Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
आजकाल रीन व टाइड ची जाहीरात
आजकाल रीन व टाइड ची जाहीरात दाखवतात. प्रतिस्पर्धी आहेत ना मार्केट मधे ते ? असं ह्यापुर्वी तरी बघितलं नव्हतं....
सगळ्यात dumbest जाहिरात मला
सगळ्यात dumbest जाहिरात मला आठवते ती दहा-बारा वर्षांपूर्वीची - एक clueless आणि मठ्ठ दिसणारी स्त्री बघते आहे, पुढे एक पेन आहे, आणि मागून आवाज येतो "जब, तब, अब. Today's का zee ballpen"
अमि, अगदी नेमक तेच सान्गितलस,
अमि, अगदी नेमक तेच सान्गितलस, अन अशा असन्ख्य जाहिरातीन्चा मारा होत असतो!
यावर कायदा/सेन्सॉर वगैरे कशाचीच बन्धने नाहीत का? की मुक्तबाजारपेठेचे हे अन्ग आहे?
आयला, हा बीबी वाहता आहे
आयला, हा बीबी वाहता आहे वाट्ट.....
आधीच्या सगळ्या पोस्ट्स नरसाळ्यातून पडणार्या पाण्याप्रमाणे वाहुन गेल्यात!
अजुन एक जहिरात ..J & K cement
अजुन एक जहिरात ..J & K cement ची..काय संबंध त्या बाइचा आणि सिमेंट्चा??
एक अत्यंत किळसवाणी जाहिरात
एक अत्यंत किळसवाणी जाहिरात म्हणजे ये तो बडा टाँइंग है.... चिड येते ती जाहिरात आली की.
अमूल मॅचोच्या सर्वच जाहिराती
अमूल मॅचोच्या सर्वच जाहिराती किळसवाण्या आहेत. अमूल नावाच्याच बटरच्या जाहिराती अजूनही उत्सुकता, ह्यूमर जपून आहेत. आणि हे अमूल बघा!
असो. एअरटेलची 'हॅपी हॉलिडेज' गोड होती
मुलांच्या मार्केटचा विषय निघालाच आहे तर- रविवारी पोगोवर ११वा सिनेमा असतो. ब्रेकमध्ये एकापाठोपाठ एक हॉर्लिक्स, कॉम्प्लान, बोर्नव्हिटा आणि बूस्टच्या जाहिराती येतात. अगदी लागोपाठ. सर्वच कंपन्या म्हणतात, आमच्या ड्रिंकमुळे मुलं मोठी, ताकदवान, शक्तीमान, उंच वगैरे होतात. मी लेकाला विचारलं, कळतंय ना तुला कसे गंडवतात ते? तोही हसला थोडक्यात, मुलांनाही त्यातला फोलपणा समजतो. आपण मुलांनाच 'ते आपल्याला कसे बनवतात' हे समजावून सांगावे. त्याचे चिखलातले मोजे त्याला पाहिजे तितका सर्फ देऊन धुवायला सांगितले होते मी एकदा. त्याने उत्साहाने घासले, मनसोक्त पाण्यात खेळला, पण फारसा उपयोग झाला नाही, मोजे मळकेच राहिले, तेव्हा त्याला पटलं, 'दाग अच्छे नहीं'! सो, लोड घेऊ नका. मुलं आपल्याला वाटतं त्यापेक्षा हुशार असतात.
>>>>> त्याचे चिखलातले मोजे
>>>>> त्याचे चिखलातले मोजे त्याला पाहिजे तितका सर्फ देऊन धुवायला सांगितले होते मी एकदा.<<
ही छान आयडीया आहे
अन बरोबर आहे, आजकालची मुल देखिल येडच्याप नाहीत हे देखिल खर!
पूनम , माझ्या भाचीची अशीच मजा
पूनम :), माझ्या भाचीची अशीच मजा त्या 'मीठाशिवाय काम पुरं कसं होणार?' जाहिरातीवरुन आम्ही केली होती.
