मांसाहाराशी ओळख
मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.
माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.
मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच
जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.
आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.
पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.
मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.
शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:
आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.
मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.
जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.
पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?
याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.
माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.
(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)
>> तुम्हि स्वता:ला विचारुन
>> तुम्हि स्वता:ला विचारुन पहा - वाघ मांसाहारि का आहे ?

मी मांसाहारी पण नाहीये आणि वाघ पण नाहीये.
मला माहित असलेला अजुन एक मुद्दा सांगतो, पहा पटतोय का.
सर्व प्राण्यांची (यात मनुष्यप्राणी देखील आला) निसर्गानेच शाकाहारी/मांसाहारी अशी विभागणी केलेली आहे.
जे प्राणी मांसाहारी आहेत (वाघ, सिंह, मांजर, इ.) ते पाणी कसे पितात ते पहा. जिभेने चाटून पितात.
त्यांची जिभ खरबरीत असते त्यामूळे ते द्रवपदार्थ चाटून पिऊ शकतात.
जिभ अशी असण्याचे कारण मांस खाताना ते बारीक होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
तर जे प्राणी शाकाहारी आहेत ते पाणी कसे पितात (गाय, बैल, इ.) ओठाने पितात. आणि त्यांची जिभ खरबरीत नसते. माणूस पाणी कसा पितो ? जिभेने नक्कीच पित नाही, तसेच जिभ खरबरीत पण नाही.
एवढेच नाही तर शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांच्या रचनेत अन्नपचनाकरिता वेगळेपण असते. माणसाची अंतर्र्चना ही शाकाहारी प्राण्यांच्या रचनेप्रमाणे आहे असे ऐकले आहे.
यावरून माणूस मुळात शाकाहारी असावा अशी निसर्गाची योजना होती, माणसाने ती पाळली नाही.
यावरून माणूस मुळात शाकाहारी
यावरून माणूस मुळात शाकाहारी असावा अशी निसर्गाची योजना होती, माणसाने ती पाळली नाही....महे श ना पुर्णपणे अनुमोदन.
कारण तुम्ही पालेभाज्या कच्च्या खाऊ शकतात, कच्चे मांस नाही. जे प्राणी मांसाहारी आहेत, ते मांस कच्चे आणि फाडुन खातात, मांसाहारी व्यक्तींना तसे करतांना मी आजपर्यंत पाहिलेले नाही. जर तुम्ही खरोखर मांसाहारी असाल तर प्राण्यांप्रमाणे मांस कच्चे आणि फाडुन खायला पाहिजे
दिवे घ्या
प्रफुल्ल, जपानमधे लोक कच्चे
प्रफुल्ल, जपानमधे लोक कच्चे मासे खातात. त्यामुळे अगदीच नाही असे म्हणता येणार नाही.
पण एकंदरीत माणसाने मिळालेल्या बुद्धीचा नको इतका वापर केला आहे काही बाबतीत
समाजात काही लोक मांसाहारी
समाजात काही लोक मांसाहारी आहेत म्हनून तर शाकाहार्याना कंदमुळे मिळू शकतात.. सगळेच शाकाहारी झाले तर गवतही मिळायची मुश्किल होईल.. त्यामुळे मांसाहार्यांचे आभारच मानले पाहिजेत.
मी मांसाहारी पण नाहीये आणि
मी मांसाहारी पण नाहीये आणि वाघ पण नाहीये >>> ते मलाहि माहित आहे. पण वाघ मांसाहारी का आहे ह्याचा विचार करण्यासाठी मांसाहारी बनावे लागते किंवा वाघ बनावे लागते हे नवीनच एकतो आहे.
जर तुम्ही खरोखर मांसाहारी
जर तुम्ही खरोखर मांसाहारी असाल तर प्राण्यांप्रमाणे मांस कच्चे आणि फाडुन खायला पाहिजे >>> भारी कॉमेंट, म्हणजे जी लोकं मांस भाजुन-शिजवुन खातात ते 'खोटे' मांसाहारी आहेत तर...
वाघ मांसाहारी का आहे त्याची
वाघ मांसाहारी का आहे त्याची कारणे मी वरील लेखात दिलेली आहेत. निसर्गाने त्याला मांसाहारी बनविले आहे. तो स्वतः काही करू शकत नाही. कठीण प्रसंगी गवत खाऊ शकत नाही.
निसर्गाने त्याला मांसाहारी
निसर्गाने त्याला मांसाहारी बनविले आहे >>> चला हे तर मान्य आहे की निसर्ग काहि जणांना शाकाहारी आणी काही जणांना मांसाहारी बनवतो. मग कशाला शाकाहारी आणी मांसाहारी यावर वाद घालायचा ?
>> कोंबड्यांवर संशोधन करून
>> कोंबड्यांवर संशोधन करून त्यांचा ब्रीडिंग काळ कमी करण्यात आला आहे.
