Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाजो बर्याच आयडिया दिल्यास:)
लाजो बर्याच आयडिया दिल्यास:) थॅन्क्स!!
करुन पाहीन यातलेच काहीतरी.
मी मागे मलाई का साग लिहीली
मी मागे मलाई का साग लिहीली होती. (वहिदा रेहमानची आवडती डिश )
व्हेज पड थाई नूडल्स ची रेसीपी
व्हेज पड थाई नूडल्स ची रेसीपी माहीत आहे का? फीश सॉस च्या एवजी काय वापरता येईल?
मला टॉमटो सॉस बनवायचा आहे
मला टॉमटो सॉस बनवायचा आहे ,बरेच दिवस टिकेल असा , कुणाला त्याची रेसिपि माहितिये का?
डिन्काचे लाडु फ्रीजर मधे किति
डिन्काचे लाडु फ्रीजर मधे किति दिवस टिकतात? डिन्काचे लाडु सगले सामान भाजुन केले आहे अनि पीथिसाखर घातलि आहे. तसेच मेथिचे लाडु किति दिवस फ्रीजर मधे टिकतात. ४ महिन्यचे लाडु आहेत.
कोणी मला दाभेली चा मसाला घरी
कोणी मला दाभेली चा मसाला घरी कसा बनवायचा ते सांगु शकेल काय?
कोणी मला रवा-बेसन लाडू(पाक
कोणी मला रवा-बेसन लाडू(पाक करुन नको) कसे करायचे सागेल का?
नमस्कार मंडळी, मला इथे
नमस्कार मंडळी, मला इथे छोल्यांची कॄती मिळू शकेल का? मला टिपीकल पंजाबी छोले नको आहेत. खुप उग्र मसाला नसणारे, आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात असतात तसे...खुप दिवस शोधतेय्...दिनेश दा मदत करु शकाल का?
जोगळेकर खालिल लिंक मधे दिनेश
जोगळेकर खालिल लिंक मधे दिनेश चि पोश्ट बघा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/133646.html?1187457761
मेथीचे डिंकाचे लाडू फ्रीजरमधे
मेथीचे डिंकाचे लाडू फ्रीजरमधे चार महिने सहज टिकतील, पण ते ठिसूळ होत जातील.
श्रद्धा, मी जैसलमेरी चणे लिहिले आहेत. ते छान होतात.
तामिळ लोक, छोले उकडून, फक्त मिरची, हिंग, हळदीच्या फोडणीवर परततात. मग वरुन ओले खोबरे घालतात. त्यांच्या नवरात्रीत प्रसाद म्हणून हा प्रकार करतात. खूप छान लागतो. ( हा प्रकार मला खोबरेल तेलात केलेला आवडतो. यात तेल नावालाच असते. )
दाबेली मसाला, टिकाऊ टोमेटो
दाबेली मसाला, टिकाऊ टोमेटो सॉस यांच्या कृति आहेत इथे. फ़िश सॉसच्या जागी सोया सॉस, राईचे तेल, आणि थोडे व्हीनीगर एकत्र करुन वापरता येईल.
धन्यवाद प्राजक्ता पण मला
धन्यवाद प्राजक्ता पण मला पाककरुन लाडू करायचे नाहीत पाक न करता रवा-बेसन लाडू करता येतात का कोणाला?
चकलीची भाजणी नसल्यास चकल्या
चकलीची भाजणी नसल्यास चकल्या करण्यासाठी आजून कशाचा उपयोग करता येइल का?मला इथे कुठल्याही देसी दुकानात भाजणी दिसली नाही कधी........
तोशवी, जुन्या हितगुजवर
तोशवी, जुन्या हितगुजवर बिनभाजणीच्या चकल्यांच्या बर्याच कृती आहेत.
पाच मिनिटात, पाक न करता
पाच मिनिटात, पाक न करता रवा-बेसन लाडू ची रेसिपी टाकते.
आम्ही घरी एक किलो बेसन आणि
आम्ही घरी एक किलो बेसन आणि पाव किलो बारीक रवा अस प्रमाण घेतो.
बेसन खरपूस भाजून घ्यायच. भाजताना हळूहळू थोड तूप सोडायच.
अख्ख एक किलो बेसन एकदम न भाजता थोड थोड करत भाजून घेणे.(नहितर दुसर्या दिवशी ऑफिस मधे कीबोर्ड बडवण्यासाठी कोणाचीतरी मदत घ्यावी लागेल)
झीरो नंबर चा रवा मिळतो म्हणे. तो बारीक रव्यापेक्शा सुद्धा बारीक असतो (इती सासुबाई).
नसेल तर बारीक रवा मिक्सि मधे अजून बारीक करायचा आणि थोड तूप घालून मस्त खरपूस भाजायचा.
बेसन साधारण कोमट झाल्यावर भाजलेला रवा त्यात मिक्स करायचा.
अर्धा किलो पिठी साखर(अतिशय बारिक हवी), कोमट बेसन-रव्यात नीट मिक्स करा. अजून गोड हव असल्यास साखर वाढवा.
