आय नीड अ चेंज.....

Submitted by षण्मुखानंद on 14 February, 2011 - 10:07

च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!

यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!

माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?

विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.

मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?

काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.

मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.

मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.

मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.

अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.

अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?

अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.

अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अ‍ॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.

ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.

तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्‍यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.

येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.

मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्‍यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठ्मोठ्या पोश्टीन्ची खिल्ली उडवणारा धागा पण आला आज पण तरी लिहितेच (ह्याचा अर्थ मी अस्सल माबोकरिण झाले नै Happy ), फार मोठ वाटल उत्तर तर सरळ दुर्लक्ष करा Wink
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
चमन तुमच्या प्रश्नांची उत्तर अशी,
१) म्हणजे नक्की काय केलं? आधी काय करत होतात आणि नव्याने काय करायचं ठरवलं?काय अडचणी होत्या? प्रस्थपितांकडे काय होतं जे तुमच्याकडे नव्हतं?> आधी करत होते तेच आताही कर्ते पण स्वतःसाठी . हा एक मोठा बदल. मी आधी पण नव्या कारखान्यांचे आराखडे करत होते आता जे डिझाइन करते ते बान्धुनही देउ शकतो आम्ही . (माझ्या ग्रुपमधिल एक जण जो सिव्हील इन्जिनीयर आहे तो हे साम्भाळतो) . प्रस्थापित लोकान्कडे बॅलन्सशिट होत्या मागिल अनेक वर्षांच्या, आणि यशस्वीपणे राबवलेल्या प्रोजेक्ट्स्ची लाम्ब्लचक लिस्ट. आम्ही जेव्हा आपापल काम करु घेतल तेव्हा आमच्या कम्पनीची पाटी कोरी होती. थोडक्यात नाबालिक.:) मी स्वतः राबवलेले खूप प्रोजेक्ट्स होते , काही तर बक्षिस मिळालेले. पण ते मी व्यक्ती म्हणुन नाही तर आधिच्या नोकरीच्या ठीकाणी केले होते. पुण्याई एवढाच उपयोग , पाटी कोरीच.

२) ह्यावर तोडगा एकच पुरे पडला नसता. बाळस धरे पर्यन्त तग धरणे ह्यासाठी मिळेल त्या स्केलची काम घेतली.(हे महत्वाच होत. इथे असली काम माझ्या लाइकीच्या, इगोच्या पेक्षा लहान आहेत अस म्हणल असत तर तग धरता आला नसता. ) एकुण चार जण होतो त्यामुळे काम वाटुन घेतली. एक जण आज साठी एक उद्या आणि २ जण लॉन्ग टर्म साठी काम करत राहिलो. दुसरा ट्रॅक ज्यावर काम चालु ठेवल ते, सोप्या भाषेत मान्डते. कॉफी टपरीवर मिळते, इराण्याकडे मिळते, उडप्याकडे मिळते तशिच सीसीडीत पण. माल विकला जाणारा तोच कॉफी पण रॅपिन्ग वेगवेगळ. आणि त्याप्रमाणे किंमतही. आमच्या सर्विस मधे असा वेगळापणा कसा आणता येइल ते शोधल. तसच ते विकत घेणारे ग्राहक शोधले . (वेगवेगळ्या देशान्चे चेम्बर ऑफ कॉमर्स , ट्रेड फेयर्स ) ग्रीन बिल्डिन्ग डिझाइन करत होतेच त्याच सर्टिफिकेशन करुन देण्याची सोय चालु केली. इतरही बरच ,पण फार लाम्बवत नाही.

३) हे सगळ करताना इंडस्ट्री स्टॅन्डर्ड पेक्षा खूप जास्त बजेट मार्केटिन्गसाठी ठेवल.

४) वय लहान (ऑर्गनाइझेशनच हो) म्हणुन प्रवेश बन्द ! ह्यावर पण उपाय केला. तगडा अनुभव असणार्या, परदेशी पण इथे भारतात काम करु पहाणार्या फर्म शोधल्या. त्याना त्यान्च्या इथे जाउन आमची कथा , लायकी, भुत्काळ भविष्यकाळ सगळ सादर केल. त्यान्च्या बरोबर इथे मोठी काम मिळवली. ह्यातुन दोन फायदे झाले. आमच्या पाटीवर ग म भ न लिहायला सुरवात झाली. तसच कपॅसिटी बिल्डिन्ग झाल.
ऑक्टोबर १ २००९ ला स्थापन केलेली आमची फर्म आता हळुहळु बाळस धरतेय. Happy

घ्या अज्जुन येक मोठी पोस्ट!!

नानबा तुम्ही अजून त्या फॉरवर्ड/ बॅकवर्ड मध्येच अडकलात का? 'लॉस्ट ईन ट्रानस्लेशन' होऊ देऊ नका.

पहिल्याने मी फॉरवर्ड/ बॅकवर्ड असे न म्हणता स्टेप अप/ स्टेप बॅक असे म्हणालो. हे वाक्य तुम्ही जेवढ्या वेळा वाचाल तेवढं पुढचं समजणं सोपं जाईल.

तुम्ही युद्धांबद्दल, लढायांबद्दल नक्कीच पाहिलं असेल, वाचलं असेल. किल्ले जिंकले जातात, राखले जातात. तानाजी मालूसरे, फिरंगोजी अश्या (सत्य)कथाही तुम्ही वाचल्या असतील.

तर मग आता ही अ‍ॅनालॉजी अशी बघा....

