पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

रोज चंद्र उगवतो
रोजच मावळतो..
जुन्या त्याच आभाळासोबत रोज
नवीन नातं जागवतो...

कदाचित, पावसाळ्यात येणारा मातीचा गंध
हा निसर्गालाही खूप आवडतो..
म्हणूच आजकाल,
ढगांमध्ये पाउस केव्हाही दाटतो....

सुकि Proud

सूर्यतेज दाविते
प्रकाश आपुल्या जीवनाला
गुरुतेज घडविते
आपुल्याच अजाण बुध्दीला

नजर मिळता नजरेला
नजर लाजते नजरेला
तुला न कळले मला न कळले
प्रेम आपुले ह्रदयातले

समोर उभे राहिलेले अनुत्तरीत प्रश्न,
मला छळत राहतात..
तुला माहित असलेली त्यांची उत्तरं,
छळात अजुन भर टाकत जातात..

रुसव्यातले हा अबोला,
मज अस्वस्थ करून जातो,
उगाच मग मागल्या पावलातली,
अंतराची आठवण करूनी देतो..

स्वतःच्याही नकळत
तिने त्याच्यावर प्रेम केलं
त्याच तिच्यावरचं प्रेम
राखीपौर्णिमेला दिसलं Happy

चिमुरे Uhoh बिचारी ती.. पण असं क्वचितच घडतं.

इतकं का कोणी कोणावर,
प्रेम करत रहावं...
उगाच आसवांनाही मग,
विरहात स्वातंत्र्य मिळावं...

Pages