलाही हातभार
शेवटच्या दशकात आपलाही हातभार लागावा म्हणून आत्ताच ऑफिसच्या बाहेर शतपावली करून कोडं योजून आले
कोडं क्र. ००३/९५:
समीरची सध्या फारच गोची झालेली होती. त्याच्या ऑफिसात ३-३ नव्या मुली आलेल्या होत्या. महकची फिगर अवरग्लासलाही लाजवेल अशी होती. मायाचे डोळे एव्हढे बोलके होते की तिला काही बोलायची गरजच पडू नये. आणि शलाका? ती तर कल्पनेपेक्षाही सुंदर होती. पण तिघींपैकी एकही त्याच्याकडे ढुंकून पहात नव्हती. एकीलातरी पटवून दाखवेन अशी त्याने पैज मारली खरी पण काहीच सुचत नव्हतं. शेवटी एक मित्र मदतीला आला. त्याने एक असलं अफलातून गाणं सुचवलं की तिघींपैकी एक नक्कीच पटेल आणि वर चप्पल खायला लागणार नाही ह्याची हमी. समीरने तर त्याला 'तूच रे माझा खरा मित्र' म्हणून मिठी मारली. ओळखा गाणं
००३/९६: प्रा. विसरभोळे अत्यंत
००३/९६: प्रा. विसरभोळे अत्यंत हुशार अणि विद्यार्थ्यांत लोकप्रिय असतात. पण नावाप्रमाणेच विसरभोळे. कधी काय आठवेल आणि काय विसरायला होइल ते सांगता येत नाही. त्यांच्या वर्गात बरखा, गुलाब आणि रसिका या विद्यार्थीनी असतात. तिंचींचे आडनाव एकच असते. रसिकाला संशोधनातली शिष्यवृत्ती मिळते ते सांगायला म्हणून ते वर्गात येतात पण तिचे नाव, आडनाव दोन्ही विसरतात. अर्रर्र, आता काय करायचे? पण मग त्यांना आठवते की त्याच आडनावाच्या दोन मुली या वर्गात आहेत. त्यांचीही नावे त्यांना पूर्णपणे आठवत नाहीतच पण त्यांची इनीशिअल्स मात्र आठवतात. या धाग्यावरून ते रसिकाचे नाव सार्या वर्गाला विचारतात - एका गाण्यातून. कुठले गाणे?
००३/९५:: पतली कमर है तिरछी
००३/९५:: पतली कमर है तिरछी नजर है खिले फुलसी तेरी जवानी कोइ बता दे कहा कसर है?
माधव, एकाच गाण्यात तिघींना
माधव, एकाच गाण्यात तिघींना नावं घेऊन पटवायचं आहे.
Pages