आपल्या किल्ल्यावर शत्रूचं आक्रमण झालं, तर किल्लेदार आपल्या काही सैन्यानिशी किल्ल्याच्या बाहेर येऊन किल्ल्याची तटबंदी सुरक्षितत राखण्याच्या हेतूने शत्रूसैन्याशी लढाई करत राहतो. प्रत्येक इंचनइंच लढवत तो शत्रूला मागे रेटत स्वतः 'स्टेप अप' करत राहतो. शत्रूला ह्या सीमेबाहेर हाकलायचे असा त्याचा गोल असतो. आता काही कारणास्तव काय होते शत्रू अचानक डोईजड होऊ लागतो किंवा आपली जिवीतहानी जास्त झालेली असते, जखमा झालेल्या असतात. शस्त्रास्त्रांची कमी झालेली असते किंवा आता किल्ला एका मर्यादेपर्यंत सुरक्षित झाल्याने, अजून लढाईची (ओपन वॉर) रिस्क घेण्यात त्याला अर्थ वाटत नाही, फायदा दिसत नाही. मग तो काय करतो तर त्याच्या सैन्याला म्हणतो. 'स्टेप बॅक', 'फॉल बॅक'.
मग तेव्हा काय करायचे असते. आपण आपल्या किल्ल्यात परत यायचे. आणि किल्ल्यात राहून शत्रूवर थोडा थोडा मारा करत त्याला दूर ठेवायचे. किंवा किल्ल्यात थोडा आराम करून, ताकद मिळवून पुन्हा शत्रूवर तुटून पडायचे.

आता हे किल्ला म्हणजे आपले स्थैर्य्...आपले गोल म्हणजे किल्ल्याभोवतीची सुरक्षित सीमा वाढवणे आणि सगळे ऑडस म्हणजे आपले शत्रू.
आता ह्या बाफवर आलेली पहिली ती ऊदाहरणं रेव्यु, मास्तुरे, निवांत ह्यांची.
तुम्हाला असे नाही वाटत का की त्यांच्या लढाईचा बराचसा टप्पा लढून झाला आहे. आपला किल्ला आता सुरक्षित आहे ह्याचा त्यांना अंदाज आला आहे. आणि आता ते 'स्टेप बॅक' स्ट्रॅटेजी नुसार किल्ल्याच्या आसर्‍याकडे जाऊ पहात आहेत. म्हणजे त्यांची लढाई संपली का ? तर नाही. शत्रू पुन्हा येऊच शकतो आणि हे त्यांनाही माहित आहे पण आता त्यांची सुरक्षित सीमा मोठी असल्याने लढाईच्या रिस्कपेक्षाही किल्ल्यातून मारा करणे त्यांना जास्त हितावह वाटते आहे. आणि तीच त्यांची योजना आहे. (मास्तुरे रेव्यु निवांत माझी अ‍ॅनालॉजी चुकत असेल तर जरूर सांगा)

तर ह्या बाफवर पहिली तिन्ही ऊदाहरणं हीच आल्याने मी 'स्टेप अप' बद्दल, 'अजून चार्ज घेऊन शत्रूशी अजून ताकदीने दोन हात करण्याच्या' गोल आणि योजनेबद्दल कोणीतरी लिहा असे म्हणालो.

मला आशा आहे आता तरी तुमचं थोडं का होईना फॉरवर्ड/बॅकवर्ड चं गोल्-गोल फिरणं लाईनीवर येईल.
नसेल तर परत ईथे लिहा आपण पुन्हा नव्याने बोलू.

१. च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय! >>> प्रयत्न कर, बढती मिळव किंवा दुसरी नोकरी बघ आणि दिवसाची शिफ्ट मिळव. एक चांगली गोष्टं घडून आली अजून दुसररी चांगली गोष्टं घडवून आणण्याची ताकद मिळाली.
२. माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार? >>> पुन्हा वरचेच.

३. काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी. >>>> पुन्हा वरचेच

ही उदाहरणं काय म्हणतात? >>> मला तरी ती कुठेच 'स्टेप बॅक' ज्याला तुम्ही का कुणास ठाऊक बॅकवर्ड म्हणतायेत न करता 'स्टेप अप' करतांनाच दिसत आहेत. तुम्हाला तसे वाटत नाहीये का?

मुद्दे क्लिअर होत असतील तर चर्चेला खीळ का म्हणून बसेल?

ईन्ना पुन्हा बेष्टं...आता त्याबद्दल ऑफिसला जाऊन लिहीन.

ब्रावो!! ईन्ना.

मस्तच. तुम्हला नक्की काय हवं आहे..कश्यात समाधान मिळणार आहे हे तुम्हाला वेळीच ऊमलगलं आणि तुम्ही तशी पावलं ऊचललीत ह्याबद्दल 'पॅट ऑन अ बॅक' ह्यासाठी काही वयाचा हिशोब करत बसण्याची गरज नाही.
फॅमिलीकडून प्रोत्साहन मिळालं, समविचारी आणि मोटीवेटेड लोकांची कंपनी मिळाली म्हणजे तुमच्यासाठी स्टेज सेटंच झालं की. म्हणजे तुम्ही ते केलंत.
प्लॅनिंग, मार्केट रिसर्च, आपला यूएसपी ठरवणं, भविष्यकाळातल्या लँडमार्कसबद्दलची कल्पना असणं, दुसर्‍यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करून त्यांच्याकडूनचा कार्यभाग साधून घेणं, आपली कुवत ओळखून आपल्या ऊडीचे अंतर ठरवणं, प्रसंगी मोठ्या ऊडीची तयारी असतांनाही वेळ बरोबर नाही म्हणून शांत बसणं. तुम्ही सगळं नियोजनपूर्वक यशस्वीपणे पार पाडल्याचं दिसतंय. खूप अभिनंदन तुमचे आणि तुमच्या टीमचे.

