Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या दिवसापर्यंत दातांच्या फटीत अडकलेली असते त्या सगळ्या अॅड्स
मुग्धटली, <<नाही टोच्या, तिचा
मुग्धटली,
<<नाही टोच्या, तिचा घोगरा आवाज मी ऐकला आहे आणि आता तिने ट्रीटमेंट घेउन बराच फरक पडला आहे... हा आवाज आहे तो घोगरा काय भसाडाच्याही पुढे आहे...>>
भसाडा हा अस्सल शब्द वापरला तुम्ही.. अनुमोदन
डव ची 'गो प्ले' वाली जाहिरात
डव ची 'गो प्ले' वाली जाहिरात म्हणताय का तुम्ही...त्या भसाड्या आवाजाची...? तोच आवाज 'दाग अच्छे है..' मधला पण आहे ना..
त्या बाईला बोलतांना किती कष्ट पडतायेत असं वाटतं...आणि अगदी भावरहित आवाज वाटतो तो...
करेक्ट स्व. रा...
करेक्ट स्व. रा...
हस्की आवाज म्हणतात त्याला आणि
हस्की आवाज म्हणतात त्याला आणि तो चक्क सेक्सी वाटतो काहिंना...
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या दिवसापर्यंत दातांच्या फटीत अडकलेली असते त्या सगळ्या अॅड्स. एकदम फालतू वाटतात, किळस वाटते बघून. आरशात बघून बाहेर पडत नाहीत का घरातून. असं कोणी करतं का?
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या दिवसापर्यंत दातांच्या फटीत अडकलेली असते त्या सगळ्या अॅड्स. एकदम फालतू वाटतात, किळस वाटते बघून. आरशात बघून बाहेर पडत नाहीत का घरातून. असं कोणी करतं का?>> याचा अर्थ ते सकाळी ब्रश करत नाहीत असाही होतो.. काय पण दाखवतात..
आमचे चिरंजीव (वय वर्ष ६) एक
आमचे चिरंजीव (वय वर्ष ६) एक दिवस म्हणाले, ते टीव्हीवर कायपण खोटं दाखवतात. म्हटलं काय झालं? तो म्हणाला, आपण रोज गोदरेज साबण लावून अंघोळ करतो, तरी एकदाही एकसुध्दा बटरफ्लाय माझ्या अंगावर बसलं नाही!!!
टोच्या एकवेळ ब्रश करत नसतील
टोच्या एकवेळ ब्रश करत नसतील पण आरशात बघत असतीलचना, तरी त्यांच्या लक्षात नाही येत.
>>एखाद्या जाहिराती वर बंदी
>>एखाद्या जाहिराती वर बंदी आणायची असल्यास काय करावे? किंवा आपला निषेध कसा व कुठे नोंदवावा?
http://www.ibfindia.com/complaint-form
मला ती व्हॅसेलिनची जाहिरात पण
मला ती व्हॅसेलिनची जाहिरात पण नाही आवडत. काय त्या बायका आपल्या हातांकडे बघून माझा स्किन टोन अमुक अमुक म्हणून सांगतात. जाहिरातीच्या शेवटी ती बयो आपला स्किन टोन ९ आहे म्हणते तर तिचा बॉफ्रे/नवरा 'नाही, १० आहे' असं लोक आपल्या मालकीच्या वस्तूचं कौतुक करताना सांगतात तसं म्हणतो. मनात येतं की विचारावं की ठोंब्या तुझा स्किन टोन काय आहे? का तू ठोंब्या आहेस म्हणून तुझा स्किन टोन विचारायचा नाही?
शाहरुखच्या सर्वच जाहीराती.
शाहरुखच्या सर्वच जाहीराती. आवडीचा असल्याने असेल कदाचित. मात्र ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी तो छळ असेल.
अभिषेक बच्चनच्या सुद्धा सर्वच जाहीराती आवडतात. अर्थात बहुधा आयडीयाच्याच. भले तो सिनेमांत मला कधीही आवडला नाही, ना माझा तो आवडता हिरो आहे. पण जाहीरातीत नेमके इक्स्प्रेशन भारी देतो.
