जुन्या हिंदी सिनेमातील गाणी म्हटले की कोणत्याही सर्वसाधारण रसिकाच्या डोळ्यासमोर पटकन ही नावे येतात - लता, आशा, किशोर, रफी, मुकेश. नंतर थोडा ताण दिला की मग मन्ना डे, तलत, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर अशी नावे आठवतात आणि अजून मागे जाण्यासाठी तुम्ही चांगलेच रसिक लागता उदा. सुरैय्या, नूरजहान, सुरेंद्र, सी.एच. आत्मा, सायगल वगैरे. पण तरीसुद्धा त्या त्या काळातील - म्हणजे ४०-५०-६० अश्या दशकातील - ही सगळी प्रसिद्ध नावे आहेत.
हिंदी सिनेमात या प्रत्येक दशकांमध्ये इतर अनेक गायक-गायिका गाउन गेले की ज्यांची दाखल त्या काही गाण्यांपूर्ती घेतली गेली पण त्यांना पुढे फारसे यश मिळाले नाही किंवा त्यांनी पुढे हिंदी मध्ये गायले नाही. त्याची कारणमीमांसा करणे हा या लेखाचा हेतू नाही. किंबहुना त्यांची आठवण काढणे एवढाच आहे कारण जेव्हा ही गाणी अधून मधून रेडिओ वर लागतात तेव्हा आपल्याला ती नक्कीच आवडतात पण काही गाणी कुणी गायली हे आठवेल याची खात्री नसते. आणि नंतर सवडीने शोधण्याचे राहून पण जाते कित्येकवेळा. अश्या काही माहिती असलेल्या नसलेल्या कलाकारांची ही काही गाणी - आजकालच्या कलाकारांची अशी यादी करायची असेल तर ती फारच मोठी होईल कारण आजकाल गायक-गायिका खंडीभर आहेत पण टिकाऊ पण २-३ लोकांनाच लाभतो. म्हणून लता आशा किशोर रफी यांच्या काळापासून ते मार्केट खुले होण्याच्या कालापर्यन्तच (८९-९०) याचा आढावा घेणे योग्य होईल.
सुधा मल्होत्रा - लता-अशा च्या प्रचंड प्रभावाच्या काळात सुद्धा स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. मला तिची काही गाणी फारच आवडतात - तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड - किशोर बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), शुक्रतारा मंद वारा आणि विसरशील खास मला ही गाणी सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
मुबारक बेगम - एक दोन गाण्यासाठीच लक्षात राहते - मुख्य म्हणजे - कभी तनहाईयो मे यू हमारी याद आयेगी
द्विजेन मुखर्जी - कुणाला ऐ दिल कहां तेरी मंझील हे माया सिनेमातले गाणे आठवते का? कित्येक लोकं ठाम पणे सांगतील की ते हेमंत कुमार चे गाणे आहे म्हणून. पण तो द्विजेन आहे! मला वाटते त्याचे एवढे एकाच गाणे हिंदी मधले.
सुबीर सेन- अजून एक हेमंतदा सारखा आवाज. यांनी मात्र काही गाणी गायली हिंदी मध्ये आणि गाजली पण - मै रंगीला प्यार का राही , दिल मेरा एक आस का पंछी , आणि मंझील वो ही है प्यार की राही बदल गये. पण मला वाटते की क्लोन लोकांच्या नशिबी फारसे यश नसते कधी. नियमाला अपवाद सुमार सानू.
येसुदास- काही लोकांच्या मते येसुदास या यादीत येणे योग्य होणार नाही कारण त्याची गाणी खूप गाजली पण इथे करिअर किती झाले हिंदी मध्ये हा मुद्दा आहे. येसुदास १९७० च्या दशकात गायला आणि काही छान गाणी आपल्याला देऊन गेला. मला वाटते की त्याचे ठीक-ठाक किंवा कंटाळवाणे असे गाणे नसावेच. सगळीच सुंदर गाणी. जब दीप जले आना, आज से पहेले, सुनयना, मना हो तुम बेहद हसीं, तुम इतनी सुंदर हो,काली घोडी द्वार खडी, कहां से आये बदरा, चांद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा, मधुबन खुशबू देता है अशी छान आणि अवीट गाणी देणारा हा कलाकार.
