मांसाहाराशी ओळख
मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.
माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.
मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच
जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.
आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.
पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.
मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.
शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:
आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.
मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.
जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.
पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?
याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.
माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.
(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)
>>> तुझा जर देवावर विश्वास
>>> तुझा जर देवावर विश्वास नसेल तर तुला मांसाहाराबद्दल काहीही वाटणार नाही. माझा आहे विश्वास म्हणून मला भिती वाटते.
बी,
तुझ्या भावना समजल्या आणि पटल्या सुध्दा. तू इतकी वर्षे परदेशी राहून सुध्दा मांसाहाराकडे वळला नाहिस हे कौतुकास्पद आहे.
माझ्यावर हसणार्यांनो, मी
माझ्यावर हसणार्यांनो, मी तसाही इथे कमीचं येतो. मला तुमच्यासारखे वादविवाद जमत नाहीत. साधी गोष्ट आहे की तुम्ही प्राण्यांना मारु नका.
मास्तुरे, धन्यवाद. मी कित्येक दिवस उपाशीपोटी काढले आहेत पण मासाहार केला नाही. मला माझा अभिमान वाटतो
बी साहेब, एक नक्की सांगतो, मी
बी साहेब, एक नक्की सांगतो, मी तुमच्यावर अजिबात हसलेलो नाही. मी केवळ सर्व संवादांना हासत होतो. मला कुणावरही हासायचे नाही. तरी दिलगीर आहे आपल्याला राग आलेला असल्यास!
लोभ असू द्यावात!
बेफिकीर, मला राग वगैरे
बेफिकीर, मला राग वगैरे मुळातचं कमीचं येतो आणि कुणाही चांगल्या व्यक्तीवर माझे त्वरीत प्रेम जडते. मला इथे ह्याचे फार नवल वाटते की इथले मित्र काल कडू आज गोड तर आज गोड तर उद्या कडू असे क्षणात बदलत असतात.
तसेही काही माझ्याकडून घडले
बेफिकिर, तू शाकाहारी नसशील तर
बेफिकिर, तू शाकाहारी नसशील तर शाकाहारी हो. मी तुला आजन्म माफ केले म्हणून समज
<< साधी गोष्ट आहे की तुम्ही
<< साधी गोष्ट आहे की तुम्ही प्राण्यांना मारु नका. >> एकदम मान्य. पण बी, हे सांगताना देवाची भिती, पाप-पुण्य, धर्म, संस्कृति व स्वतः शाकाहारी असल्याचा अभिमान इ. इ.चा आधार कुणी घेतला कीं चर्चेची गाडी रुळावरून घसरणारच ना !
भाऊ, लोकांना असे भावनाशील
भाऊ, लोकांना असे भावनाशील कधीकधी करावे लागते. म्हणून मी तसे लिहिले. त्यांचे स्वतःवर नियंत्रण नाही ही एक गोष्ट आणि प्राण्यांबद्दल फार काही वाटत नाही ही दुसरी गोष्ट.
हम कहॉ आ गये है?
हम कहॉ आ गये है?
मी मिश्राहारी आहे. फार आवडीने
मी मिश्राहारी आहे. फार आवडीने मांसाहार कधीच करत नाही. पण कोल्हापूरी मटन ताट किंवा कोळंबी, तसेच अंडाकरी वगैरे काही वेळा उत्साहाने खातो. पण माझा तरी यावर विश्वास आहे की माणूस जे खातो तसा तो बनतो.
पण काय आहे बी साहेब, इतका म्हणजे इतका प्रवास केलेला आहे की शाकाहार व्यवस्थित उपलब्धही नसायचा कित्येकवेळा! किंवा जो उपलब्ध असतो त्यापेक्षा पटकन एखादे ऑम्लेट वगैरे आपल्या समोरच बनवलेले खाऊन टाकले की सोय होते.
पूर्ण शाकाहारी होण्यात मला तरी कोणतीही भूतदया वाटत नाही कारण मी जो प्राणी खाणार असतो तो मेलेला आधीच असतो आणि माझ्यासाठी मारलाही गेलेला नसतो. पण प्राण्यांना मारणे याचे मात्र प्रचंड वाईट वाटते. बघवत नाही. ऐकवतही नाही. ऑस्ट्रेलियात एक क्रॅब डान्स म्हणून डिश मिळायची. त्यात तव्यावर जिवंत खेकडा टाकून तो तसाच तडफडत असताना समोर आणायचे आणि त्याला क्रॅब डान्स म्हणायचे. एका बाईने तक्रार केल्याचे व तो प्रकार बंद पाडल्याचे वाचले. पण हे जगभरात चालू आहे. जॅपनीज रॉ फिश खातात. चीनमध्ये म्हणे खास माकड मारण्यासाठिचे टेबल असते. त्याला मध्यभागी बसवतात व तेथेच मारून त्याच्या डोक्यातील रक्त प्यायला देतात.
