पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा खूपच उशिरा रिप्लाय करतेय
दिनेशदा, विद्याक, मंजू खूपच धन्स,
मी आज मेथ्या घालून वरण केलेय मस्त लागतेय...आता उद्या उसळ खिचडी असा बेत करायचा विचार आहे Happy
पुन्हा एकदा धन्स

मला कांदा खरपूस परतून त्यावर परतलेली माठाची नुसती लाल तिखट/ हिरवी मिरची आणि मीठ घातलेली भाजी जाम आवडते. >>>>>>>>

विषयांतराबद्दल क्षमस्व पण हे वाचल्यावर माझा गावी गेल्यावरच्या नाश्त्याचा फोटो टाकण्याचा मोह आवराला नाही..

ही दारातली भाजी.....

आणि मग तिथुन लगेच ताटात अशी......

मी मुंबईत लाल माठ कधीच आणत नाही. अगदी पचपचित लागते म्हणुन. पण गावी रोज आवडीने खात होते.

साधना, छानच भाजी. मुंबईत भाजी जर पनवेल वगैरे भागातून आली असेल तर चांगली असते.
मुंबईत जागोजाग तांदुळजा उगवतो. तो जर ओळखता आला, तर त्याच्यासारखी
चविष्ट भाजी नाही. (मी मागे फोटो टाकला होता. त्रिकोणी पातळ पाने, किरमीजी
रंगाचे तूरे असतात पण काटे नसतात.)

साधना, ती भाजी बघितल्यावर घरची फार आठवण आली. Sad

आमच्या अंगणात पण आई लाल माठ, चाकवत, पालक, अळू असलं कायबाय लावत असते.

असा गच्च वाफा असतो होय माठाचा ? मी आपल्या दोन ओळींमधे वीस पंचवीस बिया पुरल्या आहेत घरात एका
६ बाय १८ इंच कुंडीत. अजून २ आठवड्यांनी अंगणात लावेन असा विचार होता. आता इथली फ्रॉस्ट वार्निंग संपली की अंगणात मोठा वाफा करून त्यातच सरळ बिया पेरून पाहीन. माठाची भाजी आवडती आहे घरात .

मी आज मंजुडीच्या रेसिपीने केली लाल माठाची भाजी. नेमके कालचे रात्रीचे थोडे वरण शिल्लक होते. फक्त ओला नारळ वगळला (कारण घरात नव्हता.) नुसतीच फोडणीवर परतण्यापेक्शा वरण आनि लसुण व आले यांमुळे छान चव आली.

धन्स, मंजुडी.

चला आता ती माठाची भाजी करुन झाली असेल तर वरण करु यात का? Wink

माझा प्रश्न असा आहे कि, तुरडाळीचं वरण अगदी गच्च न शिजण्यासाठी काय करायचं? मी डाळ भिजवुन ठेवत नाही. कुकर लावायच्या वेळेला धुवुन लगेच कुकरला लावते. सध्या मोठा फ्युच्युराचा कुकर वापरात नाही ( फार मोठा पडतो म्हणुन), साधा शिटीवाला प्रेस्टीजचा कुकर वापरते - हं तर सांगत होते कि डाळ फार शिजवत नाही. ३ शिट्यांऐवजी २ देवुन पाहिल्या, पण डाळीची पेस्टच. मला चांगली मऊ शिजलेली तरी अख्खी दिसणारी डाळ हवी आहे. काही टीप्स, प्लीज !

दिनेशदा, तुमच्या वरणफळांच्या फोटोमधे कशी अख्खी डाळ दिसते आहे ना तशी शिजायला हवी आहे मला. पेस्टचा अगदी नॉशिया आला आहे. आईकडे अशी आमटी असायची. मऊ शिजलेली डाळ पण अख्खी.

मनिमाऊला "मऊ" डाळ आवडेना म्हणजे कठीण गं.... Wink तू कुकरला शिटी यायला लागली की आच कमी करून दहा मिनिटं शिजवून पहा....शिटी करू नकोस..त्यामुळे ती फ़ुटत असेल...
तुला दिनेशदा एक्सपर्ट कमेंट देतील पण मला तो मऊवरचा पी जे मारायचा मोह आवरत नाहीये.....म्याउ म्याउ....:)

अय्यो, एवढा वेळ आणि पेशन्स कुणाला गं. फटाकसे एका शॉटमधे डाळ्-भात शिजेल असं काही सांग की. पातेल्यात शिजायला किती वेळ लागेल? येत्या शनि-रविवारी करुन बघेन.

वेका, म्याउ म्याउ ! नाव बदललंस? आता किती गोड वाटतं आहे तेच नाव. Happy तिकडे लिहिलंस म्हणुन मी ओळखलं तरी तुला लगेच.

