मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेको मत जोडो, यातली ती भंगारवाल्या आजीची जाहिरात आवडते मला. टाळी वाजवून "ओ येस" म्हणायच टायमिंग मस्त जमलयं.

नवीन Submitted by स्निग्धा on 25 November, 2019 - 06:37

हो ती आज्जी मस्तच आहे.

फेको मत जोडो, यातली ती भंगारवाल्या आजीची जाहिरात आवडते मला. टाळी वाजवून "ओ येस" म्हणायच टायमिंग मस्त जमलयं.

नवीन Submitted by स्निग्धा on 25 November, 2019 - 06:37

हो ती आज्जी मस्तच आहे.>>>>>>>>>>>> त्या आजीच नुकतच निधन झाल. तिच नाव पुष्पा जोशी आहे. अजय देवगणच्या ' रेड' चित्रपटात ती सौरभ शुक्लाची आई झाली होती. त्यातही तिच काम मस्त झाल होत अस वाचलय.

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/p...

RIP पुष्पा जोशी.

अन्कुश चौधरीच्या लिनन किंग च्या जाहिराती अ‍ॅरोगन्ट आणि डोक्यात जातात.... म्हने काय तर बघतोस कायरागानण, लिनन घातलय वाघान

RIP पुष्पा जोशी >> RIP कशासाठी? त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो! आप्ल्याकडे आत्मा रेस्ट करत नाही.

ग्रोफर्स च्या दोन नवीन जाहिराती पाहिल्या.पहिली मस्त दुसरी अर्धवट बघितली. पाहिल्या जाहिरातीत एक नवरा सोफ्यावर बसून बायकोकडे काहीतरी मागतो तर ती डायरेक्ट कारमधून उतरते (घरातील गाऊन आणि डोक्याला वर्ल्ड फेमस टॉवेल लावलेल्या अवस्थेत) आणि डायलॉगबाजी करते.

फॉग परफ्यूम - दुकानदार, गिर्‍हाइक - दोन्ही जाहिराती छान आहेत. पात्रांच्या अगदी बारीकसारीक हालचाली, डोळ्यातले भाव, रिअ‍ॅक्शन्स, सगळं अगदी बघण्यासारखं आहे. 'ब्रँडेड, प्रिमियम' ही जाहिरात तर फारच झकास आहे.

डेटॉल ची गिरिजा ओक असलेली जाहिरात कळाली नाही आणि आवडली ही नाही. (गिरीजा ओक आवडते. यातही छानच दिसत्ये.)

Yes Bank च्या नवीन दोन जाहिराती छान आहेत।
एका जाहिरातीत एक प्रेग्नेंट वूमन बँकेच्या गेट पर्यंत येते पण तिला तिच्या आईचा फोन येतो ती फोनवर बोलत गेटपाशी रेंगाळत असताना डोळ्याच्या कोनातून सिक्युरिटी बघतो आणि बँकेचे शटर बंद करायला निघालेला तो बंद करण्याऐवजी पुन्हा वर खेचतो मॅनेजर तिथे येतो आणि नजरेने असे का केले विचारतो तर हाही नजरेनेच त्या बाईच्या दिशेने इशारा करतो, इतकी छान आहे ना हि ऍड . त्यातले तिन्ही कलाकार अगदी रिऍलिस्टिक वाटतात.

हो, ऍक्सिस बँक च्या आहेत. सॉरी आता एडिट नाही करू शकत ते क्रेडिट कार्ड चे पेमेंट करायचे होते म्हणून एस बँक लक्षात राहिले. Happy

ती जेमिनी ऑइल "घाला पिठामध्ये तेल" ची ऍड डोक्यात जाते. काय तर म्हणे आता तुमचं काही करायला वेळ मिळेल.

नवीन Submitted by सान्वी on 29 January, 2020 - 07:08

खूप खुप खूप .. माझी मुलगी म्हणते फक्त तेल आणि मीठ घालून सामोसा बनतो आणि तुला बनवता येत नाही. (तोंड वाकड केलेली बाहुली )

नाही असाच आशय दोन्ही जाहिरातींचा आहे, एक काहीतरी dishwash बार ची आहे आणि एक ही. स्वतःसाठी वेळ मिळेल....

हो ती बेकरीवाली बाई.
भांडे घासायचे काय १० १५ मिनिटे वाचतील त्यात बाई बेकरी चालवणार आहेत...
यांच्या सगळ्या घरकामाला बाया स्पॉन्सर करून सरकारने चांद्रयान ३ वर यांना लावायला हवं. पटकन मोहीम होईल!

ती जेमिनी ऑइल "घाला पिठामध्ये तेल" ची ऍड डोक्यात जाते.>>>>अगदी अगदी

हो ती बेकरीवाली बाई.
भांडे घासायचे काय १० १५ मिनिटे वाचतील त्यात बाई बेकरी चालवणार आहेत...
यांच्या सगळ्या घरकामाला बाया स्पॉन्सर करून सरकारने चांद्रयान ३ वर यांना लावायला हवं. पटकन मोहीम होईल!

नवीन Submitted by अज्ञातवासी>>>>+११११११

ती जेमिनी ऑइल "घाला पिठामध्ये तेल" ची ऍड डोक्यात जाते. >>>>>>>>>> हो किती इरिटेटींग आहे. ती बाई विद्या बालनसारखी दिसते.

वेळ मिळेल स्वतःसाठी याचा आणि त्या न्युट्रीलॉक टेक्नोलॉजीचा काय संबंध>?

स्वतःसाठी वेळात वेळ काढुन चमचमीत वजन वाढवणारे पदार्थ बनवा. भरपेट खा आणि खाऊ घाला. हे सांगायच असेल जाहिरातीतुन.

https://youtu.be/scltYH13uEY

माझी सगळ्यात आवडती ऍड! आणि प्रत्येक जनरेशन नुसार ही ट्यून अपग्रेड होत गेलेली आहे.
तशीच हम मे है हिरो! ही अजून एक!

भांडे घासायचे काय १० १५ मिनिटे वाचतील त्यात बाई बेकरी चालवणार आहेत... >>>>>>

हो, (जणूकाही) नोकरी करणाऱ्या स्त्रिया १०/१५ मिनिटांचा भांडी घासण्याचा वेळ वाचतो म्हणूनच ८/१२ तासांची नोकरी करतात Happy

भांडे घासायचे काय १० १५ मिनिटे वाचतील त्यात बाई बेकरी चालवणार आहेत>>> Lol
१५ मि तर केक चे साहित्य जमवायला लागतील.

नवीन रेंज रोव्हर ची एक ऍड पाहिली त्यात एक स्त्री न्हाव्याकडे केस कापताना दाखविली आहे (ती इंटरनॅशनल मॉडेल आहे आणि न्हावी सुद्धा) रेंज रोव्हर ती मान तिरपी करून बघत असते. (केस कापताना हलते) बर तो न्हावी नॉर्मल कैचीने कापत नसुन तो वस्तरा वापरताना दाखवला आहे।

Iphone ची I m born with potential जाहिरात खूप छान आहे

Pages