आता फक्त एकच शेवटची विनंती. एखादा छोटा गोल, अगदी छोटा उदा. 'तुमचा पहिलं स्ट्रक्चर डिझायनिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळवणं', ऑफिससाठी जाग सेट करणं, हे त्यात आलेल्या अडाचणींसहित कसं घडवून आणलंत' ते थोडक्यात लिहिणार का? अगदी छोट्यातला छोटा गोल त्याचं प्लॅनिंग , सेट बॅक्स आणि ईम्प्लिअमेंटेशन असं. कंटाळा करू नका नक्की लिहा. कदाचित तुमची पोष्टंच ह्या बाफचा रस्ता सुरळीत बनवेल.

ऑन अ सिरियस नोट.. ह्या बाफवर
ज्यांनी एक दोन पोष्टी टाकून काढता पाय घेतला,
ज्यांनी प्रश्न विचारणार्‍या पोष्टी टाकल्या, त्यांना प्रतिसाद मिळाले, समाधान झाले अथवा नाही पण त्यांनी त्याबद्दल पुन्हा लिहिण्याचे टाळले.
ज्यांनी अगदी कडक शब्दात कंसर्न्स व्यक्त केले, प्रतिसाद मिळाला पण पुन्हा लिहिण्याचे टाळले.
किंवा ज्यांना प्रश्न विचारून, कंसर्न्स व्यक्त करूनही प्रतिसाद मिळाले नाहीत आणि म्हणून त्यांनी पाठपुरावाही न करता लिहिण्याचे टाळले.
अश्यांनी नक्की काय साधले कळायला काही मार्ग आहे का?

हाच बाफ असे नाही ईतर कुठलाही बाफ. मी काही लिहिले/विचारले समोरचा/चे गंभीरपणे माझ्या म्हणण्यावर प्रतिसाद देत आहे आणि मी पुन्हा तिथे न लिहिता गप्प बसलो. काय साध्य होते अश्याने?
विनाकारण चर्चेला फाटे फुटत राहिले, वाचणार्‍यांचा गोंधळ होत राहिला, कुणाचीतरी वेळ एनर्जी प्रतिसाद देण्यासाठी खर्च झाली, ती माझ्यामुळे झाली ह्याची मला नैतिक जबाबदारी वाटत नाही का? साधे शिंकलो तरी आपल्याला थोडे ऑब्लिगेटेड वाटते आपण पटकन 'एक्स्क्यूज मी' म्हणतो.
तर मग ईथे लिहून आपला मुद्दा तडीस न नेल्याने आणि अनेकानेक लूज एंड्स बनवत राहिल्याने काय होते? मला वाटत नाही कुणी कुरापती काढायच्या म्हणून लिहित असेन मग समाधान होईपर्यंत लिहून आपण काढलेला मुद्द्याची जबाबदारी घेऊन तो आपणंच बंद करावा असे प्रत्येकाने ठरवून घ्यावे असे मला वाटते.
प्रत्येकाने असे ठरवल्यास बर्‍याचश्या चर्चा अजून काही पटींनी प्रॉडक्टिव होऊ शकतील.

ऊत्तरं देणारा-री एक दोघेच असतील तर थोडी वाट बघण्याचीही तयारी हवी. 'अरे मलाही काही म्हणायचे आहे' फार सोपे आहे ना असे विचारणे?

मी अगदी मायबोलीवर रामराज्याचा वगैरे विचार करतोय का? असेल पण 'आपण काढलेल्या मुद्द्याची जबाबदारी आपणच घ्यावी आणि समाधान झाले, ईथूनपुढे चर्चेची गरज नाही किंवा वेळ/एनर्जी ह्या कारणाने चर्चा शक्य नसल्यास तो मुद्दा स्वतःहून मागे घावा अथवा बंद करून चर्चेला पुढे वाट करून द्यावी असे मला स्पष्टपणे वाटते आणि ही शिस्त चर्चेत ऊडी घेण्यापूर्वी ठरवलेली बरी.
हे कोण सांगतंय ह्याला काही महत्त्व नाही. का आणि काय सांगतंय ह्याचा विचार व्हावा.

एक सांगू इच्छितो-
मी जे प्लॅनिंग केले होते त्यात -आता परत इंजिनीयरिंग व व्यवस्थापन क्षेत्रात जाणे नाही- असा निर्धार केला होता.

तो मुद्दा स्वतःहून मागे घावा अथवा बंद करून चर्चेला पुढे वाट करून द्यावी असे मला स्पष्टपणे वाटते आणि ही शिस्त चर्चेत ऊडी घेण्यापूर्वी ठरवलेली बरी. >> अ ह जि ही बा हा त नाही पटले. मुद्दा Vs मुद्दा ही गंमत नाहीये. इथे लोकांचे व्यक्तिगत आयुष्य गुंतले आहे. तुझा मुद्दा की माझा की तिचा याला काहीच अर्थ नाही. खोडा अथवा समर्थन द्या यालाही फारसा अर्थ नाही.
These are explorations. Freeflowing is fine.

चमन मी विचारले होते प्रश्न १५ एप्रिलच्या पोस्टमधे. काही जणांनी त्यांचे अनुभव लिहीले. मी पुन्हा अजून न लिहीण्याचे मुख्य कारण म्हणजे एक दोन दिवस अजून अनुभव येउ देत म्हणून थांबणे हे होते. तुझा प्रश्न "जनरल" आहे याचा अंदाज आहे, पण मी आधी काही पोस्ट टाकल्या होत्या म्हणून आत्ता हा खुलासा.