इरफान खान सुद्धा अश्याच पद्धतीने वापरला जातो, पण मग त्याच्या प्रत्येक जाहीरातीत तो तसाच दिसायला लागल्यावर बोरमारी होऊ लागली.
सलमानखानची मात्र एकही जाहीरात आवडत नाही. सिनेमांमध्ये बोलात तर तो आपला स्टाईलभाई आहे, पण जाहीरातीत तो नाही बरा वाटत वा त्याला अजूनपर्यंत योग्य प्रकारे वापरला गेला नाही. कपडेधुलाईच्या जाहीरातीत त्याला "मेरी बीवी स्टार है, उसकी धुलाई दमदार है" असल्या लाइनी बोलताना बघणे छळ आहे.
आमीरखान हल्ली दिसत नाहीत कुठल्या जाहीरातीत पण कोकाकोलाच्या वेगवेगळ्या गेटअपमधील जाहीराती आवडायच्या. . अबे बाल की दुकान, तू आदमी है के अंडा, थंडा दे थंडा .. तिथेही तो मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या इमेजला जागायचा.
अमिताभचे म्हणाल तर ते एक आदरणीय व्यक्तीमत्व असल्याने ते जाहीरातीत तसेच दाखवल्यास भावते.
हृतिक रोशन म्हणजे काहीतरी डान्सस्टेप हेच समीकरण नाहीतर हॉलीवूड स्टारसारखा त्याला लूक देऊन आपले प्रॉडक्ट ईप्मोर्टेड ब्रांडचे आहे असे भासवणे. पण मला वैयक्तिकरीत्या फारश्या नाही रुचत त्याच्या अश्या जाहीराती. कहो ना प्यार है मध्ये दिसलेला फ्रेश लूक मी नेहमीच मिस करतो.
हल्ली रणबीर कपूरही बरेच जाहीरातीत दिसतो, पण सिनेमांत आवडू लागलेला हा रायझिंग सुपर्रस्टार जाहीरातीत मात्र त्याच तश्यात स्टाईलमध्ये बघायला नाही आवडत. कदाचित छानश्या स्क्रिप्टचा अभाव हे ही कारण असेल.
हिरोईनींपेक्षा बरेचदा नव्यानव्या फ्रेश चेहर्याच्या मॉडेल जाहीरातीत बघायला आवडतात. तरीही प्रियांका चोप्रा व्हाय शूड बॉईज हॅव ऑल द फन, आणि कतरीना आंब्याचा रस पिताना बघताना आवडली. दिपिकाचा ग्लॅमरस लूक मला आवडतो पण जाहीरातींमध्ये ती नाही कुठल्या फारशी आवडली. इतर मध्यमवयीन हिरोईनी आईच्या भुमिकेत बघणे कसेसेच वाटते. मग श्रीदेवी असो वा जुही वा माधुरी वा शिल्पा शेट्टी .. तुर्तास इतकेच .. भर टाकत राहणार ..
भसाड्या आवाजाबद्दल अनुमोदन.
भसाड्या आवाजाबद्दल अनुमोदन. प्रत्येकवेळी टोचतोच तो आवाज कानाला.

हस्की आवाज>> राणी मुखर्जी >> हो! माझ्या नवर्याला आवडतो तिचा भसाडा आवाज
रात्री खाल्लेली भाजी दुसर्या दिवसापर्यंत दातांच्या फटीत अडकलेली असते त्या सगळ्या अॅड्स. >> यक्क!! आणि त्यात भाज्यांचे अडकलेले तुकडे बघून कुठली भाजी होती हे ही कळते... भेंडी, पालक वै.
तयार केलेली भाजी आयती गिळतानापण नक्की कुठली भाजीए - फरसबी, वालपापडी की गवार याचा गोंधळ असतो...
