हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, तिथेच आहे. तो हॅरीला सांगतो, की तिन्ही हॅलोज त्याच्याकडेही आल्या होत्या. (वँड, स्टोन त्या खड्यामधून, आणि क्लोक हॅरीच्या वडलांकडून उसनं घेऊन) पण तो मास्टर ऑफ डेथ होण्यासाठी योग्य नसल्याने त्याला त्या तिघांपैकी लीस्ट पॉवरफुल वँडवरच फक्त हक्क मिळवता येऊ शकला होता. स्टोन तो वापरायला गेला आणि हे होऊन बसलं. व्हॉल्डेमॉर्टला कधी ह्यांबद्दल माहिती मिळवायचा योगच आला नसल्याने त्याच्याकडे स्टोन येऊनही त्याला तो कळलाच नाही, आणि कळला असता, तरी त्याला त्याची भीतीच वाटली असती, इ. इ.

भीती नाही
वोल्दी ला त्याची गरजच नव्हती कारण त्याला कोणाला परत जिवंत करण्याची इच्छाच नव्हती
त्याला कोणीच नव्हतं इतकया जवळची व्यक्ती
त्याला फक्त अमर्याद ताकद हवी होती ज्याने लोकं घाबरतील
त्यामुळे त्याला क्लोक पण इतका काय गरजेचा वाटलं नाही
त्याला फक्त इल्डर wand हवी होती
ती पण त्याची wand हॅरी ला मारू शकत नाही म्हणून
होलॉज चा उपयोग त्याला नव्हताच
त्याला फक्त होरकृक्स हवे होते

म्हणजे तेच ना
कोणाला बोलावणार
त्यानेच मारलंय सगळ्यांना
कोणी मित्र नाहीत नातेवाईक नाहीत
तो कायम एकटा आहे आणि तसाच राहायला आवडतं त्याला
भीती आहे फक्त त्याच्या मरणाची

त्याची इच्छा आहे पण भीतीमुळे कोणाला बोलावू शकत नाही अशी कोणी व्यक्तीच नाहीये

Pages