मॅग्गी

Submitted by भूत on 18 April, 2011 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाणी , मॅग्गी नुडल्स चे पॅकेट , आवडत असल्यास गाजर , हिरवे वाटाणे , उकडलेली अंडी , चिकनचे पीस वगैरे

क्रमवार पाककृती: 

१) बाजारातुन मॅग्गी नुडल्स चे पॅक विकत आणावे .
२) त्याच्यावर पाककृती लिहिलेली असते ती फॉलो करावी .

वाढणी/प्रमाण: 
एकासाठी एक पॅकेट पुरते .
अधिक टिपा: 

१) हॉस्टेलवर मित्रांच्या सोबत खायला विशेष मजा येते .सोबत चहा सिगरेट असल्यास उत्तमच !

माहितीचा स्रोत: 
मॅगी नुडल्स चे पॅकेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅगी बस टू मिनिट. Wink पंत बरं झालं मॅगीची रेसिपी टाकून पेटंट पंत झालात तुम्ही. रेडी टू मेकच्या पण रेसिपी येऊदेत भागा भागातून. Happy

टिप - पेटंटचा उच्चार पेटंट असाच करावा उगाच पेशंट म्हणून करू नये.

>>पाणी , मॅग्गी नुडल्स चे पॅकेट , आवडत असल्यास गाजर , हिरवे वाटाणे , उकडलेली अंडी , चिकनचे पीस वगै

मी शाकाहारी आहे. बोल्ड केलेले जिन्नस उपलब्ध नसल्यास काय करावे याचे मार्गदर्शन कराल काय?

उकडलेली अंडी , चिकनचे पीस >>>> हे उपलब्ध्द नसल्यास द्राक्ष टॉमॅटो ची भाजी ...बटाट्याची आमटी असले घासपुस पदार्थ खावेत ..:खोखो:

बोल्ड केलेले जिन्नस उपलब्ध नसल्यास काय करावे याचे मार्गदर्शन कराल काय? >>> मंदार त्याने स्पष्ट लिहीलेय "आवडत असल्यास" . तु नाहि घातलेस तरी चालेल Proud

आज कधी नव्हे ते मला डु आय चे आभार मानावेसे वाटताहेत ....असेच प्रतिसाद द्या डु आय नों म्हणजे धागा वर राहील आणि ज्यांना कळायचे आहे त्यांना कळेल Biggrin

पंत्या...... तुझा... सन्यासभंग कार्यक्रम सुरु झाला.. असे समजावे... काय? नाय मॅग्गी सारखी महान रेसिपी टाकलीस.. म्हणून विचारलं.. हर न्युडल पे नया सन्यासभंग स्कँडल... Rofl

असं टुकार लिखाण चालत वाटत>>>> काय राव, कसं काय टुकार हा शब्द टाइपला जातो तुमच्या कडुन. मी एम डी आर रेडिमिक्स ची रेसपी टाकाव म्हणत होतो लावला कि नाट त्याला .....

आणि हो अन्न पुर्ण ब्र्ह्म म्हणतात कुठे फेडाल हे पाप.. शिव शिव शिव....

झाल्यावर एक चिझ स्लाइस घालायचा , थोड बटर सोडायच बाजुनी आणि २ मिनीट झाकुन ठेवायच. मग खायच. एकदम य्म्मी..

या वर आपण सगळ्यांनी मिळुन वेगवेगळी मॅगी बनवण्याची पध्दत इथे टाकली तर.........

फार जणांना लाभ होईल..............

मॅगी तयार झाली की त्यात एक भाजलेला उडदाचा पापड चुरडून टाकावा आणि आंब्याचं लोणचं घालून खावी. हॉस्टेलमधलं आमचं स्टेपल फूड.

मॅगी वर वरून मस्त बारिक चिरलेला कांदा भुरभुरावा आणि चवीला टोमॅटो सॉस घ्यावा.. आणि मग जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे ओरपावी.. जमत असल्यास थोडेसे पाणी जास्त ठेवावे म्हणजे तो रस्सा पण मस्त पणे भुरक्या मारत पिता येतो...

मॅगीचा मसाला आजिबात फुकट जाऊ देऊ नये.... ते पाकिट चारी व्यवस्थित उघडून सगळा मसाला वापरावा.. सोप्पी पद्धत त्या पाकिटात चमचाभर पाणी घालावे आणि ते प्यावे किंवा मॅगी शिजत असताना त्यात घालावे...

मॅगी तयार होत आली की त्यात अमुल बटर घालावे थोडे. आमच्या घरी भरपुर कांदा, टोमॅटो , हि. मिरची, कडीपत्त, कोथिंबीर आणी असतील त्या भाज्या ( गाजर , फ्लॉवर , मटार , कोबी ) हा १५ दिवसातुन एकदा नाष्टा असतो. Happy

आणि संपल्यावर ती कढई मस्त पुसुन खायला बेस लागते Proud

मॅगी शिजतांना पाणी अंमळ थोडे जास्तच घालावे...आणी मग हे मॅगीचं सुप थंडीच्या दिवसात लय भारी लागते.
रच्याकने: मॅगीचा मसाला दुपारच्या उरलेल्या भातात अगदी थोड्या पाण्यात घालुन मिक्स करावा आणि कुकर बंद करुन भात जरा वाफवावा... अ प्र ति म चव!

रच्याकने: मॅगीचा मसाला दुपारच्या उरलेल्या भातात अगदी थोड्या पाण्यात घालुन मिक्स करावा आणि कुकर बंद करुन भात जरा वाफवावा... अ प्र ति म चव!
अर्या हे वेगळा बाफ उघडुन सांगायला पाहीजे. उध्या पंतचा हाही धागा बंद केला एडमिननी तर

मुक्तेश्वर नेहमीसारखा गोंधळ नाही घातलात तर अ‍ॅडमिन धागा बंद कशाला करतील ?

मोहीनी>>>>आर्याची गम्मत करतो आहे

Pages