पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना, तुरीच्या दाण्याची वरण फळे करतात तशी फळे ही छान लागतात माझ्या सासरी (गुज्जु अस्ल्याने) थंडीत अशीच फळे करतात ..म्हणजे वरणा ऐवजी तूरीचे दाणे उकडून घ्यायचे. बघ करून मस्त लागते भरपूर कोथिंबीर आणि लसूण आहा हा ..:)

दिनेशदा धन्यवाद, पण इथे म्हणजे मायबोलीवर टाकलेत का? जुन्या, नव्या दोन्हीत शोधलं होतं पण नाही मिळालं. असो... नेटवर सलाड्स दिसली भरपूर पण टिपिकल गुजराथी पदधतीची भाजी हवी होती....पपई किसून घेऊन फोडणीला टाकून परतायची, हिरव्या मिरच्या, मिठ, साखर टाकायचं अशी साधीशी कृती कळली आहे, आता करून बघेन...काही विशेष वेगळं घालायचं असतं का असं वाटलं म्हणून इकडे विचारलं होतं, असो.

मला मोकळा बासमती राईस करायची पद्धत हवी आहे. कुकर मध्ये मी छान मोकळा भात करू शकते . माझं ते प्रमाण बसलं आहे पण हा जास्त प्रमाणात करायचा आहे आणि तेवढा मोठा कुकर नाहीये. मी पूर्वी गरज पडली tenva कुकर २-४ वेळा करून वेळ मारून नेली पण हे आता शिकायलाच हवंय असं दिसतंय.
शक्यतो हि पद्धत scalable असावी म्हणजे कितीही जास्त भात करायचा असेल तरी वापरता यावी अशी असावी.(व्यावसायिक दृष्टीने )

मी पाणी काढून टाकून करायचं प्रयत्न केला पण प्रयोग फसला आणि बासमती राइस खातो आहोत असा नाही वाटला कारण त्याचा बराचसा सुगंध पाण्यात निघून गेला. असा मला तरी वाटलं.
जुन्या हितगुजवर भाताची कृती आहे पण ती वाचता नाही येत आहे म्हणून हा प्रश्न पुन्हा एकदा केला खरा तर.
प्लीज मला हि कृती सुचवाल का कोणीतरी. मी छोट्या प्रमाणात कृती करून पाहीन आणि मग मोठ्या प्रमाणात करायला लागिन.

धन्स!

ओके मिनोती, धन्यवाद. सलाडपण करून पाहीन....छान वाटतय हे..नाहीतरी अख्या पपईची भाजी करून नाही आवडली/खपली तर...उद्याच आता पपई मोहीम.

मला डिंकाचे लाडू करायचे आहेत दर वर्षी करतो.. पण नवीन प्रकार कसे करतात कोणी walnuts वगैरे टाकून केले आहेत का ते बघावे म्हणून विचारले..

प्रित, अक्रोड घालून पण डिंकाचे लाडू छान होतात. मी अक्रोडाचे लहान लहान तुकडे करून किंवा जाडसर कुटून लाडूत घालते.

मला संत्रा भाताची रेसिपी सापडत नाहीये. माबोवर वाचल्याचं आठवतंय. कुणाला सापडली तर प्लीज लिंक द्या.

थॅन्क्स मिनोती Happy
अगं मी काही दिवसांपूर्वी तिथेच बघितली होती रेसिपी. पण विसरून गेले. आता उद्याच करेन Happy

मधे हैदराबाद ला पॅराडाईज हॉटेलची व्हेज बिर्याणी खाल्ली होती. अप्रतिम होती..कोणाला त्याची रेसिपी माहिती आहे का?

मखनाच्या रेसिपीज आहेत इथे. खाली सर्च मध्ये मखना टाकुन सर्च करा.

मी पाव-अर्धा चमचा तुपावर मखना चांगले कुरकुरीत होईपर्यंत परतते आणि देते मुलीला. ती पॉपकॉर्नसारखे खाते. लहान मुलांना द्यायला पदार्थातुन देण्यापेक्षा असे द्या. आरोग्याला चांगलेच असावेत. मखना म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या.

