हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅरी झाडुवर बसुन उडण्यात पटाइत होता. त्याच्या घुबडाचे नाव हेडविग होते.

हॅरीच्या वडिलांचे वडिल चेटक्या( जादुगार ) होते व हॅरीच्या वडिलांची आई चेटकिण होती म्हणुन हॅरीचे वडिल चेटके होते परंतु हॅरीच्या आइचे आई वडिल साधी माणसे असुन सुद्धा हॅरीची आई मात्र चेटकिण निघाली!

हॅरीला हॉगवर्ट किल्ल्यासमोर असलेल्या तलावावरुन असंख्य तमपिशाच्च सिरिअस ब्लॅकच्या दिशेने जाताना दिसु लागले..त्यातला एक तमपिशाच्च तिकडे तलावाच्या त्या बाजुला असलेल्या हॅरीचा मुका घेणार आहे हे बघुन हा इकडचा हॅरी लगेच म्हणाला.. आश्रयदाता अपेक्षितो! तसे म्हटल्याक्षणी आकाशात धुराचे एक धावते चंदेरी काळविट निर्माण झाले व ते काळविट बघुन ते सर्व तमपिशाच्च घाबरुन पळुन गेले...

वगैरे वगैरे...

आता ज्यांनी ज्यांनी हॅरी पॉटर फक्त इंग्लिश मधेच वाचले आहे.. त्यांनी त्यांनी प्रामाणिक पणे सांगावे.. मराठीत हे सगळे कसे वाटते?

मुकुंदजी मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कोणतेही पुस्तके वाचताना अगोदर ते मूळ भाषेतच वाचावेत. जर मूळ भाषा आपणास अवगत असेल तर काय हरकत नाही. मात्र माझ्या आईला इंग्रजी भाषा येत नाही म्हणून तिच्यासाठी हॅरी पॉटरची पुस्तकं मराठीत खरेदी केली आणि मी सुद्दा वाचली.
तुम्ही वर केलेले भाषांतर तुमच्या भाषेत केले आहे मात्र मंजुषा आमडेकर यांनी खूप मेहनत घेऊन भाषांतर केले आहे. मी पुस्तके दोघी भाषेत वाचली असून मूळ ग्रंथाची सर मराठी ग्रंथात नाही हे जाहीर आहे. पण मला मराठीतुन पुस्तक वाचताना रोलिंग बाई खरोखरच मराठी आहेत की काय ? असा अनुभव आला. भाषांतरच्या दर्जा खूप चांगला आहे मला हेच म्हणायचं आहे. तुम्हाला उदाहरणासाठी Goblet of fire मधील अंड्यांन swimming tub मध्ये गायलेलं गण्याचंच उदाहरण देतो.

Come seek us where our voices sound
We cannot sing above the ground
And while you're searching, ponder this
We've taken what you'll sorely miss
An hour long you'll have to look
And to recover what we took
But past an hour the prospect's black
Too late its gone it won't come back

मराठी भाषांतर (मंजुषा आमडेकर यांनी केलेले)

शोध आम्हाला येऊन तेथे
आवाज आमचे ऐकू येती जेथे
जमिनीवर आम्ही गाऊ शकत नाही
शोधताना हे ध्यानात घेई
आम्ही आणला तुझा अनमोल ठेवा
शोधायला फक्त एक तास हवा
तेवढ्याच वेळात आपली वस्तू घेऊन जा
तासानंतर काही खरं नाही
फार उशीर होईल ती वस्तू निघून जाईल
पुन्हा न कधी फिरून येईल

