च्यायला ही नोकरी माझ्या आयुष्याची वाट लावणार. तीन वर्षे झाली नाईट शिफ्ट करतोय!
यार मला ग्राफिक्स डिझाईनमध्ये जायचं होतं सॉलीड आयडीयाज आहेत डोक्यात पण कोणते ग्रह फिरले आणि कायमचा टेस्टींगमध्ये अडकलो यार!
माझी ही फिरती कधी संपणार रे देवा? तीन वर्ष झाले लग्न होऊन सलग तीन दिवस सुद्धा घरी जेवायला
मिळत नाही. आज इंदुर, उद्या दिल्ली परवा जयपूर, पुढे कसं निभावणार?
विक्या साल्या सात वर्ष झाली तुला ह्या कंपनीत, टीम लीड होऊन दोन वर्षे झालीत येड्या आहेस कुठं?
तो दिल्लीवाला सुखबीर बघ दोन वर्ष ज्युनिअर आहे तुला आणि जर्मनीच्या प्रोजेक्टचा मॅनेजरपण झाला. का? तर आयआयएम लखनौचा शिक्का आहे त्याच्या कपाळावर. तू साल्या युनि टॉप फाईव्ह मध्ये होता ना आणि एवढी ब्राईट मेमरी आहे तुझी, तू करना कॅटचा अभ्यास आणि जा बी स्कूलला. लाईफ बनेल तुझी.
मुलगा हॉटेल मॅनेजमेंटला जायचं म्हणातोय, दोन वर्षांचा पाच लाख खर्च आहे, कसं जमवू. आडीपीएलवाले जॉब द्यायला तयार आहेत पण काम सध्या करतोय त्याच्याएवढं चांगलं नाही, पुन्हा हुद्दाही सध्यापेक्षा जरा कमीचाच मिळतोय, नुसत्या पैशांकडे बघून करू का शिफ्ट. मग इथे कमावलेल्या क्रेडीटचं काय?
काय वैताग नियम आहेत या देशाचे? आता माझ्याकडे भारतातली चांगली एमडी डीग्री असतांना, दोन वर्षांची प्रॅक्टीस असतांना इथे काम करण्यासाठी पुन्हा दोन वर्ष अभ्यास करा आणि परीक्षा द्या. छ्या नुसता टाईमपास. कशाला आलो ह्या देशात. ह्याच्या बदलीपायी माझ्या करीयरची वाट. पण मला कथ्थक फार छान येतं. पूर्ण पाच वर्ष महाराजांकडे प्रशिक्षण घेतलंय, रियाज चालूच आहे, स्टेज शोजचा अनुभव आहे मग मी इथे पण शोज करू का? प्रशिक्षण पण देऊ शकतेच की मी.
मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचंय, मी फॅक्टरीतून आल्यावर रोज किमान चार तास अभ्यास करतो.
दोन महिन्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ फक्त अभ्यास करणार. परीक्षा सहा महिन्यांनी आहे.
मला सध्याची नोकरी सोडून माझं स्वतःचं हॉटेल उघडायचंय मी आणि माझा मित्र पार्टनर होणार आहोत. एक हॉटेल चालवायलाही घेणार आहोत. पैशांची जमवाजमव करतोय.
मी आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय बदलले. फार नाही पण ठीकठाक पैसा कमावलाय पण बॉडीबिल्डींग कधी सोडली नाही. दरवर्षी मी लाखो रुपये खर्च करतो त्याच्यावर.
अरे तू कसला हजरजबाबी आहेस, तू आला की गृपला हसवून हसवून मारतोस, कुणी सुद्धा मी जातो असं म्हणत नाही. स्टँडअप कॉमेडीचा जरूर विचार कर.
अंगावर कामं घेऊन त्येच त्येच सुतारकाम करायचा लय कंटाळा आलाय. हे आजकालचे पोरं काय काय कोर्स करत्येत आणि आणि कायबी डोकं लढिवत्यात फर्निचर मध्ये. परवा एक असंच पोरगं आलं होतं कंपनीकडून कमिशनवर काम देतो बोलत होतं. त्याचं डोकं माझे हात. काय करावं?
अरे तो माझा मावस भाऊ आहे ना तो कसला चंपक आहे माहित्ये, थरमॅक्समधली पन्नासहजाराची एसीमध्येबसून कीबोर्ड बडवायची नोकरी सोडली आणि आता २० बाय २० च्या आणि पत्र्याच्या शेडमध्ये एक मशीन घेऊन वर्कशॉप काढणार आहे म्हणे.
अरे तो आपला १२ वीच्या वर्गातला तो होता ना बघ त्याचा ९८ चा गृप येऊन पण त्याने बाप बिल्डर म्हणून त्याच लाईनमध्ये जाण्यासाठी सिव्हिलला अॅडमिशन घेतली, अरे तो मर्चंट नेव्हीत गेलाय आता.
ह्या ना अश्या असंख्य घटना, असंख्य प्रसंग. एक विचार, मनाची एक उचल, वेडाची एक लहर, एक निर्णय आणि प्रयत्नांची पराकष्ठा पूर्ण आयुष्य बदलू शकते.
तुम्ही कधी असा विचार केलाय का? अशा पॅराडाईम शिफ्ट साठी प्रयत्न केलाय का?
पास या फेल मॅटर नही करता है बेटा बस जीजान से कोशिश करना जरूरी है. हे बाबावाक्य प्रमाण मानून कधी निर्णय घेतला आहे का? असे प्रसंग तुमच्या आसपास घडले असतील तर दुसर्यांसाठी प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन म्हणून ते इथे शेअर कराल का?
किंवा असं काहीतरी करायचं आहे पण प्रेरणेचा अभाव आहे, प्रयत्न चालू आहेत पण काही अडचणी येतायेत सल्ला हवाय, हो केलाय प्रयत्न, माझ्याकडे देण्यासाठी सल्ले आहेत......तरी इथे लिहा.
येस्स! आय कॅन विन, यू कॅन डू इट वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्या धाग्याचा मुख्य ऊद्देश अॅस्पिरंट्सना व्यक्त होण्यासाठी असा काहीसा आहे.
मी का लिहितोय?
............मीही काहीतरी ठरवलंय, प्रयत्न करतोच आहे, कदाचित इथे लिहिणार्यांकडून मिळालेली प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शनामुळे प्रयत्नांना गती मिळू शकेल.