हे संशोधन भाज्या/फळांवरही होतं. आपण खात असलेली एकही फळ/भाजी मूळ नैसर्गिक स्वरूपातली नाही. हल्लीच्या काळात रसायनांचा अतिरिक्त वापर भाज्या/फळांवरही होतोच.
लेखिकेनी शेवटच्या प्रतिक्रियेत लेखाचाच एक भाग परत देउन सगळ्या शंकांना बगल दिलेली आवडली (लक्षात ठेवायला पाहिजे
)
>> जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.
ह्म्म, आता कळलं, आपलाच आहार कसा चांगलाय आणि दुसर्याचा कसा हीन आहे एवढं सांगितलं चालतं, पण दुसर्याला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे...
>> जे प्राणी मांसाहारी आहेत ते हिंस्त्र आणि क्रूर असतात (उदा. वाघ, सिंह) व जे शाकाहारी आहेत ते शांत स्वभावाचे असतात
food chain म्हणजे काय हे सांगायला नको. herbivorous प्राणी गवत/पाला खातात, जो इकडे तिकडे धावत नाही आणि खाणारर्यांचा विरोधही करत नाही (हो न?), त्यासाठी त्यांना हिंस्त्र आणि क्रूर असण्याची काय गरज? मांसाहार केल्यामुळे वाघ, सिंह हिंस्त्र होत नाहीत तर पोटाचा खळगा भरायला ते मांसावर अवलंबून असल्याने त्यांना तसं व्हाव लागत. आता त्यांनी गवत खाल्ल असतं तर ते वाघ, सिंह झालेच नसते
मिश्राहारी प्राणी माहिती नसावेत असं वाटतय, म्हणून ही छोटीशी यादी,
Various mammals are omnivorous by nature, such as pigs, badgers, bears, coatis, hedgehogs, opossums, skunks, sloths, squirrels,[6] raccoons, chipmunks,[7] mice[8] and rats.[9] Also some primates are omnivorous including humans and chimpanzees.[10][11] Various birds are omnivorous, whose diet varies from berries and nectar to insects, worms, fish, and small rodents; examples include cassowarys, chickens, crows and related corvids, keas, rallidae, and rheas. In addition, some lizards, turtles, fish, such as piranhas, and invertebrates are also omnivorous.
जर मांसाहार इतका वाईट तर मानवाच्या उगमापासून युरोपात सगळे मांसाहार (अगदी रोज २ वेळा) करतात तरी त्यांच्या स्वभावावर किंवा समाजावर वाईट परिणाम कसा झालेला नाही?
तुम्हाला जे आवडातं ते खा, इतरांना ते पटवून द्यायची काय गरज? त्यातून जन्मापासून गाव न सोडलेल्या एखाद्याचे असे विचार असले तर वेगळी गोष्ट आहे पण जगभरातील इतक्या सार्या देशातील लोकांना भेटूनही असेच विचार? कमाल आहे...
जर तुम्ही खरोखर मांसाहारी
जर तुम्ही खरोखर मांसाहारी असाल तर प्राण्यांप्रमाणे मांस कच्चे आणि फाडुन खायला पाहिजे
लई भारी. मग शाकाहारी असनार्यानी कच्चे गवत खायचे का?
वाघ सिंह क्रूर असतात.. अजिबात पटत नाही, माणसाइताका क्रूर कुणी नाही.
मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. हेही न पटणारे आहे. मांसाहारी लोक शाकाहार्याना फारसे सांगत नाहीत. शाकाहारी लोकच वाघ सिंह क्रूर कसे, त्याअंच्या आतड्याची लांबी...इ इ नेहमीच्या मुद्द्यांचे दळण घालतात.
>>> माणसाइताका क्रूर कुणी
>>> माणसाइताका क्रूर कुणी नाही.
अगदी बरोबर. माणूस प्राण्यांना खाण्याकरता मारताना कशा क्रूर पध्दतीने मारतो याची काही उदाहरणे मी आधीच्या प्रतिसादात दिलेली आहेत. त्यावरून हेच सिध्द होते.