पातेल्यापेक्षा तरी अशी कुकरमध्ये कदाचित लवकर शिजेल असं मला तरी वाटतं.....
हो नाव तेच आहे पण उगाच जरा छोटं झाल्यामुळे जपानी वाटतंय मला..हीही.....:) हाबार....:)
तू डाळ करताना पण पेशंस नाही म्हणजे काय नाहीतर आता दुसरं कुणी तुला काही सल्ला देतंय का बघ...

त्या पद्धतीने भात पण शिजेलच ना?? न शिजून सांगतो कुणाला डाळीचं पातेलं खाली ठेव आणि भात वर..

तू कुकरला शिटी यायला लागली की आच कमी करून दहा मिनिटं शिजवून पहा....शिटी करू नकोस..>>> वेका अगं मेला कुकर पण मवालीच गं. प्रेशर जमल्यावर गॅस बारिक केला कि शिटी होवु नये म्हणुन तरी शिट्या मारतोच Proud कुकर बदलुन बघावा का? हा विरासत मधे आलेला कुकर आहे जुना छोटुसा. चांगला चालतो, म्हणुन बदलला नव्हता.

पेशंस नाही म्हणजे, लक्ष ठेवायला वेळ नाही. पाणी संपलं, उतु गेलं, तळाला लागलं हे सगळं बघायचं तर माबोवर कधी येवु मी? Happy

छोटे कुकर मवालीच असतात...तोहार इस रोग का इलाज हमार पास नहीं है......

>>पाणी संपलं, उतु गेलं, तळाला लागलं हे सगळं बघायचं तर माबोवर कधी येवु मी? Proud

डाळ तशी शिजायला पाणी थोडे जास्त घ्यायचे आणि वेळ थोडा कमी करायचा.
समजा कमी शिजली, तर जरावेळ उकळून हवी तेवढी शिजवता येते.
काही काही डाळींच्या जातीच तशा मऊ शिजणार्‍या असतात. तसे असेल तर
अर्धा तास भिजवून कूकरबाहेरच शिजवायची. यावेळी डाळीला फार फेस येतो, तो
मात्र काढत रहावा लागतो.

पाणी थोड कमी घाल मनी आणि छो.कु. असेल तर प्रेशर आल की बारीक कर. पुन्हा शिट्टी होईलस झाल (पुन्हा फुसफुसायला लागल की) की बन्द कर. तुला पाहिजे तसे वरण होईल. अन घाटून्कोस जास्त मग. Happy

मने मऊ डाळ शिजते म्हणजे वरण उत्तम होतं गं त्याचं. अख्खि डाळ दिसली तर वरणाचं पाणि वर आणि डाळ खाली बसते. असो पण पसंद अपनी अपनी Happy

मने मऊ डाळ शिजते म्हणजे वरण उत्तम होतं गं त्याचं. अख्खि डाळ दिसली तर वरणाचं पाणि वर आणि डाळ खाली बसते. असो पण पसंद अपनी अपनी >>>>>>>>>>+++++++१

दिनेशदा & अनघा, थँक्स ! असा प्रयत्न करुन बघते.

दक्षी & सृष्टी, माझी ग्राहक पेठेतली डाळ असते. खरंच छान शिजते. पण पेस्ट खायचा कंटाळा येतो. जरा तरी डाळ दिसावी असं वाटतं. आमटीच्या चवीचं पिठलं किती दिवस खाणार? Happy

माझ्याकडे quinoa आहे...त्याचं आपल्या पद्धतीने काही करता येईल का?न्याहारी, जेवण कुठलाही पदार्थ चालेल्....सध्या मी फक्त ते शिजवून तूप्,मीठ मिरी घालुन खातेय आणि मुलांना देते पण त्यापेक्षा छान काही बनवलं तर नक्की आवडेल....

मेधा, मस्त आहे ग.....लगेच शोधुन दिलंस त्याबद्दल खूप आभार...
आता त्यातला एक पदार्थ तरी शनिवारच्या न्याहारीला करता येईल....
कोस्कोचं क्विनोआ परवडणेबल पण आहे....आणि आता रेसिप्या मिळाल्यामुळे करणेबल पण ...पुन्हा एकदा थांकु थांकु........

तुरीची डाळ व छोले १२ तास भिजवून मग इलें. कुकर मध्ये शिजविले. उत्तम शिजले.. सध्या घरी गॅस कनेक्षन नाही त्यामुळे हे कसे करायचे असे वाटत होते पण हाका नाका. Happy

कुणी फ़्रोजन भेंडी वापरतं का? मला ताजी भेंडी मिळण्याचं ठिकाण खूप लांब आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच भेंडी आवडते त्यामुळे फ़्रोजन आणावी का? आपल्या पद्धतीने परतून करण्यासाठी काही वेगळी खबरदारी थॉ करण्यासाठी???

Pages