अरे ठीक आहे ना, चमन ने योजना
अरे ठीक आहे ना, चमन ने योजना हा शब्द काय वापरला सगळे त्याच शब्दाच्या मागे लागलेत. तो काय म्हणतोय ते समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. त्याचे फक्त म्हणणे आहे की
तुम्हाला चेंज हवा आहे तर तो काय चेंज हवा आहे ते ठरले आहे का ? विचार केला आहे का ? जर ठरले असेल तर मग आता तो ठरलेला चेंज कसा मिळवायचा ते पण ठरवले आहे का ?
आता ह्यात काहींना चेंज काय हवा आहे ते कळलंय, काहींना अजून नक्की कळलं नाहीये, काहींना कळलंय पण काही अडचणींमुळे ते शक्य नाहीये. ठीक आहे ना मग.
ज्यांना कळलंय, त्यांना उपयोग होईल की नाही काही ठोस पावले उचलायला , जर आधी काही नीट प्लान्स आखले तर ?
रैना, शैलजा काय म्हणताहेत हे मला समजतेय आणि पटतेय. मी फक्त चमन चे म्हणणे मला जसे समजले तसे मांडायचा प्रयत्न केला आहे. असो.
झंपी फार नम्र विनोदी लिहू
झंपी
फार नम्र विनोदी लिहू शकतो पण तसे न लिहिता थेट लिहितो....
आता जे मी काल शैलजाला लिहिले तेच पुन्हा कॉपी पेस्ट करतोय. (अक्षरशः कॉपी पेस्ट आहे) तुम्ही वर जे म्हणालात ते आणि मी ईथे खाली जे लिहिले आहे ते त्यात काय वेगळं आहे ते मला सांगा. आयुष्य, नाळ, सल्ले वगैरे राहुद्यात.
--------
तू आणि मी बहूधा गोलच्या बाबतीत एकच गोष्टं थोड्याफार फरकाने म्हणतोय. तुम्ही 'आयुष्य घडणं, इवॉल्व्ह होणं' वगैरे म्हणतायेत आणि मी तेच ईवॉल्व्ह होणं छोटे छोटे मटेरीअल टप्पे गाठतांना आपोआप होत राहतं असं म्हणतोय. मी जरा जास्त बेसिक्सना चिटकून बोलतोय एवढंच.
आणि योजनेच्या बाबतीत म्हणशील तर 'योजना फ्लॉप होऊ शकते म्हणून बनवायचीच नाही' असा तुझ्या पोष्टींचा अर्थ निघतोय. हाच अर्थ बरोबर असेल तर मी म्हणेण 'ही खूप नाईव विचारसरणी झाली'
आयटीमधला एकसुद्धा प्रोजेक्ट योजना न बनवता घडून येतो का?
योजना फसते- कारणं कळतात- ती पुन्हा नव्यानं बनते- पुन्हाही फसू शकते- प्रोजेक्ट सक्सेफुली पूर्ण झाल्यावर आपण म्हणणार- ही योजना बहूतेक बरोबर होती. पुढे तश्याच प्रोजेक्टला आपण ही योजना वापरून बघू शकतो. नव्या परिमाणांमुळे ती यावेळेसही १०% फसू शकते. (हे तू आधीच बघू शकलीस आणि टाळू शकलीस तर चांगलंच आहे) पण ९०% तरी काम झाले ना तुझे. ऊरलेल्या १०% साठी पुन्हा तुझी योजना रिवाईज कर. एवढे सोपे आहे.
असो....
आयटी चा विषय निघालाच आहे
आयटी चा विषय निघालाच आहे तरः
इतक्यातच ऐकलेले वाक्यः
'इंडस्ट्रीमधे या क्रमाने गोष्टी होतातः रेडी, शूट, एम, शूट, एम, शूट, एम, ...,
तर अॅकॅड्समधे: रेडी, एम, एम, एम, एम, ....'
बहुदा अनेकांचे तसेच होते. योजना बनतात, पण त्या योजनाच राहतात. त्या फुलप्रूफ कधीच नसतात (असल्या तर त्या ट्रीव्हीयल असतात) म्हणून तुमच्या लेव्हलच्या रीस्कवर सेटल होऊन मारायची उडी (चमन म्हणतो त्याप्रमाणे कोणता बदल ते ठरवुन).
योजना करतांना तुम्हाला आज काय हवे आहे, उद्या काय हवे असेल, एका वर्षाने काय, ५, १०, २५, ५० वर्षांनी काय हवे असेल याचा थोडातरी विचार करून, अंदाज बाधून निर्णय घ्यायचा. तुमच्याकरता, जगाकरता. तो फळास येईलच असे नाही. पण म्हणून काय झाले?
मी हे सर्व केले आहे का? नाही. पण लिहीता-लिहीता पटते आहे, त्यामुळे करुनही पाहीन कदाचीत.
तुझी चिकाटी मानली चमन. आपण
तुझी चिकाटी मानली चमन.
आपण कितीही स्पष्ट लिहीले असे वाटले तरी वेगळ्या लोकांना त्याचा वेगळा अर्थ लागतो हे इथे मायबोलीवर फार सर्रास जाणवते. ह्याचं कारण माझ्यामते आपण आपला स्वभाव, आपले अनुभव ह्यांच्याशी अनुसरुन समोर जे लिहीलय त्याचा अर्थ काढतो.
तुला नेमकं काय म्हणायचय ते मला आणी इतर बर्याच लोकांना अगदी नीट समजलय, तसं त्यांनी स्पष्टपणे इथे लिहीलेही आहे. तुला हे पटवून द्यायचं कार्य पुढे न्यायचे असेल तर अर्थातच तो तुझा प्रश्न आहे पण मला तरी पुढे जाऊन तुला एके दिवशी, तुझ्या विचारसरणीला विरोध करणार्या लोकांकडून "आलं लक्षात" अशा युरेका टाईप, लाईट बल्ब वाल्या पोस्टी दिसतील ह्याची काही ग्यारंटी नाही.
मी आधी लिहील्याप्रमाणे आपण लिहीलेले मतं, विचारसरणी ह्याचा समोरच्याला लागलेला अर्थ हा कितीही नाही म्हंटल तरी सापेक्ष असतो. समोरच्यानी आपल्या विचारसरणीशी "आयडेंटिफाय" करावं ही गोष्ट फक्त समोरच्याच्या हातात असते आणि हे मान्य करुन पुढे सरकणेच प्रॅक्टिकल आहे. एक दिवशी जेव्हा त्यांना तुझ्या विचारसरणीशी रिलेट करता येइल तेव्हाच हा तिढा सुटेल.