अहो मस्तुरे साहेब मग काय
पुन्हा एकदा : भारतात ८५ %
पुन्हा एकदा : भारतात ८५ % (कदाचित जास्तच) लोक मिश्राहारी आहेत. गंमत अशी झालेली आहे की आत्तापर्यंत ज्यांच्याकडे विद्या आणि त्या अनुषंगाने येणारी भाषिक कौशल्ये परंपरागतरीत्या होती त्यांनी साहजिकच त्यांचेच अनुभव,मते नियम, सवयी इत्यादींना लेखनातून प्रकटन दिले. सर्वसामान्यांचे राहाणीमान,आहारविहारादि सवयी हे सर्व (मध्ययुगीन)साहित्यात परावर्तित झालेले नाही.त्यामुळे मिश्राहार अपवादात्मक रीत्या केला जातो किंवा वाईट/हलक्या दर्जाचा असतो,ते पाप असते असे (गैर)समज भारतीय जनमानसात शिरून बसले आहेत जे अर्थातच चुकीचे आहेत.जगभरातले सर्वश्रेष्ठ कवी,साहित्यिक,संशोधक,प्रज्ञावंत,तत्त्ववेत्ते,धर्मसंस्थापक,सुधारक,बंडखोर,नवयुगनिर्माते,नवजगशोधक,चित्रपट,नाटकादि माध्यमे अत्यंत तरल आणि संवेदनाशीलतेने हाताळणारे बहुतेक सर्व लोक हे ठळकपणे मिश्राहारी आहेत.
आहारामुळे माणूस सात्त्विक,तामसी वगैरे बनतो हे अर्थातच चुकीचे ठरते.
>>> अहो मस्तुरे साहेब मग काय
>>> अहो मस्तुरे साहेब मग काय थोडे गोंजारुन एक 'प्पपी' घेउन अन एक 'गालगुच्चा' देउन मग मारलं तर हिंस्त्रपणा कमी होतो किंवा होतच नाही असं म्हणायचे आहे का..?
स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता कसेही मारले तरी हिंस्त्रपणा कमी होत नाही हे मान्य. पण निदान मारताना त्यांचे कमी हाल करा ना. शॉक देऊन मारलं तर कमी वेदना होऊन काही सेकंदातच तो प्राणी मरेल. उकळत्या पाण्यात जिवंत प्राणी टाकून किंवा सावकाश गळा चिरून किंवा पाय तोडून तडफडत ठेवण्यापेक्षा ते कमी वेदनादायक नसेल का?
चु. प.
चु. प.
>>> जगभरातले सर्वश्रेष्ठ
>>> जगभरातले सर्वश्रेष्ठ कवी,साहित्यिक,संशोधक,प्रज्ञावंत,तत्त्ववेत्ते,धर्मसंस्थापक,सुधारक,बंडखोर,नवयुगनिर्माते,नवजगशोधक,चित्रपट,नाटकादि माध्यमे अत्यंत तरल आणि संवेदनाशीलतेने हाताळणारे बहुतेक सर्व लोक हे ठळकपणे मिश्राहारी आहेत. आहारामुळे माणूस सात्त्विक,तामसी वगैरे बनतो हे अर्थातच चुकीचे ठरते.
भारतातले संतपुरूष (संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, परमहंस योगानंद महाराज, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज इ.) हे शाकाहारी होते व ते अत्यंत सात्विक होते.
>>> अहो मस्तुरे साहेब मग
>>> अहो मस्तुरे साहेब मग काय..? थोडे गोंजारुन एक 'प्पपी' घेउन अन एक 'गालगुच्चा' देउन मग मारलं तर आपली काहीच हरकत नाही मांसाहारासाठी...?
माझा मांसाहाराला संपूर्ण विरोधच आहे. पण जे मांसाहार करणारच आहेत त्यांनी प्राण्यांना कमी वेदना द्याव्यात असे मला वाटते.
भगवान बुद्ध, येशू, प्रभू
भगवान बुद्ध, येशू, प्रभू रामचंद्र , शिवाजी महाराज हे मांसाहारी होते, तेही सात्विक होते... ( सीतेच्या आवडत्या मांसाहारी रेसिपीसाठी अन्न वै प्राणम ही मायबोलीवरची मालिका रेफर करावी.
)
आहो तो चुकुन पडला होता
आहो तो चुकुन पडला होता
......असो असो 
माझा मांसाहाराला संपूर्ण विरोधच आहे. >> छान छान आहे मग..!
ते तसे असले तरी माझा
ते तसे असले तरी माझा मांसाहाराला विरोधच राहील.
(No subject)
>>> उद्या वरण भात महागला की
>>> उद्या वरण भात महागला की मग बोंबलू नका म्हणजे झालं !
नाही बोंबलणार! "वरण भात" ही माझी आवडती डिश आहे.
फेसबुकवरचे हे पान बघा.
I luv Waran Bhaat Limbu Tup
(http://www.facebook.com/?ref=home#!/pages/I-luv-Waran-Bhaat-Limbu-Tup-3/...)
मला माहीत होतं, असं कुणीतरी
मला माहीत होतं, असं कुणीतरी लिहिणार, म्हणूनच मी ती कमेंट येडिट केली. लोकं मांसाहार करतात तर शाकाहारी लोकांची पोटं का दुखतात कळत नाही...