मी अमि, पोस्ट एकदम मस्त आणि
मी अमि, पोस्ट एकदम मस्त आणि मुद्देसुद...
पूनम - एकदम सहीच..
मला एका जाहिराती बद्दल खरच
मला एका जाहिराती बद्दल खरच कुतुहल आहे.ती एका साबणाची जाहिरात आठवतीय का तुम्हाला? "मिस्टर काळे,मिसेस काळे,मिस काळे...अं.... मिस गोरे?"
सध्या आजिबात न आवडणारी
सध्या आजिबात न आवडणारी म्हणजे - निरमा.... अगदिच काही अर्थ नाही त्या जाहिरातीला...
good gingle for pear soap
good gingle for pear soap
मला काही जाहिरातींबद्दल एक
मला काही जाहिरातींबद्दल एक प्रश्न असा आहे की,
मुळात अशा जाहिराती टि.व्ही. सारख्या दृकश्राव्य माध्यमातुन दाखविल्या जाणे योग्य आहे का ?
मी गर्भ निरोधकांच्या जाहिरातींबद्दल विचारत आहे.
या जाहिरातींचा लहान मुलांवर परिणाम होऊ शकतो का ? तो टाळायचा असेल तर मुलांना सहज कळणार नाही पण मोठ्यांना कळेल अशा पद्धतीने या जाहिराती दाखवल्या जाऊ शकत नाहीत का ?
पूनम, लय भारी! महेश,
पूनम, लय भारी!
महेश, अनुमोदन!
"मिस्टर काळे,मिसेस काळे,मिस काळे...अं.... मिस गोरे?" >> फेअर & लव्हली ची अॅड होती ना ती..
चिडचिड होते माझी असल्या जाहिराती बघून.. आपण कसं दिसलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, गोरं म्हणजेच चांगलं - असल्या मूर्ख कल्पना आपल्या मनावर ठसवायचा प्रयत्न करतात असं वाटतं..
अमेरिकेतल्या टीव्ही दाखवणार्या जाहिरातीतल्या बर्याच मला तरी निर्बुद्ध कॅटॅगरीतल्या वाटतात
(अपवाद आहेतच.. पण एकंदरीत)
आणि आपला मिडिया प्रत्येक (चुकीच्या) बाबतीत त्यांचं अनुकरण करतो (उदा. बरेच रिअॅलिटी शो वगैरे)
एक ती 'gespo' असंच काहीसं नाव
एक ती 'gespo' असंच काहीसं नाव असलेल्या भांडी घासायच्या साबणाची जाहिरात लागते. त्यात तो माणूस एका बाईच्या स्वयंपाकघरात शिरून ओरडतो,'आपके बर्तन बिमार है...बिमार..':) इतका कर्कश ओरडतो तो की तिथली भांडी उचलून त्याच्या डोक्यात घालावी असं वाटतं.:)
प्राची, मी पाहिली नाही ही
प्राची, मी पाहिली नाही ही जाहिरात अजून.
आमच्या शेजारचा एक मुलगा ३-४ वर्षाचा असताना त्याने एका विशिष्ट टॉफीसाठी हट्ट धरला. त्याच्या बाबांनी ती आणून दिली. त्याने दाताने दोन तुकडे केले .... नंतर भोकाड पसरले. काय तर जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे त्याचे दोन तुकडे केल्यावर त्यातून धबधबा बाहेर आला नाही. त्याला धबधबा बाहेर येणारीच टॉफी हवी होती. ३-४ वर्षाच्या मुलाला जे जाहिरातीत दिसत होते तेच खरे वाटले. परोपरीने समजावल्यानंतर आणि थोडा मार पडल्यावर तो शांत झाला.
>>त्याचे दोन तुकडे केल्यावर
>>त्याचे दोन तुकडे केल्यावर त्यातून धबधबा बाहेर आला नाही.
बादवे, बीबी वाहता आहे का नाही
बादवे,
बीबी वाहता आहे का नाही हे कसं ओळखायचं ?
