दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंत्रालयाच्या आगीत दोन जणांचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम, मुंबई
Thursday, 21 June 2012 16:42
उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिससमोर मृतदेह आढळले
मुंबई : मंत्रालयात लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झालाय. सहाव्या मजल्यावर दोन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासमोर हे मृतदेह आढळले आहेत.

हे मंत्रालयात काम निमित्त आलेले नागरिक असल्याचं सांगण्यात येतं आहे.

आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

सहाव्या माळ्यावर अग्निशमन दलाला संध्याकाळी सातवाजेपर्यंत पोहचणं अशक्य होतं. अग्निशमन दलाने हे दोन मृतदेह शोधून काढले आहेत.

आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. >> Sad

आमच्या एका सरांच्या ओळखीतून खूप वर्षांपूर्वी भा. द. खेरसरांना घरी जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांची 'हसरे दु:ख' आणि 'हिरोशिमा', 'बर्लिन गंगेला मिळाले' वाचली होती.
सरांना विनम्र श्रद्धांजली...

भा. द.खेर यांना यांना श्रद्धांजली Sad
आम्हाला काहीही करा आणि वाचवा, धुराचे लोळ पसरलेले आहेत, असे संदेश या लोकांकडून पाठवण्यात येत होते, पण आग वाढल्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. >> Sad फ़ार वाईट झाल.

भा.द.खेर यांना श्रद्धांजली !
हिरोशिमा वाचली आहे. फार ओघवते आणि चांगले लिखाण होते त्यांचे.

.

दारासिंग यांना श्रध्दांजली

हनुमान रामवासी झाला Sad

पेपरात अजुन चिंताजनक दिलेली आहे...आणि नेट वर निधन झाल्याची बातमी प्रसिध्द झाली...आजतक मधे दाखवत आहे की डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली आहे... Sad

श्री. दारासिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, ही प्रार्थना.
कृपया अशा बातम्यांची आधी खात्री करून, मग इथे पोस्ट करावं, ही विनंती.

http://www.dnaindia.com/entertainment/report_dara-singh-passes-away_1713868
दारासिंग ह्यांना माझी भावपूर्ण आदरांजली.
बालपणात हनुमानानंतरचं आमचं दैवत होतं ते म्हणजे दारासिंग. दारासिंग नेहमीच अजिंक्य असतो असा आमचा ठाम विश्वास होता.

Pages