ऋन्मेऽऽष चांगली पोस्ट. अनुमोदन. मध्यमवयीन हिरोईनी आईच्या भुमिकेत बघणे कसेसेच वाटते. >> या अॅड मध्येच बघणे भयाण वाटते. श्रीदेवी चा आवाज किती चिरकलाय व्हॅनीश च्या अॅड मध्ये. त्यातल्या त्यात इंग्लीश विंग्लीश मध्ये बरा वाटलेला. डब का नाही करवून घेत? ऐश्वर्या पण नाही सहन होत!! तिच्या आणि अभिषेकच्या प्रेस्टीजच्या अॅड्स कित्ती ओव्हरअॅक्ट केलेल्या आहेत. अभिषेकच्या आयडिया च्या आवडल्या.
रणबीर च्या डोकोमोच्या आवडलेल्या. हृतिक ची रिसेंट HE डिओ ची आवडली अॅड. वरूण, सिद्धार्थ आणि आलिया च्या कोका कोलाच्या अॅड्स पण मस्त होत्या.
आलिया भट ची हिरो प्लेझर ची
आलिया भट ची हिरो प्लेझर ची अॅड चांगली वाटली. जास्त बड्बड नाहीये. पीसी ताईंच्या अॅड पेक्षा चांगली आहे.
रणबीरची ओरिओ विसरलात का! कसली
रणबीरची ओरिओ विसरलात का! कसली गोंडू अॆड होती भावा बहिणीची.
रून्मेष (सॉरी, मोबाईलवर टाइप करता येत नाही तुमचा आयडी) मस्त पोस्ट.
रणबीरची ओरिओ विसरलात का! कसली
रणबीरची ओरिओ विसरलात का! कसली गोंडू अॆड होती भावा बहिणीची.>> अय्यो... ती कशी विसरले... अगदी खरोखरीचे भाऊ बहीण वाटतात. खरंच दृष्ट लागण्यासारखी!!!
रेडिओवर परत अल्टा मॉन्टे च्या
रेडिओवर परत अल्टा मॉन्टे च्या जाहीतारिनी धुमाकुळ घातला आहे .
मोठी फॅमिली असेल तर मोठे घर पाहीजे .
विशेश नोन्द करण्यासारखी गोश्ट म्हणजे सर्व जाहीराती गुजराती कुटुंबाभोवती फिरतात .
का?
फक्त गुजराथी कुटुंबच मोठी असतात की यान्ची मोठी घर फक्त गुजराती लोकांना परवडणार ?
कुठच्या तरी पाईपची जाहिरात
कुठच्या तरी पाईपची जाहिरात इंग्रजी न्यूज मध्ये बघितली. राजकारणी, फिक्सिंग करणारे खेळाडू, अशी वेगवेगळी कृष्णकृत्य केली जात आहेत आणि तिथे लिक होऊ शकतं पण हे पाईप जिथे वापरले आहेत तिथे लिक नाही होणार. मस्त innovative, humorous वाटली.
होंडाच्या नव्या mobilio गाडीची जाहिरात पण मस्त लक्षवेधी वाटली.
रणबीरच्या ओरीओच्या दोन जाहिराती आहेत. एक जरा मोठ्या बहिणीबरोबर आणि एक छोट्या बहिणीबरोबर (किंवा कदाचित भाचीबरोबर). छोटीबरोबर tab वर video chat करताना ओरिओ खातो आणि ती जेव्हा रुसते तेव्हा समोर हजर होतो.
सर्वात जास्त राग किळस तिटकारा
सर्वात जास्त राग किळस तिटकारा कसला येत असेल तर त्या भंगी विशालचा
सर्वच मराठी सिरेलीना तो प्रायोजित करतो
नेमका जेवायला बसला कि हा येतो टोयलेट साफ करायला
कधी कसल्या जाहिराती दाखवायच्या याची अक्कल नाही मराठी सिरेली वाल्यांना
ड्रीमगर्ल, वरूण, सिद्धार्थ
ड्रीमगर्ल,
वरूण, सिद्धार्थ आणि आलिया च्या कोका कोलाच्या अॅड्स पण मस्त होत्या.
>>>
येस्स, हाहा मै क्रेझी हून , गाण्याची चालही सही आणि मूडही सही. त्याला साजेसेच असे त्यांचे फ्रेश चेहरे. क्रिकेटचा सामना बघताना दर दुसर्या ओवर नंतर जरी ती जाहीरात आली तरी वैताग येणे तर दूरच उलट रिफ्रेशमेंटच एक प्रकारची.