हे सांगायचे कारण, मला तू "चेंज" घडवून आणणयाच्या दृष्टिनी घेतलेल्या पावलांबद्दल वाचण्यात जास्त रस आहे आणि मला वाटतय ह्या सगळ्या पोस्टपसार्यामुळे ते इथे यायला वेळ लागतोय.
चमन, तुम्ही फूलप्रूफ योजना
चमन,
तुम्ही फूलप्रूफ योजना असु शकते असे लिहिले आहेत त्यावर मी लिहिले माझे मत. व ते का पटले नाही बस इतकेच लिहिले.
मी नक्की कुठल्या पानावर वाचले ते पुन्हा बघावे लागेल. बाकी मुद्दे सेम आहेत तुमचे हे पटले.
पण मी योजने विरोधात नाहीये हे लक्षात घ्या.
आस्चिग, मवा, बुवा तुम्ही माझे
आस्चिग, मवा, बुवा
तुम्ही माझे काम बरेच सोपे केले. खूप खूप धन्यवाद.
झंपी योजना हवी ह्याबद्दल आपण एकाच पेजवर आलो हे छान वाटले.
आस्चिग म्हणतायेत तसं <<<<<< बहुदा अनेकांचे तसेच होते. योजना बनतात, पण त्या योजनाच राहतात. त्या फुलप्रूफ कधीच नसतात >>>>> हेच दुसर्या शब्दात असे की प्रत्येक योजना फ्लॉप होईपर्यंत फुलप्रूफच असते. कुठल्यातरी पायरीवर ती फ्लॉप झाली आणि तिला रिवाईज केले की पुन्हा फ्लॉप होईपर्यंत ती आपल्यासाठी फुलप्रूफच असते. दोन्ही वाक्यातले शब्द एकदम ऊलटे आहेत आणि वरवरचा अर्थही एकदम विरुद्ध आहे. म्हणून एकाच वाक्यात पुन्हा सारांश.
विचारपूर्वक बनवलेली कुठलीही योजना फुलप्रूफच असते..... फ्लॉप होईपर्यंत !!!! तात्पर्य कुठलीच योजना फुलप्रूफ नसते.......हीट होईपर्यंत. (ह्या रिझनिंगने गोंधळून जाऊ नका)
आपण कितीही स्पष्ट लिहीले असे वाटले तरी वेगळ्या लोकांना त्याचा वेगळा अर्थ लागतो हे इथे मायबोलीवर फार सर्रास जाणवते. ह्याचं कारण माझ्यामते आपण आपला स्वभाव, आपले अनुभव ह्यांच्याशी अनुसरुन समोर जे लिहीलय त्याचा अर्थ काढतो. >> बरोबरच आहे बुवा. म्हणूनच ते वेगवेगळ्या प्रकारे, अनेक ऊदाहरणांनी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यात १००% यश येणार नाही हे पक्कं माहित आहेच. म्हणून आता एखाद्या 'अचिवर' ने ईथे लिहीपर्यंत मी माझं कलम म्यान करतो.
आणि तोवर ह्या बाफवर लिहिणे आता माझी नैतिक जबाबदारी नाही हे ही नम्रपणे वगैरे
मी अलिकडेच Harvard Business
मी अलिकडेच Harvard Business Review मधे आलेला एक लेख वाचला. त्याची लिंक इथे देत आहे. त्यांचे सगळे मुद्दे मला फार प्रभावी वाटलेत. लिंक अशी आहे- http://www.businessweek.com/managing/content/feb2011/ca20110225_479098.htm
वर चमन ह्यांनी व्यवस्थानपनाच्या संदर्भात जे मुद्दे मांडलेत ते बर्यापैकी आजच्या व्यवस्थापनाला लागू पडतात. पण त्यांनी इथे लिहिण्याबद्दल जे काही विचार मांडलेत ते अजिबात पटले नाही. मुळात मायबोलीच्या प्रशासकांचे व्यवस्थापन इतके चांगले आहे का की इथे वाचकांनी आणि लिहिणार्यांनी इतका विचार करावा? इथे कित्येक बीबींवर वाद निर्माण होतात तेंव्हा प्रशासक गप्प असतात. जर त्यांनाच काही वाटत नाही तर इतर जे नीटपणे इथे येतात, लिहितात, वाचतात त्यांनाही नंतर नंतर मग वाटायला लागते की अरे इथे बरेच झोल आहेत. उदा: डुप्लिकेट आयडींची इथे फार मोठी समस्या आहे, कित्येक नियम स्वतः प्रशासक पाळत नाहीत किंवा त्यांचे लॉजिक कळत नाही. उदा. काल की एक धागा उघडला होता 'लांबलचक पोष्टींचा' तो उगाच बंद केला. त्यापुर्वी ईंगजी कवितांची मराठीतून चर्चा अशा स्वरुपाचा धागा उघडला होता तोही बंद केला. शिवाय लोक इथे उगाच प्रशासकांची त्यांच्यासमोर वाहवा करतात आणि तिकडे वाहत्या गप्पांच्या पानांवर जाऊन प्रशासकांना टोमणे मारतात. म्हणजे प्रशासकांसमोर ही लोक प्रामाणिक नसतात. पण इतर वाहत्या बाफांवर त्यांच्या मनातले खरे काय ते व्यक्त करतात. जाउ दे.
चमन, मी पण प्रश्न विचारले
चमन,
मी पण प्रश्न विचारले होते म्हणून प्रतिक्रिया देतोय. मी पुढे केले मुद्दे, आपल्याला महत्वाचे वाटले नाहीत,
म्हणून लिहिणे सोडले. असो, असे प्रश्न उपस्थित करताना, थेट नाव घेऊन लिहावे या मताचा मी आहे.
इथे मधे शेकडो पोस्ट्स
इथे मधे शेकडो पोस्ट्स पडल्यायत आणि त्या वाचायची चिकाटी माझ्यात नाहीये त्यामुळे वादाचा मुद्दा मला बहुदा कायमच अज्ञात राहणार असं दिस्तंय..
पण तरीही - वैद्यबुवांची पोस्ट अतिशय पटली
चमन तुम भी क्या याद करोगे..
चमन तुम भी क्या याद करोगे.. हेघ्या पुढच्या प्रश्नांचे उत्तर.:)
बाकी खरच ह्यावर कोणाला अजुन जाणुन घ्यायचे असेल तर आता मेल पाठवा. इकडे उगाच मुळ मुद्दा भरकटतो अस वाटत.
