मॅग्गी

Submitted by भूत on 18 April, 2011 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाणी , मॅग्गी नुडल्स चे पॅकेट , आवडत असल्यास गाजर , हिरवे वाटाणे , उकडलेली अंडी , चिकनचे पीस वगैरे

क्रमवार पाककृती: 

१) बाजारातुन मॅग्गी नुडल्स चे पॅक विकत आणावे .
२) त्याच्यावर पाककृती लिहिलेली असते ती फॉलो करावी .

वाढणी/प्रमाण: 
एकासाठी एक पॅकेट पुरते .
अधिक टिपा: 

१) हॉस्टेलवर मित्रांच्या सोबत खायला विशेष मजा येते .सोबत चहा सिगरेट असल्यास उत्तमच !

माहितीचा स्रोत: 
मॅगी नुडल्स चे पॅकेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी , धन्स ग , मी बऱ्याचदा जाहिरातीतली maggi सारखी maggi का नाही होत म्हणून कंफ्यूज व्ह्यायचे . तू केलेली maggi डिट्टो जाहिरातीप्रमाणे वाटतेय

चिकनचे पीस ह्यातला पीस हा शब्द मराठी आहे का इंग्लिश??
<<
चवीने खावासा वाटला तर इंग्लिश. भाजीत दिसल्यावर इक्स! झालं तर मराठी.

मामी फोटु मस्तए. तोपासु. मला मॅगी कधी खाल्लीच तर गरम/कोमटच आवडते. गार नाही आवडत्,चव जाते. मी पाणी उकळत असताना, मसाला चमचाभर पाण्यात कालवुन टाकते, त्यामुळे त्याच्या उकळत्या पाण्यात गुठळ्या होत नाहीत.

मॅगी मसाला क्युब्ज फ्लॉवरच्या रस्सा भाजीत मस्त लागतात.

.

मी पण काल खाल्ली शेवटली एक उर्लेली....मला वाटते.मॅगी परत येईल . कंपनीवाली ही लोकं हुशार असतात. कोर्टात आहे ना केस अजुन

नेसकॅफे वर २ पाकिटे ओट मॅगी ची फुकट मिळालेली अजून उरली आहेत घरी.
किड (कीड नाही:) ) बाहेर गेले असताना खाणार आहे. काय जी लेड विषबाधा व्हायची ती होउन्न जाऊ दे!! Happy
मॅगी फ्यान Happy

Pages