झाड भावनेने ओथंबलेले असते. दाखवत नाही ते! पण त्यालाही वाईट वाटते पान तुटले तरी! असे म्हणतात की झाडे सर्वात जास्त रिअॅक्ट होतात घडणार्या घटनांना!
कुणालाच दुखवायचे नसेल तर खायचे काय? मी नेहमी म्हणतो की एक ब्राह्मण चतुर्थी करतो त्या दिवशी एक मुसलमान कोंबडी खातो. गणपती त्याला शिक्षा का करत नसेल? म्हणजेच सर्व भाग श्रद्धेचाच ना?
बाकी मानवी दात आणि आतडी हे शाकाहारासाठि आहेत हे तर खरेच कारण बहुतांशीमानव कच्चे मांस नाही खाऊ शकत. परवाच मी लांडग्यावरील एक लेख वाचला त्यात लिहिलेले होते की त्याना हाडे फोडण्यासाठी चार भिन्न प्रकारचे दात असतात. माणसाला असा एकही दात असु शकत नाही ज्याने इव्हन कोकराचेही हाड फोडू शकेल.
अर्थात, मांसाहाराशिवाय जगणे शक्य आहेच, हे मात्र पटले.
-'बेफिकीर'!
बेफिकिर, खूप छान लिहिले आहेस.
बेफिकिर, खूप छान लिहिले आहेस. इतकी छान बुद्धी लाभली आहे हृदय देखील लाभो.
(No subject)
http://www.yogsandesh.org/art
http://www.yogsandesh.org/articles/67/1/Non-vegetarian-Food-Healthy-or-U...
मांसाहार विरूद्ध शाकाहार ही
मांसाहार विरूद्ध शाकाहार ही चर्चा हनुमानाची शेपटी आहे. कधीही न संपणारी.
शाकाहारी किंवा मांसाहारी या दोघांनीही कोणत्याही (एकमेकांच्या) आहाराला तुच्छ लेखू नये, दुसर्याच्या आवडी-निवडीचा आदर करावा. कोणालाही शाकाहार्/मांसाहार कसा श्रेष्ठ्/कमी दर्जाचा हे पटवून मतपरिवर्तनाचा प्रयत्न करू नये व त्यात आपला वेळ व्यर्थ घालवू नये.
माझे भाषण संपले
टाळ्या !!! चार ओळीत भाषण
टाळ्या !!! चार ओळीत भाषण संपवले त्याबद्दल दक्षिणा यांचे मन:पुर्वक आभार ! बाकी चालू द्या.
कृपया कोणावरही वैयक्तिक
कृपया कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी टाळावी ही नम्र विनंती.
मास्तुरे कोणी केली वैयक्तिक
मास्तुरे कोणी केली वैयक्तिक टिकाटिप्पणी?
दक्षिणा, हे तुम्हाला उद्देशून
दक्षिणा,
हे तुम्हाला उद्देशून नाही. पण मागील काही प्रतिसादात चर्चा वैयक्तिक पातळीवर घसरायला लागली आहे असे मला वाटले.
बी तुम्हाला कोणीही हसले नाहि.
बी तुम्हाला कोणीही हसले नाहि. पण एकुणच ज्याप्रकारे साद- प्रतिसाद येत होते - दोन्हि बाजुकडुन ते वाचुन खुप मनोरंजन झाले आणी हसायला आले.
मला मायबोलीवर कायम पडत
मला मायबोलीवर कायम पडत असलेल्या प्रश्नाने डोके वर काढले.
दुसरी व्यक्ती हि माझ्यापेक्षा भिन्न आहे. तिला तिच्या आवडीनिवडी, मते असू शकतात. ती माझ्या आवडीनिवडींशी व मतांशी जूळत नसली, तरी ती मते मांडायचा त्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे... हे स्वीकारणे एवढे अवघड का जाते ?
दुसरी व्यक्ती हि माझ्यापेक्षा
दुसरी व्यक्ती हि माझ्यापेक्षा भिन्न आहे. तिला तिच्या आवडीनिवडी, मते असू शकतात. ती माझ्या आवडीनिवडींशी व मतांशी जूळत नसली, तरी ती मते मांडायचा त्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे... हे स्वीकारणे एवढे अवघड का जाते ? >>>>>
हे अवघड जाते असे नाहि वाटत. पण " माझी मते/आवडिनिवडी या सगळ्यात भारी" हा इगो दुखावला जाणे स्विकारणे अवघड जात असावे असे वाटते.
शाकाहारी लोकांविषयी मला
शाकाहारी लोकांविषयी मला नितांत आदर आहे !
आणि त्यातल्या त्यात जे लोक, शाकाहारच ग्रेट असल्याचा पुरस्कार करतात त्यांच्यावर तर अतीव प्रेम आहे!
गो व्हेजीज गो!
( तुम्हा लोकांमुळेच मांसाहाराच्या किमती जरा तरी आटोक्यात आहेत लोको ! :P)
-एक कट्टर मांसभक्षी !