चुकुनही गरम बेसनात साखर घालयची नाही. (मी हा प्रताप केलेला आहे. सुज्ञास पुढचे सांगायची गरज नहि).
आता आपले नेहमीचे चव वाढवणारे साथिदार "वेलची-जायफळ पावडर, चारोळ्या, काजू , घाला.
आता त्यात तूप (गरजेपुर्त) घालुन लाडू वळावेत.
साज .. छान आहे रेसेपी... करुन
साज .. छान आहे रेसेपी... करुन बघेन..
मला पाक घालुन लाडू करायचे म्हणजे टेंशन येते
धन्यवाद दिनेशदा...शोधते
धन्यवाद दिनेशदा...शोधते जैसलमेरी चणे ईथे
तोशवी,ज्वारी किंवा गव्हाच्या
तोशवी,ज्वारी किंवा गव्हाच्या पिठाच्या चकल्या करु शकते.........:स्मित:
साज, don't mind, पण हे तर
साज, don't mind, पण हे तर more or less बेसनाचेच लाडू आहेत, १ किलो बेसनास पाव किलो रवा म्हणजे काहीच नाही.. 'रवा-बेसन' लाडवात ideally हे प्रमाण उलट हवं ना?
अर्थात त्याला मग पाक लागेलच. पाकाशिवाय नाही होणार. पण पाक करणं या लाडवासाठी तर नक्कीच अवघड नाही. एकतारी पाक तर असतो. दिनेश यांनी फार सुटसुटीत कृती दिल्यात पाकाच्या याच ग्रूपमध्ये.
धन्यवाद प्राजक्ता पण मला
धन्यवाद प्राजक्ता पण मला पाककरुन लाडू करायचे नाहीत पाक न करता रवा-बेसन लाडू करता येतात का कोणाला?>>>
जोगळेकर मी दिलेल्या लिंक मधे दिनेशदांनी खालिल क्रुति लिहलेली आहे.सोयिसाठी इथे चिकटवतेय..
रवा बेसनाचे लाडु करताना पाक करायची भिती वाटत असेल तर. दोन्ही पिठे भाजुन झाली कि त्यात दिलेल्या प्रमाणात (थोडे थंड करुन) पिठीसाखर मिसळावी. मग ते मिश्रण घट्ट झाकणाच्या डब्यात घालुन कुकरमधे दहा मिनिटे वाफ़वावे. मग दुधाचा हबका मारुन लाडु वळावेत. हेहि लाडु चवीला छान लागतात.
तुमच बरोबर आहे पीएसजी. रव्याच
तुमच बरोबर आहे पीएसजी.
रव्याच प्रमाण कमी आहे. पण मी रव्या-बेसनावर जास्त प्रयोग केले नाहित अजून.रव्याच प्रमाण वाढवून ट्राय करेन.
रव्याचं प्रमाण वाढवलं तर तो
रव्याचं प्रमाण वाढवलं तर तो कच्चा नाही का राहणार? पाकाशिवाय रवा फुलणं अवघड आहे असं मला वाटतं. रव्याच्या लाडवांसाठी पाक हवाच..
मी नुसत्या रव्याचे लाडू
मी नुसत्या रव्याचे लाडू सुद्धा बिन पाकाचे करते (पाकातले पण करते) .रवा भरपूर भाजायचा.
तो गरम असतानाच त्यात पिठी साखर आणि तूप घालायच आणि पटापट लाडू वळायचे.
मस्त लागतात. मुख्य म्हणजे हे लाडू बरेच दिवस टिकतात.
अशाच पद्धतीने गव्हाच्या पीठाचे सुद्धा लाडू करायचे.अंदाजे तूप घालायच.
साज धन्यवाद मी आजच करुन बघेन.
साज धन्यवाद मी आजच करुन बघेन.
सोयाबीन च्या गोळ्याची भाजी /
सोयाबीन च्या गोळ्याची भाजी / बिर्यानी किंवा इतर काहीही कसे करायचे?
ते सोया चंक्स मीठ घातलेल्या
ते सोया चंक्स मीठ घातलेल्या कोमट पाण्यात २० मिनिटे भिजवायचे. मग हलक्या हाताने पिळून घ्यायचे. मग कुठल्याही मसालेदार भाजीत भर म्हणून घालायचे. साधारण वांग्याची वगैरे आपण रसभाजी करतो, त्या प्रकारे करता येते. या चंक्स ना स्वतःची अशी चव नसते. जो मसाला घालू त्याचा स्वाद लागतो त्याला.
sweet and sour प्राँन्स कसे
sweet and sour प्राँन्स कसे करतात ? जुन्या हितगुजवर क्रुती नाही मिळाली.
मलाही दाभेली मसाल्याची क्रुती
मलाही दाभेली मसाल्याची क्रुती जुन्या हितगुजवर नाही मिळाली
कोणी सांगु शकेल का?
http://food-forthought.blogsp
http://food-forthought.blogspot.com/2006/02/maximum-city-maximum-taste-d...
इथे आहे दाबेली मसाल्याची कृती. तिच्या सगळ्या रेसिपीज सोप्या आणि मस्त असतात तेव्हा डोळे झाकुन करायला हरकत नाही.
Pages