निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकिता धन्स ग.

पण आळस आणि संकोच जिंकले

आळस समजु शकते. पण मैत्रीणीला फोन करायला संकोच कसला ?

काल जागूच्या घरी नॅनो गटग मस्त झाले. Happy

दिनेशदा, मामी, साधना, जागू खुप खुप धन्यवाद. Happy

वृतांत कोण लिहिणार हे तुम्ही ठरवा. फोटो पाठवण्याची व्यवस्था अस्मादिकांकडुन करण्यात येईल. Proud

या माझ्या दोन रिक्षा Proud
निसर्गाच्या सोबत Happy
http://www.maayboli.com/node/27410

निसर्गावर केलेली छोटीशी मात Happy
http://www.maayboli.com/node/27377

जमल्यास वाचा ..

http://www.maayboli.com/node/27391
Happy
प्रतिसाद द्यायला इतका कंजुषपणा मी तरी कधी केला नाही..
(या अशा घटनांमुळे अनेक झाडांच देखील नुकसान झालेले आहे,निसर्गही बिघडतो)

हाय लोक्स! पेरू मस्तच यायला लागले आहेत. काल झाडाखाली पाहिलं तर चांगले मोठ्ठे २ पेरू पक्षांनी अर्धे खाऊन टाकलेले दिसले. तेव्हा लक्षात आलं की पेरू पिकलेत. मग काल ५/६ चांगले पिकलेले पेरू काढले. खूप गोड आहेत.
चांगले तयार नारळही सध्या बरेच पडताहेत. स्वयंपाकात मजा आहे.

अश्वे अग इथे मी नाही रेसिपी टाकत इथे फुल आणि झाडच टाकते. माझी पोस्ट पाहुन तु असा रिप्लाय दिलास का ? Lol

अंगणात एक पारिजातक, एक मोगरा, एक जाई आणि एक मधुमालती असावी अस माझं स्वप्न आहे.

त्यासाठी अंगण हवं, अंगणासाठी घर हवं..

यादी लांबत जाते.

होइल एक एक करुन सगळी स्वप्न पुर्ण होतील Happy

निकिता,
झाडांची कल्पना छान वाटली.स्वप्न नक्की पुर्ण होईल.
जागु,
धन्स ! प्राजक्ताच्या फुलांची ओळख तर झाली.
Happy

अश्विनी, काय सुंदर उपमा दिलीत!
जागू, अप्रतिम फोटो- प्राजक्ताचे.
निकिता, नक्की सगळी स्वप्नं पुरी होतील.

जागू, प्राजक्ताचा सुन्दर सडा बघुन नयन त्रुप्त झाले. डिसेंबरमधे ह्या गोष्टी दिसणार नाही मला. Sad

अंगणात एक पारिजातक, एक मोगरा, एक जाई आणि एक मधुमालती असावी अस माझं स्वप्न आहे.
त्यासाठी अंगण हवं, अंगणासाठी घर हवं..
यादी लांबत जाते.

होइल एक एक करुन सगळी स्वप्न पुर्ण होतील
----------------------------------------------------------------------------------
निकिता, निराश होउन स्वप्न सोडायची नाही. घट्ट हृदयाशी बाळगुन ठेवावी. एक दिवस नक्की पुर्ण होतील. Happy

हो लहानपणी मी देखिल अशीच फुलाझाडांची स्वप्न बघायची.
मायामित असतांना ती पुर्ण देखिल झाली. तेथे परसदारी आंबा, पेरु, मोगरा, नारळ, नागरवेल (खायची पाने), गवती चहा वैगैरे होते. येथे, डिसीत थंडीमुळे फारसा वाव नाही. तरी मोगरा, कढीलिंब, तुळस, पपई, कोरफड अशी थोडिफार जपुन आहे. दुर्दैवाने, पपयाची झाडे वाढतात वाढतात आणि एक थंडीची लाट त्याना मारुन टाकते. खुप वाईट वाटतं. पण उठुन पुन्हा नविन झाडं लावते ह्या आशेने कि एक न एक दिवस पपई नक्की फळेल.

माझ्या सध्याच्या छोट्या घराच्या छोट्या खिडकी मध्ये

मुळा, मिरची, हळद, कोरफड, गुलाब, काकडी, तुळस, चाइनीज गुलाब, लिंबु, मोहरी इतकी जण आहेत Happy
आणि हो एक भोपळ्याचा वेल.
त्याच काय करु कळत नाही. तो रेतीत रुजला उन्हात टिकला. माझ्याने त्याल उपटवत नाही. म्हणुन तो आहे. कधीतरी उपटेन धीर करुन

बरं मला सांगा..लिंबाना लिंब यायला काही कराव लागतं का?
गुलाब २ वर्षांचे आहेत. भरभरुन फुलतात, पण आताशा जरा नाराज दिसतात..त्यांना हसवायच आहे.. कसे करावे?

निकिता, लिंबाला जरा मोकळी हवा लागेल. मग येतील. समजा फळे नाही धरली तर त्यावर एक खास प्रकारचे फुलपाखरू नक्कीच अंडी घालायला येईल. भोपळ्याचा वेल फार पसरत असेल तर त्याची कोवळी पाने भाजीसाठी वापरता येतील.

मामीची/ साधनाची / जागूची बाग बघितली, आता निकिता आणि मानुषी कडची बघायची आहे.

---------------

सापाच्या बाबतीत आपल्यावर गारुड होते, असा अनुभव मी स्वतः घेतलाय. त्याक्षणी तरी भिती न वाटता, मी बघत बसलो होतो.
एका ठिकाणच्या बेटावरचे सगळे साप, (ते अंडी / पिल्ले खातात म्हणून ) पक्ष्यांनी आंधळे करुन टाकले आहेत, असे अटेंनबरोच्या एका सीडीत दाखवलेय. तिथले पक्षी बरोबर डोळ्यांवरच चोच मारतात.
यावेळी दुबई वरुन, ह्यूमन प्लॅनेट ची डिव्हीडी घेऊन आलोय. बघायला घेतली कि लिहितोच.

दिनेशदा सध्या देशात आहात असं ऐकिवात आहे. इकडे कधी चक्कर? आणि माझी काही बाग बीग नाही हो ...असंच आपलं काहीबाही लावलंय.

माझ्या सध्याच्या छोट्या घराच्या छोट्या खिडकी मध्ये

मुळा, मिरची, हळद, कोरफड, गुलाब, काकडी, तुळस, चाइनीज गुलाब, लिंबु, मोहरी इतकी जण आहेत
/////////////////////////////////////////////////////////////////////
बापरे, आंगण नसुन इतके. मग आंगण झाल्यावर काय काय!! छान.

दुर्दैवाने, पपयाची झाडे वाढतात वाढतात आणि एक थंडीची लाट त्याना मारुन टाकते. खुप वाईट वाटतं. >>> सुमंगल, झाड कीती उंच वाढते?

रोपा भोवती गोणपाटाचे कुंपण घाला....जसजसे झाड वाढेल.. तसे कुंपणाची उंची वाढवत जा. सुरुवातीला एक दिड फूटा पर्यंत अतंर ठेवा खोडापासुन.

Pages