<<<<आता फक्त एकच शेवटची विनंती. एखादा छोटा गोल, अगदी छोटा उदा. 'तुमचा पहिलं स्ट्रक्चर डिझायनिंगचं कॉन्ट्रॅक्ट मिळवणं', ऑफिससाठी जाग सेट करणं, हे त्यात आलेल्या अडाचणींसहित कसं घडवून आणलंत' ते थोडक्यात लिहिणार का? अगदी छोट्यातला छोटा गोल त्याचं प्लॅनिंग , सेट बॅक्स आणि ईम्प्लिअमेंटेशन असं. कंटाळा करू नका नक्की लिहा. कदाचित तुमची पोष्टंच ह्या बाफचा रस्ता सुरळीत बनवेल >>>
पहिल काम मिळाल ते एका डिझाइन कॉम्पिटिशन मधे भाग घेउन. ( म्हणजे भाग बर्याच ठिकाणी घेतला होता ,इथे जिंकली स्पर्धा
) त्यामुळे एक प्रकारे आमच्या काम करण्याच्या कुवतीवर शिक्कामोर्तब झाल. आधी सान्गितल्या प्रमाणे चौघानी काम वाटुन घेतल होत. आज साठी , उद्या साठी आणि भविष्यासाठी काम शोधणे. आजची काम दुरुस्ती, एक्स्पानशन, फिजिबिलिटी रिपोर्ट बनवणे, वगैरे स्वरुपाची होती. त्यातुन एक व्हिजिबिलिटी निर्माण झाली. आमच्या पाटीवर फुटकळ का होइना लिस्ट दिसायला लागली. ह्यातुनच सम्पर्क वाढले. जुने क्लाएन्ट्स ज्यासाठी पुर्वी काम केल होत, त्यान्च्या पुढच्या कामासाठी बोलवायला लागले. इथे आमच्या लहान पसार्यामुळे कमी/ वाजवी फी आकारुन काम करुन देउ शकणे हा आमचा अजुन एक प्लस पॉइन्ट झाला. बाजारपेठेचा अभ्यास चोख चालु होता. त्यामुळे कुठे काय काम येउ शकते तिथे सर्वात आधी पोचणे हे पण केले. ह्याला आम्ही उद्यासाठी काम शोधणे म्हणायचो.
मी जिथुन बाहेर पडले तिथलेच मी शिकवुन तयार केलेले २ ड्राफ्ट्स्मन माझ्या कडे आले, बस्तान बसे पर्यन्त पगार मागणार नाही म्हणत. हे मला धक्कादायक पण त्याच वेळी फार फार स्फुर्ती दायकही होत. कोणीतरी एवढा अपार विश्वास ठेवत आपल्या कुवतीवर ह्याच दडपण सुद्धा आल. पण निभावल. जमा पुन्जीमधुन पगार पहिल्या दिवसापासुन केले. प्रयत्न कर्तेय म्हणुन फुकट कोणाकडे मागितल नाही. पहिला प्रोजेक्ट मिळाल्यावर जागा भाड्यानी घेतली. प्रत्येक प्रोजेक्ट्गणिक लागतिल तशी माणस गोळा केली. आज पेहली तारिख है च्या दुसर्या बाजुला बसुन२५तारखेपासुन काय टेन्शन येत ते अनुभवल :).
) गोळा करायला मजा येतेय.
अजुन जागा भाड्यानी घेतलेली आहे. माझ्या साठी ,पहिले सहा आठ महिने पगार घरी यायच्या ऐवजी जमापुन्जी तळ गाठत होती तरी ज्या ज्या लोकाना कामावर नेमल त्यान्चा पगार ठरलेल्या दिवशी नियमानी केला. ह्यामुळे आमच्या कडचा प्रत्येक जण खरच आमच मनुष्यबळ आहे. इथेपर्यन्त खरतर कोणतीही जाणिवपुर्वक योजना आखणी केली नाही. पहिल वर्ष सम्पताना मागे वळुन पाहिल , वाटल हे जमतय की! मग गोल्स, बजेट , रिव्ह्यु वगैरे वगैरे चालु केल. आज आमची कम्पनी प्रा. लि. आहे. २०२० पर्यन्तचा मार्ग आखला आहे. पण तसच हे पण लक्षात ठेवल आहे की जग आपल्या नियोजनाला मान देउन पुढे सरकणार नाही. भारतात होणारी परदेशी गुन्तवणुक , (कारखाने स्वरुपाची ) जगातल्या बर्याच इतर घडामोडीन्वरच उत्तर असते. ह्या व्हेरीएबल्स्चा अभ्यास सुरु केला. एक आर्किटेक्ट म्हणुन असा अभ्यास केला नव्हता , गरजही नव्हती. पण हा पट मान्डायला मजा आली. आणि त्या साठी लागणार ज्ञान( डोक्यावरुन गेल पहिल्यान्दा ,भारताची एकॉनोमिक पॉलिसी वगैरे वाचल्यावर
ओ चमन दादा आता आणखी इचार्पुस नको बर्का. दुसर्या कोणावर तरी द्या राज्य. आपली टैम्प्लिज! तास्भर जातो यवढ लिवायला !
इन्ना, पुन्हा एकदा
इन्ना, पुन्हा एकदा स्फुर्तीदायक पोस्ट.
आश्चिग, चमन पोस्ट आवडल्या.
चमन तुमची चिकाटी अगदी वाखाणण्याजोगी आहे.
चर्चेत उपयोगी असे काही मी लिहित नसले तरी वाचुन फायदा होईलच असे वाटतेय.
इन्ना- भारी पोस्ट. चमन, खालची
इन्ना- भारी पोस्ट.
चमन, खालची पोस्ट इंट्रेस्टिंग आहे.
शैलजा
इन्ना, रैना दोघींच्या पोस्टी
इन्ना, रैना दोघींच्या पोस्टी खूप आवडल्या.
तुझे पोस्ट वाचताना बरेच ठिकाणी 'अगदी, अगदी' झाले रैना.
वॉव रैना! खूप छान लिहिलसं.
वॉव रैना! खूप छान लिहिलसं.
आज पेहली तारिख है च्या
आज पेहली तारिख है च्या दुसर्या बाजुला बसुन२५तारखेपासुन काय टेन्शन येत ते अनुभवल>> मेरे वो दिन गये गये. तेव्हा मीही अशी उत्कट पोस्टे टाकत असे. इन्ना तुम्हाला मनापासून शुभेच्छा. इट इज अ थ्रिल्लिन्ग राइड. माझी प्रा. लि. कं सध्या कार्टनात बंद आहे.
