पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, कोबी बारीक चिरली असेल तर त्यात पिठे, ति.मी.ओवा इ.इ. मिसळून रोल करून ते वाफवून तुकडे करून फोडणी दे. (मुठिया:) )असच कोणत्याही भाजीचं होतं.. Happy

कोबीचे भानोले, कोबीचा डोलमा, कोबीची कोशिंबीर, कोबीचे पराठे, कोबीची रबडी करता येते.
स्प्रिंग रोल, फ्राईड राईस, मांचुरियन मधे वापरता येते.
ऊडिद डाळ, चणा डाळ, हिरवे वाटाणे, तूर डाळ घालून भाज्या करता येतात.

अ‍ॅना, दिनेशदा खुप खुप धन्यवाद. भरपुर आयडियाज मिळाल्यात.. आत हे प्रकार करुन झाले की येते परत विचारायला... Wink

माझ्याकडे इडली रवा आहे..त्याचा रवा डोसा करता येइल का.. आणि कसा ?

कोबीची पंजाबी भाजी (मीरे पावडर, कांदा,लसुन . आल, कलौंजी ई घालुन) भाजी मस्त लागते. कोबी बारीक चिरला असेल तर सरळ पराठे पण करता येतील.आणि कोबीचे पराठे freeze पण करता येतात .

किट्टू, इडलीच्या रव्याचा रवा डोसा नाही जमणार. ( तो रवा तांदळाचा असतो) रवा डोसा करायला गव्हाचा रवा लागतो, त्याची कृति आहे इथे. त्या रव्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्याच चांगल्या होतात. त्यात मुगाच्या डाळीचा भरडा घालून उपमा करायचा. मग त्याचे लाडू करुन ते परत वाफ़वायचे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर हा प्रकार छान लागतो.

युस मधे कोणत्या ब्रँडचे गव्हाचे पीठ चांगले आहे?
मधे १-२ ब्रँड वापरून बघितले. पण प्रत्येक वेळी फुलके, घडीची पोळी, साधी पोळी कडक. Sad

मी सध्या रेड मिल ब्रँड किंवा किंग आर्थर ब्रँडचे होल व्हीट फ्लोर वापरते. एकदम मस्त. चपात्या थोड्या चॉकलेटी रंगावर असतात पण चविला अगदी देशातल्या सारख्या. वापरुन पहा Happy

कोणत्याही अमेरिकन ग्रोसरी स्टोर मधे अगदी वॉलमार्ट्मधे पण मिळायला हरकत नाही. मी ट्र्डर जोज्/सेफवे/रेलिज इथुन आणाते.

धन्यवाद! तसे 'सुजाता' वर चान्गले चाललेय .. << पण चविला अगदी देशातल्या सारख्या >> वाचुन रहावले नाही. पुढल्या वेळी आणुन बघते.

थोडा थोडा फ्लॉवर आणि ब्रोकोली उरले आहे. दोन्ही मिळुन भाजी करायची आहे तर त्यात काय मसाला आणि वाटल्यास इतर भाज्या घालुन छान भाजी करता येइल?

फ्लॉवर, ब्रोकोली, बटाटा, टोमॅटो, कांदे अगदी मोठे तुकडे करायचे. नेहेमी सारखा रस्सा करायचा गोड मसाला/कांदा लसूण मसाला घालून. अप्रतीम लागतो.

पनु, बाजारात पिझ्झा बेस तयार मिळतात. त्यावर आधी बटर आणि मग टोमॅटो सॉस लावायचा, वर आपल्याला हवे ते टॉपीन्ग पसरायचे ( कांदा, मिरची, कॉर्न, अननस, मश्रुम, बेसिल वगैरे ) मग त्यावर मोझरेला किंवा हवे ते चीज किसून टाकायचे.
एक सपाट तवा वा पॅन घेउन त्यावर तो ठेवायचा, अगदी मंद गॅसवर ठेवायचा, वरुन झाकण ठेवायचे. दहा मिनिटात बेस कुरकुरीत भाजला जातो व चीज वितळते/ पण अवन किंवा ग्रील शिवाय वरुन सोनेरी रंग येत नाही.

मला कुणी सांगाल का - सुरती वाल,कडवे वाल,आणि पावटे यात फरक काय?

आणि ते ओळखायचे कसे?

त्यांची इंग्रजीतील नावे माहीत असतील ,तर खुपच छान! म्हणजे दुकानात शोधताना त्रास कमी....

कडवे वाल आकाराने तपकिरी रंगाचे असतात, पण या रंगाच्या दोन तीन छटा असतात. त्या मानाने पावटे किंवा गोडे वाल थोडे मोठे असतात, व रंग पांढरा असतो.
सुरती पापडी असते ना ? या शेंगा चंद्रकोरीच्या आकाराच्या असतात. उंधियु साठी लागतात. या भाजीसाठी दाणा भरलेल्या व कोवळ्या अश्या दोन्ही घेतात. दाणेवाल्या सोलून तर कोवळ्या अख्ख्या घेतात.

हाय,

फराळी मिसळ करताना, शेंगदाण्याच्या उसळी ऐवजी काय घालता येइल?
नुसती रसाची बटाटा भाजी विथ थोडस दाण्याच कुट चालेल का?
शेंगदाणे जास्त खल्ले की पित्त होत Sad

धन्यवाद दिनेश.
लाजो, उसळी मधे ओले नारळ व मिरची मिक्सर मधुन काढून घालु शकतेस. मी बरेचदा तसेच करते.

खुप सफरचंद आहेत घरी. weekend partyसाठी त्याचा काही गोड पदार्थ करता येईल का?
आधी लिहीले असेल तर लिंक द्या.
धन्यवाद.

अ‍ॅपल पाय, अ‍ॅपल strudel, अ‍ॅपल केक, शिर्‍यात केळ्यासारखे सफरचंद घालता येतील.

Pages