मधल्या काळात ते बॅकवर्ड फॉरवर्ड कोठून आले कळाले नाही. मी ही 'स्केल बॅक' म्हंटलो होतो. पण हा बीबी त्या शब्दांच्या अर्थाच्या वादात गुंतायला नको म्हणून पुन्हा टिप्पणी करत बसलो नाही Happy

These are explorations. Freeflowing is fine. >> म्हणजे काय रैना ? गोल- गोल चर्चा का?
एकेक मुद्द्याला धरून बोलत राहिल्यानेच चर्चा होईल ना? आणि एकाने एकच मुद्दा काढावा असे थोडीच आहे. ज्या हेतूने (पुन्हा गोल) तुम्ही चर्चेत ऊडी घेतली तो साध्य होईपर्यंत पाठपुरावा करा, हेतू सोडू नका. आणि जोपर्यंत ह्या चर्चेतून मला काहीतरी वेगळे पाहिजे आहे म्हणून मला त्यात भाग घ्यायचा हे पूर्णपणे ठरत नाही तोपर्यंत फक्त वाचत रहा. एकेक मुद्दा हातावेगळा करतच चर्चा पुढे वाहत राहिलना. नाही तर सगळ्यांचं एकदम तळं नाही का साठणार?
पुन्हा तेच आले आणि मटेरिअल गोल वगैरे.

फारेंड Happy अरे मला कुणाकडनं क्लॅरिफिकेशन नको आहे तू प्लीज तसे काही वाटून घेऊ नकोस. मी फक्त आपला सहभाग कश्यासाठी आहे ह्याचा विचार करा असे म्हणतोय.

चमन, तुझी सिरियस नोट काही पटली नाही रे. Happy ज्याला/ जिला जसे वेळ होईल तसेच लिहिणार ना? आणि हे काय? कोणी लिहावे, न लिहावे ह्याला सेन्सॉरशिप लावायची गरज का भासते आहे एकदम? लिहूदेत की कोणालाही विषयाच्या अनुषंगाने, ज्यांना मनापासून वाचायचे आहे, ते वाचतील, त्यातून काही मिळाले तर घेतील, नाही मिळाले तरी काय वांदा आहे? पुढे कधीतरी मिळेल.

आणि मुद्दा बंद करायचा म्हणजे काय? उदाहरणार्थ, मी इथे जे काही लिहिलं ते माझे, मला पटणारे विचार आहेत. नुसता मुद्दा मांडायचा वा प्रतिवाद करायचा म्हणून केलेला नाही. ते बंद कसं काय करु मी? आणि मुद्दा तडीला न्यायचा म्हणजे काय? समोरच्याला आपलंच म्हणणं मान्य होईतोवर रेटत रहायचा का? मेर्कू खरंच नईच समझा रे.

शैलजा, पूर्ण अनुमोदन.
चमन, नाही पटलं. काही हेतू मनात न बाळगता एखाद्याला इथल्या चर्चेत भाग घेऊन त्यातून काही ध्येय मिळालं असेल तर?

बागुलबुवाला अजून लिहायला वेळ होत नाहिये का रे? तुझं तर एकाच वेळी बरंच काय काय चालू आहे! Happy इच्छा असल्यास वेळ काढून लिहीच.

रैना, शैलजा, अंजली ++
बॅकवर्ड फॉरवर्ड, स्टेप अप स्टेप बॅक - माझे शब्द.
चमनच्या पहिल्या काही पोस्टींवरून त्यांचे अर्थ सारखे वाटले मला.
असो, शब्दात नको अडकायला.

चमन, मलाही कळला नाही हा फंडा. मुळात अनेक लोक इथे काहीतरी सोल्युशन मिळेल म्हणून नाही लिहियेत. Their inputs can give different perspectives असं मला वाटतं. मी काही प्रश्न विचारले, काही मुद्दे मांडले. त्यावर तुमची उत्तरं आली, काहींचे अनुमोदन आले. कहींनी स्वतःचे अनुभव लिहिले. मी जे शोधतेय, त्यासाठी मला नवीन दिशा मिळाली. या बीबीचे माझ्या दृष्टीने तेच महत्व आहे.

>>> आता ह्या बाफवर आलेली पहिली ती ऊदाहरणं रेव्यु, मास्तुरे, निवांत ह्यांची.
तुम्हाला असे नाही वाटत का की त्यांच्या लढाईचा बराचसा टप्पा लढून झाला आहे. आपला किल्ला आता सुरक्षित आहे ह्याचा त्यांना अंदाज आला आहे. आणि आता ते 'स्टेप बॅक' स्ट्रॅटेजी नुसार किल्ल्याच्या आसर्‍याकडे जाऊ पहात आहेत. म्हणजे त्यांची लढाई संपली का ? तर नाही. शत्रू पुन्हा येऊच शकतो आणि हे त्यांनाही माहित आहे पण आता त्यांची सुरक्षित सीमा मोठी असल्याने लढाईच्या रिस्कपेक्षाही किल्ल्यातून मारा करणे त्यांना जास्त हितावह वाटते आहे. आणि तीच त्यांची योजना आहे. (मास्तुरे रेव्यु निवांत माझी अ‍ॅनालॉजी चुकत असेल तर जरूर सांगा)

चमन,

परफेक्ट अ‍ॅनालिसिस! Happy

शैलजा>>... त्यासाठीच मी आपण लिहितो त्याची 'नैतिक जबाबदारी' असे म्हणालो.
वेळ असेल तसे लिहा पण चर्चा १० व्या पानावर आली आहे आणि तुम्ही मला वाटते म्हणून पुन्हा दुसर्‍या पानावरचा मुद्दा ऊकरून लिहिणार. मग दहाव्या पानावरती चर्चा करणार्‍यांना तुझ्या प्रतिसादाने ऑब्लिगेटेड वाटून लिहायचे असेल तर त्याने चर्चा पुन्हा दुसर्‍या पानांवर घेऊन यायची का? तेच मुद्दे चघळायचे का? म्हणजे झालेच ना पुन्हा गोल-गोल.
नाहीतर मग दुसरे काय होणार की तुझा मुद्दा अनुत्तरीत राहणार. जे तुला बरोबर वाटणार नाही.

