हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप... डेथली हॅलोज मधे कथानक इतक्या वेगात पळत असते की हॅरी कधी माफी मागणार?

हर्माइनीमुळे आपला वाँड गेला अस हॅरीला कधीच वाटले नाही किंवा त्याने कधीच असे बोलुन दाखवले नाही. तुला कुठे असे वाचण्यात आले? उलट तो हर्माइनीला म्हणतो सुद्धा की गॉड्रिक हॉलो मधुन .. बथिल्डा बॅगशॉटच्या घरातुन.. नगीनीच्या अ‍ॅटेकपासुन .. तो जिवंत राहीला ते फक्त हर्माइनीमुळेच! ( बाय द वे... तो बथिल्डा बॅगशॉटच्या घरातील प्रसंग व हाफ ब्लड प्रिंस मधला केव्ह मधला प्रसंग... हे दोन प्रसंग... सबंध हॅरी पॉटर पुस्तकांमधले दोन स्केअरीएस्ट प्रसंग आहेत अस मला वाटले.. खुप मस्त वर्णन केले आहे पुस्तकात जे के रोलिन्स ने.)

पण डॉबी मरतो तेव्हा खरच खुप वाइट वाटते. मोस्ट लाइकेबल कॅरॅक्टर इन द सीरीज! “ डॉबी इज अ फ्री एल्फ! ही केम हिअर टु सेव्ह हॅरी पॉट्टर! “ माल्फॉय मॅनॉर मधले त्याचे हे वाक्य वाचताना डोळ्यात पाणी येते.

डॉबी मरतो तेव्हाचा प्रसंग वाचतांना मला नेहमीच डोळे पुसत वाचावं लागतं.
हॅरी जेव्हा त्याच्यासाठी फावड्याने कबर खणतो तेव्हा ही Sad

वेळच वेळ असतो की
बिल च्या घरी तब्बल दोन तीन आठवडे राहतात ते

आणि हॅरी wand चे बोलून दाखवत नाही थेट पण जेव्हा हरमयनी म्हणते की बेलट्रिक्स ची wand मला नको तेव्हा त्याच्या मनात येतं की कसे तिने त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला असतो की wand वर काही अवलंबून नसते

आणि होलॉज मध्ये अरियाना वर इतका वेळ का खर्ची घातलाय हेही कळत नाही
त्याचा कथानकावर काहीही परिणाम पडत नाही

होलॉज मध्ये अरियाना वर इतका वेळ का खर्ची घातलाय हेही कळत नाही >>> डंबलडोर यांची व्यक्तिरेखा क्लिअर होते त्यातून! असे मला वाटते. हॅरीच्या मनात जे प्रश्न असतात, गुंता असतो, तो सुटायला मदत होते.

कुठे सुटतो गुंता
कारण अगदी शेवटी आबेफिर्थ त्याला सांगतो की कसा albus ने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला त्याचे काहीही नव्हते
आणि त्यावर हॅरी म्हणतो की त्यांना शेवटपर्यंत वाईट वाटत होते
पण यावरून कथानक कुठं काय बदलते?
Albus ने जे केलं ते बदलत नाहीच ना
आणि त्यामुळे हॅरी च्या मोटिव्ह मध्येही बदल होणार नसतो कारण त्याला हे माहिती असतेच की काहीही झाले तरी woldi ला मारणे आपल्यालाच करावे लागणारे
डंबलडॉर कसेही असले tri

आशुचॅम्प, एन्ड रिझल्ट पुस्तकाच्या सुरवातीलाच बहुधा बऱ्याच लोकांना माहिती असावा, परंतु फक्त त्यासाठीच कुठे आपण पुस्तक वाचतो? महाभारतात कुंतीने कर्णाच्या जन्माचं रहस्य त्याला सांगितल्यावरही तो दुर्योधनाच्या बाजूने लढला, त्यामुळे जे व्हायचं तेच झालं तर हे का लिहीत बसले, असं व्यासांना तर म्हणू शकत नाही आपण. डंबलडोरसारख्या विझार्डलाही कर्स्ड अंगठी मिळाल्यावर त्यातल्या स्टोनचा वापर अविचाराने आरियानासाठी कसा लगेच तपासणी न करता करावासा वाटला, ह्यात तर त्याच्या वर्षभरात निश्चित झालेल्या मृत्यूचं आणि पुढच्या सर्व घटनांचं मूळ दडलेलं आहे. त्याने तसं केलंच का, हा प्रश्न हॅरीलाही सतावत असेल, मलाही होता. त्या कॅरॅक्टरविषयी महत्त्वाच्या गोष्टी ह्यातून स्पष्ट होतात. तसंच हॅरी, डंबलडोर, व्हॉल्डेमॉर्ट तिघांच्याही आयुष्यात लहानपण ते पौगंडावस्था ह्यात मृत्यू कसा आला, आणि त्या‌ तिघांच्याही जडणघडणीवर त्याचा कसा परिणाम झाला, हे पाहण्याजोगं आहे. हॅरीचं मास्टर ऑफ डेथ असणं ह्या पार्श्वभूमीवर अधिकच उठून दिसतं मला तरी.

