हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स एक शंका अशी आहे कि, स्नेप जेव्हा हॅरी कडे नकाशा पाहतो तेव्हा लागलीच त्याला शंका येते का कि हा मॅप आहे ? किंवा जेव्हा त्याचा पाणउतारा जेव्हा सुरु होतो तेव्हा मूनी , पॅड फूट , इ- नावे वाचल्यावर त्याला तो कुणी बनवला असावा हे कळते ? तसे त्याला जेम्स आणि सिरीयस ची शाळेतली टोपण नावे माहित असतील का ?

आज हॅरी पॉटर चा पहिला भाग पुन्हा वाचायला घेतला Happy
1 प्रश्न - पहिल्या भागात हॉगवर्ट्समधून येणारी पत्र टाळण्यासाठी व्हर्नोन काका संपूर्ण कुटुंबाला समुद्रातल्या एका खडकावरील खोपट्यात नेतात ना . हा खडक आणि व्हॉल्डमॉर्टने एक हॉरक्रक्स जिथे लपवला ती गुहा सेम आहे का ?

धन्यवाद भरतजी Happy
सहज विचारले मला वाचताना प्रश्न पडला म्हणून.

हॅरी चे काका ज्या खडकावर नेतात त्याचे आणि होरॉक्रक्स ज्या गुहे मध्ये आहेत त्या ठिकाणांची वर्णने वेगवेगळी आहेत. आणि जर हॅरी त्याचा जवळ असता तर कपाळावरची खूण दुःखली असती किंवा किमान जाणीव झाली असती.

Oh Yes, point आहे खरा. आता सहावा भाग पुन्हा वाचायला पाहिजे खरा. धन्यवाद लोक्स Happy

डिमेंटर कसे तयार होतात any idea? आणि डिमेंटर ने मुका घेतलेला माणूस मरतो फायनली की कोमात असल्याप्रमाणे जगत राहतो फक्त without आत्मा? बार्टी क्राऊच ज्युनिअर. प्रमाणे?? फायनल outcome काय?

डिमेंटर कसे तयार होतात any idea? >>>याचा बहुतेक काही उल्लेख नाहीये ते असतात असच सांगितलंय..

डिमेंटर ने मुका घेतलेला माणूस मरतो फायनली की कोमात असल्याप्रमाणे जगत राहतो फक्त without आत्मा? >>आत्म्याशिवाय जीवन अशक्य आहे.. सो डिमेंटर ने मुका घेतला की माणूस मरतो..

बार्टी क्राऊच ज्युनिअर. प्रमाणे?? >>>याचा कुणी आणि कधी घेतला मुका Biggrin

फायनल outcome काय?>>>मौत

संशोधक, प्रतिसादासाठी धन्यवाद Happy

बार्टी क्राऊच ज्युनिअर. प्रमाणे?? >>>याचा कुणी आणि कधी घेतला मुका >>
गोब्लेट ऑफ फायरच्या शेवटी मॅकगोनागल सांगतात ना ??? फज डिमेंटर ला आत घेऊन आले आणि त्याने कोठडीत ठेवलेल्या बार्टी क्राऊच ज्यु. चे चुंबन घेतले.

काल हॅ . पॉ - चे ७ वे पुस्तक वाचताना एक गोष्ट नव्याने लक्षात आली. सौ विजली जेव्हा बिल च्या लग्न आधी हॅरी आणि कंपनी ला राऊंड अप करतात आणि शाळा सोडण्याचे कारण विचारतात. तेव्हा हॅरी सांगतो कि मला डम्बल डोर नि एक कामगिरी सांगितली आहे आणि रॉन हरमायनी देखील त्याला मदत करण्यासाठी येणार आहेत तेव्हा विजली म्हणतात कि तुझी ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल डम्बल डोर च्या आदेशावर काम करायला अक्खी फिनिक्स ची सेना तयार असताना तुला कशाला काही ते सांगतील ?
आता माझी शंका अशीच आहे कि , हॅरी हा स्वतः एक होरक्रक्स आहे, तो नष्ट कसा करायचा हे पण हे त्यांनी स्नेप ला वेगळ्या भाषेत सांगितले होते. तर डम्बल डोर नि इतर होरक्रक्स नष्ट करायला हॅरी ला का सांगितले ? त्यापेक्षा मोठे , लायक आणि अनुभवी जादूगार सेनेत उपलब्ध असताना ?

