विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्लंड हारले हे भारताच्या दृष्टीने चांगलेच झाले Happy

आता आयर्लंड आणि नेदरलँड विरुद्ध युसुफ्, युवी, रैना, सचिन सगळ्यांना मजबूत बॉलिंग प्रॅक्टिस दिली पाहिजेल...
आपली आयर्लंडविरुद्धची मॅच शेजारच्या फिरकी पीचवर आहे असं ऐकलय!

यो रॉक्सला जोरदार अनुमोदन!
कितीही फिक्सिंग मानले तरी ओब्रायनच्या रन्स काही आकाशातून पडलेल्या नाहीत, त्याचे क्रेडीट त्याला दिलेच पाहिजे.

इंग्लंड आयर्लंड मॅच फिक्स होती असे म्हणणे हा आयर्लंड वर अन्याय आहे.
मॅच नंतरच्या गप्पांत हर्ष भोगलेने म्हटले की इंग्लंड आयर्लंडचे चांगले खेळाडू पळवून नेते. त्याला हे उत्तर होते.
Eoin Morgan हा आयरीश खेळाडू इंग्लंडकडून खेळतोय.
भारत इंग्लंड मॅच फिक्स होती असे म्हणणारे ती भारताकडून फिक्स होती असे म्हणतात. तर पाक मिडियाला वाटतेय की इंग्लंडची शेवटची घसरगुंडी विशेषतः झहीरच्या तीन विकेट्स या फिक्स्ड होत्या.

सहमत आहे, तो आयर्लंडवरील अन्याय आहे. वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे इतकी तुफानी खेळी करणे हेही फिक्सिंग असू शकणार नाही.

हा धागा भारीच आहे.

मॅचेस इंटरेस्टीग होतायत त्याचा आनंद घ्यायचा सोडुन फिक्सींग ...फिक्सींग काय लावलय ?
त्या टीव्हीवाल्यांनी पण भंडावुन सोडलय...
सकाळी कुठल्या तरी न्युज चॅनलवर ..धोनीला मौनीबाबा करुन टाकला.काय तर म्हणे इंग्लंडच्या मॅचनंतर तो कुठल्याही प्लेयरशी बोलत नव्हता.
कालच्या मॅचचे श्रेय आयरीष खेळाडुंना द्यायला पाहिजे आणि हो त्या खेळपट्टीला सुद्धा...

shock2.JPG

मला वटतं आज नेदरलँड आफ्रिकेला २५० पर्यंत रोखेल आणि सहज ही धावसंख्या पार करेल.. अजून एक अप्सेट!!

एकंदरीत भारतापेक्षा ईतर सर्वच (अगदी लींबू टींबू सुध्ध्दा) संघांची गोलंदाजी "ऊच्च" दिसतीये.. कालचे आयर्लंड चे क्षेत्ररक्षण तर आपल्या कईक पट चांगले होते.. Happy

कालचा आयर्लंड चा सामना फिक्स्ड असायची शक्यता अजीबात नाही.. पुन्हा परत क्षणचित्रे व प्रक्षेपण बघितले.. संदिग्धता कुठे दिसत नाही. ओब्रायन चे शतक महान- ज्या प्रकारे आणि आवेशात गडी खेळलाय- रिचर्ड ची आठवण आलीच.. हा प्राणी ऑसी, न्युझी टिम मध्ये असता तर नक्कीच एव्हाना icc top 10 मध्ये पोचला असता.

हिरकु,
अगदी! ओब्रायनने ऑफ साईड ला स्क्वेयर बाऊंड्रीवर मारलेला षटकार अप्रतिम. त्याच्या मनगटात किती ताकद असेल याची जाणीव होते.. धोणी "कोणे एक काळी" असाच कत्तल करायचा..
कालच्या ओब्रायन च्या खेळीला स्ट्रॉस "क्रूर कत्तल" म्हणला ..:)
५० चेंडूत १०० हा विक्रम आता कोण मोडू शकेल? abd/viru/yusuf/watto/pollard... ?

नेहेमीप्रमाणे आवळा आणि अबे, आफ्रिकेच्या मदतीला धावलेत..
आता आफ्रिकेचे २७५+ होवू शकतात हे दोघे टिकले तर... बाद झाले तर ने. ला पुन्हा संधी आहे.

<< ५० चेंडूत १०० हा विक्रम आता कोण मोडू शकेल? abd/viru/yusuf/watto/pollard... ? >> आफ्रिदी ? आणि, विक्रम मोडायच्या यादीत हक्काचं आपलं नांव वगळलं हें नाही आवडलं तर...... खुन्नसने "साहेब" पण !! Wink
योगजी, कालची ओब्रायनची खेळी झपाटल्यागत, विस्मयजनक व कौतुकास्पद होती, हे निर्विवाद. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे धाक व दबाव निर्माण करण्यासाठी त्याने नियमितपणे अशाप्रकारची कामगिरी करणंही गरजेचं आहे. तरच तो abd/viru/yusuf/watto/pollard... इ.इ.च्या पक्तीत जाऊन बसेल .

इंग्लंडची बोलिंग फारच वाईट पडली.. शेवटच्या १० ओव्हर मध्ये ऑन द टार्गेट असे hardly चार-पाच यॉर्कर बघायला मिळाले असतील...
पण KOB - one of the all time best innings!! Happy

आयर्लंडने काल ते केलं जे इंग्लंडला रविवारी करता नाही आलं - त्यांनी ३२५+ रन्स successfully chase केल्या!
आयर्लंडने काल ते केलं जे भारताला रविवारी करता नाही आलं - त्यांनी इंग्लंडला हरवलं!

