दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता तरी ही बातमी खरी आहे का? खरी असेल तर दारासिंग यांना श्रद्धांजली... Sad

प्रमोद देव म्हणतात त्याप्रमाणे माझ्या लहानपणी दारासिंग म्हणजे फ्रिस्टाइल कुस्तीत कधीच न हरणारा जग्गजेता असेच आम्हाला वाटत असे. मुंबईत हाजीअली जवळ वल्लभभाई पटेल स्टेडिअमवर त्याच्या मायटी मंगोल वगैरेबरोबर होणार्‍या कुस्तीच्या जाहीराती मुंबईत सगळीकडे दिसायच्या. त्याच्या पायाच्या कैचीचा डेथ लॉक कोणालाच सोडवता येत नाही असा आम्हा लहान मुलांमधे गाढा विश्वास होता. त्याचा लहान भाउ रंधावा सुद्धा कुस्तीवीर होता. रंधावा जर हरला तर दारासिंग जाउन त्याचा बदला घेतो असाही आमचा एक समज होता.

राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात भारताचा झेंडा फडकवणारे 'रुस्तम-ए-हिंद' आणि नंतर टीव्हीवरच्या रामायणात 'जय श्रीराम'चा जयघोष करत द्रोणागिरी पर्वत हातावर घेऊन आकाशी झेपावणारा 'हनुमान' साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं
दारासिंग ना श्रद्धांजली

Sad Sad Sad Sad Sad

दारासिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad Sad Sad
रामायणातली हनुमानाची भूमिका त्यांनी खूपच सुरेख वठविली.

'पाणीवाली बाई' म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मृणाल गोरे यांचं निधन.

Sad

'सेवन हॅबिटस ऑफ हायली इफेक्टिव पीपल' चे लेखक आणी मोटिव्हेशनल स्पीकर (मराठी शब्द आठवत नाहिये) स्टीवन कोव्हे यांचे निधन Sad

मृणाल गोरे - एक झुंझार नेतृत्व (गोरेगावची पाणीवाली बाई) काळाच्या पडद्याआड. दंडवते, गोरे यांच्यासारखे, राष्ट्र सेवा दलाच्या तालमीत तयार झालेले, निस्पृह राजकिय नेते पुनः होणे नाहि.

राज, भरत मयेकर +१.
मृणालताईंना श्रद्धांजली.

मृणाल गोरे
मृणालमावशी.... लाटणं मोर्चा, थाळी मोर्चा, मंत्र्यांना घेराव, आणीबाणीमधलं त्यांचं फरार होणं... सगळं इतकं जवळून बघितलय. निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात अठरा-अठरा तास दौरे, मिटिंगा करीत फिरणारी मृणालमावशी आठवतेय... झुंजार खरच...

Sad

अभिनेते राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली Sad
माझा आवडता अभिनेता.
आधी शम्मी कपूर, नंतर देव आनंद आणि आता राजेश खन्ना Sad Sad Sad

Pages