मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये भी कोई शेयर करनेवाली बात है वाल्या सगळ्या जाहिराती मस्तं आहेत. लिप्स्टिकवाली तर मस्तंच. शी टच्ड द पीकल वाल्या पण छान आहेत.

KBC ची ती हिंदू-मुस्लीमवाली नाही आवडली >>> हो, ती जरा क्लिशेच वाटली. शिवाय गेम-एपिसोडचं टेलिकास्ट सुरू असतानाच फोन-अ-फ्रेण्डचा फोन येतो हे पण बरोबर नाही.

दाताच्या फटीत अन्न अडकलेल्या अ‍ॅड बघुन वाटत की अ‍ॅड करणार्‍यांना कॉमन सेन्स नाही की ते अ‍ॅड बघणार्‍या आपल्यासरख्यांना मूर्ख समजतात... तुम्ही सकाळी उठुन चुळ भरा अथवा न भरा, ब्रश करा अथवा न करा, तुम्ही खात असलेल अन्न जर तुमच्या दाढांनी चावता ज्या तोंडाच्या आतल्या बाजुला असतात तर समोरच्या दातात अन्न अडकेलच कस?

ती रिनचि जाहिरात
शाल रिनने का धुवत नाही?
आईचे कपडे रिनने का धुवत नाही ?
शेवटी आईला हॉटेल बाहेर सोडून एकटीच का आत घुसते ?
आईला हॉटेलवाले आत घेत नाहीत का ?

रिनची जाहिरात -
मुळात रिनने कपडे झालेत ना स्वच्छ...मग शाल पांघरायचीच कशाला? तो थंडीचा सीझन असतो असंही काही दर्शवलेलं नाहीये ना ?

हो, आणि त्या जाहीरातीत ती आईच्या पुढे टेचात चालते, आईला मागे सोडत ते नाही भावत. निगेटीव्ह इम्प्रेशन पडते.

एयरटेलची नवी जाहिरात पाहून हसायला आलं. बायको नवर्‍याची बॉस? हे इंडियात 'मुश्किलही नही नामुमकीन' आहे Happy

प्रो कबड्डीची जाहिरात मस्त वाटली......बागेत ते सिनियर सिटीझन्स त्या माणसाला अडवतात ती.

मुलीच्या शाळेचा पहिला दिवस. आई मुलीला शाळेत सोडायला जाते. मुलगी म्हणते, तू इथेच थांबणार आहेस ना? तर आई हो म्हणते आणि शाळा सुटेपर्यंत ‌तेथेच थांबते. आणि घरी जाऊन चपात्या खाऊ घालते. मस्त जाहिरात आहे. बहुतेक तेलाची जाहिरात आहे ती.

अलिया भट्टची स्कूटीची जाहिरात आवडली
जिंगल एकदम सहिये
>>
+१

तिला म्हणाव हीम्मत असेल तर खर्या नणदेला बुद्धू म्हणुन दाखव
>>
Rofl

KBC ची ती हिंदू-मुस्लीमवाली नाही आवडली. बळचं ओढून ताणून केल्यासारखी वाटली.

>>
लिंक प्लिज. मी नाही पाहिलीये Uhoh

बाकी जाहिरात बनवणं लै अवघड असतं बाबा Proud

होंडाच्या नवीन कारच्या ad साठी फालतू शिवाय अजून काही सुचत नाही
मराठीत किंवा हिंदीमध्ये RAP , बाबा सेहगल सोबतच इतिहासजमा झाल …
कार जितकी impressive तितकीच जाहिरात फालतू दर्जाची

<<एयरटेलची नवी जाहिरात पाहून हसायला आलं. बायको नवर्‍याची बॉस? हे इंडियात 'मुश्किलही नही नामुमकीन' आहे >>

त्या जाहिरातीवर टीकाही होतेय.. बॉस असली तरी शेवटी घरी जाऊन स्वयंपाक करुन नवर्‍याची मनधरणी करते बिचारी..कैच्याकै दाखवलंय!
आणि मुळात एअरटेलचा जाहिरातीशी संबंध किती ओढून ताणून आणलाय!