पण हे सगळं अशा वेळी येतं की जेव्हा उत्सुकता दाटून आलेली असते की पुढे काय होणार
आणि हे मग अनावश्यक पाल्हाळ लावल्यासारखं वाटलं

मला एक प्रश्न पडायचा ,जो काल अधोरेखित झाला कि , जेव्हा व्हॉल्डेमॉर्ट छोट्या हॅरी ला मारायला गोड्रीक्स hallow मध्ये जातो आणि सत्यानाश करून घेतो त्यानंतर त्याच्या शरीराचं काय होत ? म्हणजे ते usual evil पेक्षा पुढं गेलेला इत्यादी ठीक पण शरीराची काय वासलात ? कोणी काही वाचलंय का यावर ?
एक थेअरी अशी मांडतात कि , dumbledor नि ते आधी येऊन नष्ट केलं आणि मग सिरियस आणि रूबियस ला तिकडे बोलावलं कारण त्यांना म्हणे जादुई विश्वाला याच विचारात ठेवायचं होत कि तो आता फक्त नाहीसा झालाय , परत येऊ शकतो.
कारण जादू मंत्रालय त्याच शरीर दाखवून आता सगळ्यांची सुटका झाली असं म्हणायला रिकामी झाली असती आणि fudge ने ते स्वतःच यश असं दाखवलं असत.

movie वाल्यानी दुसऱ्या शरीराचं मूर्खपणाच चित्रण केलाय शेवटी. त्याचे छोटे छोटे तुकडे कागदासारखे उडताना दाखवून. पुस्तकात जेके बाई नीट लिहतात कि त्याच शरीर तसेच पडलं इतकं कि कुणी आधी जवळ जायला तयार होईना !

मी पुन्हा एकदा समग्र हपॉ वाचून काढले आणि पुन्हा एकदा पोतभर प्रश्न पडले आहेत की पुढे काय होतं

उदा
1 हॅरी परत डडली कुटुंबाला भेटतो का? मोठे झाल्यावर त्यांच्यातील संबंध कसे राहतात
2 हरमयनी तिच्या आईवडिलांना भेटते का?
3 ग्रेन्जर आणि विजली कुटुंब यांच्यात लग्नाची बोलणी करायला भेटी गाठी झाल्या असतील का? आर्थर ना तर डेंटिस्ट ची उपकरणे बघून हर्षवायू झाला असेल
4 हॅरी आणि जिनी च्या लग्नाला काय अडचण नसेल आली मोस्टली, जर डडली परत आलेच नाहीत तर
5 हॅरी लग्नानंतर कुठे राहतो, सिरीयस चाच घरी का? आणि क्रिचर त्याच्याकडे राहतो का कामाला?
6 जेम्स लिली आणि अलबस यांच्यापैकी कोणी सीकर होतात का?
7 त्यांच्यापैकी कोणाला मारुडर मॅप व इंव्हिजिबिलिटी क्लोक मिळतो का?
8 विझर्ड फॅमिलीत बाळंतपण घरीच।करतात का? सात पुस्तकात मिळून जन्माला आल्याचा उल्लेख फक्त टेड टोंक्स चा आहे
9 होगवर्ट्स चे हेडमास्तर नंतर कोण होतात, मागोनिगल मॅडम का?
10 रॉन नांतर नक्की कोण होतो, एकेठिकाणी वाचले की तो हॅरी सारखा ऑरर होतो तर एके ठिकाणी आहे तो जॉर्ज ला बिझनेस मध्ये पार्टनर होतो आणि दोघे मिळून दुकान चालवतात

आशुचँप.. खर म्हणजे हॅरीने व्होल्डोमोर्टचे नाव नावाने घेण्याचे कारण तुला पहिल्याच पुस्तकाच्या शेवटी सापडेल.. डंबलडोरच त्याला म्हणतो.. की

"ऑल्वेज युज प्रॉपर नेम ऑफ थिंग्स… बिंग अफ्रेड टु से हिज नेम अ‍ॅड्स टु द फिअर व्हॉल्डोमोर्ट हॅज क्रिएटेड अँड इट गिव्ह्स हिम अननेसेसरी पॉवर ओव्हर दोज हु डोंट से हिज प्रॉपर नेम."

