कुछ याद इन्हे भी कर लो - गायक-गायिका

Submitted by prashant_the_one on 20 July, 2011 - 22:48

जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.

हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.

सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.

यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..

गुलमोहर: 

ये शहर है अमन का... यहाँ पे सब शांती शांती है.. गाणारा ही तोच.. >>> तो बाली ब्रम्हभट्ट नाही... जॉली मुखर्जी Happy

बेला सुलाखे सुद्धा रिअ‍ॅलिटी शो मधुन बॉलिवूडात आली ना? Uhoh पण टिकली नाही जास्ती... "गले मे लाल टाई.... (हम तुम्हारे है सनम) आणि राजा हिंदुस्थानी मध्ये परदेसी परदेसी गाण्यात कुठल्यातरी चार लायनी गायली.... (असं म्हणण्याचं कारण हे की त्यात बर्‍याच गायिका आहेत... त्यात नक्की ही कुठे गायली तेच कळत नाही..:(

रच्याकने, सुदेश भोसले को काय को भूलगये? Uhoh
अमिताभ बच्चन व इतर अनेक नटांच्या आवाजाची नकल हुबेहुब करणारा म्हणून जास्ती ओळखतात लोक... पण त्याचं शावा शावा... माहिया से शावा..
आणि बचके तु रेहना रे बचके तु रेहना.. मध्ये थोडा रेकल आवाज...
पण आमच्या लहानपणी, मै पोट्टी पटाऊंगा मगर हल्लु हल्लु.... फार गाजले होते Lol

>>>>साधना सरगम आणि अलका याज्ञिक तशा एकाच काळातल्या गायिका पण अलका पुढे आली, साधनाला फार चान्स मिळाला नाही... हम है राही प्यार के मध्ये बंबई से गयी पुना, आणि साथिया मध्ये चुपके से लग जा गले.... सुंदर गायली...<<<<

बंबई से गयी पुना अलका याज्ञिकचं आहे ना. मला वाटतं, वोह मेरी निंद मेरा चॅन मुझे लॉटा दो, हे साधना सरगम ने गायलं आहे. (मला दोन मात्रा कशा द्यायच्या ते कळत नाहिये, म्हणुन चॅ आणि लॉ झालं आहे).

चित्रा, येशुदास आणि एस.पी.बालसुब्रमण्यम हे दक्षिणेतले हिट्ट गायक हिंदीत तसे अपयशीच म्हणावे लागतील. नाही म्हणायला, एस.पी. ने सलमानला त्याच्या सुरुवातीच्या काळात फार तारलं. पत्थर के फूल, लव, मैने प्यार किया, हम आपके है कौन वगैरे. येशुदासचं सुरमयी अखीयों में (सदमा) एवढंच आठवतं. दौडमधलं ओ भंवरें त्याचंच असा बर्‍याच जणांशी वाद घालून झालाय. जाणकार सांगतीलच त्याबद्दल Happy चित्राची बाँबे आणि लव मधली गाणी चांगलीच गाजली होती.

बंबई से गयी पुना अलका याज्ञिकचं आहे ना. मला वाटतं, वोह मेरी निंद मेरा चॅन मुझे लॉटा दो, हे साधना सरगम ने गायलं आहे. (मला दोन मात्रा कशा द्यायच्या ते कळत नाहिये, म्हणुन चॅ आणि लॉ झालं आहे).
>>>> नशीब 'मुझे लोटा दो' नाही झालं, अर्थाचा अनर्थ झाला असता Light 1

रच्याकने लौ (lau) असं लिहा !

नशीब 'मुझे लोटा दो' नाही झालं, अर्थाचा अनर्थ झाला असता >> मित्त Rofl

मित्त पण एसपी दक्षिणेत सॉलिड गाजलाय बरं.. Happy

येशुदासने अमोल पालेकरसाठी कितीतरी गाणी गायलीत, चितचोरची सगळी, जानेमन जानेमन तेरे दो नयन(सोबत आशा)
इतरही बरीच.

का करु सजनी आए न बालम, चांद अकेला जाए सखी री आणि कोई गाता मैं सो जाता- दोन्ही आलाप (आलाप मधे लता-दिलराज कौर यांचे माता सरस्वती शारदा हे पण आहे), चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, जीना उसका जीना है, खुषियां ही खुषियां हो जीवन में जिसके, कहां से आए बदरा, जिद ना करो, दिल के टुकडे टुकडे करके मुस्कुराके चल दिए, सुनयना/
यातले बरेच राजश्रीचे पिक्चर्स दिसताहेत.

एस पी बालसुब्रण्यम आधी एक दूजे के लिए मधे आला ना हिंदीत?

नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.>>>>नितीन मुकेशची "आजा रे आजा रे ओ मेरे दिलबर आजा" (नूरी) आणि "तुम्हारी पलको के चिलमनोमें ये क्या छुपा है सितारे जैसा" (नाखुदा) हि अत्यंत आवडीची गाणी. Happy

येशुदासने अमोल पालेकरसाठी कितीतरी गाणी गायलीत, चितचोरची सगळी, जानेमन जानेमन तेरे दो नयन>>> धन्यवाद भरत... ही गाणी कशी काय विसरु शकतो Uhoh

रच्याकने, वर सोनाली वाजपेयीचा उल्लेख वाचला. पूर्वी दुरदर्शनवर एक कार्यक्रम पाहिला होता. संगीतकार कल्याणजी-आनंदजी जोडीतले कल्याणजी यांच्या सोनाली वाजपेयी आणि साधना सरगम ह्या शिष्या! तो कार्यक्रम कल्याणजीभाईंवर होता. त्यात दोघीही तोडीस तोड गायल्या होत्या. दुर्दैवाने सोनालीला हिंदी सिनेमात फारशी संधी मिळाली नाही. त्यामानाने साधना सरगम बरीच गाजली म्हणायची. आजच्यासारखे रियालिटी शोज त्यावेळी असते तर चित्र वेगळं दिसू शकलं असतं कदाचित!

जिप्स्या.. तू खरच गाण्याचा डेटाबेस आहेस.
"anubhav " सिनेमातलं tanujachya तोंडी असलेल"कोई चुपकेसे आके" कोणी म्हटलंय?

जिप्स्या उषा खन्नाने अजून एक गाणं गायल्याचं आठवतंय ते म्हणजे ये दिल किसको दू मधलं..रफिसोबतचं "फिर आने लगा याद वो, प्यार का आलम..."

सुमन कल्याणपूर यांच्या भगिनी शामा हेमाडी/चित्तार यांचा आवाज 'जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम' या गाण्याला आहे.

खरं तर देवांग पटेल ला याद करणं अयोग्य ठरेल पण "मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू... मेरी मर्जी..." म्हणत त्याने थोडे दिवस का होईना पब्लिक ला वेड लावलं होतं..
पण मेरी मर्जी मेरी मर्जी करत... पुढे हा कोणाच्या मर्जीस आला नाही ही गोष्ट वेगळीच. Proud

प्रीती उत्तम बहुतेक संगितकार उत्तम सिंग यांची मुलगी का? Uhoh (जाणकार प्रकाश टाकतीलच.) तिने ही अर्जुन पंडीत, ताजमहल (नविन), पिंजर, गदर साठी गायन केले, पण एकही गाणं गाजलेलं मला आठवत नाही. त्यातल्या त्यात "मुसाफिर जानेवाले, नही फिर आनेवाले..." हे आठवेलच...

कविता पौडवाल आई सारखी काही पुढे आली नाही..
जिन्स, लव्ह यू हमेशा (काय नाव आहे सिनेमाचं Uhoh :() आणि सपने सिनेमात माझ्या मते एकच गाणं गायलं.. "स्ट्रॉबेरी आँखे क्या सोचती है.." गाऊन बिचारी गायबच झाली.

अन्वर या नावाचा उल्लेख कोणीच केला नाही. आवाज हुबहू रफी सारखा.
मला आठवते एक गाणे "अर्पण" मधे जितेन्द्रच्या तोन्डी असलेले,
"मुहोब्बत अब इजारत (की तिजारत) बन गयी है"
अजुन काही गाणी ---
हमसे का भूल हुई, जो ये सजा हमका मिली (जनता हवालदार, राजेश खन्ना)
सोहनी मेरी सोहनी और नही कोई होनी, रब से ज्यादा... (सोहनी महिवाल, सनी देओल)
नजर से फुल चुनती है, (आहिस्ता आहिस्ता)
जिन्दगी इम्तिहान लेती है (नसिब, बच्चन)
हाथों की चंद लकिरोंका (विधाता, दिलिपकुमार)

पिनाझ मसानी... ही गायीका कुणाला आठवते का?...
८०च्या उत्तरार्धात आणी ९०च्या मध्या पर्यन्त हिने खूप चांगल्या गझ़ल गायलेल्या, पण बहुतेक गायन हिन्दी सिनेमाच्या परिघाबाहेर झालेलं. काही काळ दिल्ली दूर-दर्शनच्या सांगितीक कार्यक्रमांसाठी ओ.पी.नय्यर साहेबांच्या संगित दिग्दर्शनात गायलेली. हिन्दी सिनेमा साठी दोन-तीन गाणीच गायली, पण दूर्दैवाने गाणी गाजलीच नाहीत...

शेरॉन प्रभाकर... हिन्दी सिनेमा मधे पॉप गाणी गायलेली पॉप गायिका. विशेषतः बप्पी लाहिरीच्या संगीत दिग्दर्शनात गायिलेली. अलेक पदमसी सोबत लग्न झाल्या नंतर संगीत क्षेत्रातून पुर्णपणे बाहेर गेली...