खरंतर या काव्यपंक्तीच मराठी भाषांतर करणं माझ्यासारख्या सामान्य माणसाला (विद्यार्थी) जरा जिकिराच होत आणि जवळ जवळ अशक्य कारण मी तांत्रिक (यंत्र अभियांत्रिकी) क्षेत्रातील पुस्तकांची मराठी भाषांतर करू शकतो. मात्र मंजुषा आमडेकर यांनी बरोबर इंग्रजीप्रमाणे यमक अलंकार जुळवून आणि अर्थ न बदलता अगदी योग्य रीतीने भाषांतर केले आहे. त्यासाठी त्यांची दोघी भाषेतील घट्ट पकड आपणास लक्षात येते. शिवाय हॅरी पॉटरच्या पुस्तकांची भाषांतर करण खूपच कठीण काम होते परंतु भारतीय भाषांत खरोखरचं हिंदी व मराठी या भाषेतील अनुक्रमे सुधीर दीक्षित आणि मंजुषा आमडेकर यांसारखे गुणवत्ताधारक भाषांतरकार यशस्वी ठरले. ( बंगाली भाषेतील अनुवाद बऱ्याच जणांना खटकला आहे त्यामुळे तो विचारात घेतला नाही )
टीप : भारतीय भाषांत गुजराती, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम यापैकी फक्त 1लेच पुस्तक प्रकाशित झालेले आहे.

टिनू.. मी ते भाषांतर उपहासाने केले होते.. अतिशयोक्ती अलंकार वापरुन.. मुद्दा अधोरेखित करण्यासाठी.. असो..

आता ज्यांन्ना इंग्लिश येत नाही त्यांना काही उपाय नाही.. त्यामुळे त्यांना दुधाची तहान ताकावर भागवण्याशिवाय गत्यंतर नाही.. पण मी ज्यांना इंग्लिश येते त्यांनी हॅरी पॉटरची पुस्तके (चित्रपट नाही!)इंग्लिशमधेच वाचावीत असे म्हणत होतो.. आश्रयदाता अपेक्षितो.. वगैरे भ्रष्ट नक्कल करुन वापरलेले शब्द वाचण्यापेक्षा...

माझ्या कडुन हा भाषांतराचा विषय इथेच संपवतो.

ट्विटरवर हा फोटो दिसला. त्या बद्दलची बातमी वाचली आणि मला क्बिडिश वर्ल्ड कपमधल्या डेथ मार्कची आठवण झाली.

darkmark.jpg

हा धागा राजकारणाकडे वळवायचा हेतू नाहीए. व्हॉल्डेमॉर्टने आपण आणि ते अशी विभागणी केली.
आज असंच exclusionary राजकारण करणारे अनेक नेते देशोदेशी निर्माण झालेले पाहून होर्क्रक्स आठवले.

रोलिंगबाईंना पुन्हा एकदा दंडवत.

खूपच उशिरा जॉईन झालो आहे हॅरी पॉटर चा डाय हार्ट फॅन आहे मी हॅरी पॉटर ची सगळी ची सगळी सात पुस्तके नऊ वेळा वाचून झाली आहेत ज्याच्या कोणाकडे मराठीतून ही पुस्तके असतील सॉफ्ट ऑफिसमध्ये तर नक्की खालील ई-मेल आयडीवर मला पाठवा आणि खूपच छान पुस्तक आहेत केव्हाही कधीही मी ही पुस्तके वाचून काढत असतो आणि ऑडिओ बुक्स आपण उल्लेख कोणीतरी केला होता मला आवडेल ऐकायला देखील
dhavaltrivedi04@gmail.com

मुकुंद, तुमची हिंम्मतच कशी झाली ?? हॅरी पॉटरच्या मराठी भाषांतराला भ्रष्ट नक्कल म्हणण्याची. खरंतर तर टिनुने Patronus ला पितृदेव हाच शब्द पुस्तकात आहे हे लक्षात ठेवावे आणि मुकुंद तुम्ही पुस्तकं मराठीत वाचली आहेत का ?? जरा वाचा आणि मग दुसऱ्यावर नाव ठेवा. तुम्ही खुशाल भाषांतरकाराचा अपमान करत आहे. आणि हो टिनू मी तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की भाषांतराचा दर्जा उत्कृष्ट आहे. ज्याप्रमाणे रोलिंबाईंनी लॅटीन भाषेत मंत्र लिहिले आहेत त्याप्रमाणेच मंजूषाबाईंनी संस्कृत भाषेत मंत्र भाषांतरित केली आहेत. शिवाय महाराष्ट्रात बऱ्याच जणांना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी मराठीत पुस्तके लिहिणे अपेक्षितच होतं. आणि ज्या बाबतीत आपल्याला काय माहीत नाही त्या बाबतीत टिप्पणी न केलेलंच बरं.