ती कोणत्याश्या कारची 'त्यांना वाटतं त्यांच्यासाठी आहे पण ती माझ्यासाठी आहे ' वाली अ‍ॅड पाहिली का?
कसली डोक्यात जाते राव ती अ‍ॅड Uhoh

हायला, ती कोकाकोलाची नवी अ‍ॅड काय पकाऊ आहे. कोक प्यायचा तो नो फॉर्मेलिटीज हे दाखवायला म्हणे. ते मामा-मामी नुसता कोक घेऊन आले? काहीतरी 'चकणा' आणायचा ना बरोबर. परत भाचीने नुस्ता मामालाच नमस्कार केला. मामीला 'देखल्या देवा दंडवत' तरी घालायचा. मामी बरीक तरुण दिसते नै मामाच्या मानाने Wink

लोक कोल्ड ड्रिंक्स एक तर एन्जॉयमेन्टचा भाग म्हणून पितात किंवा तहान लागली म्हणून. भारतीय लोक इमोशनल आहेत म्हणून प्रत्येक बाबतीत ओढूनताणून कशाला त्या इमोशन्स आणायच्या???

^^^^^^^^^

खरंय, नाही जमत काही अ‍ॅड...
पण कोकाकोलाच्या जाहीरातीत नेहमीच इमोशन्स आणि भारतीय संस्कृतीवर भर दिला जातो. याउलट पेप्सी ग्लॅमर प्रीफर करते.

खरंय.
पण कोका कोला वाल्यांना माहिती आहे कि लोकांच्या भावनांना हात घातला कि आपले प्रोडक्ट खूप खपते. भलेभले याला बळी पडतात.

बाकी आणखी एका अश्याच पेयाची जाहिरात आहे. त्यात शाहरुख ते पेय पीत असतो व काही तरुण व लहान मुले त्याच्याकडे अधाशीपणे पाहत असतात. पिवून झाल्यावर तो भुवया उंचावून 'काय?' असे विचारतो. मला त्या जाहिरातीतला आशय व संदेश अजून कळला नाही . Lol

अरे पण सही आहे ती अ‍ॅड .. ती पोरे आणि या वयात शाहरूखही फार क्यूट दिसतो त्यात.. आणि सोबतीला ती म्युजिक / गाणे पण मस्त आहे ..

बाकी आशय म्हणाल तर कतरिना कैफ नाही का स्लाईस मँगो बड्या सेक्सी अंदाज मध्ये थेंबथेंब पिते... तेव्हा नाही बरा तुम्ही आशय शोधत Proud

"...कारण तुमच्याकडे पाच रूपयांचा शिक्का आहे!..." हिन्दीतील सिक्का चे मराठी शिक्का करून टाकले आहे - कोणत्यातरी बिस्कीट की चॉकोलेट वाल्यांनी.

कतरिना कैफ नाही का स्लाईस मँगो बड्या सेक्सी अंदाज मध्ये थेंबथेंब पिते... >>>> म्हणुन तिची नक्कल शाखा ने करावी Uhoh झेपल तेवढच कर म्हणाव त्याला.

ती ओल्ड स्पाईस दिओची नविन अ‍ॅड बकवास आहे.

<<<< बाकी आशय म्हणाल तर कतरिना कैफ नाही का स्लाईस मँगो बड्या सेक्सी अंदाज मध्ये थेंबथेंब पिते... तेव्हा नाही बरा तुम्ही आशय शोधत फिदीफिदी >>>>>

तेंव्हाही मी आशय शोधायचा प्रयत्न केला होता . पण लगेच कतरीनाचे ओठ व त्यावरचा स्लायीस चा थेंब पाहून सोडून दिला. (फिदीफिदी) काय करायचे? आता एखाद्या राजेशरी ला शाहरुख ची ती एड आवडली असेल तर मग हरकत नाही. (दुप्पट फिदिफिफी)

Pages