Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 18, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » लाडू » रवा, रवा - बेसन लाडू » Archive through August 18, 2007 « Previous Next »

Lalitas
Wednesday, October 15, 2003 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ कप बारीक रवा
पाऊण कप खोबरें (पांढरा भाग घ्यावा)
पाऊण कप साखर व अर्ध्या कपापेक्षा थोडं कमी पाणी
पाव कप तूप
अर्धा चहाचा चमचा वेलदोड्याची पूड
केशर आवडत असल्यास थोडेसें दुधांत भिजवून घ्यावे
बदामाचे काप, किसमीस, पिस्त्याचे काप आवडीप्रमाणे

तूप कडक तापवून घेऊन त्यांत रवा गुलाबी परतून घ्यावा. नंतर त्यांत खोबरें घालून खोबर्‍याचा खमंग वास येईपर्यंत परतावें.
एका मोठ्या भांड्यांत साखर व पाणी एकत्र करून कच्चा पाक तयार करावा.
त्यांत वेलदोड्याची पूड, केशर, किसमीस, बदामाचे व पिस्त्याचे काप आणि रवा - खोबरें घालून भांडें चुलीवरून खाली उतरून नीट ढवळावे.
मिश्रण गार झाल्यावर लाडू वळावे.
मिश्रण जर कोरडें झाले असेल तर लाडू वळता येत नाहीत. अशावेळी थोडें दूध मिसळावे, लाडू वळता येतील. पण दूध घातलेले लाडू फार टिकत नाहीत, फ्रिज़मधे ठेवावे.


Mali
Wednesday, October 22, 2003 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rava ladoo:
mazya aai chi kruti:
sahitya
5 vatya rava
3 vatya sakhar
1 naral(ola)
keshar,velachi ,manuka
Kruti:
rava thodya tupavar khamang bhaja.dusarya bhandyat sakhar+dudh/pani hyancha ek tari pak kara.Pak zalyavar tyat bhajalela rava taka.Gas band kara.keshar velachi takun dhavala.Ladoo valata yetil etake gar zalyavar (komat) ladoo valayala ghya.
He vatate titake kathin nahi .Mi aadhi karayala jat navhate pan ekada karun baghitalyavar soppe vatale.Kam zatpat aahe.

Tip:komat zalyavar jar mix kadak vatale tar thode dudh ghalun mala aani vala.
Maze ladoo zale aani aaichya todis tod.


Saee
Wednesday, October 22, 2003 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं पण नारळ कधी घालायचा? तु म्हणतेयस तर धाडस करुन बघतेच, कारण पाकाची फार भीती असल्यामुळे मी नेहमी बेसनाचे लाडूच करते!! कुणी विचारलंच तर माना वेळावुन सांगते आमच्याकडे रव्याचे लाडू ना कुणाला आवडतच नाहीत.....

Mrudulahg
Thursday, October 23, 2003 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rava ladoo (dusari paddhat)

1 cup rava
3/4 cup sakhar
1/3 cup sukhe khobare
1/4 cup dudh
2 tsp sajuk tup
bedane, velachi.

rava changala gulabi rang yei paryant tupat bhaja. tyavar thode se dhudh shimpa mhanaje rava changala phulato.
Tyat khobare ghalun ajun thode bhaja.
2-3 min ni sakhar ani velachi ghala.
4/5 min ni garam dudh ghala. Jar dudh jast zale asel tar mishran ghatta hoistovar shijava.
thand zalya var ladoo vala. Valatana tyala varun bedana lava mhanaje chaan disel.

he ladu shakyato bighadat nahit.


Mali
Thursday, October 23, 2003 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Saee,

naral bhajun ghyayacha.Rava bhajun hot aala(kamang suvas yayala lagala)ki tyatach khobare takayache.aani paratavayache.changale badami rangavar bhajun ghyayache ravyabarobarach.
Thodya divasanni jo naralala khavat pana yeto to Khobare bhajalyane mhane yet nahi.

Arch
Thursday, October 23, 2003 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधूच्या recipe ने शंकरपाळ्या छान होतात. इथली साखर जरा कमी गोड असल्यामुळे मी प्रमाणापेक्षा थोडी जास्त साखर घातली.

अगदी सोप्पे रव्याचे लाडू:

१ कप रवा
1/4 कप तूप
1/2 कप carnation milk powder
१ ते सव्वा कप साखर (तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे ठरवा)
1/4 कप ओल्या नारळाचा चव
बेदाणे
बदाम
केशर
वेलची पावडर
दूध

मंद आचेवर तुपात रवा छान खमंग भाजून घ्या. रवा भाजत आला की त्यात खोबर, बदामाचे काप घालून परत नीट भाजा.

आता रवा stove वरून काढून घ्या आणि गरम असतानाच त्यात साखर, milk powder , केशर, वेलची पूड आणि बेदाणे नीट मिसळून घ्या. मिश्रण अगदी एकजीव करा. नंतर त्याच्यात लाडू वळण्याची consistency येईल इतकच दूध शिंपडा जास्त नको. हळू हळू दूध घालत mix करत राहिल, तर दूध जास्त होत नाही. मग लाडू वळा. जास्त दिवस ठेवायचे असले तर fridge मध्ये ठेवा. 2-4 दिवसात संपवणार असाल तर बाहेरपण छान रहातात. fridge मध्ये ठेवलेत तर खाण्याच्याआधी room temperature ला आणा किंवा १० second microwave मध्ये ठेवा.

रवा भाजेपर्यंतच stove च काम.

फ़ार छान लागतात. भरपूर केशर बदाम घातले की दिसतातपण छन


Parijat
Thursday, November 11, 2004 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lalita,
Mala tumhee dilelya kruti pramane ladu karayche ahet pan kachha paak kasa karaycha ?


