कास आणि भोवताल..

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

ही एक गुराखी बाई, मस्त गप्पा मारत होती, आणि तिथे जाऊन मी कसा फुक्कट वेळ घालवतेय ह्याबद्दल तिची फार जहाल मते होती! Proud फार गोड होती पण.

ह्या फोटोमध्ये नैसर्गिकरीत्या खडकावर सतत पाण्याची संततधार पडत राहिल्याने, खडकाला भगदाड पडलेले आहे व त्यातून पाणी वाहते.

थोडिशी निराशा. पण सध्याच्या 'कासच्या' हंगामाकडूनच ! थोडा लांबलाय ना ह्यावेळेसचा कासचा हंगाम?
प्रचि ३ सारख्या आणखी प्रचिंची अपेक्षा होती. भोवतालचा परीसर सुरेखच. उथळ पाण्याचा खळखळाट आणि ती घळ सुरेखच. लँडस्केप फोटोग्राफी हा प्लस पॉईंट आहे तुझ्या फोटोग्राफीतला असे मला वाटले.

खुप छान आहेत फोटो... तू नेहमीच मला डेस्कटॉप बॅकग्राऊंडसाठी छान छान फोटो पुरवतेस. पण एवढेच फोटो का काढलेस?

खुपच सुंदर........!!!!!!!!!!!!!! Happy

सर्वप्रथम, सगळ्यांचे धन्यवाद आणि अजूनही फोटोंची मागणी केल्याबद्दलही Happy एकदम भारी वाटलं! अजून काही टाकणार आहे लोकहो, असाच लोभ ठेवा.

माधव, केपी - पावसामुळे काही फुलांचे फोटो नाही काढता आले. कॅमेरा खराब व्हायची भीती होती नं.
कंदील पुष्प पाहिले. सुरेख दिसते.

>पठार म्हणजे महाराष्ट्रातलं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ना? >> सशल, हो.

मेधा, नाखु, हिम्या, क्लोजअप्स टाकणार आहे. सहसा कास म्हटलं की केवळ फुलं असं एक समीकरण सगळ्यांच्या मनामध्ये बसलेलं असतं, अर्थात तिथलं सौंदर्य पाहता त्यात काही आश्चर्य नाही, वावगं नाही, पण कासच्या पठाराच्या सभोवतालचाही निसर्ग तितकाच सुंदर आहे, कासकडे जाणारी वाटही अशीच सुरेख आहे, असा हा निसर्ग तुमच्यासमोर मांडायची इच्छा होती, म्हणून हे काही फोटोही टाकले.

अमि, खूप काढलेत गं फोटो, त्यातले वेचक देते इथे.

>> दिवाळीपर्यंत बहर असेल का? >> जयु, नाही गं बहुतेक.

ओय मला एक शंका आहे.
वार्‍याने फुलं इतकी हलत असतात अशा वेळेस फोकस कसा ठेवायचा? खालून धरुन ठेवायची का?
(हसू नका. खरंच विचारते आहे)

रैना, तू आपल्या ट्रेकच्या वर्णनाचा पुढचा भाग टाकेपरेंत तुझ्या शंकाची उत्तरं देऊ नाहीत खरं तर! Proud

मी कधी कधी धरुन ठेवते, कोणाला धरायला सांगते, पण मोस्टली वाट पाहते शांतपणे. तयार रहायचं, एक क्षण मिळतो, तो टिपायचा. Happy

>>वार्‍याने फुलं इतकी हलत असतात

मी दोन पद्धतीने प्रयत्न करतो.
१. शटरस्पीड १/८० पेक्षा जास्त ठेउन ... जेवढे फोकस होईल त्यानुसार आयसो बदलतो.
२. शटरस्पीड १/१०, १/१५, १/२० असा ठेऊन आयसो शक्य तेवढा कमी करतो [पॅनिंग] आणि फोटो जमतो आहे का बघतो. नं२ ने मला अजूनतरी जमलेला नाही नीट.

नंबर २ कठीण पडतो नं नंद्या? पॅनिंग? फुलांचे पॅनिंग मलातरी जमत नाही, आणि ही फुलं तर किती चिमुकली आहेत अरे..

वार्‍याने फुलं इतकी हलत असतात अशा वेळेस फोकस कसा ठेवायचा? >> वारा सहसा एकाच दिशेने वहातो. आपण वार्‍याची दिशा आणि फुल याच्या मधे उभे रहायचे. फांदी खूप लांब आणि नाजूक नसेल तर हा उपाय मस्त काम करतो नाहीतर नंद्याने सांगितल्याप्रमाणे शटरस्पीड वाढवायचा.

बर्‍याचदा मी ज्या फुलाच्या जवळ जाऊन फोटो काढायचा प्रयत्न करते की ते फुल हलायला (म्हणजे वार्‍याने) लागतं. मग काय करायचं? Proud

Pages