अंजली, नताशा >>> हो लिहिता येऊ शकतं. अश्विनीने तेच केलं. तिला जे सांगायचे होते तिने लिहिलं आपण वाचलं, प्रतिसाद दिला, ज्याला जे घ्यायचं त्यानं ते घेतलं. चर्चा तिथून पुढे आली.

आता जर तू अश्विनीला तिच्या प्रतिसादांसंदरर्भात प्रश्न विचारले तर ऊत्तराची नैतिक जबाबदारे तिने घेतली पाहिजे की नाही सांग. तिने ऊत्तर दिले तू पटले नाही म्हणून शांत राहिलीस तर मग तिने ऊत्तर दिल्याने काय साध्य झाले किंवा तुला प्रश्न विचारून काय साध्य झाले.

ऊदाहरणादाखल शूम्पीने मागे एक प्रश्न विचारला मी त्यावर भले मोठे काही खरडले. आता तिचे समाधान झाले का मला महित नाही. नाही पटले का तसेही लिहिले नाही. मग मी लिहून काय ऊपयोग झाला? माझी वेळ आणि एनर्जी खर्च झाली. दुसर्‍यांना मी लिहिल्याचा ऊपयोग झाला का? माहित नाही. राहिलेना ओपन एंड.

शैलजाला पटले नाही तिने जबाबदारीने डिसअ‍ॅग्री म्हणून मुद्दा बंद केला. मग आता त्यामुळे 'योजना अणि योजनेचे महत्व' ह्याबद्दल लिहिण्याची सध्यातरी गरज नाही असे ठरवता आले आणि नानबाचा मुद्द्याला व्यवस्थित ऊत्तर देता आले.
मला तरी, मला ऊद्देशून लिहिलेल्या पोष्टींना ऊत्तर देणे ऑब्लिगेटेड वाटते. ऊत्तर देणे शक्य नसल्यास मी तसे सांगेन मला जमणार नाही आपण हा मुद्दा नंतर बोलूयात.
आता मी काही ह्या बाफचा ठेकेदार नाही त्यामुळे असे ओपन एंडस तू दुसर्‍या कोणाशी चर्चा करतांना ठेवलेस तर मला काही प्रॉब्लेम नाही पण त्याने काही साध्य होते असे मला वाटत नाही.

अजून एक फसलेली उडी -

एका मोठ्या आयटी कॉर्पोरेटमध्ये असलेला एक मिडल लेव्हल मॅनेजर. जवळपास २० वर्षे आयटीत जॉब केला. आधीच्या आणि आताच्या कंपनीने भरपूर शेअर्स व ऑप्शन्स दिले. हा माणूस अत्यंत कष्टाळू. फारसा ब्रिलियंट नाही, पण अतिशय हार्डवर्कर. भरपूर कष्ट व निष्ठेच्या जोरावर हा खूप वर गेला.

वयाच्या ४३-४४ व्या वर्षी धाडस केले. कंपनीतल्या एका दुसर्‍या व्यक्तीने याला कन्व्हिन्स केले आपण स्वत:चा व्यवसाय सुरू करू. त्यांना कॉलसेंटर सुरू करायचे होते. याने जॉब सोडून बरेचसे शेअर्स विकून भागीदारीत कॉलसेंटर, बीपीओचा व्यवसाय सुरू केला. पार्टनरच्या स्वभावात लबाडी होती. आधीच्या कंपनीत पैशाच्या अफरातफरीचे त्याच्यावर आरोप होते व त्या कारणामुळे त्याला राजीनामा द्यावा लागला होता.

या माणसाने जवळपास २५-३० लाखांची गुंतवणूक केली. पहिल्यापासून सर्व काही फसत गेले. १-२ वर्षात लक्षात आले की कंपनीत खूपच प्रॉब्लेम्स आहेत. कंपनी सावरण्याकरता याने अजून १०-१५ लाख घातले. पण फायदा झाला नाही. शेवटी सर्व डोलारा कोसळला. कंपनी बंद करावी लागली. ४०-५० लाख गेलेले होते आणि जॉबही गेलेला होता.

आता वय झाल्यामुळे कोठे जॉबही मिळेना. शेवटी हा आपल्या मूळ खेड्याकडे परत गेला व तिथे आता वडीलोपार्जित शेती करतो.

चमन.. किल्ल्याच्या अ‍ॅनालॉजीची पोस्ट झकास..

स्केल अप च्या संदर्भात हे एक उदाहरण चालेल..