ओरिओ सुद्धा मस्त
(अवांतर - रणबीरचे हे रूप आवडते. बर्फी आणि अजब प्यार की गजब कहाणी या दोन्ही चित्रपटांत नितांतसुंदर हिरोईनी असून तो जास्त आवडला होता ते याचमुळे. आधुनिक राजकपूर)
आणखी एक अवांतर - आशूडी, मला स्वतालाही माझे नाव इथे पहिल्यांदा (कॉप्म्युटरवरूनही) टाईप करायला बर्यापैकी खटपट करावी लागली होती.
तर त्या भंगी विशालचा >>>> हा
तर त्या भंगी विशालचा
>>>>
हा हा,
हो, जरा इरीटेटच होतात त्या अॅड मलाही.
त्यातही बरोबरची गृहीणी अशी रिअॅक्ट करत असते की घरी शाहरूख नाही तर गेला बाजार सुनिल शेट्टीच आला आहे.
आज काल मला सुनील शेट्टी
आज काल मला सुनील शेट्टी म्हटलं की हिंदीतलं ओगी अँड कॉकरोचेस आठवतं
मॅकस, मी तर आज उदाहरण
मॅकस, मी तर आज उदाहरण द्यायच्या नादात किती तरी वर्षांनी सुनिल शेट्टी म्हटलंय .
असो, उगाच रात्रीच्या टायमाला जास्त थट्टा नको, मर्यादीत क्षमतेचा असला तरी गुणी आणि प्रामाणिक कलाकार होता वा आहे तो.
अवांतर किंबहुना विषयाला धरून - तो आला आहे का कधी कोणत्या जाहीरातीत ?
तर त्या भंगी विशालचा >>>> हा
तर त्या भंगी विशालचा
>>>>
हा हा,
हो, जरा इरीटेटच होतात त्या अॅड मलाही.
+१
त्या जाहिरातींवर बंदीच आणायला हवी. किळसवाण्या आहेत अगदी. त्यात तो कुमकुमचा सुमीत पण असायचा. तो गोड होता पण तरी जाहिरात इरीटेट व्हायचीच- जास्तीकरुन जेवताना.
मोबाईल चार्जिंगची अॅड. बोका
मोबाईल चार्जिंगची अॅड.
बोका बसलेला दाखवला आहे.तो मुलगा मोबाईल चार्ज करुन घेतो वगैरे...
प्युअर ईट ची अॅड वैताग आणते.
प्युअर ईट ची अॅड वैताग आणते. ती बाई पाण्याचा ग्लास उडवून लावते जसं काय तो मुलगा विषच पितोय.
अलिया भट्टची स्कूटीची जाहिरात
अलिया भट्टची स्कूटीची जाहिरात आवडली
जिंगल एकदम सहिये
प्युअर ईट ची अॅड वैताग आणते.
प्युअर ईट ची अॅड वैताग आणते. ती बाई पाण्याचा ग्लास उडवून लावते जसं काय तो मुलगा विषच पितोय. >> खरच स्वप्ना. त्यात ती वहीनी तिला म्हणते अग बुद्धू पाणी प्युअर ईट च असेल तर सेफ आहे. तिला म्हणाव हीम्मत असेल तर खर्या नणदेला बुद्धू म्हणुन दाखव.

तिला म्हणाव हीम्मत असेल तर
तिला म्हणाव हीम्मत असेल तर खर्या नणदेला बुद्धू म्हणुन दाखव. .. भारी
पण हो, खरेच ती जाहीरात वैताग आणते,
माझी आईही अश्या अॅड बघून चिडते, "मेले काहीही दाखवतात" हा तिचा यावेळचा फेवरेट डायलॉग.
पण ते सोडा लोकहो,
काँग्रेस विधानसभेच्या जाहिराती पुन्हा सुरू होऊ घातल्यात
तिला म्हणाव हीम्मत असेल तर
तिला म्हणाव हीम्मत असेल तर खर्या नणदेला बुद्धू म्हणुन दाखव. >>
अलिया भट्टची स्कूटीची जाहिरात आवडली >> +१
Pages