जसपाल सिंग - रफी किशोर च्या जमान्यात स्वतंत्र आवाजाचा हा एक गायक १-२ सिनेमा पुरता येऊन गेला. गीत गाता चल आणि सावन को अने दो हे त्याचे लक्षात राहणारे (आणि बहुतेक तेवढेच) सिनेमे. पण मला स्वत:ला त्याचा खडा आवाज खूपच आवडतो. मोकळा आणि खडा आवाज असूनही भावपूर्ण होता.
मंगल सिंग - मला फक्त याचे एकच गाणे आठवते - काली तेरी चोटी है परांदा तेरा लाल नी. एकदम रफी सारखा सणसणीत आवाज. काही किरकोळ गाणी नंतर त्याला मिळाली. शब्बीर, मुन्ना सारख्या बिभीषण (बी ग्रेड आणि भीषण दोन्ही एकदम) लोकांपेक्षा कितीतरी चांगला होता.
हेमंती शुक्ला - कहां से आये बदरा गाणारी ही गायिका! छान होता आवाज. काही बंगाली आणि दोन चार हिंदी सिनेमात गायली.
छाया गांगुली आप की याद आती राही रात भर - गमन मधले हे गाणे खतरनाक गाउन राष्ट्रीय पारितोषिक घेऊन गेली.. नंतर एक एका सिनेमात ऐकलं - थोडासा रूमानी हो जाये. पुढे काहीच कळले नाही. बहूतेक ती गजल मध्ये गेली नंतर.
आरती मुखर्जी - दो नैना और एक कहानी (मासूम) साठी राष्ट्रीय पारितोषिक घेणारी गुणी गायिका. तसे ब-या पैकी सिनेमात गायली. अगदी १९५८ पासून हिंदी सिनेमात थोडेफार गायली आहे !! पण हिंदी पेक्षा बंगाली मध्ये जास्त काम केले.
हेमलता - ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातलाच हा एक. एक मला वाटते की उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे )चा अपवाद वगळता ती फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावी. अगदीच साधारण गायिका असूनही तिची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली (जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी). तू इस तरह वरून आठवले - मला वाटते की एक गाणे दोघांनी गायल्याची बरीच उदा. आहेत पण हे एकमेव गाणे असावे जे ३ वेग-वेगळ्या लोकांनी एकाच सिनेमात गायले - हेमलता, रफी आणि मनहर उधास आणि प्रत्येकाचे गाणे वेग-वेगळ्या मूड मध्ये नेते एकच चाल असून !!
मनहर उधास - मुकेश नंतर त्याच्या सारखा आवाज म्हणून काही गाणी यांनी गायली. मुकेश असताना सुद्धा अभिमान सारखा त्याला चित्रपट एस.डी. कडे मिळाला होता. पण मुकेश च्या आवाजाची जादू नव्हती. श्रीखंड संपल्यावर उरलेले भांडे विसळून पियुष करतात तसे काहीतर मला वाटते याचे गाणे ऐकल्यावर ..ना धड श्रीखंड ना पेय !! असाच अजून एक क्लोन १-२ गाणी मुकेश नंतर गाउन गेला - कमलेश अवस्थी. मुकेश नंतर त्याच्या मुलांनी नितीन-मुकेशनी प्रयत्न करून बघितला पण एकतर जमाना बदलत होता आणि त्याचे गाणे वडिलांचा वारसा चालवू शकत नव्हते त्यामुळे काही फारसे झाले नाही पुढे.
दिलराज कौर - अशा भोसले क्लोन. अशा भोसले नंतर ओ पी कडे कुणाला घ्यायचे हा प्रश्न होता त्यामुळे त्यांनी दिलराज ला घेऊन काही गाणी केली. आवाज काही वाईट नव्हता. आशा ची आठवण यायची. हिरा मोती नावाचा एक पडेल सिनेमा होता पण त्यातले - होठ है तेरे दो लाल हिरे हे पंजाबी ठसक्याचे गाणे रफी बरोर तिने झकासच गायले आहे.