(प्लीज.... ही पोस्ट वाहून जायच्या आत सांगा)
1 2 3 4 5 6 7 8 9 … पुढे >
1 2 3 4 5 6 7 8 9 … पुढे > शेवट »
हे नसेल तर बीबी वाहता आहे (असा माझा अंदाज)
मी अमि .. विशिष्ठ टॉफी...
मी अमि .. विशिष्ठ टॉफी... बब्बालू बबल्गम
मी पण माझ्या मुलाला ३ वर्षाचा असताना ते विकत घेउन दिलं.. त्यावर लगेच तो म्हणाला आई हे खाउन पाणी येतं का ? बिचार्या मुलांना काही समजत नसतं.
आणखी एकदा स्वतःहून सुपर मार्केट मधून पास्ता ट्रीट च पाकीट घेतलं त्याने.. घरी बनवल्यावर जराही खाल्लं नाही.
मग म्हणाला.. शाहरुख खान खोटं बोलतो.. मामा मिया चांगलं नसतं
बिचार्या मुलांना काही समजत
बिचार्या मुलांना काही समजत नसतं >> खरय, माझ्या मुलाला खूप दिवस वाटत होतं की डीश टीव्ही लाउन द्यायला शाहरुख खान सगळ्यांच्या घरी जातो
मंजे.. :हाहा:
मंजे..:हाहा:
पुर्वी प्रॉमीस की कोलगेटच्या
पुर्वी प्रॉमीस की कोलगेटच्या टुथपेस्टमधुन लवंग बाहेर येते अशी एक जाहिरात यायची.
त्यावेळी पेपरमधे आलेली एक बातमी: काही मुले सुट्ट्यांमधे मामाच्या गावाला गेली. त्या छोट्या गावात मामाचे किराणा दुकान होते,.या मुलांनी 'टुथपेस्टमधुन लवंग बाहेर येते ' ही घोकंपट्टी करत एकूण एक टुथपेस्ट उघडुन रिकाम्या केल्या....! बिच्चारा मामा ...
ती नवीन निरमाची जाहीरात बघुन
ती नवीन निरमाची जाहीरात बघुन आम्ही खुप हसलो. ती बाई, चिखलाला दटावते अगदी बोट दाखवून , "निरमा..निरमा....वॉशिंग पावडर निरमा..."....आणि चिखल स्तब्ध होतो........ हा हा
मॅगी ची नवीन अॅड गोड आहे. आई कांदा चिरताना रडते म्हणुन मुलगा रडतो.
आय लव्ह चीझ...
आय लव्ह चीझ... http://www.youtube.com/watch?v=ngcYF83Nz64&feature=PlayList&p=5C6A903E59...
मंजू आर्या मामाच्या
मंजू
आर्या मामाच्या दुकानाची वाट ...
हो ती निर्माची एक्दम फाल्तू आहे जाहिरात... माझा लेक म्हणतो आई पाणि असं उभं कसं रहातं...
मागच्या वर्षी मी त्याला सांगायची की टीवीत दाखवलेलं सगळं खोटं असतं.. तर त्याला न्युज पण खोट्या वाटायच्या
आता चांगलं समजायला लागलं.
आजकाल रीन व टाइड ची जाहीरात
आजकाल रीन व टाइड ची जाहीरात दाखवतात. प्रतिस्पर्धी आहेत ना मार्केट मधे ते ? असं ह्यापुर्वी तरी बघितलं नव्हतं....
>>>> त्या जाहिरातीवर बॅन आणलाय. आजच्या न्युजमध्ये सांगितले.
>>त्याला न्युज पण खोट्या
>>त्याला न्युज पण खोट्या वाटायच्या
सहीच!!
मजा आली वरचे किस्से
मजा आली वरचे किस्से वाचून..
माझी आवड्ती मराठी जाहिरातः सोन्याहून सोनसळी प्रिया माझी --लक्स
किती गोड गाणं आहे...
Pages