मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रम

Submitted by रैना on 5 January, 2011 - 23:48
ठिकाण/पत्ता: 
लोकमान्य साहित्य सेवा संघ. विलेपार्ले पूर्व

मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले

लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

लोकसत्तेतील बातमी.

माहितीचा स्रोत: 
वर्तमानपत्र, इतर
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, January 6, 2011 - 21:00 to शनिवार, January 15, 2011 - 21:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

califest मी जाणार आहे . कोणी येतेय का ?
आम्हा स्टूडेंट्सना आजच बोलावले होते पालव सरांनी. पण आज जमल नाही

ऐशुलाही वारली पेंटिग हवे होते पण नेमके त्या दिवशी तिची परिक्षा आहे. त्यामुळे जमले नाही. वारली पेंटिगमध्ये भुमितीय आकृत्या जास्त असतात, त्यामुळे चित्रकला चांगलीच हवीय असे काही नसेल.

तु तोवर यु टुबवर पाहुन सराव कर Happy

नेहरू सेंटरचा राष्ट्रीय नाट्यमहोत्सव

SEPTEMBER, 29th to OCTOBER 3rd:
Wildlife Week exhibition @ BNHS: “Tatwamasi” – A Glimpse into Periyar’s Wildlife:
Venue: BNHS, Hornbill House hall, opposite Lion Gate, Fort, Mumbai.

Timing: Opening ceremony on 29th September 2014 at 11.00 a.m. – Exhibition will remain open for the next five days from 9.30 a.m. to 5.00 p.m.

अधिक माहितीसाठी http://www.bnhs.org/nature-trails-a-camps/one-day-programmes.html

रविराज कुंभार, रोहन मोरे, सागर कुड्ले यांचा Recent Paintingचा Group Show नेहरु सेंटरच्या आर्ट गॅलरीत २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान सुरु आहे.

शोभिवंत माश्यांचे प्रदर्शन

http://www.mid-day.com/articles/fish-exhibition-in-kandivali-begins-toda...

unnamed.jpg

दिनांक: १ ते ६ ऑक्टोबर, २०१४.
वेळ: सकाळी १० ते रात्री ९
पत्ता: Aqua Life exhibiton, Kandivali Recreation Club, Opp. KES college, Shantilal modii Rd., Bhagat colony, Kandivali West, Mumbai 67.
प्रवेश फी: ६० रू.

बोरीवली प्रबोधनकार ठाकरे कलादालनात सध्या ३ नोवेंबरपर्यंत रवी सचुला आणि दृष्टी जयकृष्ण ह्या पती-पत्नीचं चित्रप्रदर्शन भरले आहे. चित्रे मिक्स मेडिया मध्ये केलेली आहेत. रवीने चारली चाप्लीनचा प्रोप वापरून चित्रे सादर केली आहेत तर दृष्टीने मेरलिन आणि मेडोंना ह्या होलीवूड अभिनेत्रींचा प्रोप वापरलाय. दोघात मिळून जवळपास ३०-४० चित्रे प्रदर्शनात ठेवलियेत. तशी यथातथा आहेत, पण ४-५ चित्रांमध्ये छान क्रिएटीविटी आहे. मला भावलेली चित्रे -
रणगाड्याच्या आकारातील बंदिस्त शाळेची बस,
अपसाइड डाऊन शहरात खाली पडणारा चारली आणि त्याचे चकित झालेले भाव,
सुळावर उभा चारली आणि त्याला कोपर्यातून (कॅमेरात) शूट करणारी माणसे,
वाळवंटात नकाशा घेऊन चारली गोंधळल्या अवस्थेत उभा आहे,
रखरखीत वाळवंटात शर्टहीन व्यक्ती बाईकवर निघालीय आणि एक भलेमोठे लाल कार्पेट त्यासमोर उलगडत जातेय,
मेडोंनाच्या चेहर्याचा पेपर कापून त्या मध्ये वृत्तपत्रातील कात्रणे चिकटवली आहेत. कात्रणांचा एकूण रोख जगात बिनधास्त जगावेगळे काही करायला निघालेल्या बाईला जी स्टीरीओटाईप विशेषण लावले जातील तसा आहे.

मुंबईतले किल्ले वन्स मोर!
२३ नोवेंबरला सकाळी ७ ते सन्ध्याकाळी ७:३० मिलिंद पराडकर सर पुन्हा मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्यायला येत आहेत.

