शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय १ - "विस्थापितांच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 21:14

"विस्थापितांच्या आरोळ्या"

'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...' Proud

मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....

पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं

Charoli 1.jpg

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विस्थापितांपैकी कुठल्याही एका विस्थापितावर तुम्हाला चारोळी करायची आहे.
५. दिलेल्या विस्थापितावर एका वेळेस, एकाच विस्थापितावर, एकच चारोळी टाकावी.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब चालवून घेऊ हजारात
गरिबाला कुठं मोठं पोट
एक दिवस असाही येईल
लोकहो, प्लीज नोट

लले तुझ्यामुळे मलापण हुक्की आली लिवायची Proud

माझी साडेसाती संगणकाला देऊन
आत्ता कुठे आराम फर्मावतोय
क्रमशाधिपतींचा मी टाईपरायटर
व्हिआरएस घेतलेय म्हणूनच सुखाने जगतोय

(कृपया ह्यातल्या क्रमशाधिपती नावावरुन उग्गा ताणू नये)

एका जमान्यात बडविला मला हापीसात
केली माझी हाडं खिळखिळी
आताच्या संगणकाच्या जमान्यात
केवळ मी कोपर्‍यात बसुन हळहळी

बंब बंब तांब्याच्चा बंब
गार पाण्याच्चा, चावर्‍या थंडीच्चा
फुक्या कवितांचा, टुकार ललितांचा
सर्रकन कसा उतरला दंभ

त. टी. : 'टुकार ललितांचा' हे ललिबद्दल नाहीये. प्लीजच नोट Proud

युगेअठ्ठाईस राह्यलात उभे; बाह्येर काय च्चाल्ले ते ठाव नाय तुमास्नी इठ्ठलराव
आवो, बंबात घाला ती ईट ; (आता बंब बी राह्यले न्हाईत बगा !)
वारकरी येत्यात जात्यात हरसाल, तुमी व्हता खुश
रुप्यामोत्यांच्या राशी, आता येईल जॉज बुश

देवा- क्या बात है होती हाँ.
नीरजा- बदाबदा पाऊस पडतोय. कधीमधी आमची बी वही भिजती ;-). दंभ वॉज गुड.
ललिता/ भरत /कविता/आशूतोष- गुड ट्राय.

'अडगुलंमडगुलं'; म्हनायची सवय निस्ती
'बंबात घाल'; म्हनायची सवय निस्ती
बंबआनमडगुलं; युगेलोटली गायब व्हऊन;
हिथल्य्या वस्तुंमध्ये शोधू नये सोताची पहचान

आज हायेत उद्या न्हाईत
आपन आपनांस तिर्‍हाईत
हितल्ल्या चीजांध्ये गुंत्वू नये जीव
आपली आपुन करु नये कीव

मायाममताचीजवस्तु
अर्पावी इठ्ठ्लाचरनी
त्येलाच ठरवू द्यावी
आपली करनी

हाये ना तो उभा इटेवरी फक्त ?
करु द्ये तेला प्रयत्नांची शिकस्त

कित्येकांची मीच शमवली तहान
प्रवासाच्या सोवळ्यात मोठा माझा मान
आजीच्या वळकटीबरोबरच माझे स्थान
आता फक्त संग्रहालयातला खोटा बहुमान>>

हवे तसे मला बदडुनी
कारकुना तू स्पीड मिरवला...
आठवतो का कधी तुला मी
ज्यावर पहीला धडा गिरवला?>>

या दोन मला खुप आवडल्या... इतरही मस्तच... भारी...

आठवणींच्या गावा,
का उगीच फिरूनी यावं,
कोर्‍याच त्या पत्रांचं उत्तर,
सांग आता काय ते द्यावं?

एकल्या या कोंडल्या जीवाला,
दाराची सापट खुणावते,
पत्रे तुझी तळहाती येता
मज नेहमीच ,माझे जग भेटते..

नागरी केंद्राच्या हापिस मधे,
लाईन देते एक टाईपरायटर,
ती फेकते जाळं असं कि
माझा होतो लटकलेला स्पायडर..

चौरसफ़ुटांच्या जागांत अंगणे कशी मावायची
घाईगडबडीच्या वेळापत्रकात आंघोळ दोनशे सेकंदांची
सकाळी तुमच्या सोबतीला ’धार तोतर्‍या नळाची’
सवड तरी कुठे आहे तुम्हास मला आठवायची

(लग्नातल्या भांड्यांवर नजर फिरवत बंबीणबाई उखाणा घेतात-)

आला आला रुखवत
त्यात होत्या नोटा
मेल्या गिझराने दिला फाटा
अन् काढला बंबाचा काटा Proud

रैनातै... भारी की वो!

वळकटीबरोबर माझा प्रवास
मान कधी मज होता खास
कांती मळभली अतीव उदास
अडगळीत माझे संथ नि:श्वास!

कधी मायना गुलाबी, कधी ख्यालीखुशाली
डोळ्यांत पाणी..वाचून चार ओळी
ईमेल आली संपलेच सारे
पत्रांतले अत्तर आता कुठे रे

हीटर हीटर
किती रे तू , चीटर!
पाणी नाही तापत तुझ्याने एकसुध्दा लिटर!
बरा होता तुझ्यापेक्षा माझा, तीनपायी बंब
होत नव्हती रोज अशी, आंघोळीची बोंब!

(Peter peter.. pumkin eater)

लाकडी भुस्सा पोटात ढकलत
जाळला देह तुमच्यासाठी
मोडीत लपवतोय काळवंडलेलं तोंड
हेच भाग्य का माझ्या ललाटी

Pages