मास्तर, संपुर्ण लेख हा
मास्तर, संपुर्ण लेख हा वयक्तिक विषयाचा आहे....
उदाहरणार्थ..
तुम्ही जर शुध्द्द शाकाहारी/मांसाहारी असाल तर जे काही त्याचे पाप/पुण्य आहे (जसा तुमचा समज आहे) ते 'मला' किंवा तुमच्याशी संबंधीत इतर व्यक्तिला/समाजाला भेटणार नाहीय.
आणि अशा वयक्तिक विषयात जर तुम्ही कुणाशी 'जबरदस्ती' कराल तर तीही एक प्रकारे 'हिंसाच'होईल.
हे वरील उदाहरण...
<<<तू शाकाहारी नसशील तर शाकाहारी हो. मी तुला आजन्म माफ केले म्हणून समज >>>
एखाद्याचे मन मारण्यात हात भार लावणे किंवा स्वतःचेच मन मारुन जगणे हा एक 'घोर हिंसेचा' प्रकार असे मला वाटते.
('बी' आयडी बद्दल नितांत आदर आहे मला, पण.., स्वत:ला ते एक शुध्द्द शाकाहारी समजतात आणि मांस ग्रहण करीत नाही कारण 'त्यात जिंवांची हिंसा/हत्या होते'. ही त्यांची 'भुल' आहे, शुध्द भाषेत 'अंधश्रध्दा' आहे.)
आणी हे मी इथेच पुढे स्पष्ट करेन...
(No subject)
भाऊ, मस्त चित्र. पहिल्यांदा
भाऊ, मस्त चित्र.
पहिल्यांदा गल्फ मधे गेलो होतो त्यावेळी बिस्किटांच्या पुड्यांवर "प्यूअर बीफ फॅट" असे लिहिलेले असायची, त्याची आठवण झाली.
छे छे! दोन्ही गटांनी चर्चा
छे छे! दोन्ही गटांनी चर्चा फारच थोडक्यात आटोपती घेतली. खालील मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी प्रकाश टाकावा आणि आम्हास शहाणे करून सोडावे ही विनंती :
१. आहार आणि बुद्धी यांचा एकमेकांशी संबंध - शाकाहार आणि मांसाहाराचा मेंदुच्या विविध केंद्रांच्या उत्क्रांतीत असणारा वाटा.
२. मानवाची शारिरीक क्षमता आणि अन्नपदार्थांतील घटक यांचा परस्पर संबंध
३. अन्नाचे घटक आणि मानवी वृत्ती : विथ स्पेशल फोकस ऑन भारतीय शाकाहार आणि मांसाहार
४. स्त्रीयांनी शाकाहारी आणि पुरुषांनी मांसाहारी असावे का?
५. पुण्यात मांसाहार करावा काय?
६. पुणेकरांनी मांसाहार करावा काय?
६. NRP (नॉन रेसिडेंट पुणेकर्स) नी मांसाहार करावा काय?
मामी, पिक्चर तो अभी बाकी है
मामी, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त.
मी एक बर्यापैकी मांसाहारी, बालपणापासूनच. मध्ये काही वर्षं अजिबात बंद होता पण कॉलेजलाईफ पासून पुन्हा मागील पानावरुन पुढे चालू.
माझी मांसाहाराची कारणे.
१. मला आवडतो म्हणून
२. मला आवडतो म्हणून.
<< बिस्किटांच्या पुड्यांवर
<< बिस्किटांच्या पुड्यांवर "प्यूअर बीफ फॅट" असे लिहिलेले असायची, >> दिनेशदा, 'स्वादिष्ट', स्वस्त', 'घरच्यासारखं', 'गरमागरम' इ.इ. अनेक विशेषणं उपलब्ध असताना, प्रत्येक शाकाहारी हॉटेलच्या पाटीवर 'शुद्ध' हेच विशेषण 'शाकाहारी'ला कां लावतात हे मला पडलेलं जुनंच कोडं आहे !
मामीजी, आपले पहिले तीन प्रश्न 'बौद्धिकते'कडे झुकलेले असल्याने मी त्यांच्या वाटेला नाही जाऊं शकत. चौथ्या प्रश्नाच्या उत्तराऐवजी मला विनोदच सुचतात. आपल्या शेवटच्या प्रश्नांचं उत्तर पुण्यातल्या मासे-मटणाच्या दुकानाबाहेरच्या शनिवार-रविवारी दिसणार्या लांब रांगाच देतील !
५. पुण्यात मांसाहार करावा
५. पुण्यात मांसाहार करावा काय?
६. पुणेकरांनी मांसाहार करावा काय?
६. NRP (नॉन रेसिडेंट पुणेकर्स) नी मांसाहार करावा काय?>>>
दिनेश आणि चाणक्य, तुमच्या
दिनेश आणि चाणक्य, तुमच्या दोघांच्याही पोस्टला भरभरून अनुमोदन..
Pages