पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केकसाठी पाईनॅअपल टीन आणला आहे. त्यातल्या फोडी वापरुन रायता कसा करायचा? आणि सिरपचे काय करता येइल Uhoh

रायत्याकरता कॅन्ड पायनॅपल वापरत असाल तर त्यातलं सिरप काढून टाकून अननसाच्या बाईट साईज फोडी करुन घ्या. बाकी रायत्याकरता घेतो तसंच दही फेटून घ्या. त्यात रायता मसाला, लाल तिखट पावडर, मीठ, किंचित साखर वगैरे मिसळून घेऊन आयत्यावेळी फोडी टाकून मिक्स करुन घेऊन वरुन कोथिंबीर घाला.

सिरप वापरुन, पायनापल शिरा करता येईल (पण फोडीही थोड्या लागतील) सिरप हेवी आणि लाईट असे दोन्ही प्रकारात असतात. त्यानुसार कमीअधिक गोड असतात.

श्रीखंड तसेच मध्यम आचेवर सतत ढवळत आटवत ठेवायचे. हळू हळू गोळा जमू लागतो. मग खाली उतरून त्यात थोडी पिठीसाखर घालून घोटायचे आणि थापायचे. बाजारात ज्या श्रीखंडाच्या कडक वड्या मिळतात, त्या साखरेपासूनच केलेल्या असतात. वरीलप्रमाणे केलेल्या वड्या, अगदी कडक होणार नाहीत.
श्रीखंडाचे पियुष पण करता येते. (पाणी आणि कणभर मीठ घालून घुसळायचे.)

द्क्ष Proud

दिनेशदा, पायनापल शिर्याची रेसिपी द्या नं प्लीज जमेल तेव्हा (सिरपवाली नाही खरी) ही एक डीश मी मुंबईत असताना बाहेर खाल्ली आहे. ़़कधीतरी बनवायला आवडेल Happy

अल्पना, मी केळा वेफर्स करताना,केळ्याचे साल काढते. कढईत तेल तापले कि ( तेल जास्त तापवु नये ) त्यात काप सोडले कि मंद गॅसवर काप तळते. बराच वेळ लागतो पण वेफर्स कुरकुरीत होतात. वेफर्स जरा थंड झाल्यावर त्यावर मिठ/काळेमिरी पावडर्/लाल तिखट काय पाहीजे ते टाकुन हाताने एकत्र करावे.
साउथ वाले केळ्याचे काप मिठ, हळदीच्या पाण्यात थोडावेळ ठेवतात मग बाहेर काढुन कापडाने टिपुन मग तळतात. तसेही छान होतात. पण उपवासाला ते चालत नाही....ही लिन्क बघ...
http://www.youtube.com/watch?v=ctNpu_k9OGY

sorry अल्पना! अनघाला केळ्याचे वेफर्स हवे होते. मी चुकुन तुझे नाव लिहीले.

सुमेधाव्ही, मी घरी बनवते इंन्सट जिलेबी. ही घ्या सोपी कृती. अर्ध्या तासात जिलेब्या तयार होतात.

साहित्य : १ पेला मेदा, १/२ टी स्पून सोडा, १ टी स्पून सायट्रीक अ‍ॅसिड, १ पेला साखर, १ चिमूटभर हळद, १ टे. स्पून तेल, तूप तळण्यासाठी.

दुधाच्या प्लास्टीकच्या पिशवीला एका टोकाला केचीने थोड कापाव आणि त्यात जिलेबीच पीठ भरा. किंवा लाल रंगाच्या प्लास्टीकची बॉटल्स सॉससाठी मिळतात त्याही वापरता येतील.

कृती: साखरेचा एक तारी पाक करा. मेदयामध्ये सायट्रीक अ‍ॅसिड, हळद घालून मिश्रण व्यवस्थित ढवळावे. एका वाटीत सोडा व तेल घालून व्यवस्थित फेटून घ्या. मेद्यात सोडयाचे मिश्रण घालून खूप फेसावे.

कढईत / किंवा छोटया जाड बुडाच्या परातीत तूप गरम कराव आणि पिशवीने किंवा बाटलीने जिलेब्या पाडाव्यात. दोन्ही बाजूने तळून १ मिनिट पाकात ठेवा आणि गरमागरम जिलेबी खा. Happy

निवा, आज संकष्टीला जिलेब्यांचा नेवेद्य. Happy
फोटो पाठव मला. Happy

केक का नाही केला? >> क्रिम केक केला. पण श्रावण असल्यामुळे नेह्मीचा नाही.. मला एगलेस उपसाईड डाउन येत नाही Sad

परवा रायता केला, मस्त एकदम.. आता शिरा करतेच उद्या Happy

खजुराची बर्फी करण्याची पाककृती कोणाला माहिती असल्यास सांगा/लिंक द्या.. प्लिज Happy

मला एक बेसिक प्रश्न पडला आहे.... Uhoh
बेकिंग सोडा म्हण्जेच आपला खायचा सोडा अस्तो का ?????

हो विमानात कित्येकदा टोमॅटोचा रस प्यायलो आहे. घट्टसर असतो आणि किंचित रवाळ असतो. त्यासाठी फ्रेन्च टोमॅटोच लागतात. कारण फ्रान्समधील टोंमॅटो आकारानी मोठे असतात आणि ते लालबुंद असतात.

मुंबईच्या प्रकाश मध्ये साबुदाणा वड्या बरोबर एक साबुदाणा पुरी मिळते ती कशी करतात? आय फील लाइक अ बिट ऑफ स्टार्च टुनाइट Happy

साबुदाणा वड्याच्या पीठात बटाटा जास्त घालून थालिपीठासारखं छोट्या आकारात थापून तळतात.

विद्या धन्यवाद. करून पहातेच आता के.वे. Happy
जिलब्या एमटीआरच्या पाकिटाच्या करून पाहिल्या होत्या. छान झाल्या. आता वरच्या कृतीने कधीतरी करून पाहिल्या पाहिजेत.

एका कार्यक्रमाला पिवळ्या पदार्थांची थीम आहे... माझ्याकडे मसालेभात आलाय... पण मसालेभाताला पिवळा रंग
कसा आणायचा? .. एरवी तो लालसर/केशरी होतो, ते टाळायचे आहे... काय करता येईल?
टोमॅटोऐवजी काही दुसरं टाकू का? की पिवळा रंग टाकू सरळ? तिखट तर तसंही टाकत नाही, लाल मिरच्या वापरीन म्हणतेय. कृपया उपाय सुचवा. Happy

अंजू, नुसती हळदीची फोडणी? मग <टोमॅटोऐवजी काही दुसरं टाकू का?>>>> या प्रश्नाचं काय करू? टोमॅटोशिवाय मी कधी मसालेभात खाल्लाच नाहीये Uhoh

Pages