आणी हॅरी थ्रु अँड थ्रु डंबलडोरचा शिष्य असल्यामुळे तो नेहमीच व्हॉल्डोमोर्टला व्होल्डोमोर्टच म्हणायचा.. त्यामुळे सातव्या पुस्तकात त्याने तसे न करण्याचे त्याला कारणच नव्हते.

आणी सातव्या पुस्तकात कथानक वेगात जात असते हे मी यासाठी म्हटले की खुपच गोष्टी एकामागोमाग एक घडत असतात. शेल कॉटेजमधे सुद्धा हॅरी ग्रिपहुक व ऑलिव्हँडर यांची मदत मागण्यात बिझी असतो व ग्रिंगॉट बँकेतल्या लस्ट्राँज व्हॉल्टमधे डल्ला कसा मारायचा याचा प्लान करत असतो. नुसता हात चोळत बसला नसतो तिथे तो.. तेही डॉबीच्या मरण्याच्या दु:खाच्या पार्श्वभुमीवर…. Sad

तुला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मला माहीत नाहीत पण इन्व्हिजिबिलिटी क्लोक त्याच्या मुलाला तो नंतर देत असावा( अल्बस सेव्हेरस पॉटरला) अस मला वाटत.. कारण तो त्याच्याकडे पिढीजात आलेला असतो … ३ पेव्हेरो ब्रदर्स मधल्या सगळ्यात धाकट्या इग्नोटिअस पेव्हेरो कडुन.. कारण हॅरीचे वडिल जेम्स पॉटर.. हे इग्नोटिअस पेव्हेरोचे वंशज असतात.

पण मला क्रिचरबद्दल एक वेगळाच प्रश्न सतावत आहे. क्रिचर जेव्हा व्हॉल्डोमोर्ट बरोबर केव्ह मधे जातो तेव्हा व्हॉल्डोमोर्ट त्याला ते डेडली पोशन प्यायला लावतो… ते प्यायल्यावर क्रिचर अशक्त होतो व व्हॉल्डोमोर्ट क्रिचरला( हाउस एल्फला) कमी लेखत असल्यामुळे त्याला तिथेच अशक्त अवस्थेत सोडुन जातो. त्याला असे वाटते की क्रिचर तिथेच मरुन पडेल. पण क्रिचर त्या गुहेतुन डिसॅपरेट होउन रेग्युलस ब्लॅककडे परत जातो व रेग्युलसला सगळ सांगतो. पण मग नंतर पुढची २०-२५ वर्षे व्हॉल्डोमोर्टला कळतच नाही की क्रिचर एल्फ अजुन जिवंत आहे?तेही ब्लॅक फॅमीली च्या घरात?

तो एल्फ ला एवढे महत्वच देत असेल
तो जगला ला मेला याची विचारणा कधी केलीच नसेल
आणि रेग्युलस तर नंतर भेटत नाहीच वोल्दी ला
आणि बाकी सगळे तर अधिच बाहेर पडलेले असतात
बेलट्रिक्स आणि सिरीयस अझकबन मध्ये असतात
मग कोणाकडून कळणार

आशुचँप... तसेही असेल... पण जो डार्क विझर्ड स्वतःच्या आत्म्याचे सात तुकडे करु शकतो त्याला क्रिचर जिवंत आहे हे समजले पाहीजे होते.... Happy

मार्गी.. तुमचे पत्र वाचले.. त्यातुन तुम्हालाही हॅरीचे विश्व भावुन गेले आहे हे जाणवते.

पण एक निरीक्षण...

तुमच्या पत्रातुन तुमच्यात व तुमच्या पुतणीत असलेला एक काका पुतणीचा जिव्हाळा दिसुन येतो. तिने जे हॅरीचे विश्व तुमच्या आधी वाचनातुन अनुभवले तेच नंतर तुम्ही अनुभवल्यावर तुम्हाला एक कॉमन अनुभव तिच्याशी शेअर करण्याचा आनंद झालेला दिसुन येतो व तिला हॅरीचे विश्व व आपले विश्व यातले साधर्म्य तुम्ही तिला सांगत आहात.

मला तुम्हाला एक सांगावेसे वाटते की तिने ज्या वयात ती पुस्तके वाचली व तुम्ही तुमच्या वयात ही पुस्तके वाचली... त्या दोन्ही वाचण्याच्या इंटरप्रिटेशन मधे खुप फरक असु शकतो. तिने़ ज्या वयात ही पुस्तके वाचली त्या वयातील मुले पुष्कळ वेळा त्तश्या पुस्तकांमधे तात्पुरती रमतात अँड देन दे मुव्ह ऑन टु द नेक्स्ट रिडींग अ‍ॅड्व्हेंचर..