बी, प्लीज माझ्या
बी,

प्लीज माझ्या क्षेत्राबद्दलचा उल्लेख काढशील का प्लीज. एकतर यांनी धागा सार्वजनिक केला आहे.
मी ती पोस्टच थोड्या वेळा नंतर उडवेन.
उत्तर हो. तुला प्रोजेक्टस बद्दल माहिती हवी असेल तर ईमेलने देईन.
रैना, सॉरी मी बदल केला आहे
रैना, सॉरी मी बदल केला आहे माझ्या पोष्टमधे. मला नक्कीच तुमच्या प्रोजेक्टबद्दल वाचायला आवडेल.
आयुष्यातल्या कुठल्याहि
आयुष्यातल्या कुठल्याहि टप्प्यावर, चाकोरीबाहेर जाण्याचा धाडसी निर्णय घेणार्या सगळ्यांचं कौतुक. आणि घेउ पाहत असणार्यांना शुभेच्छा!
मी तर चक्रावुनच गेलोय. असं म्हणावसं वाटतंय... आय नीड अ ड्रिंक; ए लार्ज स्काच. सिरियसली!
है शाब्बास ईन्ना आणि
है शाब्बास ईन्ना आणि रैना.
तुमच्यामुळे आजच दिवस सुरू होताच सार्थकी लागला. वावा
ईन्ना,
ईनंती चा मान राखल्याबद्दल लई धन्यवाद.
बस्तान बसे पर्यन्त पगार मागणार नाही म्हणत. >>> कुठे राहतात असे लोक? नक्की कसे दिसतात?
२०२० पर्यन्तचा मार्ग आखला आहे.>>> ग्रेट!!! केवढा विश्वास आणि केवढी दूरदृष्टी हवं हे करायला. डिसें २०१२ साठीची काय योजना आहे ते विचारणार होतो
ईन्ना तुमच्या प्रत्येक वाक्यातून लाख मोलाचं मिळालं आहे (आय मीन ईट). प्रत्येक वाक्य घेऊन काय मिळालं हे खूप सांगावसं वाटतंय पण ते माझ्यापुरतंच राहूदेत.
तुम्हाला लिहून छान वाटत असेल तर जमेल तसं लिहित रहा.
रैना,
केवढे मस्त लिहिलेस.
गिरते है शहसवार ही मैदान-ए-जंग मे,
वो तिफ्ल क्या गिरे, जो घुटनो के बल चले.
हे तर मी आता पाठंच करून ठेवलंय (त्या 'तिफ्ल' ला जीभ अडखळते पण जमेल संध्याकाळपर्यंत नक्की) . साचलेपण यायला लागलं की जप करायला मस्त आहे.
तुझ्या ह्या पोष्टीतून केवढे तरी गोल्स अचिव केल्याचं दिसतंय. तू त्याला 'वहात रहाणं' म्हणतेस मी त्याला एकेक हात मारत पुढे पुढे पोहोणं म्हणतोय. एवढाच काय तो फरक.
फुकटचे श्रेय किंवा धन्यवाद सुद्धा मिळत नाही असा प्रोजेक्ट मागुन घेते >>> मला हे जमवणं सध्या भयंकर निकडीचं आहे.
हॅरीचे 'डिपार्टमेंट ऑफ मिस्टरीज' आठवा. एकेका दारावर ठोठावले की पाहिजे तर काट मारायची, पाहीजे तर आत जायचे, रहायचे, पाहीजे तर पुढे जायचे. >>> कर्रेक्ट्..दार ठोठावत राहणे महत्वाचे. ते ऊघडल्यावर काय करायचे ह्याच्या योजना बनत, बिघडत, हारत, जिंकत राहतीलच.
दिनेशदा>> माफ करा. पण आता त्याबद्दल चर्चा नकोय असं ठरलंय.
आला!! बाफ १००% लायनीवर आला. आता १०० च्या स्पीडने पळावा ही अपेक्षा.
खरंच चेंज हवा आहे का, आणि
खरंच चेंज हवा आहे का, आणि असल्यास कोणता, हे जाणून घ्यायचे असेल तर अशा एखाद्या प्रश्नाचा गंभीर विचार करावा:
मला जर आज अचानक १० लाख (किंवा १० कोटी) रुपये मिळाले - नो स्ट्रींग्स अॅटॅच्ड - तर मी काय करीन?
तुम्हाला बदल तुमच्यात करायचा आहे, की तूमच्या राहणीमानात, की तूमच्या आजुबाजुच्या लोकांमधे ते लक्षात येईल.
मी असा विचार केलेला नाही. करायला हवा. झेन तत्वज्ञान मला पटते असे नाही, पण आवडते नक्कीचः
Sitting quietly doing nothing,
Spring comes, and the grass grows by itself.
(रेमंड स्मुलयानच्या 'द डाओ इज सायलेंट' मधून)
हो ग रैना.. लश्कराच्या
हो ग रैना.. लश्कराच्या भाकर्या लिमिटेड भाजते पण एकंदरीत नवीन काय काय करून बघायचे (जुनं करून बघितलेलं रिवाईज करायचे) उद्योग सतत चालूच असतात.
मला जर आज अचानक १० लाख (किंवा १० कोटी) रुपये मिळाले - नो स्ट्रींग्स अॅटॅच्ड - तर मी काय करीन?
तुम्हाला बदल तुमच्यात करायचा आहे, की तूमच्या राहणीमानात, की तूमच्या आजुबाजुच्या लोकांमधे ते लक्षात येईल. >> प्लॅन रेडी आहे आशिष, पैसे मिळायचीच खोटी
दिनेशदा लिहा तुम्ही, एखाद्याला नसेल पटलं म्हणून सगळ्यांनाच नाही पटत असं नाही होतं..
योजनेसंदर्भात एक गमतीशीर आठवण
योजनेसंदर्भात एक गमतीशीर आठवण सांगाविशी वाटतेय,
मी अकरावीत असतांना वडिलांना दुकानात मदत करत असे, आमचे परंपरागत घाऊक धान्याचे दुकान आहे. दाळ, तांदूळ, रवा, मैदा वगैरे. १९९७-९८ साली अकरावी म्हणजे बारावीची पूर्वतयारी असे न म्हणता दहावी आणि बारावी मधला 'ऐश का टाईम' असे होते. तर ह्यावेळी नवीनच कॉलेजची हवा लागल्याने 'लायनीची' खोज (आमची आमचीच, ह्यात आईवडिलांचा काही सहभाग नव्हता) फार युद्धपातळीवर चालू होती. त्यामुळे क्रिकेट आणि बाजारपेठा किंवा देवळे इथे चकरा मारणे एवढीच काय ती कामं होती. तर वडिलांनी मला दुकानाची ड्यूटी लाऊन दिली. आमचे घर जिल्ह्याच्या ठिकाणी होते आणि सगळी गिर्हाईकं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणची सर्व लहान मोठी किराणा दुकाने. प्रत्येक दुकानाची तालुक्यांच्या गावाची एकेक लाईन असे (तसली लाईन नव्हे हो).