काळे मीठ कोणत्या रंगाचे असते? त्याची चव नेहमीच्या मीठापेक्षा वेगळी असते का?
आम्हाला दुकानदाराने सफेद मीठाची पावडर दिलीय, काळे मीठ म्हणून. त्याची चव नेहमीच्या मीठासारखी आहे.

अमि, काळ्या मिठाचे खडे असतील तर ते काळ्या रंगाचे आणि पावडर असेल तर ती गुलाबी रंगाची असते. त्याची चव नक्किच वेगळी असते (पण ती त्यातल्या खनिजांमूळे, त्यातले सोडियमचे प्रमाण तेवढेच असते.) चिमूटभर तोंडात टाकली तरी तोंडाला चव येते. (चाट मसाला मधे असते ते.)
हे मीठ खाणीतून काढतात, आणि समुद्रकिनार्‍यापासून दूर असणार्‍या काही भागात, पुर्वी हेच मीठ वापरत असत.
यालाचा रॉक सॉल्ट, सैंधव, शेदेलोण अशी नावे आहेत.

काळे मीठाची पावडर गुलाबी असते आणि खडे काळ्या हिंगासारखे काळे. चव मीठ आणि हिंगाची मिक्स अशी वेगळीच असते. एक विशिष्ट वास असतो. पादेलोण म्हणतात त्याला. Happy

मी एका उत्तर भारतीय मैत्रिणीला याबद्द्ल विचारले तेव्हा तिने काळ्या मीठाबद्दल हेच सांगितले. तिने पुढे सांगितले की, दुकानदाराने आम्हाला जे मीठ दिले ते सैंधा नमक आहे जे उपवासासाठीच्या खाद्यपदार्थात वापरतात.

मला बेक्ड ब्रेड रोल करायचे आहेत. मी याआधी तळून केले असल्यामुळे सगळी पाकृ माहिती आहे (ओव्हन बेक करताना पाकृ मधे काही बदल करावे लागत नाहीत असं वाटतंय.), पण ओव्हन बेक करताना ओव्हन सेटिंग काय ठेवायचं ते माहित नाही. प्रिहीटिंगचं टेंपरेचर, बेकिंगचा वेळ वगैरे सगळी माहिती हवी आहे. आणि बेक करताना तूप/अनसॉल्टेड बटर/अमूल बटर यातलं काय लावू रोल्सना? किंवा काहीच नाही लावलं तर खमंग होतील का?

साक्षी१, मखाण्यांबद्दलची माहिती http://www.maayboli.com/node/7044?page=3 ह्या धाग्यावर वाचायला मिळेल. इथेच मुलांसाठी खाऊचे बरेच पर्याय दिसतील.
http://www.maayboli.com/node/14636 इथे प्राचीने मटर आणि मखाणे घालून कुर्मा लिहिला आहे.

बटाट्याचं आवरण असलेल्या मटारच्या कचोर्‍यांची कृती कोणाला माहित आहे का ? अशा कचोर्‍या उपासाला चालतात का ?

काल खारी बुंदीचे पाकीट मिळाले नाही म्हणून घरीच एक वाटी बेसन घेउन त्यात तिखट मीठ घालून बुंदी पाडली. मोठ्या झार्‍यातून पाडली व छोट्या झार्‍याने मीडीअम गरम तेलात तळली. गार झाल्यास मग एअर टाइट डब्यात ठेवली. अजूनही कुरकुरीत आहे. पाणीपुरी बरोबर मस्त कामाला आली. इथे तेलुगु सुपर मार्केटात पाणीपुरी मसालाच ठेवत नाहीत. एक वाटी पिठात चार घाणे झाले. जस्ट राइट. जस्ट इनफ.

malvani kombdi vade chi recipe havi aahe apecially vade chi, andaje 50 mansansathi vade karayache aahet , krupaya kilo chya pramant sanga , ani 50 mansansathi che hi praman sanga

मी गोव्याला गेले असताना मला फणसाचे काप खायला मिळाले होते, अप्रतिम होते, कुणाला रेसिपि माहित असल्यास क्रुपया द्या प्लीज

मला कोकणात करतात तसे मोहोरी चढ्वुन करतात त्या खारातल्या मिरच्यानची क्रुति हवी आहे. कोणी सान्गेल का.

Pages