मॅग्गी

Submitted by भूत on 18 April, 2011 - 03:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाणी , मॅग्गी नुडल्स चे पॅकेट , आवडत असल्यास गाजर , हिरवे वाटाणे , उकडलेली अंडी , चिकनचे पीस वगैरे

क्रमवार पाककृती: 

१) बाजारातुन मॅग्गी नुडल्स चे पॅक विकत आणावे .
२) त्याच्यावर पाककृती लिहिलेली असते ती फॉलो करावी .

वाढणी/प्रमाण: 
एकासाठी एक पॅकेट पुरते .
अधिक टिपा: 

१) हॉस्टेलवर मित्रांच्या सोबत खायला विशेष मजा येते .सोबत चहा सिगरेट असल्यास उत्तमच !

माहितीचा स्रोत: 
मॅगी नुडल्स चे पॅकेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅग्गी शिजत असताना अंडं घालण्याची आयडीया मस्तच आहे ..मी बर्‍याचदा करतो तसे....

एकदा मॅग्गी जराशी खरपुस भाजुन करायचा विचार आहे ट्राय करायला हरकत नाही Happy

( अवांतर : मी आपल्या नेहमीच्या ष्टाईलने कोणाला तरी टोमणा मारायला म्हणुन हा धागा सुरु केला होता ...त्याची इतकी चांगली रेसीपी होईल असें वाटलं नव्हतं Biggrin

बाकी पाककृती टाकल्याने रसिक वर्ग इतका वाढत असेल तर आजपासुन पाकृ कंपुत Proud )

>>मी आपल्या नेहमीच्या ष्टाईलने कोणाला तरी टोमणा मारायला म्हणुन हा धागा सुरु केला होता

असे करु नये ही विनंती. या ग्रूपमध्ये खरंच चांगली माहिती मिळते आणि लोक याचा खूप वापर करतात. त्यात या कारणासाठी काही लिहून जागा फुकट घालवू नये. यासाठी "मॅगी कशी करावी/खावी" असा लेखनाचा धागा चालला असता. या पाककृतीचे तेच झाले आहे अर्थात.

इथली चर्चा वाचा -
http://www.maayboli.com/node/7402

मॅगीची कृती:
एकीकडे पाणी उकळून घ्या - त्यात नूडल्स शिजवून घ्या.. थोडसं पाणी ठेवून बाकीचं पाणी ओतून द्या
दुसरीकडे (म्हणजे दुसर्‍या घरात/खोलीत वगैरे नव्हे तर दुसर्‍या भांड्यात) जिरे मोहरी मिरची घालून चळचळीत फोडणी करा. त्यात कांदा टॉमेटो मटार परता - थोडसं मीठ आणि तांबड तिखट टाका. कांदा टॉमेटो परतून झाला की मॅगी मसाला घाला - वरच्या नूडल्स मधलं थोडसं ठेवलेलं पाणी घाला, शिजलेले नूडल्स घाला.
एक वाफ आली की कोथिंबीर घालून मॅगी खायला घ्या Proud
(खरच भारी लागतं असलं मॅगी)

थँक्स पंत, इतक्या वर्षांनी आज समजलं 'मॅग्गी' कशी बनवायची ते..!
मनापासुन आभारी आहे मित्रा..!

माहितीचा स्रोत:
मॅगी नुडल्स चे पॅकेट >> हे वाचुन तर "पोटात कळ" उठली.....व्वा.. मित्रा व्वा..छान रेसीपी..!

(आणखी अशा प्रकाराच्या "रेशेप्यांच्या" अपेक्षेत)

अधिक टिपा:
१) हॉस्टेलवर मित्रांच्या सोबत खायला विशेष मजा येते .सोबत चहा सिगरेट असल्यास उत्तमच !

