Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
सर्व दिवंगतांस श्रध्दान्जली
सर्व दिवंगतांस श्रध्दान्जली व त्यांच्या आत्म्यास चिरशान्ति मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना
अश्विनी, किती भरभरुन बोलत
अश्विनी, किती भरभरुन बोलत होतीस त्यांच्याबद्दल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो.
सर्व दिवंगतांस श्रध्दान्जली व
सर्व दिवंगतांस श्रध्दान्जली व त्यांच्या आत्म्यास चिरशान्ति मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
साउथ ची सुप्रसिध्द नॅशनल
साउथ ची सुप्रसिध्द नॅशनल अॅवॉर्ड विजेती गायिका स्वर्णलता काल लंग इन्फेक्शन नी गेली :(, वय फक्त ३७ !
हिन्दीत 'हाय रामा ये क्या हुआ, सुनता है मेर जिया' आणि ए.आर. रेहमान साठी इतरही गाणी गायली होती !
गाण्यांच्य अरुपाने कायम अजरामर राहो ही गुणी गायिका..
वय फक्त ३७ वर्ष
वय फक्त ३७ वर्ष

अर्र.. डीजे फारच वाईट
अर्र.. डीजे फारच वाईट बातमी...
पुण्यातील तबलावादक डॉ. विनोद देऊळकर ह्यांचे दोन दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. ते केवळ ३५ वर्षांचे होते.. त्यांनी संगीत अलंकार परीक्षेत भारतात प्रथम क्रमांक मिळवला होता. पुण्यातील अनेक नामवंत गायकांना ते साथ करायचे..
अश्विनीमामी- परवाच्या पेप्रात
अश्विनीमामी- परवाच्या पेप्रात मी सुधाताईंची श्रद्धांजली वाचली, तेव्हाच तुमची आठवण आली. याच त्या केळकरबाई माहित नव्हते पण का कोण जाणे याच असतील असे वाटले.
अग काल व आज शोकसभा होत्या पण
अग काल व आज शोकसभा होत्या पण मला जाता आले नाही. स्वर्णलताची बातमी वाचली होती. हे लोक तरूण वयात का जातात. फार दु:ख होते.
ज्येष्ठ संगीतकार कमलाकर भागवत
ज्येष्ठ संगीतकार कमलाकर भागवत यांचे निधन
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=103...
एक सुरेल व्यक्ती हरपली !!
एक सुरेल व्यक्ती हरपली !!
अरे ३५ नि ३७ ही काय वये आहेत
अरे ३५ नि ३७ ही काय वये आहेत काय मरण्याची?
ज्येष्ठ संगीतकार कमलाकर भागवत
ज्येष्ठ संगीतकार कमलाकर भागवत यांचे निधन>>>

कमलाकर भागवत यांना श्रद्धांजली.
त्यांची काही अजरामर गाणी:
घाल घाल पिंगा वार्या
देह जावो अथवा राहो
ॐकार प्रधान रूप गणेशाचे
चंदनाचे हात पायही चंदन
देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला
आली बघ गाई गाई
गणाधीपा हो उठा लवकरी
उठा उठा चिऊताई
चक्रवाक पक्षी वियोगें
जेथें जातों तेथें तूं माझा
दीनांचा कैवारी दु:खिता
दीपका मांडिले तुला
देह शुद्ध करुनी भजनीं
नाम आहे आदी अंती
बुडता आवरीं मज
मायेविण बाळ क्षणभरी
शतकानंतर आज पाहिली
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
योगेश, तु लिस्ट दिल्यावर
योगेश, तु लिस्ट दिल्यावर माझ्या लक्षात आले की किती नितांतसुंदर गाणी भागवतांनी दिली होती..
ओह, यातल्या बर्याच कविता
ओह, यातल्या बर्याच कविता शाळेत असताना अभ्यासक्रमात होत्या.
भागवंतांना भावपुर्ण श्रद्धांजली !
ओह..... भागवतांना
ओह..... भागवतांना श्रद्धांजली... योगेश, ही लिस्ट वाचून, अकराच्या गाण्यांचा गाव जागला मनात....
किती सुंदर गाणी ! भागवतांना
किती सुंदर गाणी ! भागवतांना श्रद्धांजली.