ऊदा. नगर जिल्ह्यातले दुकान असेल तर त्यांची गिर्हाईकं म्हणजे 'श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव' अशी. आता कोणी राशीनचे गिर्हाईक आले तर आम्ही म्हणणार ' नाय बा ती आपली लाईन न्हाईच, अमूकतमूक करतो ती लाईन, थिकडून माल घेवा! जावा'
असे का तर, ह्या व्यवसायात ऊधारीची बात असते. माल घेतल्यापासून महिन्याभरात घेतलेल्या मालाचे पैसे द्यायचे. आणि एकदा का त्या गिर्हाईकाचे खाते आपण आपल्याकडे ऊघडले की ते गिर्हाईक दुकानात येत नाही आपणच दर आठवड्याला ठराविक दिवशी सकाळी निघून (शक्यतो ज्या दिवशी तालुक्याचा बाजार असतो त्याच्या दुसर्या दिवशी कारण त्या दिवशी त्यांच्याकडे भरपूर पैसे जमा झालेले असतात आणि मालही बराच संपलेला असतो त्यामुळे ऑर्डरही चांगली मिळते) तालुक्याच्या गावी जाऊन तिथल्या आपल्या सगळ्या गिर्हाईकांकडून ऑर्डर घेऊन, महिन्यापुर्वीच्या मालाचे पैसे घेऊन संध्याकाळाच्या गाडीने परत येणे असा नेम असे. ऊधारीची बात असल्याने विश्वास वाटत नसल्यास अथवा मध्ये कोणी हमीदार नसल्यास आम्ही असे नवीन कुणाला माल देण्याच्या फंदात पडत नसत. रोख देऊन माल घेणारा असेल तर मला त्यादिवशी चहा सांगून ये, लिंबूपाणी घेऊन ये अशीही कामे पडत.
माझा मामाही अश्याच तालुक्याच्या गावी रहात असे, ते गाव काही आमच्या लायनीत नव्हते आणि मामा जरी ह्या किराणा व्यवसायात नसला तरी त्या व्यवसायातल्या लोकांशी त्याचा संपर्क मोठा होता. मग मला दहावी-अकरावीच्या सुटीत काहीतरी प्रोजेक्ट द्यायचा म्हणून वडिलांनी आणि मामाने त्याच्या तालुक्याच्या गावी दोन्-तीन गिर्हाईकांना पटवून व्यवस्थित सेटींग करून (पैशाची फार मोठी रिस्क न घेता) त्यांची खाती मला सांभाळण्यास दिली. मीच त्यांना मालाचे भाव सांगायचे, डील करायचे (वडिलांनी एक रेंज ठरवून दिलेली असायची, बार्गेन करत हळूहळू खाली ऊतरायचे.) आणि शनिवारी (बाजार शुक्रवारचा) जाऊन पैसे (ह्या लोकांना 'चेक' द्या म्हंटले तर पायताण काढून हुंगायला देतील आणि ऑर्डरही देणार नाहीत. कारण बँक खाती वगैरे त्यांच्या नियमांत नव्हते. बँक फक्त सोनं सुरक्षित ठेवायला असते एवढेच त्यांना माहित) आणि नवीन ऑर्डरी घेऊन यायच्या असे ठरले. पण मी लहान असल्याने आणि सगळे शेठ लोक वयाने ४०-५० शीचे असल्याने ते फार घासाघीस करत नसत. मामाची पुण्याई की त्यात त्यांना चॅलेंज वाटत नसे माहित नाही. ऊलट ते मला बिस्किटं, काजू, पिस्ते असे काहीबाही देत रहात. (मी त्यावेळी लहान असल्याने चहा पित नसे
) वरून मामीच्या हातच्या शिक्रणाचाही बोनस असेच. मामाचे गाव साधारणतः आमच्या गावापासून दोन्-तीन तासांवर होते पण थेट गाडी नसल्याने ती दोनतीन वेळा बदलावी लागत. काहीही करून मामाच्या गावावरून निघणारी ४ ची गाडी पकडायचीच नाहीतर त्यादिवशी मामकडेच रहायचे असा दंडक वडिलांनी घालून दिला होता. असे तालुक्याच्या गावी जाण्यास आम्ही 'तगाद्याला जाणे' असे म्हणत असू. पण कोण कुठल्यादिवशी कोणत्या गावी तगाद्याला जातो हे मोहिमेसारखे गुप्त ठेवावे लागे (बिझनेस सिक्रेट). नाही तर दगा फटक्याचा फार धोका असे. अशी लुटमार वर्षातून एखाद्याचा बाबतीत घडतच असे. आठवड्याच्या बाजाराचा दिवस कोणता आणि लाईन कोणती ह्याची माहिती जगजाहीर होती तरी वेळा बदलून, गाड्या बदलून पैसे सांभाळून आणायला लागत. पाऊस वगैरे चांगला न झाल्यास असे प्रकार तर खूपच वाढत.
तर सांगायचे असे की वडिलांनी एक सॉलीड योजना बनवून दिली.
एवढ्या वाजता निघायचे पण तीच गाडी पकडायची नाही.
.
कधी ह्या गावाची गाडी पकडायची कधी दुसर्याच.
मग तिथून अजून दुसरीच गाडी पकडून मामाच्या गावापर्यंत पोहोचायचे. गाडीतले चेहरे न्याहाळत रहायचे.
एकच चेहरा सगळ्या गाड्यात दिसला म्हणजे आपला पाठलाग होतोय. हे नक्की.
नेहमी ढगळ शर्ट घालायचा. बूट घालायचे. चप्पल घालायची नाही.
प्रवासात काही खायचे नाही. पाणीही नाही म्हणजे कुठे ऊतरायला नको
नेहमी एकाच क्रमाने गिर्हाईकांकडे जायचे नाही. हा क्रम बदलत रहायचा.
पैसे ठेवायची बॅग कशी असावी, ती कशी पकडावी. गाडीत पैसे कसे सांभाळावे. त्यावर लक्ष कसे ठेवावे. जास्त करून चढतांना ऊतरतांना असे सगळे स्वतः करून दाखवले.
