शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय १ - "विस्थापितांच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 21:14

"विस्थापितांच्या आरोळ्या"

'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...' Proud

मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....

पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं

Charoli 1.jpg

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विस्थापितांपैकी कुठल्याही एका विस्थापितावर तुम्हाला चारोळी करायची आहे.
५. दिलेल्या विस्थापितावर एका वेळेस, एकाच विस्थापितावर, एकच चारोळी टाकावी.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हो इमेल मध्ये असं काही असतं का?
तिच्या लाल ओठातलं गोड हसु उठतं का?
खोडलेल्या अक्षरातनं सरळ कोणी भेटतं का?
खोल खोल डोळ्यामधलं मायचं आसू दिसतं का?

काय हो.. इमेल मध्ये असं काही असतं का?

तसे ठीक आहे जाळणे वगैरे, समजु नका ते भारी वगैरे,
देवा जपावे वैभवास तुमच्या, समजतील तुम्हां जोशी वगैरे... Proud

ईमेल हे ईमेल असतं,
मेल आणि फिमेल दोघांचही असतं..
तीच्या hi ला ह्याचं hello असतं,
कधी सुपर फास्ट तर कधी slow असतं..

समृद्ध अडगळी वस्तु लोपल्या
मागे राहिल्या कळखुणा
स्मृतीविभोर का होतसे?
या तंत्राच्या जन्मवेणा !

सही जा रैला है सर्वलोक्स.

मी काहीही खास खाल्ले प्यालेले नाही. माहौल. Wink
अश्विनी सॉरी- आज विठ्ठलरावच ! Proud

उभ्या आडव्या तिरप्या अक्षरांनी सजलेली माझी काया
कधी औपचारिक विचारपूस, कधी आपल्यांची माया
कंप पावणारी अक्षरे अन बालिश वळणे सुंदर गोल
शाईतून येणारा वात्सल्याचा गंध आता झालाय निव्वळ फोल

पैठणीच्या मोरांमध्ये
पत्रं ठेविले निळे गुपचूप
ऊन दावता झळाळले
ओळींचे ते फसवे अप्रुप

शब्दांचे ते नाजूक मोती
स्मरणातून ओघळले सर
लिहीणार्‍याचे ओरखडेच
कुयर्‍यांची ती विरली जर

पत्रे सारी अबोध अनावर
एकेकाळचा प्रेमज्वर
पैठणीचाही उर फाटला
दाटला अन गहिवर

(आता मला संयोजक बॅन करणार बहुतेक.) Proud

गो अरुंधती.

स्वच्छ आम्हि पांढरे शुभ्र
नाहि घडवला कधि काळा बाजार
मोठल्या या नोटांन्नि मात्र
अण्णा ला घडवले उपवास हजार

माझ्या उरी दाटली थोरामोठ्यांची गुपिते
कधी रागे सुनावणी कधी प्रेमाची गीते
टपोरी अक्षरे सुबक कधी कीडेमुंग्यांची रांग
गिचमिडीत कोपर्‍यात सांकेतिक प्रीतरंग!

खिडकीला डोळे लावून ती माझी वाट पाहत
अस्वस्थ करायची अधीर ये-जा
आता खट्टखट्ट फोन लावते
पोस्टमनला बंदच असतो दरवाजा!

इठ्ठलराव, किती पत्रे लिवली वो
वाचित काहुन न्हाई ?
मी म्हंलं का रागीवलात
तळतळुन बोल्ले कायीबायी

इठ्ठलराव, खुसाली कळवित र्‍हावा
तुमची लै येती याद
यमाची म्होरल्या टायमाला
येनार बगा साद

इठ्ठलराव, मी बी तैय्यार हाये
बांधून छोटं गठुडं
तुमी नीटर्‍हावा खावाप्यावा
एवडच घालत्ये साकडं

अंधार्‍या पेटार्‍यात धूळ खात
पिवळ्या दुमडलेल्या कडा सावरत
बुजल्या शाईतील आठवणींची लेऊन लक्तरे
वाट बघतोय तुझ्या मायेच्या स्पर्शाची!

अरे धावा रे महावितरणाने घातलाय
नेहमीसारखाच वीजेचा घोळ
बंद पडले तुमचे गीझर अन् हीटर
बंबाला घाला चुलीत म्हणे, आता भोगा फळं!

Proud

टक टक करुन बोटे दुखती
कॉपी पेस्ट ना तुझे सोबती
कार्बन कॉपी एकच सोबती
ना करेक्शन ना अ‍ॅडजेस्ट्मेंटशी तुझी नाती.

अरे मेल्या यमा कुठं मारून बसलास दडी?
जीर्ण दीन झालोय मी, पण तूच खा पडी!
राख घालून घेतलीये डोस्क्यात जरी विझली ठिणगी
धूळभरल्या अंगाने गांजत काढतोय बाकीची जिंदगी

धन्स लोक... आत्ता हापिसातुन आल्यावर वाचल्या सगळ्या आरोळ्या एकदम.... मस्तच लिहतायत सगळे... रैना तर फुल्ल सुटेश Happy

होतो जवान जवा
आमचीच 'हवा' होती...
पुसती आजची पोरे
ही नोट 'कवा' होती?

तांब्या मी फिरकीचा
असे लखलखता झकास
पण कानामागून आला आणि गरम-गार झाला
मेला हा फुटणारा थर्मास

Pages