वयाच्या २३व्या वर्षी घरच्या अडचणींमुळे बँकेची नोकरी.. (१९७८)
२७व्या वर्षी बायको बरोबर स्टेशनरीच्या बिजनेसची सुरुवात. पण थोडे स्थैर्य हवे असल्यामुळे बॅंकेची नोकरी कायम. (१९८२)
स्टेशनरी सप्लाय करता करता कस्टमरांच्या आग्रहासाठी बरोबर प्रिटींगचा व्यवसाय सुरु. त्यात आधी फक्त पेपर वर छपाई.. बरोबर कॉम्प्युटरवर डिझाईगींग
कालांतरानी अजुन एका कस्टमर साठी कापडावर छपाईची सुरुवात. हे चालू असताना बँक एकीकडे चालूच..
१९९८ साली बँकेकडून कॉम्पुटर प्रशिक्षण आणि कॉम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये बदली...
२००० साली बँकेतून व्हीआरएस. आणि पूर्णपणे बिजनेस मध्ये लक्ष. त्या वेळा पर्यंत बिझनेस मध्ये पूर्णपणे कापडावर छपाईची सुरुवात.
२००४ साली कापडावर कॉम्प्युटराईज्ड एम्ब्रॉयडरीचे नवीन मशिन.. आणि त्याचे डिझायनिंग. ज्याचा आधीच्या बिझनेसशी फक्त कापड ह्या एकाच गोष्टीशी संबंध.
२००९ साली स्वतःच्या जागेत स्थलांतर... ह्या बरोबर्च प्रिंटींगमधल्या वेगवेगळ्या गोष्टी चालूच..

(मास्तुरे रेव्यु निवांत माझी अ‍ॅनालॉजी चुकत असेल तर जरूर सांगा)>>>> माझ्याबाबतीत तसा प्रकार नाहिय. डिटेल्स उद्या लिहिन. बाकि आजच इतक्या पोस्ट वाचल्या कि त्या परत वाचायला लागतील Happy

एक किस्सा आहे माझ्या मोठ्या आतेबहिणीच्या मिस्टरांचा. आता ते ५५ च्या जवळ आले आहेत पण पस्तिशीच्या आसपास त्यांनी करियरमध्ये तेव्हा नविनच असलेल्या क्षेत्रात उडी घेतली. आधीच्या नोकरीत ते एका जर्मन कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावर होते. त्यानंतरचं प्रमोशन मिळणार नव्हतं कारण त्या वर फक्त एक जर्मनच असू शकत होता. त्याकाळात म्हणजे साधारण ३५ वर्षांपुर्वी एक इलेक्ट्रिकल इंजिनियरींगची VJTI मधून डिग्री घेतलेला माणूस अचानक सॉफ्टवेअर मध्ये घुसला. सुरुवात ग म भ न गिरवण्यापासून केली. तेव्हा माझी आत्तेबहिण SBI मध्ये होती. १ वर्षांनी कंपनीतर्फे ऊसगावात गेले सगळेजण (बहिणीने LWP घेतली होती). तिथे कायमचं रहायचंच नव्हतं त्यामुळे प्रोजेक्ट संपताच परत येऊन बहिणीने नोकरी कंटिन्यू केली. मुलीला पुण्यात शाळेत घातले. अशी १० वर्षं एक पाय भारतात एक बाहेर असं ते मेहुणे करत होते. नंतर एक ठाम निर्णय घेऊन सत्यमसारखी तेव्हा तेजीत असलेली कंपनी सोडली कारण यापुढे भारताबाहेर जाणार नाही हा त्यांचा निग्रह होता. घरात त्यांची कॅन्सरग्रस्त वृद्ध आई, मोठी होणारी मुलगी, नोकरीवाली बायको असल्याने त्यांना इथेच रहाणं महत्वाचं होतं. सत्यम सोडल्यावर एका पुर्णपणे नव्याने स्थापन होणार्‍या सॉफ्टवेअर कंपनीचा सगळा सेट-अप उभारुन दिला. कुठे सत्यम आणि कुठे ती बारसं करायच्या वयाची नवी कंपनी ! पण माणसाच्या मनात कसलीही चलबिचल नाही. स्वतःला नक्की काय हवंय हे माहित होतं त्याप्रमाणे निर्णय घेतले गेले. मी एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे मग आता खाली कसा उतरू या विचाराने त्रास करुन घेणं नाही. अत्यंत सुखात आहेत, स्वतःच्या सासुसासर्‍यांचीही (माझी आत्या आणि तिचे यजमान) देखभाल मुलाप्रमाणे करत आहेत. त्यांना आता एकच काळजी आहे की इंजिनियरींगला असलेल्या मुलीचं करियर कसे आकाराला येईल त्याची. त्यासाठीही त्यांनी स्वतः काही ध्येयं ठेवली असतील, मार्ग आखून ठेवले असतील आणि मुलीलाही विचार करायला लावलाच असेल.

चमन,
त्या व्यक्तीला उपयोग झालाय किंवा नाही हे कदाचित तुम्हाला कळलं नसेल पण तुमची पोस्ट वाचून बाकी कुणाला उपयोग झाला असेल तर?
दिलेले उत्तर पटले नाही / पटले तर तसा रिस्पॉन्स द्या असं तुमचं म्हणणं असेल तर समजू शकते. पण उत्तर दिलं नाही तर तुमचे श्रम /वेळ वाया जाईल असं नाही. बरेच लोक रोमात राहून तुमची पोस्ट वाचत असतील.
हा माझा दृष्टीकोन आहे. तुम्हाला पटलाच पाहिजे असा आग्रह नाही ;). We will agree to disagree. :).

अंजली >> तुझा दृष्टीकोन मला नक्कीच पटला आणि मी ईथून पुढेही मला ऊद्देशून लिहिलेल्या पोस्टला न कंटाळता ऊत्तर देऊन चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करेनच. माझा आग्रह आहे असे नाही पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण पोष्ट लिहिल्यानंतर आपली नैतिक जबाबदारी वाढते आणि चर्चेच्या हितासाठी ती तेवढी पाळावी बस्स.

अश्विनी असे लोक फार चांगले गॉडफादर बनू शकतात. वेळात वेळ काढून तास दोन तास त्यांच्याशी नुसत्या गप्पा जरी मारल्या तरी सहामहिन्यांच्या मूल्यशिक्षणाची शिदोरी तयार झाली.