कधी दोन गिर्हाईकांकडे जमा केलेले पैसे तिसर्या विश्वासू गिर्हाईकाकडे ठेऊन द्यायचे आणि नुसतीच रिकामी बॅग घेऊन चौथ्या, पाचव्याकडे जायचे. मग परतीच्या वाटेवर ते ठेवलेले पैसे परत घ्यायचे.
कधी आठवड्यात मामाची आमच्याकडे चक्कर होणार असेल तर पैसे मामाकडेच ठेवायचे. असे खूप काही होते त्या योजनेत.
आणि दुसर्या दिवशी निघायच्या आधी मी कोणत्या रूटच्या गाड्या पकडणार आहे आणि कोणत्या क्रमाने गिर्हाईकांना भेटणार आहे, कोणत्या मालाचे सँपल्स बरोबर घेऊन जाणार आहे असे सगळे कागदावर लिहून द्यावे लागे.
असे काही महिने सुरळीत चालले. पहिल्या सत्रात अकरावीचा तसाही काही फार अभ्यास नव्हताच. पैसेही दिसत होते मिसळ बिसळ, आईस्क्रीम , सिनेमा असे खर्चायलाही मिळतही होते म्हणून मलाही आनंदच होता. पण एकेदिवशी होऊ नये तेच झाले. तालुक्याच्या बाजापेठात कितीही नाही म्हंटले तरी गर्दी असतेच. त्यात एस्टी स्टँडजवळचे दुकान असेल तर जास्तीच. अश्याच वेळी गर्दीतून वाट काढतांना कोणीतरी पैशांची पिशवी धरलेल्या हातावर ब्लेड की लहान चाकू काहितरी मारले. प्रचंड कळ जाणवली पण नेमके काय झाले कळले नाही, पिशवी छातीशी धरून गर्दीतून वाट काढत बाहेर आलो तर ऊजव्या हाताची बाही रक्ताने गच्च. मी कदाचित वेदनेला हार जाऊन हातात धरलेली पिशवी टाकून देईन शी त्याची योजना असावी (हो मग तेही योजनेशिवाय थोडेच काही करतात) मग जरा धावतंच एका दुकानात घुसलो. नशिबाने त्याच्याकडे फोन होता. मामाला फोन केला. त्याने लागलीच कुणाला तरी मला घ्यायला पाठवले.
मग त्यानंतर दोन्-तीन आठवडे गेलो नाही. मग वडिलांनी दुकानातल्या एका हमलाच्या शाळा सोडलेल्या ऊडाणटप्पू पण अंगाने धिप्पाड मुलाला तिकिटाचे, खाण्यापिण्याचे आणि अजून वर काही असे पैसे देऊन माझ्यासोबत दर आठवड्याला तालुक्याच्या गावी जाण्यास राजी केले.
पुढे बारावीनंतर मी ईंजिनियरिंगला गेलो आणि मग दुकान सुटले ते कायमचेच. वडिलांनी बाईक घेऊन देतो ईथल्याच ईंजि. कॉलेजात अॅडमिशन घे आणि दुकानात मदत करत रहा असे अमिष दाखवले होते पण माझी योजना बाहेर पडायचीच होती तर मी नाही म्हणून टाकले. आजीलाही योजनेत सामील करून घेतलेच होते मग त्यांनी दुसर्यांदा काही विचारले नाही.
सही रे चमन! भारी अनुभव!
सही रे चमन!
भारी अनुभव! वडिलांनी मुद्दाम जवाबदारी टाकली ते भारी वाटलं नाहीतर लहान लहान करत पोरं मोठी घोडी होतात अन पैसे संभाळणे, हिशोब, जवाबदारीने काम करणे ह्याची बोंब होते.
हो बुवा.. एकट्या माणसाने
हो बुवा.. एकट्या माणसाने व्यवसाय सांभाळायचा म्हंटल्यावर फार ओढाताण होते. यश वगैरे येत जात राहते पण गेलेली वेळ येत नाही. म्हणून कमीत कमी चुका करणे ईष्टं आणि म्हणूनच योजना आवश्यक.
त्यांची ओढाताण बघूनच I dont belong here असे ठरवून टाकले होते.
मला जर आज अचानक १० लाख (किंवा १० कोटी) रुपये मिळाले - नो स्ट्रींग्स अॅटॅच्ड - तर मी काय करीन? तुम्हाला बदल तुमच्यात करायचा आहे, की तूमच्या राहणीमानात, की तूमच्या आजुबाजुच्या लोकांमधे ते लक्षात येईल. >>>>> अगदी बरोबर आस्चिग.
हवासा बदल ओळखण्याची ही प्रक्रिया सोपी जावी म्हणून आज अलादिनचा जिनी माझ्या समोर अवतरला आणि म्हणाला 'कुठलाही एक बदल सांग, पटकन करून देतो' तर मी काय सांगू? असा बेसिक प्रश्न आपण आपल्यालाच विचारून बघावा. सांगितलेला बदल करून झाला की पुन्हा विचारावा. काही काळ ह्या बदलांचा कंटाळा आला तरी काही हरकत नाही, तेव्हा शांत रहावे.
'काय बदलू?' ह्याचे ऊत्तर काहीही येऊ देत....
'मला वेळ नाही म्हणून सेल फोनची रिंग टोन बदलून दे' किंवा
'स्मोकिंग मुळे निकामी झालेली माझी फुफ्फुसं बदलून दे' किंवा
'रॅट रेस मुळे मनात नसतांना मी ग्रिडी बनत गेलो तर माझ्या स्वभावाचा हा भाग बदलून दे'
असे काहीही. तर जिनी काय म्हणेल,
१) मी तुझ्या कामातून तुला दहा मिनिटं वेळ मिळवून देतो...तू रिंगटोन बदलून घे.
२) मी तुला चांगल्या डॉक्टरचा पत्ता देतो, तू भरत असलेल्या आयुर्विम्याचे पैसे काढून देतो, थोडे धैर्य देतो तू ऑपरेशन करून घे.
३) मी तुला मेडीटेशनचा ऊपाय सांगतो. कामातून थोडा वेळ मिळवून देतो त्याने मन स्थिर होते.
असा प्रत्येक बदल आनंदाशिवाय अजून काय घेऊन येणार?
अहाहा!!! मला मि. नेल्सनची फार आठवण येतेय, त्याची जिनी (जेनी)
इन्ना, रैपो,पोस्ट
इन्ना, रैपो,पोस्ट आवडल्या.
