"विस्थापितांच्या आरोळ्या"
'लिटर लिटर पाणी तापवले
आता ना दिसे एकही थेंब...
अडगळीच्या खोलीमधे
पडलोय मी उघडा बंब...'
मंडळी, इथे लिहायच्या आहेत तुम्हाला आरोळ्या... विस्थापितांच्या... हे विस्थापित आहेत....
पाणी तापवायचा बंब,
टंकलेखक - टाईपरायटर,
आंतर्देशीय पत्र - इनलँड लेटर,
फिरकीचा तांब्या आणि
एक अथवा दोन रुपयांची नोटं
******************************************
सर्वसाधारण नियम:
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विस्थापितांपैकी कुठल्याही एका विस्थापितावर तुम्हाला चारोळी करायची आहे.
५. दिलेल्या विस्थापितावर एका वेळेस, एकाच विस्थापितावर, एकच चारोळी टाकावी.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.
******************************************
रैना, कोलटकर भेटून गेले काय..
रैना, कोलटकर भेटून गेले काय..
साहेब चालवून घेऊ
साहेब चालवून घेऊ हजारात
गरिबाला कुठं मोठं पोट
एक दिवस असाही येईल
लोकहो, प्लीज नोट
सही लिहितायत सगळे लले तू पण
सही लिहितायत सगळे
लले तू पण उतरलीस मैदानात
लले तुझ्यामुळे मलापण हुक्की
लले तुझ्यामुळे मलापण हुक्की आली लिवायची
माझी साडेसाती संगणकाला देऊन
आत्ता कुठे आराम फर्मावतोय
क्रमशाधिपतींचा मी टाईपरायटर
व्हिआरएस घेतलेय म्हणूनच सुखाने जगतोय
(कृपया ह्यातल्या क्रमशाधिपती नावावरुन उग्गा ताणू नये)
एका जमान्यात बडविला मला
एका जमान्यात बडविला मला हापीसात
केली माझी हाडं खिळखिळी
आताच्या संगणकाच्या जमान्यात
केवळ मी कोपर्यात बसुन हळहळी
बंब बंब तांब्याच्चा बंब गार
बंब बंब तांब्याच्चा बंब
गार पाण्याच्चा, चावर्या थंडीच्चा
फुक्या कवितांचा, टुकार ललितांचा
सर्रकन कसा उतरला दंभ
त. टी. : 'टुकार ललितांचा' हे ललिबद्दल नाहीये. प्लीजच नोट
युगेअठ्ठाईस राह्यलात उभे;
युगेअठ्ठाईस राह्यलात उभे; बाह्येर काय च्चाल्ले ते ठाव नाय तुमास्नी इठ्ठलराव
आवो, बंबात घाला ती ईट ; (आता बंब बी राह्यले न्हाईत बगा !)
वारकरी येत्यात जात्यात हरसाल, तुमी व्हता खुश
रुप्यामोत्यांच्या राशी, आता येईल जॉज बुश
देवा- क्या बात है होती हाँ.
नीरजा- बदाबदा पाऊस पडतोय. कधीमधी आमची बी वही भिजती ;-). दंभ वॉज गुड.
ललिता/ भरत /कविता/आशूतोष- गुड ट्राय.
गीझर शॉवरच्या जमान्यात लोकं
गीझर शॉवरच्या जमान्यात
लोकं भिजतात चिंब
मी आपला जुना पुराणा बंब
जुन्या आठवणीतच दंग
'अडगुलंमडगुलं'; म्हनायची सवय
'अडगुलंमडगुलं'; म्हनायची सवय निस्ती
'बंबात घाल'; म्हनायची सवय निस्ती
बंबआनमडगुलं; युगेलोटली गायब व्हऊन;
हिथल्य्या वस्तुंमध्ये शोधू नये सोताची पहचान
आज हायेत उद्या न्हाईत
आपन आपनांस तिर्हाईत
हितल्ल्या चीजांध्ये गुंत्वू नये जीव
आपली आपुन करु नये कीव
मायाममताचीजवस्तु
अर्पावी इठ्ठ्लाचरनी
त्येलाच ठरवू द्यावी
आपली करनी
हाये ना तो उभा इटेवरी फक्त ?
करु द्ये तेला प्रयत्नांची शिकस्त
जोरदार आरोळ्या लोक्स !
जोरदार आरोळ्या लोक्स !