Lalitas
Monday, November 15, 2004 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बर्‍याच दिवसांनी ह्या बीबीवर आले म्हणुन तुमच्या लाडवांसंबन्धीच्या प्रश्नांना वेळेवर उत्तर देता अलं नाही...

पारिजात, कच्चा पाक म्हणजे... पाणी व साखर दिलेल्या प्रमाणात घेऊन उकळत ठेवावे... एखाद्या मिनिटानंतर चमच्यावर पाक घेऊन बोटाच्या चिमटीत त्याचा चिकटपणा आजमावावा, पाकातला पाणचटपणा जाऊन बोटांना चिकतपणा जाणवू लागला की कच्चा पाक तयर झाला... शिवाय अरूणिमा ने कलं तसं 'साखरेचा पाक' मधील दिनेशच्या सूचना
} follow

Charu_ag
Wednesday, March 23, 2005 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,
रवा बेसन च्या लाडवांमध्ये दोन्हीचे प्रमाण महत्वाचे आहे.

मी इथे क्रुती देत आहे,
१) अडीच वाटी रवा
२) दिड वाटी बेसन
३) साधारन एक वाटी तुप
५) दोन वाट्या साखर

मंद आचेवर रवा आणि नंतर त्यातच बेसन तुपावर खमन्ग भाजुन घेणे. साखरेचा एकतारी पाक करुन त्यात हे मिश्रन थंड झाल्यनंतर घालणे. थोडा वेळ झाकुन ठेवणे. या पाकात रवा चंगला फुगतो. साधारन दिडपत फुगल्यानंतर लाडु वळायला हरकत नाही. किसलेले खोबरे आणि आवडत असतील तर इतर dry friuts घालुन लाडु वळणे.


Archananj
Wednesday, March 23, 2005 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rava-besan ladwat thode ricotta partun ghalawe. sundar hotat.

Deemdu
Tuesday, October 26, 2004 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवा बेसनाचे लाडु करताना बारीक रवा घ्यावा. दोन ग्लास रव्याला १.५ ग्लास बेसन वापरावे. प्रथम रवा आणि बेसन तुपावर वेगवेगळे भाजून घ्यावे. बेसन भाजताना तुप जरा जास्त लागते. रवा आणि बेसन दोन्हीही चांगले गुलाबी रंगावर भाजावे.
नंतर परातीत भाजलेले रवा बेसान एकत्र करावे. साखरेचा एक तरी पाक करून, पाक गरम असतानाच त्यात वरील भाजलेले रवा बेसन, वेल्दोडा पुड टाक्कुन एकदा हलवून बाजूला ठेवून द्यावे.
पाक सगळा जिरून गेल्यावर लाडू वळावेत


Dineshvs
Tuesday, October 26, 2004 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी रवा बेसनाचे लाडु लिहायचा आळस केला. तरि पण एक टिप देतोच.
कुठलाहि लाडु करताना पाकाचे तंत्र जमावे लागते. त्या ऐवजी काकवी, मध वैगरे वापरुन लाडु करता येतात. ते टिकत नसले तरी चवीला छानच लागतात.
रवा बेसनाचे लाडु करताना पाक करायची भिती वाटत असेल तर. दोन्ही पिठे भाजुन झाली कि त्यात दिलेल्या प्रमाणात (थोडे थंड करुन) पिठीसाखर मिसळावी. मग ते मिश्रण घट्ट झाकणाच्या डब्यात घालुन कुकरमधे दहा मिनिटे वाफ़वावे. मग दुधाचा हबका मारुन लाडु वळावेत. हेहि लाडु चवीला छान लागतात.


Chetu08
Wednesday, October 27, 2004 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi rava besan ladoo ase karte:
Rava aani besan khamanga bhajte ( ajibat tup na ghalta) tyat pithisakhar add karte. aani tup changle ukalawun mishranat halu halu ghalte. baryapaiki gar zale ki kishmis lavun ladu walte.

Bee
Friday, September 08, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला साधे रव्याचे लाडू करायचे आहे. रवा जाड वापरू की बारीक कुणी सांगू शकणार का?

पाक किती तारी करायचा असतो...


Moodi
Friday, April 21, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rava Laddoo

Ingredients

• Condensed milk 400 gms, sweetened
• Suji or semolina 2 & 1/2 cup
• Ghee 3 tablespoons
• Cardamom powder 1/2 teaspoon


Method
• In a kadai, fry the semolina till it is brown.

• Add the ghee and roast for 10 minutes.

• Add the condensed milk and cardamom powder and stir till the mixture leaves the sides of the pan.

• Remove form the fire and make into small laddooos with greased palm.

• Garnish with roasted cashews and raisins.


Moodi
Monday, September 04, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरण रवा लाडू

Bage
Monday, November 20, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Arch,
Arch मी तू दिलेल्या recipe ने रव्याचे लाडू केले. खूप छान झाले आहेत. माझ्या मुलीला ( 18 months ) पण आवडले :-) . मी hot wheat cereal रवा म्हणुन वापरले thanks Arch


Ashdeo
Tuesday, June 26, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललितास ने दिलेल्या कृतीप्रमाणे लाडू केले. छान जमले होते. धन्यवाद!

Rads
Tuesday, August 14, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कच्चा पाक कासा करायचा कळाले, पण १ तारी व २ तारी पाक कासा ओळ्खायचा

Me_mastani
Saturday, August 18, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च तुम्ही दिलेल्या क्रुतीत जाड रवा वापरावा का बारीक? आणि पिठीसाखर वापरावी का साधी?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators