शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय १ - "विस्थापितांच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 21:14

"विस्थापितांच्या आरोळ्या"

'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...' Proud

मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....

पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं

Charoli 1.jpg

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विस्थापितांपैकी कुठल्याही एका विस्थापितावर तुम्हाला चारोळी करायची आहे.
५. दिलेल्या विस्थापितावर एका वेळेस, एकाच विस्थापितावर, एकच चारोळी टाकावी.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसात भिजला तुम्ही काकाऽ
शेंबडानं झाला चिंब..
भारनियमनी वीजही गेलीऽ
काकी मारिती बोंब

गर्रम पाणी आण्णाल कुठ्ठून
गॅसवालाही लांब
तुम्ही आम्हाला, अहो आम्हाला, म्हंजे बंबाला लावलं ना टिंबऽ *
काऽका बंबाला लावलंत टिंबऽ *

*मायबोलीत जसं काहीही गायब करायचं झालं की टिंब देण्याची फ्याशन आहे. आता पिवळ्या टिकल्या जुन्या झाल्यात.

चूल म्हणाली बंबाला,
तुला ढलप्या, मला मात्र लाकडे भारा भर,
बंबाने टाकला एक तु. क. ,म्हणाला
' तू बस घरात, मी मात्र मायबोलीवर '

पाचशे आणि हजारच्या नोटा
करतात सर्वांना मिंध्या
आणि एक दोनच्या होतात
भराभर चिन्ध्या

हे टाक बंबात
ते टाक बंबात
बंबाने मारली बोंब
स्वतःच गेला बंबात

ढिंग टिक्या ढिंग टिक्या सेल्फोनच्या रिंगा
सफरचंदी चौकोनावर ई.. पत्रांचा पिंगा
रद्दीतल्या आठवणींना विचारत नाही कुत्रं
आपला जुना मित्र आंतर्देशीय पत्र
(वर ई.. म्हणजे वैतागाने ई.. असे म्हणायचे)

कर्रर्रर्रर्रर्रर्र कटक.. कर्रर्रर्रर्रर्रर्र कटक..
इथे भटक .. तिथे भटक
ट्रँ.....खटा ट्रँ.....खटल
संगणक आला लाइन बदल.

प्रवासात कुठेपण चहा मिळतो फर्मास
पुरवायला थंड गरम असतो थर्मास
काळाने अशी घेतली फिरकी काय सांगु राव
कोपर्यात पडलाय आपलाच तांब्या

कडकट्ट तार आली, बोलघेवडा फोन आला
चॅटींगच्या खिडक्यांमधून हाय्-हॅलोचा बोलबाला...
पॉवर जाता खिडकी बंद अन फोन ठेवता आवाज
मी मस्त चिरंजीवी अन त्यांचा क्षणभंगूर खेळ साला...

बंबाने टाकला एक तु. क. ,म्हणाला
' तू बस घरात, मी मात्र मायबोलीवर ' >>> मस्तय Happy

स्वरूप, आगे बढो!

ह्या आयडियालाच सलाम.
सगळ्याच आरोळ्या बेष्ट.
त्यातही ही फार आवडली,
होतो जवान जवा
आमचीच 'हवा' होती...
पुसती आजची पोरे
ही नोट 'कवा' होती?

व्वाव ! मस्त चारोळ्या सगळ्यांच्या,
रैना इठ्ठलाच्या मागं हात धुवुन लागलीय Lol
स्वरुप मस्तच रे !

...

---

---

कवड्या गेल्या दमड्या गेल्या

पैसा झाला खोटा

क्रेडिट कार्ड आणि ई मनीपुढे

उडून गेल्या नोटा

CPU, स्क्रीन , माउस संगे

कॉम्प्युटर नवा सजला

टाइपरायटर गेला तरी

कीबोर्ड जुनाच उरला..

लहानांना आशिर्वाद असतो, बाळा,
नि मोठ्यांना साष्टांग नमस्कार-
सारं क्षेमकुशल लिहावं, बाळा,
नमनाला घालू नये तेल, घडाभर.

तुझं 'क्षेम' कळलं नि आलो, आज्जे,
तेव्हा कढत पाण्याची धार तुझ्यावर-
लोण्याच्याऐवजी फुलांचा वास तुला
नि जुनी पत्रं विस्कटून माझ्या मनभर

अक्षर नीट सरळ काढावं, बाळा
गिरवू नये, खोडू नये, डाग नको-
वरती श्रींचे नाव येऊ देत, बाळा
नि चुकीच्या ठिकाणी घड्या नको.

हे कढत पाणी मला चटका देईल
हे गंधहीन पाणी कसे जागवील तुला?
तुझ्या बंबातल्या तांब्यापितळेच्या वासाचे
पाणी शुचिर्भूत कसे आता करेल मला?

तुझ्या पिसोडीत रुपया-दोन-रुपयांची
ती चुरगळ आता मी शोधतो आहे
वारसा नि इस्टेटीच्या फार पलीकडचं
माझं आनंदनिधान हरवलं आहे.

तुझं कपाट माझ्यापेक्षा सुदैवीच
खिन्नतेऐवजी तुझं संचित सांभाळतं आहे
तुपालोण्याचे डबे, फिरकीचा तांब्या,
लोणच्याचे सट, अडकित्ते मिरवतं आहे.

याला आता झाली काही वर्षे, आज्जे
कुठच्या तरी सृजनात ते जमा झालं.
फाईलीतल्या डेथसर्टिफिकेटवर टाईपलेलं
तुझं नाव पुन्हा मला जरा हलवून गेलं.

विकत मिळते आज सारे, आज सारी सोनकळा
बिस्लरीच्या बाटल्या ह्या भिजवती तुझा गळा
हरवली ती माणसे, ज्यांना होता माझा लळा
तहानलेला जीव माझा.... कोरडा नि मोकळा Happy

Pages