Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
राजेश.के + १००० मलाही फार
राजेश.के + १०००
मलाही फार आवडली.त्याच जाहिराती विषयी लिहायला आले होते. 
सर्वात जास्त राग किळस तिटकारा
सर्वात जास्त राग किळस तिटकारा कसला येत असेल तर त्या भंगी विशालचा
सर्वच मराठी सिरेलीना तो प्रायोजित करतो
नेमका जेवायला बसला कि हा येतो टोयलेट साफ करायला
कधी कसल्या जाहिराती दाखवायच्या याची अक्कल नाही मराठी सिरेली वाल्यांना>>>>>>>>>>>>>:)
आतापर्यंत मला वाटायचे कि हे फ़क़्त मलाच जाणवले .....कारण खरच ते किटाणू म्हणून जे प्रकार दाखवले जातात ते एरवी (जेवत नसताना) सुद्धा बघवले नाही जात. अगदीच किळसवाणे वाटते.
हल्ली ती प्रियांका चोप्राची
हल्ली ती प्रियांका चोप्राची चोकलेट ची जाहिरात बघवत नाही ते तिचे कपडे...........या नट्या प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी स्वतःला लहान दाखवण्याचा का अट्टाहास करतात.
airwick चि एक जाहिरात काल
airwick चि एक जाहिरात काल बघितलि
त्यात ते सांगतात कि
पति के दोस्त आते है घर का सत्यानाश करने
ओर
पत्नि कि सहेलिया आति है दुनिया का सत्यानाश करने>>>>>>>>>>>>>>>>anumodan छान आहे ती जाहिरात आवडते आणि हलकेच हसू येत.
लॉरियाल पॅरिस प्युअर रेड
लॉरियाल पॅरिस प्युअर रेड कलेक्शन लिपस्टिक च्या अॅड मधील सुंदर्या निव्वळ भयाण दिसतात. अमानवियच जणू!
लॉरीयल बद्दल अगदी सहमत. सर्व
लॉरीयल बद्दल अगदी सहमत. सर्व (कृत्रिम) श्वेतवर्णीय आणि रक्तओष्टीय सुंदर्यांना पाहून व्हँपायर डायरीचा भाग पाहत असल्यासारखे वाटून घाबरायला होते.
Birla Sun Life Insurance ची
Birla Sun Life Insurance ची खुद को कर बुलंद हि जाहिरात खूप आवडते . एक autism चा शिकार असलेला मुलगा आणि त्याचे वडील यांच्यामधील नाते दाखवले आहे… जरूर बघा
https://www.youtube.com/watch?v=tzbo5YpJDvQ
हल्ली HDFC Mutual Funds च्या
हल्ली HDFC Mutual Funds च्या लहान मुलांना घेऊन २-३ जाहिराती आहेत. एकदम मस्त आहेत, संदेश अगदी योग्य पोहोचतो गुंतवणुकीचा.
१) एक मध्यमवयीन स्त्री पोहायला शिकत असते त्याचवेळी लहान लहान मुले बिनधास्त पोहत असतात.
- काही गोष्टी लवकर सुरु केलेल्या चांगल्या
http://www.youtube.com/watch?v=z62vD5BDDUE
२) एक लहान मुलगी शेजारच्या आजोबांना दररोज हसून 'हाय' करत असते. पण आजोबा किंमत देत नसतात. हळू हळू मत परिवर्तन होत त्यांचं. मोक्याच्या क्षणी मदत होते
- छोट्या छोट्या, योग्य ठिकाणी केलेल्या, गुंतवणुकी भविष्यात फार उपयोगी पडतात.
http://www.youtube.com/watch?v=j53EYWtoB6I
३) एक लहान मुलगी साडी नेसते आणि कौतुकाने आईला दाखवते, आई तिला तिचे रूप आरशात दाखवते तेव्हा साडी नेसतानाचा झालेला घोळ लक्षात येतो
आणि मग आईच तिला नेसवते साडी.
- काही गोष्टी या एक्स्पर्टनाच करु द्याव्यात.
http://www.youtube.com/watch?v=Pp7PxDkY8Sc
हो रंगासेठ भारी जमल्यात त्या
हो रंगासेठ भारी जमल्यात त्या अॅड. कल्पना मस्त आहेत.
मला एक जाहिरात खुप आवडते
मला एक जाहिरात खुप आवडते सॅमसंग ची.. एक अंध मुलगी एकाला दरवाजा उघडुन आत घेते अन तो टिव्ही रिपेअर केल्यावर एका शोमध्ये त्यांच्यातलीच एक गाताना दिसते.. ती मुलगी सार्यांना बोलावते अन एका वेगळ्याच दुनियेत ते सगळे रममाण होतात.. त्याला हे पाहुन अगोदर ती कुणाला बोलावते हे कुतुहल व नंतर सार्यांचा तो आनंद पाहुन खुप बरं वाटत.. खुप भरुन येतं ती अॅड पाहताना..
वोडाफोन च्या सेकंड हनिमून
वोडाफोन च्या सेकंड हनिमून वाले आजी आजोबा भारी आहेत. सिरीज मध्ये येत आहे हि जाहिरात. फर्स्ट ते गोव्याला येतात मग तिथे गाईड (पोनी घातलेल्या) चौकशी, मग ते दिल चाहता है फोर्ट ला व्हिसिट, टॅटू गोंदून घेणे आणि आता पॅराशूट वर आजीचे उडणे सगळ्या भारी.