प्रीती सागर - ज्युली मधले इंग्रजी गाणे माय हार्ट ईज बीटिंग, प्रीतीला प्रसिद्धी देऊन गेले.मस्त गायले आहे. मंथन मधले एकदम वेगळे गुजराती लोकसंगीतावरील म्हारो गाम काठा पाडे पण भन्नाटच होते... पण का कुणास ठाऊक काही फारसे घडले नाही मात्र.
शैलेंद्र सिंग - ऋषी कपूर मुळे शैलेंद्र ला ब-यापैकी संधी मिळाली होती पण तसा साधारणच गायक असल्यामुळे ( आणि बहुतेक नंतर ऋषी बरोबर न जमल्यामुळे) स्वतंत्र गाणी दुस-यांसाठी फारशी मिळाली नाहीत. थोड्या प्रमाणात अभिनय पण केला (अग्रीमेंट नावाचा एक सिनेमा चक्क रेखा बरोबर केला आणि बरे केले काम). सध्या TV सिरिअल्स मध्ये असतो.
चंद्राणी मुखर्जी - चंद्राणीनी ब-यापैकी गाणी हिंदी मध्ये गायली पण नाव कधी झाले नाही. मला आवडणारी काही गाणी म्हणजे सोनिक-ओमीने केलेले "इस इश्क मुहब्बत की कुछ है अजीब रस्मे", आणि अनु मलिक चा पहिला हिट सिनेमा पूनम - मुहब्बत रंग लायेगी जनाब आहिस्ता आहिस्ता. मोहम्मद रफी बरोबरचे हे गाणी.. अक्षरश: खरे वाटत नाही की हे अन्नू मलिक चे गाणे आहे.
यात नसलेले इतर कुणी गायक-गायिका असतील तर जरुर लिहा ..
>> कोण विसरलय त्यांना रैना.
>> कोण विसरलय त्यांना
रैना.
पहिल्या पॅरॅत हो!! >>> ओ ती
पहिल्या पॅरॅत हो!! >>> ओ ती फक्त उदाहरणा दाखल इतर लोकांची यादी होती मालक... माफी करावी
हेमंतदा माझे अति-आवडते गायक आहेत. त्यांच्याबद्द्ल तेव्हा असं म्हटलं जायचं की "देवाचा कधी आवाज गाताना ऐकायला मिळाला तर तो हेमंतदां सारखा असेल.."
<<मदन मोहनच्या आवाजातल्या '
<<मदन मोहनच्या आवाजातल्या ' माई री मै का से कहुं..' ला तर तोडच नाही.>> अगदि अगदि
" गीत गाय पत्थरोने " हे हे टायटल साँग पण किशोरी आमोणकरच्या आवाजात होत.
दोन्ही गाणी माझी खूप आवडती आहेत .
वाणी जयराम (बहुतेक)
वाणी जयराम (बहुतेक) कर्नाटकमध्ये खूप फेमस होती ना ?
मस्तच लेख, मोठा आढावा घेतला
मस्तच लेख, मोठा आढावा घेतला आहे.
यातील काही गायक जसे की हेमलता, रुना लैला या लता-आशा यांच्या तथाकथित मॉनॉपॉलीला उत्तर म्हणून पुढे आणण्यात आल्या असे म्हणतात.
आरडीच्या 'तुझसे नाराज नही जिंदगी' हे एकच गाणे गाजवून गेलेला अनूप घोषाल बंगालीत प्रचंड मोठा माणूस पण हिंदीत परत दिसलाच नाही.
सुधा मल्होत्रा आणि हेमलता
सुधा मल्होत्रा आणि हेमलता यांची माझ्या आवडीची अजुन हि दोन गाणी
ये प्यार था या कुछ और था, न तुझे पता ना मुझे पता
स्वर: सुधा मल्होत्रा
चित्रपट: प्रेमरोग
संगीत: लक्ष्मीकांत प्यारेलाल
वफा जो न कि तो जफां भी न किजे, के मरने कि तमन्ना मैं कही जी ना जाए
स्वर: हेमलता
चित्रपट: मुकद्दर का सिकंदर
संगीत: कल्याणजी आनंदजी
>>> स्वाती हो अमितकुमार
>>> स्वाती हो अमितकुमार अनप्रोफेशनल होता हे खरंय. बहुतेक गंभीर नसावा तो गाण्याच्या बाबतीत.
