बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, तीव्र शिशिर येणार या कारणाने शैशारिक गटग पोस्टपोन ?
मी वृत्तान्त लिहायला घेतला होता Proud

कोणाला हनी वोडका विकत हवी आहे का? हवी असेल तर सांगा.
$३० ला मोठी बाटली. मी फोटो टाकेन एक दोन दिवसात. माझ्या एक एक्स्ट्रा पडून होती जी बूक झाली आहे. अजून कोणाला हवी असेल तर मला आताच सांगा कृपया.

अनुभवातून शिकतो माणूस (म्हणजे मानव, माणूस आयडी नाही).

"२००३ च्या मार्च महिन्यातल्या गटगला तुम्ही अमुक तमुक सोय देणार म्हणाला होता आणि अजून कशी दिली नाही?" अशा प्रश्नांची सवय झाल्यावर दुसरं काय होणार ! Happy

बुवा गुळाच्या पोळ्यांची ऑर्डर पुढच्या शनीवारपर्यंत ढकललीत या बद्दल धन्यवाद.

थोडे आधी कळले असते तर मी रं पा घेऊन आलो नसतो. आता घरी रं पा नि मी डायेट जिंजर एल पिणार!!
नाहीतर परत दारूच्या दुकानात! तो म्हणेल, च्यायला काय बेवडा आहे म्हातारा!
म्हणू दे, मला काय त्याचे?

म्हणजे मानव, माणूस आयडी नाही.
तोहि शिकेल हो!हुषार असला तरी तसा लहान आहे अजून, जरा चाळीस वर्षाचा झाला की हळू हळू अक्कल येऊ लागेल, मग कळेल त्यालाहि. नाहीतरी चाळीशीच्या आतल्या कुणाला कश्शातले काही कळत नसते, उगाच बोलत असतात!!
Happy Light 1

अजय,
केंद्र सरकारच्या नव्या सायबर कायद्यातील कलम १२ ड परिशिष्ट ४ अन्वये वेबमास्तरांना गटगला हजर राहून त्याच्या विहित नमुन्यातील वृत्तांताच्या तीन सत्यांकित प्रतिलिपी आपल्या प्रतिज्ञापत्रासह विभागीय आयुक्तलयात सादर करणे अनिवार्य आहे.

किंवा कुणा कारकुनाला ५० रुपये द्या!! लाच दिली की भारतातला कुठलाहि कायदा पाळला नाही तरी चालतो.
Proud

आणखी फोटो नकोत का? गटगला आलेल्या सगळ्यांचे?
मी ऐकले आजकाल भारतात सगळीकडे फोटो मागतात, बँकेत खाते उघडायला, मोबाइल घ्यायला नि मी तर ऐकले की लोकलने पार्ल्याहून दादरला जायचे असले तरी दर वेळी एक नवा फोटो द्यावा लागतो!! नाहीतर आहेच, ५० रुपये द्या! मग कसला कायदा नि काय?

फक्त कसाब, अफजल गुरु यांच्यासारख्यांना तो कायदा नाही!
Proud Proud

बुवा,
मोठी असेल तर ठेवा माझ्यासाठी.
सप्री,
वर नावनोंदणी कर.

समोश्याची ऑर्डेर कॅन्सल केली आहे.

गटग पुढे ढकलले ते बरेच झाले. स्नो फार आहे. तसदीबद्दल मैत्रेयीचा गटग मध्ये हार तुरे देऊन सत्कार करुयात.

भाई, मागच्या वेळी तुम्ही जी पाहिली होती तशीच मिळेल तुम्हाला. मी आपल्या सगळ्यांकरता एरवी पेक्षा मोठी म्हणजे डबल साईजची घेतली आहे. आणून ठेवतो आता तुमच्या करता एक.
विकु Lol

>>$५५ ला भाई.>> काय चाल्लय काय? भाई, तुम्ही ऐकून कसं घेता? Proud
फुक्कट पोस्टी पाडायला आणखीन एक आठवडा मिळाला. टार्गेट १०००.

७०० व्हायला आल्या आहेत. तेव्हा १००० सहज शक्य आहेत.
पास्ता रटरटतोय बुवा. ५मिनिटांत जेवायला बसणार.

Pages