वोडाफोन च्या सेकंड हनिमून
वोडाफोन च्या सेकंड हनिमून वाले आजी आजोबा भारी आहेत. >>> + १११
वोडाफोन च्या सेकंड हनिमून
वोडाफोन च्या सेकंड हनिमून वाले आजी आजोबा भारी आहेत. >> येस एकदम हटके जाहीरात आहे. आजोबा गोव्याला पहिल्यांदा जातात पण आज्जी मात्र तरुणपणी एकदा जाऊन आल्या आहे. हे एकदम सुचक वाक्यात बोलून जातात.
पॅराशूटवाली जाहीरात पण मस्त आहे. अतिउत्साहात खाली कसे उतरणार याकडे लक्षच देत नाही. आजोबा एकदम टीपिकल मध्यमवर्गीय सारखे "याकडे लक्ष दे, हे बघ, तसे नको करु" असे सांगत असतात.
लिंक द्या
लिंक द्या
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=4owGLFsQ9f0
https://www.youtube.com/watch?v=s5_d7pQKGhw
धन्यवाद
धन्यवाद
कोणाला ती जाहिरात आठवते का...
कोणाला ती जाहिरात आठवते का... सौ रुपये देदो मम्मी दस रुपये में क्या मिलता है
भावना गोवेकर लींक द्या ना
भावना गोवेकर लींक द्या ना सॅमसंग च्या अॅड ची.
मागच्याच पानावर इतरांनी
मागच्याच पानावर इतरांनी केलेलं आवाहन परत.. हा धागा २०००+ पोस्टी झाल्याने आता खालच्या लिंकवर चला
:-
http://www.maayboli.com/node/51027
वोडाफोन च्या सेकंड हनिमून
वोडाफोन च्या सेकंड हनिमून वाले आजी आजोबा यन्च्याबद्द्ल थोडि महिति (साभार लोकसत्ता) :-
जाहिरातीत पती पत्नी म्हणून काम करणारे हे जोडपं खऱ्या आयुष्यातही नवरा बायको आहेत. व्ही.पी. धनंजयन आणि शांता धनंजयन अशी त्यांची खरी ओळख. पण त्यांच्याबद्दल एवढीच ओळख करून देणं पूर्णपणे चुकीचे ठरेल. नृत्य क्षेत्रात धनंजयन दाम्पत्यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते. हे दोघंही भरतनाट्यम विशारद आहेत. आतापर्यंत जगभरात आपल्या नृत्याविष्काराने त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. हे दाम्पत्य स्वत: विद्यार्थ्यांना भरतनाट्यम शिकवतात. २००९ मध्ये या दाम्पत्याला पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
जाहिरातीतल्या दोन भागांसाठी या दाम्पत्यांनी खूप मेहनत घेतली. यासाठी व्हीपी धनंजयन हे स्कूटर चालवायला शिकले, तर शांता यांनी पॅरासेलिंगचे धडे घेतले. या दोघांनीही सत्तरी केव्हाच पार केली आहे. याबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची तर व्हीपी आणि शांता हे दोघंही बालपणापासूनच एकत्र नृत्याचे धडे घेत आहे. जेव्हा शांता पहिल्यांदा व्हीपी यांना भेटल्या होत्या तेव्हा त्या आठ वर्षांच्या होत्या तर व्हीपी हे बारा वर्षांचे होते.
मस्त माहिती अपर्णा
मस्त माहिती अपर्णा
त्या दोघाना ----/\----
रिया,
रिया,
https://www.youtube.com/watch?v=779KwjAYTeQ
अपर्णा खुप छान माहिती... अन
अपर्णा खुप छान माहिती... अन त्या वोडाफोनच्या अॅड खरच भारी आहेत..
भावना, मस्तच!
भावना, मस्तच!
आजी आजोबांची सुट्टी संपली .
आजी आजोबांची सुट्टी संपली . परत घरी निघाले
आजी आजोबांची सुट्टी संपली .
आजी आजोबांची सुट्टी संपली . परत घरी निघाले Sad
नवीन Submitted by स्वस्ति on 17 May, 2017 - 17:03 >>>>>>>>>>>
to be continue आहे बहुदा ते ट्रेन आल्यावर उठताना म्हणतात ना और बाकी है समथिंग (आज बघते व उद्या लिहिते)
अमीर खान च्या सर्व जाहीराती
अमीर खान च्या सर्व जाहीराती थन्डा मतलब कोका कोला .विहिरीतून कोका कोला च्या बाटल्या काढ्लेली आणि thank you भैया --ती. सर्व मस्त.
(No subject)
कोणाला ती जाहिरात आठवते का...
कोणाला ती जाहिरात आठवते का... सौ रुपये देदो मम्मी दस रुपये में क्या मिलता है
Submitted by नानाकळा on 8 May, 2017 - 22:26
अनुराधारेगे मला पण त्या
अनुराधारेगे मला पण त्या जाहिराती आवडतात खूप .
मला Sprite ची पण आवडते .
Pages