अजून एक शंका !
एल्डर वॉन्ड डम्बलडोर ना त्यांच्या इच्छेविरुद्ध निरस्त्र केल्याने ड्रॅको चा होतो . मूळ वॉन्ड डम्बलडोर कडेच राहतो . नंतर हॅरी ड्रॅको चा वॉन्ड त्याच्या इच्छेविरुद्ध हिसकावून घेतो त्यामुळे एल्डर वॉन्ड ची मालकी हॅरी कडे येते . मूळ वॉन्ड डम्बलडोर कडेच कबरीत असतो . जो नंतर व्हॉल्डेमॉर्ट ती फोडून घेतो आणि वापरतो .
आता , जेव्हा शेवटचे युद्ध होणार आहे तेव्हा व्हॉल्डेमॉर्ट कडे वापरण्याचा पण मालकीचा नसलेला एल्डर वॉन्ड आहे. हॅरी कडे ड्रॅको चा आणि मालकी प्रस्थापित झालेला वॉन्ड आहे . हॅरी ने युद्ध संपवल्यावर एल्डर वॉन्ड पण हॅरी कडे आला . त्याने स्वतःचा फिनिक्स चा वॉन्ड दुरुस्त केला ( नव्यासारखा ) आणि एल्डर वॉन्ड डम्बलडोर च्या फोटो मागे ठेवला . आता , ड्रॅको चा वॉन्ड च काय झालं > ?

गोब्लेट ऑफ फायरच्या शेवटी मॅकगोनागल सांगतात ना ??? फज डिमेंटर ला आत घेऊन आले आणि त्याने कोठडीत ठेवलेल्या बार्टी क्राऊच ज्यु. चे चुंबन घेतले.>>>> तो बार्टि क्राऊच ज्यु. नव्हता. त्याच्या जागी बार्टी क्राऊच सि. ने त्याच्या आजारी बायकोला ठेवलेलं रुप बदलून Biggrin

आता माझी शंका अशीच आहे कि , हॅरी हा स्वतः एक होरक्रक्स आहे, तो नष्ट कसा करायचा हे पण हे त्यांनी स्नेप ला वेगळ्या भाषेत सांगितले होते. तर डम्बल डोर नि इतर होरक्रक्स नष्ट करायला हॅरी ला का सांगितले ? त्यापेक्षा मोठे , लायक आणि अनुभवी जादूगार सेनेत उपलब्ध असताना ?>>>> कारण होरक्रक्स काय असतील हे कुणालाच माहित नव्हतं (अगदी डम्बल डोरला सुद्धा ). हॅरी स्वतः एक होरक्रक्स असल्यामुळे तो इतर होरक्रक्स शी कम्युनिकेट करु शकत होता. अन त्याला एक्ट्यालच वॉल्डेमॉर्ट काय फील कर्तोय हे समजत होतं म्हणून

व्हॉल्डमॉर्टने हॅरी ला मारलं तेव्हा त्याच्या मधला व्हॉल्डमॉर्टचा आत्मा/अंश /हॉरक्रक्स मेला बरोबर ? मग त्यासोबत हॅरी ला मिळालेल्या काही विशेष शक्तीपण ( सर्पभाषा येणे किंवा व्हॉल्डमॉर्टचे विचार वाचता येणे etc) संपल्या का ?
शेवटच्या पुस्तकात उल्लेख आहे बहुतेक पण नक्की आठवत नाहीये ..

@ मीनाक्षी कुलकर्णी
पुस्तक इतकच सांगत कि , १९ वर्षे झाली ,त्याच्या कपाळावरचा जखमेचा व्रण परत कधीच दुखला नाही .
हॅरी ला आता सर्पभाषा येत नसणार म्हणणं जरा फार्फेचिंग वाटतंय पण तसा अर्थ निघतो .
अर्थात voldy मेल्यामुळं त्याचे विचार शिल्लकच नाहीत त्यामुळं ते अनुभवणं शक्य नाही.

Just a random thought - हॉगवर्ट्सच्या माजी ( आणि मृत) मुख्याध्यापकांचे जसे फोटो शाळेत आणि महत्वाच्या ठिकाणी लावलेत ( जेणेकरून महत्वाच्या प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन मिळेल) तसे फिनिक्स सेनेच्या ( मृत) सदस्यांचे पण फोटो का नाहीत, हॅरीला त्याचे आईवडील, सिरीयस आणि अजून कितीतरी जणांशी बोलता आलं असतं ना!!!

हॅरी पॉटर मधील लॅटिन मोहिनीमंत्रांचे संस्कृत भाषांतर
(Magical charm in Harry Potter)