चमन, भारी अनुभव!
चमन, योजना आखायचे जीन्स कुठून
चमन, योजना आखायचे जीन्स कुठून आले ते समजले. मस्तच अनुभव असणार तो. जबाबदारी आणि थ्रिल!
इन्नाच्या दोन्ही पोस्ट आवडल्या. विशेषतः आज, उद्या आणि पुढे हे धोरण.
इन्ना, रैना आणि चमन अप्रतिम
इन्ना, रैना आणि चमन अप्रतिम पोस्ट!
माझाही छोटा अनुभव सांगतो. इतरांच्या तुलनेत काहीच नाही तरीही....
पीजीचा रिझल्ट हातात पडायच्या आतच मी प्युअर सायन्समधे (डेव्हलपमेंटल बायॉलॉजी) रिसर्च ट्रेनी म्हणून लागलो. हेच आपले करिअर अशी पक्की खात्री होती. पण त्यात ६ महिने झाल्यावर कळले की हे काय आपण एंजॉय करीत नाही, आय वॉज ड्रॅगिंग माय फीट टू वर्क. हा सॉलिडच धक्का होता कारण तोपर्यंत दुसर्या कोणत्याच क्षेत्राचा विचारच केला नव्हता. पण मग 'जहां नही चैना वहां नहीं रहना' असा साधा विचार केला, तीन वर्षाची फेलोशीप (जी मला डॉक्टरेट्पर्यंत नेउ शकली असती) नाकारली आणि बाहेर पडलो.
माझ्या शिक्षकांच्या मदतीने पाचगणीतील एका निवासी शाळेत ३ महिन्यासाठी लीव्ह व्हेकन्सीवर शिक्षक म्हणून अतीटेंपररी जॉब घेतला, धिस वॉज टर्निंग पॉईंट. पहिल्याच दिवशी वर्गात शिकवताना एकदम आतून वाटले की हे जमतेय आणि मजाही येते आहे. या क्षेत्रात यायचे तर पूर्ण तयारीनिशी असा विचार केला, तीन महिन्यांनी तो जॉब सोडला आणि सरळ बीएडला अॅडमिशन घेतली.
बीएडनंतर पहिली नोकरी पन्हाळ्यात एका निवासी कॉलेजमधे लागली. ती तीन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि व्यावसायिक पायाभरणीची होती. प्रयोगशाळा उभी करण्यापासून ते पालकांशी डील करण्यापर्यंत भरपूर अनुभव मिळाला आणि आपला निर्णय योग्य होता याची खात्रीही पटली.
या वेळेपर्यंत थोडेफार साचलेपण येऊ लागले होते, आपण कधीही जाउन शिकवू शकतो असा बनचुकेपणा यायची भिती होती. त्यामुळे मी वेगळ्या चॅलेंजच्या शोधात होतो, जे मला आयबीच्या सिलॅबसमधे मिळाले. त्याचवेळी माझ्या संस्थेने कॉपी पुरवणार्या सेंटरवर १२ची परिक्षा नेण्याचा घाट घातला आणि माझा उडी मारण्याचा निर्णय सोपा केला!
पुढचा स्टॉप राजकोट- इथली संस्था जुनी आणि प्रचंड मोठी, वेगळेच वर्क कल्चर, पण पुन्हा महत्वाचा मुद्दा म्हणजे 'मजा आली'. तेथून केंब्रिज युनिव्हचा ऑनलाईन डिप्लोमा केला, आयबीचे वर्कशॉप्स, त्यांच्या कामाची पद्धत मुळातून शिकता आली. मग त्याहून चांगली संधी आली आणि मी परत उडी मारली.
आताच्या शाळेत तीन वर्षे होत आली आहेत. नवीन संस्था असल्याने इथेही अनेक गोष्टी मुळापासून घडवाव्या लागल्या. मला प्रस्थापित व्यवस्थेत काम करण्यापेक्षा नवी सिस्टीम बनवायचे चॅलेंज आवडते. त्याचबरोबर
'बेटर टू बी फर्स्ट इन अॅन आयबेरिअन व्हिलेज दॅन सेकंड इन रोम' अशी जरा वृत्ती असल्याने छोट्या जागेतली मोठी जबाबदारी हे जास्त आवडीचे.
आता पुन्हा एकदा पीएचडीची तयारी चालवली आहे, पण सायन्स एज्युकेशनधे. ५ वर्षाचे टार्गेट आहे.
आयबीमधेच हॉरिझाँटल ग्रोथला (एक्झामिनर, वर्कशॉप लीडर इ.इ.) बराच वाव आहे, त्यादृष्टीनेही प्रयत्न आहेतच
या छोट्याश्या प्रवासात काही गोष्टी शिकलो-
सतत इव्हॉल्व होण्याला, शिकत राहण्याला पर्याय नाही,
आधी काम; दाम फॉलोज!!!
हे सगळे असले तरी माझे मूळ सूत्र तेच आहे- 'कामात मजा आली पाहिजे'. भौतिक प्रगती होत राहते, तिचे पॅरॅमीटर माझ्यातरी उपयोगाचे नाहीत.
लिहिताना जाणवले की चमन म्हणतो
लिहिताना जाणवले की चमन म्हणतो तशी काही योजना ठरवूनच हे सगळे बदल केले पण माझे मोटीव्ह वेगळे होते. त्यामुळे माझा अनुभव या धाग्याच्या चौकटीत बसतो का ते मला माहिती नाही.
nice
nice
मस्त पोस्ट आगाऊ! दामापायी
मस्त पोस्ट आगाऊ!
दामापायी "मजा आली" की नाही हा प्रश्न विचारला नाही पण पुढे निवडलेल्या नोकरीच्या फिल्ड मध्ये सुदैवानी वैताग आला नाही म्हणून वाचलो.
मास्टर्स करताना काही विषय खुप आवडायचे, अभ्यास करताना मजा यायची आणि त्या विषयाचे पेपर वगैरे देताना कधी अडचण नाही आली.
पुढे नोकरी शोधताना जे करायला आवडेल असं सापडू पर्यंत थांबायची तयारी नव्हती किंवा असं थांबणं काही वाईट नसतं हे समजण्याइतकी मच्युरिटी नव्हती असंही म्हणता येइल.
आता परत कधी वेळ आली तर हा निकष लावून उत्तर हो आल्याशिवाय आजिबात पुढे सरकणार नाही. मस्त! एकदम सोप्या भाषेत लाख मोलाचे लिहीलेत.
Pages