पानतमाखु द्येत घ्येत, सुकदुक्काचे गात गीत >>>
रैना, आज काय खाल्लंस? आज
रैना, आज काय खाल्लंस? आज इठ्ठलाचा मागे लागलीयस?
कित्येकांची मीच शमवली
कित्येकांची मीच शमवली तहान
प्रवासाच्या सोवळ्यात मोठा माझा मान
आजीच्या वळकटीबरोबरच माझे स्थान
आता फक्त संग्रहालयातला खोटा बहुमान>>
हवे तसे मला बदडुनी
कारकुना तू स्पीड मिरवला...
आठवतो का कधी तुला मी
ज्यावर पहीला धडा गिरवला?>>
या दोन मला खुप आवडल्या... इतरही मस्तच... भारी...
आठवणींच्या गावा, का उगीच
आठवणींच्या गावा,
का उगीच फिरूनी यावं,
कोर्याच त्या पत्रांचं उत्तर,
सांग आता काय ते द्यावं?
रैनातै क्या बात है, लै भारी
रैनातै क्या बात है, लै भारी लिवताय बगा
रैना, सेव्ह कर तुझ्या
रैना, सेव्ह कर तुझ्या चारोळ्या, तुझ्या ब्लॉगावर टाक.
नीरजा, दंभ मस्त.
आठवण तुझी येते खूप लहान्याचे
आठवण तुझी येते खूप
लहान्याचे ते रडके रूप
हरवले ते पत्रांचे सूख
लहान्या मोठा झाला खूप
एकल्या या कोंडल्या
एकल्या या कोंडल्या जीवाला,
दाराची सापट खुणावते,
पत्रे तुझी तळहाती येता
मज नेहमीच ,माझे जग भेटते..
आल्या आल्या नोटा, पैसा झाला
आल्या आल्या नोटा,
पैसा झाला मोठा,
गिझर आला न्हाणीत,
बंबानं शोभला गोठा..
रैनाताईंवर गणपतीबाप्पा
रैनाताईंवर गणपतीबाप्पा प्रसन्न झालेत.
नीधप 'दंभ' मस्ताय.
लोक्स इन जबरदस्त फॉर्म
लोक्स इन जबरदस्त फॉर्म
नागरी केंद्राच्या हापिस
नागरी केंद्राच्या हापिस मधे,
लाईन देते एक टाईपरायटर,
ती फेकते जाळं असं कि
माझा होतो लटकलेला स्पायडर..
आज रैनातै पण सुटल्यात...
आज रैनातै पण सुटल्यात...
चौरसफ़ुटांच्या जागांत अंगणे
चौरसफ़ुटांच्या जागांत अंगणे कशी मावायची
घाईगडबडीच्या वेळापत्रकात आंघोळ दोनशे सेकंदांची
सकाळी तुमच्या सोबतीला ’धार तोतर्या नळाची’
सवड तरी कुठे आहे तुम्हास मला आठवायची
(लग्नातल्या भांड्यांवर नजर
(लग्नातल्या भांड्यांवर नजर फिरवत बंबीणबाई उखाणा घेतात-)
आला आला रुखवत
त्यात होत्या नोटा
मेल्या गिझराने दिला फाटा
अन् काढला बंबाचा काटा
रैनातै... भारी की
रैनातै... भारी की वो!
वळकटीबरोबर माझा प्रवास
मान कधी मज होता खास
कांती मळभली अतीव उदास
अडगळीत माझे संथ नि:श्वास!
कधी मायना गुलाबी, कधी
कधी मायना गुलाबी, कधी ख्यालीखुशाली
डोळ्यांत पाणी..वाचून चार ओळी
ईमेल आली संपलेच सारे
पत्रांतले अत्तर आता कुठे रे
हीटर हीटर किती रे तू ,
हीटर हीटर
किती रे तू , चीटर!
पाणी नाही तापत तुझ्याने एकसुध्दा लिटर!
बरा होता तुझ्यापेक्षा माझा, तीनपायी बंब
होत नव्हती रोज अशी, आंघोळीची बोंब!
(Peter peter.. pumkin eater)
पुन्हा जाळणार मी वखारी
पुन्हा जाळणार मी वखारी वगैरे
पुन्हा लोक म्हणतील भारी वगैरे
देवा
देवा
लाकडी भुस्सा पोटात ढकलत जाळला
लाकडी भुस्सा पोटात ढकलत
जाळला देह तुमच्यासाठी
मोडीत लपवतोय काळवंडलेलं तोंड
हेच भाग्य का माझ्या ललाटी
Pages