दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पडद्यावर रंगांची आणि चित्रांची जादू करणार्‍या ज्येष्ठ छायाचित्रकार श्री. अशोक मेहता यांचं निधन.

मित्र हो,
दि.०६-०८-२०१२ रोजी माझ्या वडिलांचे अल्पशा आजाराने पहाटे ३.२० ला देहावसान झाले. या दु:खद प्रसंगी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे, एस एम एस द्वारे, इ-मेल द्वारे वा अप्रत्यक्ष रित्या ज्या कुणी माझे व माझ्या कुटुंबाचे सांत्वन केले त्या सर्वांचा मी मनःपूर्वक आजन्म ऋणी आहे.

मायबोली मित्रपरिवाराचे ऋण वर्णनातीत आहे.

--डॉ.कैलास गायकवाड.

डॉक्टरांच्या वडीलांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना
ईश्वर हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.

चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून जगप्रसिद्ध असलेला अंतराळवीर "नील आर्मस्ट्रोन्ग" काल (२५/८/१२) कालवश झाला ..
वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झालं.
असे म्हणतात कि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच "नील आर्मस्ट्रोन्गने वयाच्या ६ व्या वर्षीच अवकाशात झेप घेतली !! वयाच्या १६ व्या वर्षी या मुलाने "पायलट" होण्याचा अधिकृत परवाना मिळवला .. विशेष म्हणजे या वयात त्याला "कार" चालवता येत नव्हती ..

१९६८ साली "नील आर्मस्ट्रोन्ग आणि त्याचा सहकारी आल्ड्रिन याने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर पृथ्वीवर खालील परिस्थिती होती ..अंदाजे ६०० लक्ष लोकांनी (जगाच्या एक पंचमांश लोकसंख्या) हा सोहळा पाहिला आणि ऐकला -- आजपर्यंतच्या इतिहासातील एका कार्यक्रमासाठी सर्वाधिक प्रेक्षक संख्या ..
अनेक पालकांनी आपल्या मुलांसोबत दूरचित्रवाणीवर हा सोहळा अचंबित होवून पाहिला .. शेतकर्यांनी आपली कामे थांबवली .. महामार्गावरील वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यांवर हा वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी एकच गर्दी केली .. मिशिगनमध्ये स्काउट कॅम्पवर असलेल्या मुलांनी जनरेटर चालवून हा सोहळा पाहिला.
यानंतर काही लोक रस्त्यावर येवून चंद्राचे निरीक्षण करू लागले जणूकाही नील आर्मस्ट्रोन्गला नुकतेच त्यांनी चंद्रावर पाहिले, काही लोक दुर्बीण घेवून चंद्र-निरीक्षण करू लागले आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी नील आर्मस्ट्रोन्गच्या घराभोवती घिरट्या घालू लागले ..!!!

अशा प्रकारे नील आर्मस्ट्रोन्ग आणि त्याच्या सहकार्यांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवून मानवी इतिहासात एक अभूतपूर्व अध्याय रचला ..
समस्त मानव जातीला अभिमान वाटावा असे काम करणाऱ्या नील आर्मस्ट्रोन्गला भावपूर्ण श्रद्धांजली ...!

ओह!! नील आर्मस्ट्राँग ..
नील ची अभूतपूर्व कामगिरी या भूतलावरच्या प्रत्येक मनुष्याच्या मनावर कायमची कोरली गेली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!!!.

समस्त मानव जातीला अभिमान वाटावा असे काम करणाऱ्या नील आर्मस्ट्रोन्गला भावपूर्ण श्रद्धांजली ...!

नील आर्मस्ट्राँग श्रद्धांजली!!!

ज्येष्ठ अभिनेते ए.के. हंगल यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन. Sad

इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई ?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची भूमिका अजरामर करणारे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अवतार किशन हंगल ( ए . के . हंगल ) यांचे आज सांताक्रूझ येथील आशा पारेख हॉस्पिटलमध्ये निधन झाले . ते ९८ वर्षाचे होते . Sad

भावपूर्ण श्रद्धांजली...!

नील आर्मस्ट्राँग - Sad सलाम आणि आदरांजली

ए के हंगल- Sad खरे तर कायम दु:खी भूमिका केल्या, पण अतिशय उत्तम केल्या. आदरांजली.

इतना सन्नाटा क्यूं है भाई - Sad

हंगलांच्या बाबतीत बाबतीत म्हनायचे तर जीवनाने त्यांचा जो छळ सुरू केला होता त्यातून त्यांची सुटका झाली Sad

ए, के हन्गल... Sad
नील आर्मस्ट्राँग - शाळेतल्या दिवसांत माझा हिरो Sad

इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई ? ए के हंगल, नील आर्मस्ट्राँग, हॉकी पटू शांताराम जाधव ... Sad

भावपूर्ण श्रद्धांजली...!

हॉकी पटू शांताराम जाधव ...
>>
जाधव? हा काय प्रकार आहे?. कबड्डीपटू शान्ताराम जाधव आहेत आणि चांगले आहेत. कालच एका कार्यक्रमात स्टेजवर होते.

जुन्या काळातले हॉकी पटू शांताराम जाधव. हॉकीच्या सुवर्णयुगातले एक खेळाडू. आजच्या 'सकाळ'लाही आलीय सविस्तर बातमी.

>>आशा पारेख हॉस्पिटलमध्ये निधन
असे हॉस्पिटल आहे ? आशा पारेख अजुन आहेत तरी त्यांचे नाव दिलेले ?

नील आर्मस्ट्राँग, ए.के.हंगल, शांताराम जाधव, अभिनेत्री मालती पेंढारकर ,डॉ. अजित फडके, यांना श्रद्धांजली Sad

Pages