मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती हमाम- नीम ऑईल ची जाहिरात अजिबात आवडत नाही. मुलीला धीट बनवण्यासाठी गाडीच्या मागे धावायला लावण्यात काय पॉईंट आहे , ते नाही कळले. आखिर कहना क्या चाहते हो?

ती हमाम- नीम ऑईल ची जाहिरात अजिबात आवडत नाही. मुलीला धीट बनवण्यासाठी गाडीच्या मागे धावायला लावण्यात काय पॉईंट आहे , ते नाही कळले. आखिर कहना क्या चाहते हो? >+१ तीच ना की बाजारात एका मुलीची छेड काढताना बघून आई मुलीला पळायला लावते. त्या छेड प्रकरणात फक्त बघत बसते आणि नंतर काहीतरी बळंच तत्वज्ञान

त्या छेड प्रकरणात फक्त बघत बसते>>>>> तेच तर. त्या मुलांच्या कानाखाली आवाज काढून सांगायचं मुलीला, कुणी त्रास दिला तर त्याला असंच जाऊ देऊ नकोस. ..... आणि मग हमामने आंघोळ कर. Proud

5star ची जाहिरात. Eat 5star.. Do nothing..
त्या आजी जागेवरुन उठल्याच नसत्या तर? Sad

एक तेलाची नवीन जाहिरात आली आहे. चिन्मयी सुमीत आहे त्यात. पुर्‍या का वडे काहीतरी तळून कढईतून ताटलीत काढताना मधल्या अंतरात ते तेल सांडत सांडत आणते असं दाखव्लय. मला ते सारखं खटकत बघ्ताना.

Dettol ची जाहिरात मला आणि माझ्या मुलाला फार आवडते. तो छोटा पिगी बँक फोडतो आईच्या वाढदिवसाचे गिफ्ट घेण्यासाठी. आईला ते काचेचे तुकडे हाताला लागतात आणि तो छोटा dettol घेऊन येतो.

सध्या त्या लहान पोरांसाठी कोडींगच्या जाहिरातींनी वात आणलाय नुसता. त्यात एक ती पॅराओलीम्पिक विजेत्या खेळाडू दीपा मलीक यांची व्हाईटहॅट जुनिअर साठी केलेली ऍड कायम दिसते. त्यात त्या उल्लेख करतात मी पदमश्री आणि खेलरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि ते पदक वगैरे दाखवतात. तर त्यांच्या टॅलेंट चा आणि ह्या कोडींगचा दूरदूर सम्बन्ध नाही पण हा प्रकार सगळ्याच प्रकारच्या जाहिरातींत दिसतो सो ते जाऊद्या. त्यांच्याबद्दल आदर आहेच पण ते सरकारकडून मिळालेल्या पदव्या अश्या व्यावसायिक जाहिरातींसाठी फ्लॉन्ट करणे मला अजिबात रुचले नाही.
(बादवे ह्या दहा एक वर्षांपुर्वी नगरला स्थायिक होत्या.त्यांचे पती इथे नगरला सैन्यदल केंद्रात अधिकारी होते. त्यांनी एक रेस्टोरन्टबी सुरु केले होते. त्यांचे सासरे त्यांना मदत करायचे ते सांभाळायला. त्या स्वतः व्हीलचेअरवर फिरून सर्वांच्या जेवणाची चौकशी करायच्या. ते हाटेल तसेही परवानग्यांचा शॉट असल्याने बंद पडले पुढे लवकरच. नगर क्लबलाबी भेटायच्या बऱ्याचदा.आमच्या मातोश्रींना फार कौतुक असायचे त्यांचे.)

https://www.saamana.com/whether-white-hat-junior-coding-app-useful-for-k...