भाषांतराची चेष्टा करणारे इंग्रजी भाषा न येणाऱ्यांचा विचार करत नाहीत .. मी इयत्ता पाचवीत मराठी भाषांतर वाचलं , तेव्हा इंग्रजी समजत नव्हतं , आता समजतं , मग ओरिजिनल वाचायचं म्हणून 15 वर्षं थांबून राहणं तर शक्य नव्हतं , ते त्या वयात वाचायला मिळणं हे भाषांतरकर्त्याचेच उपकार मानायला हवेत ... सुरुवातीची 3 पुस्तकं मराठीत वाचली , आवडली , त्यानंतर पुढचे भाग हिंदीत मिळाले .. त्यांनंतर हिंदीच आवडू लागलं आणि मराठी फार कृत्रिम वाटू लागलं , हिंदी भागांची पारायणं केली ... नुकतेच इंग्रजी भाग वाचायला सुरुवात केली आहे , 3 वाचून झाले आता चौथा वाचत आहे ... हिंदी भाषांतर कुठेही कमी पडलेलं नाही , तोडीस तोड आहे ... मराठी भाषांतर करणाऱ्या लेखिकेचेही उपकार कधी विसरता येणारे नाहीत

हॅरी पॉटर आणि परीस या पुस्तकातील प्रकरणांची नावे मराठीत
1 The Boy Who Lived = जीवानिशी वाचलेला मुलगा
2 The Vanishing Glass = गायब होणारी काच
3 The letter from no one = निनावी पत्रं
4 The keepers of the keys = किल्ल्यांचा रखवालदार
5 Diagon alley = छूमंतर गल्ली
6 The journey through from platform nine and three quarters = पावणेदहा नंबरच्या प्लॅटफॉर्म वरून प्रवास
7 The sorting hat = बोलकी टोपी
8 The potions master = जादुई काढ्यांचे शिक्षक
9 The midnight duel = मध्यरात्रीतलं द्वंद्वयुद्ध
10 Halloween = हॅलोविन
11 Quidditch = क्विडीच
12 The mirror of erised = दच्छाइर्शी आरसा
13 Nicolas Flame = निकोल फ्लॅमेल
14 Norbert the Norwegian Ridgeback = नॉर्वेजियन काटेरी ड्रॅगन...नॉरबर्ट
15 The forbidden Forest = अंधारं जंगल
16 Through the trapdoor = चोर दरवाजापाशी
17 The man with two faces = दोन चेहऱ्यांचा माणूस

अनुवादक मंजुषा आमडेकर

"हॅरी पॉटरच्या गोष्टींनी बालसाहित्यातल्या निवडक, खास गोष्टींमध्ये मनाचं स्थान पटकावलं आहे..... आणि या गोष्टीमधला आनंद पोरासोरांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना पुन्हापुन्हा कितीही वेळा घेता येऊ शकेल."

अहो मुग्धामोहिनी.. तुम्ही कोण अश्या दिडशहाण्या लागुन गेल्यात की मला हिम्मतच कशी झाली असे विचारणार्‍या?

मी परत म्हणेन .. ज्या भाषेत मुळ साहित्य लिहीले असते त्याच भाषेत ते वाचणे केव्हाही चांगले.. दुसर्‍या भाषेत अनुवाद केला तर मुळ साहित्यातील पंच निघुन जाउन मुळ साहित्य पांचट वाटु शकते. आता ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना दुधाची तहान ताकावर भागवल्याशिवाय उपाय नाही.

हे माझे ठाम मत आहे. ते मत तुमच्या किंवा इतर कोणाच्या नाकाला झोंबत असेल तर नाइलाज आहे.

