दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाशवाणीवरून क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकण्यात आमचे दिवस अगदी रंगून जायचे. क्रिकेटच्या मैदानातच जणू काही आम्ही आहोत अशी भावना आमच्यात [कानावाटे] निर्माण करून देणारे जे कुणी जादुगार समालोचक होते त्यात 'सुरेश सरैय्या' हे एक नाव प्रमुख.

दक्षिण आफ्रिकेवरील बहिष्कार उठविण्यात आल्यावर त्या देशाने सर्वप्रथम भारताबरोबर दर्बन इथे आपला पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळला. ते साल होते १९९२ आणि या ऐतिहासिक समजल्या जाणार्‍या क्रिकेट सामन्याचे प्रथम धावते वर्णन करण्याचा मान श्री.सुरेश सरैय्या याना मिळाला होता. असे समजतात की त्यावेळी भावनाकुल होऊन सुरेशजी रडले होते.

ज्या सदस्यांनी 'रेडिओ क्रिकेट कॉमेन्ट्री' च्या जादूचे दिवस पाहिले असतील त्याना सुरेश सरैय्या यांची लोकप्रियता नक्कीच माहीत असेल.

भावपूर्ण श्रद्धांजली.

ज्या सदस्यांनी 'रेडिओ क्रिकेट कॉमेन्ट्री' च्या जादूचे दिवस पाहिले असतील त्याना सुरेश सरैय्या यांची लोकप्रियता नक्कीच माहीत असेल.

दूरदर्शनवर लाइव मॅचेस दाखविण्याच्या सुरुवातीच्या काळात, लोक दूरदर्शनचा आवाज म्यूट करून रेडियोची कॉमेन्ट्री लावीत.

संगीतकार बाळ पळसुले यांना श्रद्धांजली.
http://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Bal_Palsule
यामधे फारच कमी गीते दिसत आहेत. याहुन जास्त संगीत दिले असणार त्यांनी नक्कीच.
वसंतरावांच्या आवाजातले "हे गणनायक सिद्धीविनायक नमन पहिले तुला गणेशा" या गीतामधे अनेक गोष्टींचे अजब मिश्रण आहे. गीत, संगीत, नृत्य, नाट्य, लोककला, इ.

सुप्रसिद्ध कवियत्री,, नागपुरच्या सुलभा हेर्लेकर यांचे काल निधन झाले , त्यांच्या आत्म्याला शांती मिळो Sad

संगीतकार बाळ पळसुले यांना श्रद्धांजली.

आत्ताच जागूकडून समजले, : आपले माबोकर, डॉ. कैलास गायकवाड यांच्या वडीलांचे आज सकाळी निधन झाले Sad
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. आणि गायकवाड कुटुंबाला हे दु:ख सोसण्याचे बळ देवो. Sad

मी डॉक्टरांना फॉन केला होता, वहिनींनाही, पण कोणीच उचलला नाही Sad

डॉक्टरांच्या तीर्थरूपांच्या आत्म्यास शांती मिळो. श्रद्धांजली.

ओह..!! श्रद्धांजली!!!
डॉक्टर आणी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो!!

डॉ. कैलास गायकवाड ह्यांच्या वडीलांचे दु:खद निधन झाले .
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. Sad

श्रद्धांजली!
परमेश्वर डॉक्टरांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. Sad

डॉ. ना मी गेले ३-४ दिवस फोन ट्राय करतेय पण उचलतच नव्हते,बहुतेक वडील आजारी असतील म्हणून. आज सकाळी क्लिनिकला फोन केला तेंव्हा त्यांच्या स्टाफ कडून वडील वारल्याचे समजले.
इश्वर डॉ. कैलास ह्यांच्या वडीलांच्या आत्म्यास शांती देवो व डॉ. व त्यांच्या कुटूंबीयांना दु:ख सोसण्याचे बळ देवो.

Sad

इश्वर डॉ. कैलास ह्यांच्या आत्म्यास शांती देवो व डॉ. व त्यांच्या कुटूंबीयांना दु:ख सोसण्याचे बळ देवो...कृपया वाक्य तपासावे....

अरेरे बेफिकिरजींच्या मेसेजवरुन कळले हे. डॉ. गायकवाड आणी त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेत आम्ही पण सहभागी आहोत, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

.

डॉक्टर गायकवाड यांच्या वडिलांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजले.

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

समस्त गायकवाड कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
समस्त गायकवाड कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो.

डॉ.आणि समस्त गायकवाड कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो.

डॉ.आणि समस्त गायकवाड कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो.
समस्त गायकवाड कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

वैदर्भिय कवयित्री सुलभा हिर्लेकर यांना तसेच

डॉ. गायकवाड यांच्या वडिलांना श्रध्दांजली !:(

श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्याला शांती लाभो!
डॉ.आणि समस्त गायकवाड कुटुंबीयांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो.

Pages