व्हाईटहॅट सध्याच्या वेव्ह मध्ये पैसे कमवायचा प्रयत्न करत आहे.
काही मुलांना यातून जेन्यूईन फायदा होईलही.बाकी मुलं आणि पालक हे 'आमच्या सोसायटीत सगळी मुलं झुंबा ला जातात म्हणून याला पण घातलं' या भावनेने करतील Happy 9 वर्षाच्या मुलाला कोर्स पूर्ण करून 'सर्टीफाईड गेम डेव्हलपर' असं सर्टिफिकेट मिळतं.पण पुढे रोड रॅश किंवा कँडी क्रश डिझाईन करणे न करणे सर्वस्वी त्याच्या बुद्धिमत्ता आणि इंटरेस्ट वर आहे.
व्हाईटहॅट जे शिकवू शकतं ते थोडी मेहनत घालून इंटरनेटवर मुलं स्वतः किंवा पालक मुलांनाही शिकवू शकतील.

मला त्या वोडाफोनच्या cricketer वाल्या जाहिराती आवडतात.
रोहित शर्मा ची "चल चल phantom मत बन" सगळ्यात जास्त आवडते.

लाईफबॉय किंवा इतर अनेक जाहिराती ज्यात कारण नसताना बॉडी शेमिंग केलं (खरंतर ठसवलं) जातं त्या पाहून डोकं आऊट होतं..

मला ती शिखर धवनची वन टीप अन हॅंड आणि बुमराहची बुमबुम यहा फास्ट नही चलता... चल तेरा मिनी ओव्हर आवडते

फ्रीटो ले ची फेवरीट थिंग्ज काय मस्त जाहीरात आहे. यूट्यूब व्हिडीओ चालू होण्याआधी स्कीप न करता पूर्ण पाहीलेली पहिली जाहीरात Happy

https://www.youtube.com/watch?v=9WG1AS1_qMM

प्रियांका चोप्राची Appy fizz ची जाहिरात अगदी बेक्कार वाटते. सलमानची पण तशीच वाटायची. ते गोळे गो़ळे बघवत नाहीत अगदी.

आवडलेल्या जाहिराती - अमूल दूध पिता है इंडिया, अमूल घी, अमूल श्रीखंड

न आवडलेल्या जाहिराती - अमूलचीच 'ये मेरा चीज है', विको नारायणीच्या सर्वच (त्यातील ते नारायणी, नारायणी हा जप आणि केवळ ट्यूब दुखऱ्या भागाच्या जवळून बाहेरून गेल्यावर बरे वाटते! या अतर्क्य लॉजिकमुळे) (तरी विको नारायणीची ती एक जाहिरात हल्ली बंद पडली, ज्यात एक ऑफिसमध्ये काम करणारा माणूस कचऱ्यात टाकायचा कागद मागे भिरकावतो आणि तेव्हा त्याचा हात दुखतो इ. कोणीतरी आक्षेप घेतला वाटतं!)

सध्या पाहिलेली बोर्न विटा ची जाहिरात आवडली ज्यात गाडी पंक्चर असते तर आई फोन लावून बहुतेक मेकॅनिक बोलवत असते तर मुलगी स्वतः उतरुन टायर बदलते

उगाच सतत पुढे पाळणाऱ्या,काहीतरी जिंकुन येणाऱ्या इतर जाहिराती पेक्षा ही आवडली

ती नोब्रोकर ची मराठी जाहिरात तर डोक्यातच जाते सध्या. पहिल्याच सेकंदाला ती बाई कर्णकर्कश आवाजात ओरडते- शँतनु, काय करतोय तु ? जसा काय याला पॉर्न वगैरे पाहताना पकडलंय. २०२० मधली सगळ्यात छपरी जाहिरात असेल. आता मराठीची लिंक नाही भेटत पण हिंदीमधली आहे इथे जी कमी भयानक आवाजात आहे.
https://youtu.be/TGc_PaX3EqA

https://youtu.be/ld9NTyp2tec
रिलायन्स ज्युएल्सच्या नव्या उत्पादन मालिकेचं नाव आहे महालया.
महाराष्ट्राच्या राजेशाही वारशातून स्फुरलंय म्हणे!

Pages