आपण मोठी माणसे अश्या पुस्तकांमधे लहान मुलांपेक्षा जरा जास्त वेळ अडकुन पडतो.

मी अस म्हणत नाही की तुमच्या १० वर्षाच्या पुतणीबाबत हे खरे असेल पण अशी शक्यता आहे की... ती हॅरी पॉटरचे विश्व मागे सोडुन पुढच्या रिडींग अ‍ॅड्व्हेंचर मधे गुंतली असेल आणी असे असु शकते की तुम्ही जरा उशीरा त्या विश्वाचा कॉमन थ्रेड तुमच्या आणी तिच्यातल्या कम्युनिकेशन साठी वापरत आहात. Happy

आशुचॅम्प तुम्ही खूप च मोठे पंखे आहात वाटतं H P सिरीज चे ... एवढे डिटेलिंग वाचून परत वाचायची इच्छा झालीये .

हो मी खूप मोठा फॅन आहे हॅरी पॉटर चा
आता मी नुकतेच रोलिंग बाईचे शॉर्ट स्टोरीज वाचले
त्यात मूळ पुस्तकात नसलेल्या कित्येक गोष्टी बाईंनी सांगितल्या आहेत
जसे की मागगोनिगल यांचं बालपण, किशोरवयीन प्रेम प्रकरण, नवरा अकाली जाणे वगैरे
मिनिस्त्री ऑफ मॅजिक चे आजवर होऊन गेलेले सगळे प्रमुख आणि त्यांची कामे
खूप मनोरंजक आहे

@ मुकुंद जी, धन्यवाद! मला खूप उत्सुकता होती हॅरी बद्दल व त्याच्या समस्त भक्तांसोबत डायलॉग करण्याच्या वेळेस माझं अज्ञान जाणवायचं. सो! पण माझ्या पुतणीला माझं पत्र जाम आवडलं व रिलेटही झालं. त्यातला माझा मॅसेजही पोचला. Happy

सातवा चित्रपट ज्याने कुणी केला त्याला चोपला पाहिजे चांगला
किती माती खाल्ली आहे त्यात
आणि वॉलदी व हॅरी हाताने मारामारी करतात ???
आवरा रे च्यायला

नेव्हिल आणि लव्हगुड चा लव्ह ट्रॅक कुठेही पुस्तकात नसताना बळच घुसडला आहे
आणि असंख्य भयाण प्रमाद केले।आहेत
असह्य आहे ते बघणं

ज्यांना हॅरी पॉटर हे काय प्रकरण आहे हे त्याची साती पुस्तके न वाचता.. नुसते त्याचे ८ मुव्हिज बघुन कळले असेल तर मी त्यांचे पाय धरायला तयार आहे.

अगदी अगदी
आणि आहेत असे काहीजण ओळखीत

डंबलडोरसारख्या विझार्डलाही कर्स्ड अंगठी मिळाल्यावर त्यातल्या स्टोनचा वापर अविचाराने आरियानासाठी कसा लगेच तपासणी न करता करावासा वाटला, ह्यात तर त्याच्या वर्षभरात निश्चित झालेल्या मृत्यूचं आणि पुढच्या सर्व घटनांचं मूळ दडलेलं आहे. त्याने तसं केलंच का, हा प्रश्न हॅरीलाही सतावत असेल, मलाही होता >>>>
@भास्कराचार्य.... नक्की काय म्हणताय तुम्ही??
डंबलडोअर ती अंगठी ( आणि खडा) आरियानाला परत बोलावण्यासाठी वापरतात, हा उल्लेख नक्की कुठे आणि कधी झाला ??? 7ही पुस्तके वाचली आहेत, पण हा संदर्भ
लक्षात आला नाही मला कधी, म्हणून विचारते आहे. Did I miss anything or was it
kind of reading btwn the lines ???

डेथली हॅलोज मध्ये वोल्डेमॉर्ट हॅरीला मारण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळासाठी दोघेही निश्चेष्ट होऊन पडतात आणि हॅरी डम्बलडोरशी स्वप्नासारख्या अवस्थेत संवाद साधतो , त्या भागात आहे .. स्टोन वापरून एरियाना आणि आपल्या आईवडिलांना तात्पुरतं का होईना परत बोलवायचा प्रयत्न करायचा होता असं .

Oh yes, thanks @radhanisha
7वा भाग पुन्हा वाचला पाहिजे आता,
डंबलडोअर आणि हॅरीच्या त्या संवादातले बरेच भाग डोक्यात क्लिअर नाहीत अजूनही, स्पेशली त्याच्या आणि voldemort च्या छडीच्या दुव्याचा...! परत वाचायला हवं एकदा।।।

Pages