आणी जर तुम्हाला माझ्या मराठीबद्दल जर काही गैरसमज असेल की याला मराठी साहित्यातले काही कळत नाही .. तर तो गोड गैरसमज काढुन टाका.. तुम्हाला मराठीचे धडे शिकवण्याइतके चांगले माझे मराठी आहे.

म्हणुन खडसावुन सांगतो.. भाषा जरा जपुन वापरा.. नाहीतर तुमच्याच भाषेत व टोनमधे उत्तर मिळेल.

तुम्ही कोण हो मला दिडशहाणी म्हणणारे ??? स्वतःला काय डंबलडोर समजतात का ?? व्यवस्थित बोलायला शिका आधी आणि मग दुसऱ्याला शिकवा. नाहीतर मी पण तुमच्याशी अम्ब्रिजच्या शैलीत बोलायला मागेपुढे पाहणार नाही. आणि जरा आवरत घ्या. नाहीतर रहस्यमयी तळघर उघडून कालदृष्टीच्या हवाली करेल मग तिथे बोलण्याचे धडे शिकवेल तुम्हाला अनिष्ट देव. थांबा तुम्हाला मी आता कर्णाच (Howler) पाठवते.

माझ्याकडे असलेला हॅरी पॉटर आणि परीस या पुस्तकांचा संग्रह
1.मराठी आवृत्ती (Marathi Edition)
2.विसावा वर्धापन दिन आवृत्ती (20th anniversary Edition)
3.सचित्र आवृत्ती ( Illustrated Edition )

जादुई छडी घरगुती बनवली आहे.

तुमच्या़ कर्णाला व अनिष्ट देवाला घाबरुन आवरत घेतो बर का..

जाउ देत उगाच शब्दाला शब्द वाढ्वुन वाद घालायची सवय मला नाही .. किंबहुना तो माझा पिंडच नाही.

लेट्स अ‍ॅग्री टु डिसॅग्री.. तुम्हाला माझा मुद्दा कळलेला दिसत नाही.. भाषांतराला माझा विरोध नाही .. पण मुळ साहित्याची मजा मु़ ळ भाषेत जास्त येते हा माझा मुद्दा.

मुख्य म्हणजे .. मराठीत वाचलेले असोत वा मुळ इंग्रजीत वाचलेले असोत.. इथे सगळे हॅरी पॉटर सिरीजचे फॅन आहेत. त्यामुळे मी हा भाषांतराचा वाद इथेच थांबवु इच्छितो.

टिनु.. मी .. जिम के ची इलुस्ट्रेटेड पुस्तके अजुन विकत घेतली नाहीत.. तो दर २ वर्षांनी १ पुस्तक पुर्ण करत आहे . मी सगळा सेट पुर्ण झाल्यावर तो सेट घेइन. खुप छान इलुस्ट्रेशन्स आहेत. सध्या पहिल्या ३ पुस्तकांचा सेट म्हणुन मिळत आहे.

बाय द वे.. इथे कोणी ओरलँडोला युनिव्हर्सल स्टुडिओला जाउन हॅरीपॉटर वर्ल्ड अनुभवलेले फॅन्स आहेत का?

एकंदरीत अनुभव चांगला होता.. डायगॉन अ‍ॅली व तिथली दुकाने छान केली आहेत. हॉगवर्ट किल्ला बाहेरुन चांगला केला आहे. आतुन अजुन चांगला करायला वाव होता. मुव्हींग/टॉकिंग पोर्ट्रेटस व फॅट लेडीचा दरवाजा चांगला केला आहे. ग्रिंगॉट्सच्या बँकेवरचा आग ओकणारा ड्रॅगनही मस्त आहे.. प्लॅट्फॉर्म ९ ३/४ वरुन हॉगवर्ट एक्स्प्रेस मधे जाताना भिंतीत अद्रुष्य होण्याचा स्पेशल इफे क्टही छान बनवला आहे.