हिम्सकूल धन्यवाद अनुभव शेअर केल्याबद्दल. कदाचित एवढा लांबचा पल्ला गाठणार्‍याला मागे वळून पाहण्याचीही फुरसत नसते की आपली ऊडी कुठवर आली आहे. तुझी पोस्ट ज्यांच्याबद्दल आहे त्यांनीही ते वाचल्यास ईतरांबरोबरच त्यांनाही अजून आनंद, प्रेरणा मिळेल हे नक्की.

अरेच्चा. मी उत्तर दिलं नाही म्हणून रुसला की काय चमन? अरे बाबा, मी तुला स्पेसिफिकली काहीप्रश्न विचारला नव्हताच. मी जे म्हणले ते हे,हे,, मास्तुरे, रेव्यू, निवांत पाटील, अश्विनी के, आणि आता इन्ना यांच्या पोस्टीमधून त्यांनी त्यांना हवे ते बदल घडवून आणायसाठी जी आखणी केली, ज्या स्टेप्स घेतल्या त्या प्रकारच्या पोस्ट्स चा मला वैयक्तिक गुणात्मक फायदा झाला आणि त्यात अधे मध्ये ज्या चर्चात्मक पोस्ट होत्या त्यामुळे माझा खरं सांगायचं तर रसभंग होत होता. बदल हवा असेल आणि तो यशस्वी व्हावा अशी इच्छा असेल्तर काहितेरी योजना हवी याबाबत दुमत नाही. पण , काही लोकांना नाही आवडत खूप योजना बनवायला. They need to go with the flow and be spontaneous. मी आणी माझा नवरा याचं उदाहरण.मला नाही जास्ती योजना बनवत बसायला आवडत, त्याला फारच आवडतं, आणि मला त्याचा फायदा झाला तरी बरेचदा चिडचिड होतेच Wink

आता माझ्याकडून मी आणखी एखादी रसभंगात्मक पोस्ट टाकणार नाही.मला फक्त बदल घडवून आणणार्‍यांनी तो कसा घडवला हे वाचण्यात इंटरेस्ट आहे.त्यात तू पण आहेस चमन.तू एका पोस्ट मध्ये तसा काहितरी उल्लेख केला होतास पण बदल काय, कोणता, योजना काय, पायर्‍या कोणत्या हे स्पष्ट लिहिलं नव्हतस.लिहिशील का?

कोणी आपल्याला हवी असलेले बदल विशेष योजना न बनवता यशस्वी केले/झाले असतील तर ते देखिल वाचायला फार आवडेल.

कळावे राग नसावा ही विनंती Happy

Chaman uttar na denyaala barich karaN asu shakataat. Ekatar haa saarvajanik forum aahe. Tyaavar manaapaasun vaachaNare aahet tyapekshaa jaast durupayog karu shakaNare asu shakataat. Vichaar karun evadh mothhthh lihaayalaa nidaan ardhaa taas paahije. Kaamaatun vel kaadhun , connectivity milun lihiN naahee jamaNar kadaachit. Ajunahee kaahee mudde asu shakataat. TyaamuLe ekadam utaar dene naitik jabaabadaaree vagaire paryant pochaN malaa naahee paTat. :).( He maaz vaiyaktik mat aahe. )

स्केल अप आणि स्केल बॅक >>>

"मला बदल हवाय" आणि स्केल अप आणि बॅक ह्या दोन कशा सलग्न आहेत हे कळाले नाही! जर तुम्हला व्यवसाय क्षेत्रच बदलायचे असेल तर स्केल अप कसे करता येइल ? स्वतःच्याच क्षेत्रात आहे त्या पेक्षा जास्त मिळवणे हा "बदल" कसा होतो? हेही समजले नाही. एकाक्षेत्रातील अनुभ दुसृया क्षेत्रातही ग्राह्य धरत असतील तर ति क्षेत्रे सहसा सलग्न असतात अशावेळेस "बदल" ही करता येतो व तो स्टेप अप सुधा असु शकतो.

पण क्षेत्रच बदलायचे असल्यावर तो कायमच स्टेप बॅकच असणार ना! की आज मी अमुक कंपनीत मॅनेजर आहे म्हणजे मी असलग्न दुसर्‍या क्षेत्रात त्याच वा समांतर हुद्द्यवर असायला हवे?

स्टेप अप आणि बॅक चा मुद्दा सोडला तर जो अपेक्षित आहे तो "बदल" कसा करायचा/केला वा करताहेत हे वाचायला आवडेल.

अगदी बरोबर पेशवा! मी आधीही "अहगहणिहत" वेळा तेच म्हणालो हे 'स्केल अप आणि स्केल बॅक' राहू द्या बाजूला आणि नुसता अपेक्षित बदल आणि काय करायचे ते लिहा. पण त्या 'स्टेप अप आणि बॅकचे' एक्स्प्लनेशन मिळाल्याशिवाय तो मुद्दा सुटण्याची आणि चर्चा पुढे जाण्याची चिन्ह दिसेनात म्हणून पर्यायाने तेच लिहिणं आलं.

स्टेप अप आणि बॅक चा मुद्दा सोडला तर जो अपेक्षित आहे तो "बदल" कसा करायचा/केला वा करताहेत हे वाचायला आवडेल. >>> हेच ह्या बाफच्या कितीतरी पानांवर मी अगदी ह्याच तुमच्याच शब्दात म्हणालो. हेच जे गोल गोल फिरणे आहे ते मला टाळायचे होते. पण जमले नाही.