भारतातले संतपुरूष (संत
भारतातले संतपुरूष (संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, परमहंस योगानंद महाराज, शांतीसुधा, बि, मास्तुरे, प्रफुल्ला, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज इ.) हे शाकाहारी होते/आहेत व ते अत्यंत सात्विक होते/आहेत.
हे जर शाकाहारी नसते तर संत'ही नसते...बरोबर की नय...?
चातक उवाच- <<< अहो मस्तुरे
चातक उवाच- <<< अहो मस्तुरे साहेब मग काय थोडे गोंजारुन एक 'प्पपी' घेउन अन एक 'गालगुच्चा' देउन मग मारलं तर हिंस्त्रपणा कमी होतो किंवा होतच नाही असं म्हणायचे आहे का..? >>>
मला वरचा लेख आणि त्याला आलेल्या असंख्य प्रतिसादांमधला सगळ्यात आवडलेला प्रतिसाद.
बाकी चालु दे सगळ्यांचं.
@ महेश, वाघ सिंहांची जीभ
@ महेश, वाघ सिंहांची जीभ चरचरीत असते की नाही माहित नाही कारण वाघ-सिंहाच्या तोंडात हात घालायचा योग कधी आला नाही.
पण गाय, म्हैस यांची जीभ चरचरीत असते. माणसाची जीभ चरचरीत नसते. कुत्र्याची, मांजराची जीभही (गाय, म्हैस यांच्या जिभांसारखी) चरचरीत नसते. त्यामुळे जिभेच्या पोतावरून कोणी शाकाहारी की मांसाहारी हे ठरवणं अवघड आहे.
वघ, सिंह, कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी जरी लपलप करून पाणी किंवा द्रव पदार्थ पीत असले तरी गाय, घोडा, हत्ती, ससा हे शाकाहारी प्राणी काही माणसासारखे (भांड्याच्या कडेला तोंड लावून ते आत ओढणे) पाणी किंवा द्रव पदार्थ पिताना दिसत नाहीत. हत्ती सोंडेने शोषून घेतो तर घोडा, गाय, बैल, हे प्राणी थोड्याफार फरकाने जिभेचा वापर करत असावेत असे वाटते. (आठवुन पाहिलं पण काहीकेल्या चित्रं डोळ्यासमोर उभं रहात नाहीये.) त्यामुळे पाणी किंवा द्रवपदार्थ पिण्याच्या स्टाईलचा आणि शाकाहारी-मांसाहारी असण्याचा संबंध असेल असं वाटत नाही.
कच्चं मांस आणि शिजवलेलं अथवा प्रोसेस केलेलं मांस यावरूनही फारसं काही ठरवता येईल असंही वाटत नाही. कारण माणूस जेव्हा अति-अप्रगत होता (पाषाण युग वगैरे) आणि विस्तवाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत प्राणी मारून कच्चं मांसच भक्षण करायचा. त्यावेळी ते त्याला पचत होतं. पण पुढे जसजशा सवयी बदलत गेल्या आणि शिजवलेलं अन्न खायला सुरूवात केली तसतशी माणसाच्या सिस्टीम मध्येही फरक पडला असावा (इव्होल्यूशनचा परिणाम असावा) आणि माणूस प्रोसेस केलेलं म्हणजेच शिजवलेलं किंवा भाजलेलं मांस खायला लागला. त्याचा माणसाच्या शाकाहारी असण्याशी काहीही संबंध असेल असं वाटत नाही.
जिभेबाबत तुम्ही जे लिहिले आहे
जिभेबाबत तुम्ही जे लिहिले आहे ते अगदी अमान्य. कुत्रा आणि मांजराची जिभ ही खरबरीतच असते. तसेच गाय, बैल, इ. प्राण्यांची नसते. जे प्राणी शाकाहारी आहेत ते जिभेने द्रवपदार्थ पित नाहीत.
आगीचा शोध लागण्याच्या आधी मानव कच्चे मांस खात असणार हे बरोबर आहे. पण मानव त्या काळात आजुबाजुला असणार्या प्राण्यांचे पाहून अनुकरण करत असणार (निरिक्षण आणि त्यावरून निर्णय घेण्याची बुद्धी असल्याने)
महेश, तुम्ही चुकीचं बोलता
महेश, तुम्ही चुकीचं बोलता आहात. कुत्र्याची जीभ खरबरीत नसते, या उलट गाय्-बैलाची जीभ अगदी खरबरीत असते. कुत्र्याच्या तुलनेत तर नक्कीच जास्त. तुम्ही बहुतेक अनुभवलं नाहीए.
तुम्ही बहुतेक अनुभवलं नाहीए.
तुम्ही बहुतेक अनुभवलं नाहीए. >> मनिमाउ, आपले अनुभवाचे बोल
मनिमाऊ यांना १००% अनुमोदन. मी
मनिमाऊ यांना १००% अनुमोदन. मी तेच म्हणाले आहे.:-)
Pages