रोलर कोस्टर राइड मात्र सुमार वाटल्या.. . कदाचित वॉल्ट डिस्ने मधल्या अ‍ॅनिमल किंग्डम मधली.. अव्हॅटार.. पॅसेज ऑफ फ्लाइट ही आउट ऑफ धिस वर्ल्ड र्राइड दोनच दिवस आधी घेतली असल्यामुळे त्या राइडपुढे हॅरी पॉटरच्या दोन्ही राइड्स सुमार वाटल्या.

त्या सगळ्या अनुभवांवर एक नविन बीबी उघडता येइल.

टिनू व्वा !!! खूपच छान !!!! Collection गहिरे भारी आहे. मला तर तुझा हेवाच वाटून राहिला आहे. माझ्याकडे मराठी आणि इंग्रजी सेट आहे. आता illustrated पुस्तकं नक्कीच घेते शिवाय ख्रिसमसचा सेल लागला की कमी किमतीत भेटतील पुस्तकं .

मुकुंद तुमचा मुद्दा समजला मला मराठी पुस्तकं वाचताना JK रोलींगबाईंची लेखनशैली नाही जाणवत हे खरं आहे. मात्र मंजुषा ताईंनी केलेलं भाषांतर वाखाणण्याजोग आहे हेच मला सांगायचं होत आणि शिवाय महाराष्ट्रात घराघरांत हे पुस्तकं अनुवादाच्या स्वरूपातच वाचलं गेलंय. माझी आजी सुद्दा अगदी आवडीने वाचत बसते तिला तर जणू ही कादंबरी खरीच वाटत आहे आमच्या खूप गप्पा होतात या विषयावर आणि या निमित्ताने संवाद होऊन तिला बरं वाटतं. आता तिच्यासारख्या लोकांची वाचायची सोय तर मंजुषा ताईंनीच केली ना ?? त्यामुळे मी तिचा खूप आदर करते.. बय्या खूपच लिहिते ना मी !!!

धन्यवाद मुग्धामोहिनी !!!
मुकुंद तुम्ही भाग्यवान आहात हॅरी पॉटरच जग प्रत्यक्ष अनुभवने म्हणजे एक विलक्षण क्षण .... कधी USA ला जाऊ आणि युनिव्हर्सल स्टुडिओ पाहू असं वाटत आहे.

Felix Felicis
खुशकिस्मत किंवा सुदैवी काढा :- खुशकिस्मत काढा ज्याला सुदैवी काढा देखील म्हणतात. हा एक जादुई औषधी पदार्थ आहे जो काढा पिणाऱ्यास काही काळासाठी भाग्यवान बनवतो. या दरम्यान या व्यक्तीचे सर्व प्रयत्न यशस्वी होतात. एक सामान्य दिवस एका क्षणात विलक्षण दिवस होतो.
प्रभाव -
काढा पिणाऱ्यास भाग्यवान बनवणे
दुष्परिणाम -
● अतिरेकी आणि कटाक्षाने लापरवाही
● अत्यंत प्रमाणात विषारी
●चुकीच्या पद्धतीने केल्यास अत्यंत विनाशकारी
वैशिष्ट्य -
वितळताना सोनेरी रंग धारण करणे
पिण्याचा कालावधी -
६ महिने
काठिण्य पातळी -
प्रगत
घटक -
१. अश्विंदर या सापाचे अंड
२. रान कांदा
३. मार्टलॅप प्राण्याचा स्पर्शक
४. ओवांचा अर्क
५. पक्षसर्पांच्या अंड्याचे कवच
६. सामान्य ऋ पावडर