सुंदर आणि शांत.. मनात एक शांत
सुंदर आणि शांत.. मनात एक शांत भाव जागवतात ही गाणी. भागवतांना देवाने तशीच शांती द्यावी....
काही संगीतकार मोजकी गाणी
काही संगीतकार मोजकी गाणी संगीतबध्द करतात पण ती लक्षात राहतील अशी असतात. भागवतांना श्रध्दांजली.
रारंग ढांग चे लेखक, प्रभाकर
रारंग ढांग चे लेखक, प्रभाकर पेंढारकर यांचे निधन.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6707680.cms
त्यांना श्रद्धांजली !
अरेरे. त्यांना श्रद्धांजली .
अरेरे.
त्यांना श्रद्धांजली .
ओह गॉड. दरवर्षीच्या दिवाळी
ओह गॉड. दरवर्षीच्या दिवाळी अंकात त्यांचा लेख वाचायचीइतकी सवय झालेली.
माझी श्रद्धांजली
पेंढारकरांना श्रद्धांजली !!!
अरे!
अरे!
पेंढारकरांना श्रद्धांजली !!!
वाईट वाटले. श्रद्धांजली!
वाईट वाटले. श्रद्धांजली!
खरेच रारंग ढांग विसरता येणे
खरेच रारंग ढांग विसरता येणे अशक्य. पेंढारकरांना श्रद्धांजली.
आवाज चे पाटकर गेल्याचे पण वाचले.
अरेरे... रारंगढांग आणि
अरेरे... रारंगढांग आणि त्सुनामीवरचंही अजून एक पुस्तक... दोन्हींवर सुरेख चित्रपट निघू शकेल....
च्च!
रारंगढांग माझी खुप आवडती
रारंगढांग माझी खुप आवडती कादंबरी , तिच्या जन्मदात्याला भावपुर्ण श्रध्दांजली.
रारंगढांग माझी पण खुप आवडती
रारंगढांग माझी पण खुप आवडती कादंबरी. पेंढारकरांना भावपुर्ण श्रद्धांजली.
प्रभाकर पेंढारकर यांचे निधन
प्रभाकर पेंढारकर यांचे निधन Bookmark and Share
Share this on Rediff.com
Print E-mail
पुणे, ७ ऑक्टोबर/ प्रतिनिधी
‘रारंगढांग’ या कादंबरीने आबालवृद्धांना वेड लावणारे तसेच ‘एका स्टुडियोचे आत्मवृत्त’ या पुस्तकाने आपले वेगळेपण सिद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, चित्रपट दिग्दर्शक व फिल्म्स डिव्हिजनमधील प्रयोगशील दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचे आज येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मराठी चित्रपटसृष्टीचे पितामह भालजी पेंढारकर यांचे ते पुत्र होत. फिल्म्स डिव्हिजनमधील नोकरीच्या काळातील अनुभवांवर आधारित रारंगढांगने मराठी साहित्यसृष्टीत कादंबरीलेखनाला नवीन आयाम दिला. ही कादंबरी भरपूर गाजली. तिच्या तब्बल १२ आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीस वाचकप्रियतेबरोबरच राज्य पुरस्कारही मिळाला होता. प्रतीक्षा ही त्यांची पहिली कादंबरी होती. ‘चक्रीवादळ’, ‘अरे संसार संसार’, ‘चिनार लाल झाला’ या त्यांच्या कादंबऱ्यांनाही उत्तम वाचक प्रतिसाद लाभला होता. अलीकडेच त्यांचे ‘एका स्टुडियोचे आत्मवृत्त’ हे जयप्रभा स्टुडियोवर लिहिलेले पुस्तकही गाजत असून त्याचीही दुसरी आवृत्ती संपली आहे. ‘भाव तेथे देव’ (१९६१), ‘बाल शिवाजी’ (१९८६), ‘शाब्बास सूनबाई’ (१९८६) ‘प्रित तुझी माझी’, अशा गाजलेल्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. फिल्म्स डिव्हिजनमध्ये असताना त्यांनी दिग्दर्शक या नात्याने अनेक दर्जेदार माहितीपट तयार केले होते. भालजी पेंढारकर व व्ही. शांताराम यांच्याबरोबर त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.त्यांच्यामागे पत्नी व दोन कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Pages