अरे ईन्ना! तुमचा गैरसमज झाला ती पोस्ट तुम्हाला ऊद्देशून नव्हती. माफ करा मी 'नैतिक जबाबदारीची' पोस्ट तुम्हाला ऊद्देशून लिहिलेल्या प्रतिसादात न लिहिता वेगळा प्रतिसाद म्हणून लिहायला हवी होती. ठीक आहे तुम्हाला जमेल तसे लिहा. घाई नाही.
पुन्हा एकदा सांगतो, जबाबदारीबद्दलच्या पोष्टीबद्दल मनावर घेऊ नका. ती तुमच्यासाठी नव्हती लिहिली.

मला वाटलं होतं हा धागा आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकणे किंवा नसाल करत तर बदल करणे असा होता....थोडक्यात थ्री इडियट्स मध्ये आमीरने मारलेल्या फ़ंड्यासारखा...:)
चुभुद्याघ्या.....

शूम्पी >> मी रुसलो कशाला म्हणतेस अजून इथे दणादण लिहितोच आहे की. Proud
जाऊदेत प्रत्येक शब्दासाठी ऊत्तर लिहित बसत नाही..त्याने अजूनच मेस होतोय.

तुला जे वाचायचंय, तेच मलाही, पेशवालाही आणि अजून बहूतेक सगळ्यानांच. मग घोडं कुठे अडलंय आता कळेना झालंय. घोडा का अडला 'न फिरवल्याने' पुन्हा 'बदल'.
तर आता पहिला बदल म्हणून मी अजून काही केऑस न करता कोणीतरी असा 'बदल आणि योजना' लिहिण्याची वाट बघतो. (थोडे आधीच सुचले असते तर बरे झाले असते असे वाटतेय.)

आणि मी लिहिणारंच आहे पण मला त्यासाठी थोडा वेळ हवा आहे. धागा विस्मरणात गेला तरी मी तो खणून काढेन आणि लिहिनच.

चमन, तुम्ही थोडा 'बदल'(मराठीत चेंज) म्हणून जरा विश्रांती घ्या मग पुन्हा जोमाने लिहा. थोड्या बदलाने जरा वेगळी उर्जा मिळेल इथे लिहण्याची. चेष्टा नाही करत आहे फक्त सुचवते आहे. तसे तुम्ही हुशार आहातच तुमच्याकडे योजना असतीलच कसे हाताळायचा लिहिण्याने आलेला शिणवा. Happy

चांगले लिहिता आहात, सांगताना फाफटपसारा करता पण ठिक आहे. तरी पण सगळ्याच पोष्टी पटण्यासारख्या नाहीयेत. Happy

आता काय पटले नाही ते लिहितेच, जबाबदारी स्विकारून.. उगीच चिडचिड नको व्हायला तुमची...

तुमचा जो मुद्दा होता दोन पानांमागे (काल वेळ न्हवता म्हणून आज लिहितेय.. )

योजना फूलप्रूफ असावी ह्यावर माझे मत.

जिंदगीत नेहमीच फूलप्रूफ प्लॅन असला की काही होत नाही हे बिलकूलच पटत नाही.
कारण कुठलीच योजना हे नेहमी १००% फूलप्रूफच असु शकते वगैरे अशी नसते असे अनुभवावरून वाटते पण ह्याचा अर्थ असा नाही की योजना बनवूच नये. हेच म्हणायचे आहे.
योजना असावीच, असु शकते कारण ठराविक अंतराला( शॉर्ट टर्म) गृहित धरून ती बनवतो व बनवू शकतो, कधी कधी ती पारही पडते ठरल्याप्रमाने.

पण फूलप्रूफ म्हणजे जसे की पोतडीत सगळं ठेवूनच मी नेहमी जीवनाचा प्रवास करतो जसं ठसका लागला , दिला पोतडीतून काढून आळशीचा रस, ताप आला घे कडूजिराईताचा रस, पडस झालं ,घे आल्याचा रस.. पण उद्या गाडीने ठोकलं तर काय काढून द्याल पोतडीतून? तुम्ही म्हणाल ईन्शुरनस आहे ना.. पण ते सुद्धा सगळच कवर करेल कशावरून? Proud

योजना करावी पण केलेली योजना ही फक्त एका आडाख्यावरच असते. आडाखे बदलले एका क्षणी तर मी थोडेफार बदल अपेक्षित आहेत ते स्वीकारू शकतो व त्यावर आणखी एक छोटी योजना जवळ बाळगून मात करु शकतो हा एक विश्वास ठेवून चालू शकतो आणि तरीही काही अनपेक्षित घडले तर ठिक आहे, शेवटी ह्यालाच बदल म्हणणार ना. Happy योजना करताना तुम्ही आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहात त्यानुसार सुद्धा योजना बनतात/बदलतात. रिस्कचा विचार घेवूनही व मिटिगेशन प्लॅन तयार असूनही कधी कधी तो नेमके त्या क्षणी त्या वेळी अगदी त्याच बाबतीत फेल होतो/होवु शकतो असेच पाहिले आहे/ अनुभवले आहे.

उलट 'ह्या' प्रवासात नवीनच नाळ सापडून वेगळीकडे प्रवास सुरु होतो. त्यामुळे जीवनात बर्यापैकी सहजता(मराठीत flexibility) ठेवली पाहिजे योजना करताना. नाहीतर नुसता स्ट्रेसच होतो कितीही प्लॅनिंग केले तरीही प्लॅन फसला म्हणून.

फु. स. : इथे लिहिताना तुम्हाला तुमची नाळ सापडलेसे वाटतेय.. मास्तर म्हणून चांगले बनून रहाल. (सल्ला फुकट आहे तेव्हा घ्याच हा आग्रह नाही) Happy
इति योजना पुराण संपुर्ण!

Pages