किशोर कुमारही बराच नखरेल (प्रोफेशनॅलिझम च्या बाबतीत?) होता ना तसंच अजिबात सिरीयस नव्हता पण गायकी लाजवाब .. पण अमित कुमार चा आवाज नेजल होता एक तर, किशोर कुमार एव्हढी रेंज नव्हती .. लव्ह स्टोरी आणि बडे अच्छे ह्या दोन्ही ला अमित कुमार च्या आवाजाबरोबर अप्रतिम संगीताची जोड होती ..
पण एकंदर शब्बीर कुमार, मोहम्मद (मुन्ना) अजीझ, शैलेंद्र सिंग वगैरे वगैरेंपेक्षा खुप चांगला आहे अमित कुमार चा आवाज आणि गायकी ..
अनुपमा देशपांडेचा आवाज लगी आज सावन की फिर वो झडी है .. (चाँदनी) मध्ये आलापाच्या रुपात होता ..
अजून एक आठवली ती पूर्णिमा .. तू तू तू तारा, चने के खेत में सारख्या नौटंकी गाणी गाणारी .. का टिकली नाही त्याची कारणं द्यायला नकोतच ..
जतिन-ललित पैकी जतिननेही बरीच गाणी गायली .. सगळांय प्रसिद्ध बहुतेक रुठके हमसे कहिं जब चले जाओगे तुम (जो जिता वोही सिकंदर) असावं ..
वर कोणीतरी सुनिधी चौहान चं नाव लिहीलंय .. कशासठी???
सुमन कल्याणपूर आणि साधना घाणेकर (सरगम) ह्यांनां लताने पुढे येऊ दिलं नाही असं ऐकून आहे .. साधना सरगम दाक्षिणात्य संगीतात बरीच गाजली बहुतेक ..
दक्षिणातै, लकी अली, अभिजीत,
दक्षिणातै,
लकी अली, अभिजीत, सलमा आगा.. सगळीच ओळखीची नावं..
लकी अलीचं गोरी तेरी आँखे कहे हे गाणं गोरी तेरी आँखे अल्बम मधलं. कविता कृष्णमूर्तीने गायलय त्याच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे. आणि ओ सनम तेरी यादों की कसम गाणं त्याच्याच पहिल्या अल्बमचं. 'सुनो' नाव आहे त्याचं.
सलमा आगाचं दिलके अरामां तर सगळ्यांना माहितीच आहे म्हणा. नंतर तिने पाकिस्तानी सिनेमे केले म्हणे आणि गझलचे अल्बम करते.
पूर्णिमा=सुषमा श्रेष्ठ `क्या
पूर्णिमा=सुषमा श्रेष्ठ `क्या हुआ तेरा वादा' गायलेली.
वाणी जयराम: गुलजार हेमाच्या
वाणी जयराम: गुलजार हेमाच्या मीराची गायिका संगीत:रवीशंकर
सलमा आगा पाकिस्तानीच आहे.
सुंदर लेख आणि प्रतिक्रिया!
सुंदर लेख आणि प्रतिक्रिया! धन्यवाद
मनहर उधास >>> "हिरो" मधिल याची गाणी थोडीफार गाजली. मला वाटतं सुभाष घईच्या फिल्म्स मधे हा होताच.
वाणी जयराम:गुलजार-हेमाच्या_मीराची_गायिका_संगीत:रवीशंकर >>> असं म्हणतात की या चित्रपटाची गाणी लताकडुन गाऊन घ्यायची होती. पण लताला हृदयनाथ या चित्रपटासाठी संगीतकार म्हणुन हवा होता. पण रवीशंकरच फायनल झाले आणि तिने चित्रपट सोडला. मग रविशंकरांनी वाणीला घेतलं.
"बोले रे पपीहरा"... हे गाणं माझ्या एका मित्राची बहीण गाणार होती. मित्राचे वडील वसंत देसाईंकडे सहाय्य्क म्हणुन होते (कै. वसंत सामंत, यांचं आताच पंधरा दिवसांपूर्वी निधन झालं. "घनःश्याम सुंदरा.."मधे घडा त्यांनी वाजवलाय). पण वसंत देसाईंना त्यांच्या गुरुंचा फोन आला की वाणीला घे आणि मित्राच्या बहिणीची संधी हुकली.