>>>>>>>

जब मिले बैठेंगे चार यार
मित्र, मॅगी, सिगारेट और चहा Biggrin

Rofl

"कै च्या कै" कविता अस्त्यात, तसली ही ""कै च्या कै" रेसीपी हाये वाट्ट बाप्पा! कोनीतरी असा धागा (का काय म्हन्तात त्ये) चालू करा बर मंडली...."कै च्या कै रेसीपी " Lol Lol Lol

मॅगी अर्धवट शिजवुन ठेवावी, मसाला घालून.

मग कांदेपोहे करावेत. कांदापोहे वाफेवर आले की मग मॅगी मिसळावी.. मॅगी पोहे. मॅगी जास्त शिजवायची नाही..

आपजिगा१११ उर्फ टिंबकराव
म्यागी वर खाली करा
थोडी दारु टाकुनही करुन पहा मसाल्या एवजी

.

.

सूप स्टाईल आवडत असेल, तर पाकिटातला मसाला कमी पडतो. मग त्या ऐवजी सांबार मसाला चालतो.
वरून लिंबू पिळा. चाट मसाला घातलात तरी चालेल.
भाज्या नसल्या तर कोथिंबिर. अन अधी पूर्ण शिजलेला कांदा.

मॅगी शिजताना मोठ्या भोकाच्या गाळणीतून अंडं टाकलं तर लै भारी इफेक्ट येतो.

मॅगी मसाला भातात घालायची idea भन्नाट आहे. माझ्या २ वर्षाच्या मुलांना मॅगी खूपच आवडते, त्यांना मसाला न घालता noodles बनवाव्या लागतात. त्यामुळे माझ्याकडे ४/५ मसाल्याची पाकीट आहेत, फेकून द्यायचा विचार करत होते, आता भात करून बघते.

मॅगीचा मसाला आजिबात फुकट जाऊ देऊ नये.... ते पाकिट चारी व्यवस्थित उघडून सगळा मसाला वापरावा.. सोप्पी पद्धत त्या पाकिटात चमचाभर पाणी घालावे आणि ते प्यावे किंवा मॅगी शिजत असताना त्यात घालावे...
>>> नाहीतर तीन बाजुने कात्रीने उघडुन चाटावे.. लय भारी लागतं.. Light 1

मॅगी फ्राईड व्हेज बिर्याणी खाल्लीये का कधी ?

हवी असल्यास रेसिपी देतो. माहीत असल्यास कुणीतरी टंका. >> किरण्यके.. नेकी और पुछ पुछ.. द्या की ..

>>> नाहीतर तीन बाजुने कात्रीने उघडुन चाटावे.. लय भारी लागतं..

होय.. छान लागते. Happy

सखी, मला पण मसाला पॅकेट्स. आमची लाडो कोरडी मॅगी व मसाला खाते त्यामुळे माझ्याकडे नूड्ल्स उरतात. तुम्ही कप नूडल्स खाता का? त्यात छोटे पॅकिन्ग आले आहे. एका वेळी पोरांना फिट पुरते अगदी.

एका फुल मॅगीत दोन उरलेले चिकन ६५ तुकडे घालून खावा. तेवढीच थोडक्यात ऐश.

दावत-ए-मॅगी

फ्लॉवर, फरसबी, सिमला मिर्ची, गाजर, मटार, टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या आणि आटामॅगी. हवा असल्यास मॅगी मसाला.

कांदा उभा कापून घेणे. बाकीच्या भाज्या आपल्याला हव्या त्या साईजच्या कापून घेणे. अमुल बटरवर कांदा जरा लाल होईपर्यंत परतणे. मग टोमॅटो वगळता बाकीच्या भाज्या घालून परतणे आणि किंचित पाणी घालून, झाकण ठेऊन अर्धकच्च्या शिजवणे. मग यात जेमतेम पाणी, मसाला आणि मॅगी घालून पाणी आटेपर्यंत आणि मॅगी शिजेपर्यंत गॅसवर परतावे. पाणी कमी वाटल्यास थोडे अजून घालणे पण शेवटी पाणी सगळं सुकलं पाहिजे. मॅगी शिजल्यावर वाटल्यास शेवटी वरून थोडे अमुल बटर घालून गरमागरम खावे.

Pages