फेबु वरची लिन्कः
https://www.facebook.com/#!/photo.php?fbid=10204191756707196&set=a.30487...

झरबेरा, आज लोकसत्तात पण आलंय ह्याबद्दल.

होरायझन संस्थेतर्फे २३ नोव्हेंबरला मुंबईतील शिव, धारावी, शिवडी, वरळी, माहीम आणि वांद्रे या किल्ल्यांच्या दर्शनाची संधी. दुर्गांचे दर्शन, माहिती, इतिहास आणि दुर्ग संकल्पना यांचा परिचय करून दिला जाईल. नोंदणीसाठी शंकर राउत (९९६९६ ३४३४४) किंवा अनुप बोकील (७७९८० ५००८५)

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग, १५ नोव्हेंबरपासून दर शनिवारी संध्याकाळी ५ ते ७, राजा शिवाजी विद्या संकुल, हिंदू कॉलनी, दादर पूर्व, मुंबई १४

पुस्तक प्रदर्शन, १४ ते २१ नोव्हेंबर, साहित्य अकादमी, शारदा सिनेमा बिल्डींग, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर पूर्व, सकाळी १० ते संध्याकाळी ८. अकादमीने प्रकाशित केलेली मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, कन्नड, तेलुगु, बंगाली अश्या २२ भाषांतील पुस्तके अल्प किमतीत विक्रीसाठी उपलब्ध.

दादर माटुंगा कल्चरल सेन्टरतर्फे २२ आणि २३ नोव्हंबरला साहित्य रंग महोत्सवात रहस्य, भय आणि गूढ साहित्यावर चर्चा होणार आहे. २२ तारखेला संध्याकाळी ६ वाजता लेखक निरंजन घाटे यांचे 'मराठी रहस्य, भय आणि गूढ साहित्याचे स्वरुप' ह्यावर व्याख्यान आहे. तर सात वाजता नारायण धारप, रत्नाकर मतकरी ह्यांच्या कथांचे अभिवाचन असेल. २३ तारखेला संध्याकाळी ५:३० वाजता बाबुराव अर्नाळकर, सुहास शिरवळकर, भानू शिरधनकर, मधुकर अर्नाळकर यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम तर ७ वाजता 'भय इथले संपत नाही' ह्या कार्यक्रमात कमलेश भडकमकर आणि सहकारी मराठी रहस्यमय गूढ चित्रपटातील गाणी सादर करणार आहेत.

स्ट्रॅन्ड बुक स्टॉलच्या पुस्तकांचे प्रदर्शन डेव्हिड ससून लायब्ररी, जहांगीर आर्ट गॅलरीसमोर, काळा घोडा, सकाळी १० ते संध्याकाळी ७.......फोर्ट येथील त्यांच्या दुकानातही याच सवलतीच्या दरात पुस्तकं विक्रीस असतील.

काळा घोडा फेस्टिवल 7th February to - 15th February 2015.
खूप लवकर पोस्ट करते आहे, पण सरस ला जावून आल्यावर याचेच वेध लागतात. Happy

मुंबईत कीटकभक्षी वनस्पती

नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेन्डज ऑफ द ट्रीज, ५४ वे वार्षिक भाज्या, फुलं, फळं प्रदर्शन माटूंगा येथील व्हीजेटीआय मध्ये ७ व ८ फेब्रुवारीला.

सतारवादनातील घराणी या विषयावरचं चर्चासत्र, १७ आणि १८ जानेवारी एनसीपीए, एक्सप्रिमेन्टल थिएटर, ९:३०-५:३०

डोंबिवलीतून थोडे उशीरा निघून पुन्हा परतीच्या "गर्द्या" चालू व्हायच्या आत काळा घोडा फेस्टिवल पाहून येणे शक्य आहे का? म्हणजे साधारण २-३ तासच मिळाले तर बर्‍यापैकी बघून होईल का?

साधारण २-३ तासच मिळाले तर बर्‍यापैकी बघून होईल का? >>> रस्त्यावरचे स्टॉल्स, इन्स्टॉलेशन्स वगैरे बघून होतील. एखादा लाईव्ह परफॉर्मन्सही पाहता येईल छोटासा. वीक-एण्डसना बेक्कार गर्दी असते मात्र तिथे...

Pages