सुमन कल्याणपूर यांच्या भगिनी शामा हेमाडी/चित्तार यांचा आवाज 'जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम' या गाण्याला आहे.>>>>>धन्स भरत. हे माहित नव्हतं.
रच्याकने, मराठीतील "दर्यावरी रं तरली होरी रं...." हे गाणही शामा चित्तार यांचेच ना ? (सोबत हेमंत कुमार)

विवेक, शेरॉन बहुतेक त्रिकाल मधे होती, गायली पण होती.
पिनाझ मसानी, पुर्वी गझला गायला असायची दूरदर्शनवर.
फैयाझची आठवण वर निघाली होती, आलाप मधल्या रागमालेत ( बैरन बिजुरी चमकन लागी ) मधे तिचा आवाज आहे. त्यात येसुदासचा पण आवाज आहे.

आकाशवाणीवरच्या छायागीत कार्यक्रमातला एक खास आवाज, बहुतेक कब्बन मिर्झा असे नाव होते. त्याच्या आवाजात रझिया सुलतान, मधे गाणे होते.

चार बंधू मिळून भक्तीगीत गात असत. बहुतेक जयदेवने त्यांच्या आवाजात,

सूरज की गर्मी से तरसे हुए मन को
मिल जाए तरुवर कि छाया
ऐसा हि सुख मेरे मन को मिला मै
जबसे शरण तेरी आया, मेरे राम

असे एक गाणे गाऊन घेतले होते. पडद्यावर पण तेच बंधू होते. सिनेमा बहुतेक कादंबरी.

थोर ठुमरी गायिका हिरादेवी मिश्रा, गमन मधे गायल्या होत्या (रस के भरे तोरे नैन) लक्ष्मीशंकर बावर्ची मधे (काहे कान्हा करत बरजोरी ) अर्थात त्यां दोघींनी उपशास्त्रीय गायनक्षेत्रात बरेच गायन केले आहे.

आकाशवाणीवरच्या छायागीत कार्यक्रमातला एक खास आवाज, बहुतेक कब्बन मिर्झा असे नाव होते. त्याच्या आवाजात रझिया सुलतान, मधे गाणे होते.>>>>>"आई जंजिरकी झंकार खुदा खैर करे...." (रझिया सुलतान)

असे एक गाणे गाऊन घेतले होते. पडद्यावर पण तेच बंधू होते. सिनेमा बहुतेक कादंबरी.>>>>शर्मा बंधू, चित्रपट: परीणय

Happy

विजय बेनेडिक्ट आठवतो का? आयामा डिस्को डॅन्सर (शब्दशः जसे ऐकू येते तसे लिहिले आहे Happy ) हे आणि इतर बरीच गाणी इथुन-तिथुन-मिथुन साठी गायला...नंतर ९०-९१ ला बॉलिवूड ला रामराम (सॉरी जीझस-जीझस) करुन आता फक्त प्रभू येशूची भक्ति गीते गातो !!

फैयाझ यांनी गायिलेले जुंबिश चित्रपटातलं गाणं, संगीत जयदेव
http://songs.reloadlife.com/jumbish/asmaan-pe-ik-sitara.html

कब्बन मिर्झा हे विविधभारतीवर उद्घोषक होते. रझिया सुल्तानमध्ये धर्मेंद्रच्या हब्शी गुलामाच्या व्यक्तिरेखेला जुळेल अशा आवाजाच्या शोधात खय्यामनी हजारो आवाज परखले आणि त्यातून कब्बन मिर्झाची निवड झाली.

बर्‍याच वेगळ्या आवाजांना संगीतकार जयदेव यांनी निवडलेले दिसतेय :
छाया गांगुली, रूना लैला, सुरेश वाडकर (नवीन असताना), येसुदास (आलाप)

सपने चित्रपटातलं "आवारा भंवरे जो हौले हौले गाये..." म्हणणारी 'हेमा सरदेसाई' कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर सरसकट हेच गाणं गायची... ती जसपिंदर नरूला सुद्धा जाईल तिथे "प्यार तो होना ही था..." असं गायची नाही माझ्यामते किंचाळायचीच Sad त्यामानाने जसपिंदर पेक्षा हेमा सरदेसाईला गाण्याचा चान्स मिळाला बर्‍यापैकी... "अपुन बोला तु मेरी लैला...(जोश) abcdefghi Uhoh (हम साथ साथ है) सन सननन सन सननन (अशोका) आणि जंगल है आधी राह है, लगने लगा है डर (बीवी नं १) मध्ये गायली, स्टाईल सिनेमात पण गायली बहुतेक एक दोन गाणी ती.

ती जसपिंदर नरूला सुद्धा जाईल तिथे "प्यार तो होना ही था..." असं गायची नाही माझ्यामते किंचाळायचीच>>>>दक्षे, जसविंदर नरूलाचे "तारे है बाराती चांदनी है ये बारात" (विरासत), "मुझे एक पल चैन न आये सजना तेरे बिना" व "मेरी जिंदगी है एक प्यास" (जुदाई) हि दोन्ही गाणी छान आहे (न किंचाळता गायलेली :-)).

दक्षे,

सन सननन सन सननन (अशोका) हे गाणे अलका याज्ञिक चे आहे गं. हेमा सरदेसाईचे नाही.

Pages