लताची मीराभजने गुलझारकृत
लताची मीराभजने गुलझारकृत मीरा यायच्या खूप आधी आली होती, त्यामुळे तिने पुन्हा मीरा गायला नकार दिला असे वाचल्याचे आठवते.
सुरेख लेख..! माझ्या
सुरेख लेख..!
माझ्या माहीतीप्रमाणे मंगल सिंगने 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात आमीर खानसाठी 'दिल करता है तेरे पास आऊ, एलो जी सनम हम आ गये, दो मस्ताने चले जिंदगी बनाने आणि शोला शोला दिल भडके ही रफी छापाची गाणी गायलीत. त्या चित्रपटात एस. सुब्रमण्यम सलमानसाठी गायले होते.
सुमार सानू
ते 'कुमार सानू' असं आहे का? कारण कुमार सानू इतका काही 'सुमार' गात नाही.
तुम अपना रंज-ओ-गम, अपनी
तुम अपना रंज-ओ-गम, अपनी परेशानी मुझे दे दो.... : जगजीत कौर
पर्या, जगजीत कौर चा उल्लेख
पर्या, जगजीत कौर चा उल्लेख वरती आला आहे.काही गायिका फक्त आप्ल्या नवर्या/प्रियकराच्या संगीत दिग्दर्शना खालीच गायल्या आहेत. उदा: जगजीत कौर (खय्याम), शारदा (SJ मधला शंकर), रेखा भारद्वाज (विशाल भारद्वाज ... सध्या ही इतर लोकांकरता पण गाते
)
जेव्हा आशा-लता-रफी-किशोर हे
जेव्हा आशा-लता-रफी-किशोर हे सगळे भरात होते तेव्हा त्यांनाच सगळ्यात जास्त गाणी मिळण्यामागे हे ही एक कारण असू शकेल.. ह्या सगळ्यांची गाणी संगीतकाराने सांगितल्यावर ते परत तसेच्या तसे म्हणून दाखविण्याची क्षमता अफात आहे/होती.. त्या काळी सगळे लाईव्ह रेकॉर्डींग व्हायचे.. एकदा सगळे जमल्यावर कमीत कमी रीपिटीशन्स मध्ये रेकॉर्डींग करणे वेळ आणि पैसा ह्या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे होते... असे असताना संगीतकार, निर्माते ह्यांच्या दृष्टीने पटकन काम करणारे लोक कधीही फायद्याचे..
अर्थात ह्यांच्याही गाण्यांचे परत परत रेकॉर्डींगचे किस्से आहेतच..
मस्त! महिती पूर्ण लेख
मस्त! महिती पूर्ण लेख
उषा तिमोथी:तू रात खडी थी छतपे
उषा तिमोथी:तू रात खडी थी छतपे मैं समझा के चांद निकला
बुरा हो तेरा तुझे देखके कोठेसे मेरा पैर फिसला :रफीसोबत.
रफ्ता रफ्ता देखो आंख मेरी लडी है यातलं `मैंने ऐसा तो नही कहा था'
हे उषा तिमोथीने म्हटलंय.
ते 'कुमार सानू' असं आहे का?
ते 'कुमार सानू' असं आहे का? कारण कुमार सानू इतका काही 'सुमार' गात नाही. >> सुमार हे मुद्दामूनच लिहिले आहे.
बकरी सारखे रेकणे याला गायकी नक्कीच म्हणता येत नाही... पण ९० च्याच संगीतावर वाढला असशील तर तुला तो सुमार न वाटणे स्वाभाविक आहे.. मला कुठुनही त्याचे हे ssss हे sssss ऐकू आले की ढवळायलाच होते.. शब्बीर, मुन्ना, सुमार सानू म्हणजे कानावर बलात्कार ... रफी किशोर ऐकत वाढलेल्यांना तरी ते तसेच वाटणार रे .. नाईलाज आहे..