कृती -
१. सर्वप्रथम एका मोठ्या कढईत अश्विंदराचे अंड टाका आणि नंतर त्यात अश्वमुळा घालून उष्णता द्या.
२. रान कांद्याचा रस कढईत घाला व जोरात ढवळा.
३. मार्टलप प्राण्याचे स्पर्शक बारीक चिरून मिश्रणात टाका आणि उष्णता देणे चालू ठेवा.
४. ओवांचा अर्क मिश्रणात टाका व हळुवार ढवळा.
५. पक्षसर्पाच्या अंड्यातील कवचाचे चूर्ण करा आणि मिश्रणात टाका.
६. हळुवारपणे ढवळणे चालू ठेवा.
७. आता सामान्य ऋ पावडर मिश्रणात पसरवा.
८. जोरात ढवळणे चालू ठेवा आणि एकाचवेळी उष्णता देणें चालू ठेवा.
९. जादूची छडी तयार होणाऱ्या काढ्यावर फिरवा आणि 'भाग्यसङक्षय' (Felixemspra) हा मंत्र म्हणा.
१०. सुदैवी काढा तयार आहे.

मी पुन्हा एकदा समग्र हॅरी पॉटर वाचायला घेतलं।आहे आणि आता पालक म्हणून मला एक प्रश्न पडला।आहे की होगवर्ट्स ची फी किती आहे
मी अगदी बारकाईने वाचतोय त्यात पार नाईट्स बस च्या भाड्यापासून ते बटर बियर पर्यंत सगळयाच किमती दिल्या आहेत पण होगवर्ट्स ला फी किती दिली जाते, किती हफ्ते, आर्थिक मागासवर्गीय मुलांना फी सवलत दिली जाते का या

J.K. Rowling
@jk_rowling
@emmalineonline1 @micnews There's no tuition fee! The Ministry of Magic covers the cost of all magical education!

आर्थिक मागासवर्गिय मुलांसाठी पुस्तके/ सप्लाईजला वेगळा फंड मात्र आहे. तो यु नो हु ला मिळालेला.
ऑर्फनेज मध्ये डंडो जातो त्या मेमरीत.

वाह हे भारीच
फक्त बाकी गोष्टींचा खर्च मुलांनी पालकानी करायचा
आपल्याकडे पण हे असंच पाहिजे

हाफ ब्लड प्रिंस परत वाचताना: स्लगहॉर्नच्या हॉरक्रक्स मेमरीत जाऊन आल्यावर डंबलडोर आणि हॅरीच्या बोलण्यातुन, वॉल्डीला प्रॉफेसी (अर्धवट) समजते आणि तो त्यावर विश्वास ठेवुन हॅरीला मारायच्या मागे लागतो. त्यात तो लिली आणि जेम्सना मारतो, त्या गोंधळात हॅरीला शिल्ड मिळतं आणि त्याला हॉरक्रक्स बनवतो. पण जर त्याने हॅरीला आपला शत्रू मानलंच नसतं तर हे सारं घडतंच ना. असं डंडो म्हणतो.
त्यावरुन कंसा तुला देवकीचा आठवा मुलगा मारेल ही प्रॉफेसी आठवली. आणि कंसाने जर यावर विश्वास ठेवलाच नसतच, आधीची सात मुलं मारायचा प्रयत्नच केला नसता तर कदाचित कृष्ण जन्मता ना, आणि सगळंच बदललं असतं असा एक विचार डोक्यात आला. किमान असा एक ट्विस्ट देऊन भारी स्टोरी नक्की बनेल Happy

महाभारत आणि रामायणचे बरेच अस्पष्ट संदर्भ हॅपॉ मधे मिळतात. बर्‍याच वेळा विचार येतो की हे जेके ने वाचले असतिल का? (असले तरी ती कबुल करणार नाही.)

डेडली होलॉज मध्ये रॉन त्याला पदोपदी सांगत असतो की यु नो हु चे नाव घेऊ नकोस त्याला टॅबु केलं आहे
तरी हॅरी ते घेतोच आणि त्यामुळे ते अक्षरशः मरता मरता वाचतात
हरमयनी ला प्रचंड टॉर्चर केलं जातं
डॉबी मरतो

पण नंतर हॅरी एका चकार शब्दाने माफी मागत नाही दोघांची
खूप खटकलं हे
वर तो हरमयनी मुळे आपली wand गेली याच दुःखात असतो

Pages