Accio = आग्च्छम्
Alarte Ascendare = विषधर उडांछो
Aguamenti = निर प्रकातम्
Arresto Momentum = गती अवरोधम्
Bombarda = लोह भस्मम्
Confringo = पावकम्
Everte statum = वायू वेगम्
Fianto Duri = कवच सक्रीयम्
Finite Incantatem = मंत्र प्रभाव संपतम्
Immobulus = स्थिर भव
Periculum = संरक्षणम् प्रकाशम्
Peskipiksi Pasternomi = पापी पिशाच मुक्ती प्रदानम्
Piertotum Locomotor = प्रतिमो जीवित भव
Protego Maxima = संपूर्ण सुरक्षा
Reducto = लघुरूपांतरम् / बंगधम
Repello Inimicum = शस्त्र प्रतिकर्षण
Riddikulus = हस्यांतरण
Serpensortia = सर्पदंष्य
Vera Vorta = रूपांतरम्
Vipera Evanesca = विषदन्त विनाष्ठम्
Avada kedavara = तत्क्षणम् मरणम्
Imperio = संमोहितो
Expecto Patronum = आश्रयदाता अपेक्षीतो / पितृदेव संरक्षणम्
Expelliarmus = निरस्त्र भव
Lumos = प्रकाशित भव
Lumos Maxima = अति प्रकाशित भव
Crucio = पीडितो
Stupefy = सर्प अंतम्
Tarantallegra = तीव्र नर्तन
Appraition = उडांछो

जादुई प्राणी ( Magical creatures )

Basilisk - कालदृष्टी
Boggart - बहुरूपी
Centaur - अश्वनर
Hippogriff - गरूडअश्व
Cornish pixis - बाल पिशाच
Dementors - सर्वहारक / तमपिशाच्च
Fawkes - ज्वाला
Giants - दैत्य
Nagini - नागिनी

इतर ( others )

Daily prophet - दैनिक भविष्यवार्ता
Witch weekly - चेटकीण साप्ताहिक
Parselmouth - सर्पभाषी
Pensieve - स्मृती पत्र
Portkey - गुप्तमार्ग
Whomiping willow - पिटाई करणारे झाड
Felix Felicis - सुदैवी काढा
Polyjuce Potion - रूपांतर काढा
Floo powder - छू पावडर
Invisibility cloak - अदृश्य झगा
Dark Lord - अनिष्ट देव
Diagon Alley - छू मंतर गल्ली
Unforgivable Curses - अक्षम्य शाप
Moaning Myrtle - उदास मीना
Muggle - मगलू
Death Eaters - मृत्यूभक्षी / प्राणभक्षी

हॅरी पॉटर स्कॉलर्सना एक प्रश्न.. प्रिझनर ऑफ आझ्काबान च्या शेवटी श्रिकिंग शॅक मधे स्नेप ल्युपिन च्या नंतर .. त्यावेळी ल्युपिन च्या हाती असलेल्या व ल्युपिनच्या ऑफिसमधे उघडा असलेला मरॉडर्स मॅप बघुन व वाँपिंग विलोच्या बाहेर अडकलेल्या हॅरीचा अद्रुष्य झगा घेउन आत जातो.. म्हणजे .. हॅरीचा अद्र्ष्य झगा व मरॉडर्स मॅप... या दोन्ही गोष्टींची त्याला माहीती झालेली असते.. पण नंतरच्या ४ भागात स्नेप त्या गोष्टी त्याला माहीत आहेत याचा कुठे उल्लेख करत नाही.. ते कसे?

मी क्षणभर वरचे टिनुचे हॅरी पॉटरचे संस्कृत प्रतिशब्द वाचुन हॅरी पॉटर्सची सगळी पुस्तके ते शब्द टाकुन डोक्यात आणत होतो.. :).

लॉर्ड व्हॉल्डोमोर्ट उवाच... तक्षणम मरणम!

हॅरी पॉटर उवाच... निरस्त्र भव!

Happy

नको नको... इंग्लिशच बरे वाटते... Happy <<<<< हॅरी पॉटरची पुस्तके मराठीतून वाचताना संस्कृत प्रतिशब्दच चांगली वाटतात.
☺️

मला एक प्रश्न आहे , पद्मा आणि पार्वती या भारतीय असून हॉगवर्ट्झ विद्यालयात का शिकत होत्या ?? हॉगवर्ट्झ फक्त ब्रिटिश लोकांसाठी होत . पद्मा आणि पार्वती या पाटील म्हणजे मराठी होत्या असं गृहीत धरायला काही हरकत नाही.
चला मराठी लोकांनासुद्दा हॉगवर्ट्झमध्ये आश्रय होता. रोलिंग बाईंनी त्या मुलींना पराक्रमी दाखवायला पाहिजे होत. चित्रपटात सुद्दा त्यांची वेशभूषा खराब दाखवली आहे. याचा काय अर्थ घ्यावा ??

सर्वप्रथम हॅरी पॉटरची पुस्तके इंग्लिश मधुनच वाचावीत अश्या मताचा मी आहे म्हणुन मी तसे म्हटले.. जसे शाकुंतल किंवा मेघदुत जर इंग्रजीत भाषांतरीत केले तर......

मुळच्या साहित्यातली मजा व व अचुक शब्द .. हे कधीच दुसर्‍या भाषेत पकडता येत नाहीत किंवा समजवता येणार नाहीत किंवा तसा आटापिटा केला तर त्यातला पंच किंवा गोडी निघुन जाउन मुळ साहित्य अतिशय पांचट वाटु शकते.

Pages