चांगल्या सुरांचा संस्कार झाल्यावर फक्त चांगलेच स्वर आवडतात.... म्हणून लहानपणीच मुलांच्या कानावर-डोळ्यांवर चांगल्या गोष्टींचे संस्कार करणे महत्वाचे असते .. असो. हे विषयांतर झाले थोडेसे...
हिमेश रेशमियाचं नाव कुणीच कसं
हिमेश रेशमियाचं नाव कुणीच कसं घेत नाही ?
मुझे इसके घर मे रोटी चाहीये फेम ! विसरलात का ?
हिमेश रेशमियाचं नाव कुणीच कसं
हिमेश रेशमियाचं नाव कुणीच कसं घेत नाही ?>>>> १९९० पर्यंतचाच काळ लक्षात घेतला आहे
आज हिमेश रेशमियाचा वाढदिवस
आज हिमेश रेशमियाचा वाढदिवस आहे
हिमेश रेशमियाचं नाव कुणीच कसं
हिमेश रेशमियाचं नाव कुणीच कसं घेत नाही >>>>
इकडे प्रतिभावान पण उपेक्षित गायकांचा विषय चालू असल्याने हिमेशचा उल्लेख नसावा. मुळात हिमेशला गायक म्हणावे का हा वादाचा मुद्दा आहे
रच्याकने, पंकज उधास पण अजून एक उपेक्षित (चित्रपटगीतांच्या बाबतीत) म्हणता येईल. अर्थात त्याचा आवाज गझल गायकीला जास्त सूट होतो असं माझं वैयक्तिक मत! त्याचं "और आहिस्ता" खूप आवडतं.
"चिठ्ठी आइ है" जोपर्यंत भारतात होतो, तोपर्यंत नाही आवडायचं. आता NRI झाल्यामुळे फारच जवळंच वाटतं
ती देखी है सारी दुनिया...मेड
ती देखी है सारी दुनिया...मेड इन इंडियावाली राहिली यादीत.. तिने काटे नही कतते ये दिन ये रात हे मिस्टर इंडिया मधले गाणे म्हटले आहे.. कोण ती?
हिमेशची कर्झ मधली दोन गानी
हिमेशची कर्झ मधली दोन गानी चामगली वाटतात.. लुट जाऊ तेरे कर्ज पे आणि धूम तेरे इष्क की सजणा
ती अलिशा चिनॉय. मराठीतल्या
ती अलिशा चिनॉय.
मराठीतल्या गायिका अभिनेत्री फैयाझ यांनीही हिंदी चित्रपटांसाठी गायले आहे.
उषा मंगेशकर हिंदीत खूप कमी गायल्यात, पण जे गायल्या ते हिट झाले.
जामोप्या.... ती आलिशा चिनाय!
जामोप्या.... ती आलिशा चिनाय!
हां .. ती आलिशा चिनॉय
हां .. ती आलिशा चिनॉय
मी आलिशा चिनॉय आणि वसुंधरा
मी आलिशा चिनॉय आणि वसुंधरा दास चा उल्लेख करण्यासाठी इथे आले तर जस्ट आधीच्याच पोस्ट मध्ये आलिशाचे नाव आले आहे.
भरत, उषा तिमोथी आमच्या कॉलनीत
भरत, उषा तिमोथी आमच्या कॉलनीत रहात असे. गणेशोत्सवात आवर्जून गायला येत असे. आओ हुजूर तूमको, आणि जिवलगा राहिले रे दूर घर माझे... हि दोन गाणी हमखास गात असे. कॉलनीतील रहिवासी म्हणून तिला हक्काने बोलावले जायचे आणि ती कुठलेही आढेवेढे न घेता, जो ऑर्केष्ट्रा आला असेल, त्यांच्या साथीने गात असे.
तिने मराठीत पण एक लावणी गायली होती, तयांना काळीज नाही कसे, असे शब्द होते.
प्रमिला दातारने पण एक हिंदी गाणे गायले होते ना ? तिचा सुनहरी यादें हा कार्यक्रम खुपच गाजला होता.
मराठीतील शरद जांभेकर यांनी पण हिंदीत चित्रपटासाठी सलमा आगा बरोबर एक तराणा गायला होता.
Pages