आणि most imp is the very next match of Ireland ..... is against India!! Happy

विश्वचषक जिंकणार्‍या संभाव्य संघातून आता इंग्लंड व भारताचे नाव काढून टाकायला पाहिजे. दोघांचीही गोलंदाजी भंगार आहे. इंग्लंडविरूध्द ३ सामन्यात ५० षटकात २९२, ३३८ व ३२८ अशा धावा झाल्यात तर भारताविरूध्द २८३ आणि ३३८ अशा झाल्यात. नुसती फलंदाजी दणकेबाज असून उपयोग नाही. गोलंदाजी पण तगडी पाहिजे. त्यामुळे विश्वचषकावर बहुतेक ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, श्रीलंका किंवा पाकिस्तानचे नाव लागेल बहुतेक.

मास्तुरे,
लंका आणि पाकची गोलंदाजी पण काही फार चांगली आहे असे नाही... मलिंगा हा एक जुगार आहे, चालला तर वसूल. पाककडेही उमार गुल आणि आफ्रिदी खेरीज विकेट घेणारे गोलंदाज नाहीत.. शोएब भाई आता म्हातारे झाले.
आफ्रिकेकडे स्टेन, मॉर्कल हे सर्वोत्कॄष्ट गोलंदाज आहेत तर ऑसी कडे ली आणि जाँन्सन आहेत..
---------------------------------------------------------------------------
ईकडे आफ्रिका ने. वि. २३४/२ , ४२ षटकात... सामन्यातील मला वाटतं आत्ता सर्वात मह्त्वाचा कालावाधी आहे.. झटकन दोन विकेट गेल्या तर २७५ नाहीतर ३००.. बघुया.. (आवळा आणि अबे प्रत्त्येक सामन्यात खेळतातच!)

अबे ३ चेंडू ३ षटकार..
आज अबे ने मैदान गाजवलं.. १२ चौकार, ४ षटकार...
आफ्रिका ३२५ करू शकेल काय? या मैदानावर ३०० धावांचा पाठलाग शक्य वाटतोय. (पहिल्या ३५ षटकापर्यंत निव्वळ ५ च्या सरासरीने धावा झाल्या आहेत शेवटच्या पॉ.प्ले मध्ये ६१ धावा मारल्याने आफ्रिकेची धावगती वाढली. थोडक्यात नेदर्लेंड शांत डोक्याने फाजिल धोका न पत्करता खेळले तर ३०० करू शकतात असे मला वाटते..)

मास्तुरे अगदी खरं बोललात.... पाकिस्तान आणि श्रीलंकेकडे बॉलिंग मध्ये विविधता आहे तेव्हढी कोणाकडेच नाहीये.. पाकिस्तानचे तर पाचच्या पाच बॉलर पूर्णपणे भिन्न शैलीचे आहेत.. आणि त्याचा जर फायदा त्यांना उठवता आला तर ते फायनला दिसायचे चान्सेस खूप आहेत.. पण त्यांची बॅटींग तेव्हढी फॉर्मात नाहीये... आणि श्रीलंकेची पण बॉलिंग जबरी आहे... विषेश म्हणजे ह्या दोन्ही संघांना पाचवा बॉलर कोण ह्याची फारशी चिंता करावी लागत नाही.. ते ऑलराउंडरच्या रुपात त्यांच्याकडे आहेतच.. जी आपल्या आणि इंग्लंडच्या टीममधली सर्वात चिंताजनक गोष्ट आहे...

आफ्रिदी सोडला तर वरच्या चर्चेत सर्व जलदगती गोलंदाजांचा हुकमी एक्के म्हणून उल्लेख झाला आहे. पण यापुढे मला वाटतं खेळपट्टीवर बरंच कांही अवलंबून असेल. एक स्टेन [द. आफ्रिका] सोडून वेग व नियंत्रण याचं असं घातकी कॉम्बिनेशन आपल्या खेळपट्ट्यांवर इतर कोणाचं क्वचितच दिसलंय. इंग्लंडच्या अँडरसनला तर आपल्या विरुद्ध दहा षटकात ९१ धावा द्याव्या लागल्या. जर फिरकीला जराही अनुकूल
खेळपट्ट्या असल्या - आणि ही शक्यताच अधिक आहे - तर यापुढे फिरकी गोलंदाजच हुकमी एक्के ठरतील असं वाटतं. द. आफ्रिकेकडे जलदगतीचा खजिना असूनही त्यानी तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याची भाषा करणं, हें कशाचं बरं द्योतक असावं ! मलींगाचं हॅटट्रीकबद्दल कौतुक करताना ३-४ विकेट घेतलेले फिरकी गोलंदाज या स्पर्धेत बरेच आहेत हेही लक्षात घ्यायला हवं. आपल्या उपखंडातील खेळपट्ट्यानी अजून आपला इंगा दाखवला नाहीय, इतकंच !!

खरय भाऊ ... कमी धावसंख्येचे सामना बघायला लोकांना रस नाही.२०-२० मुळे फास्ट क्रिकेट लोकांना आवडायला लागलेय.४ अन ६ ची बरसात असेल तर सामन्याला रंग चढतो.

बरोबर आहे पूर्वी नजाकत, तंत्र, कौशल्य याला भाव होता... अलिकडे ठोकाठोक, आक्रमकता, उत्तुंग फटके, आणि वेग, याला जास्त महत्व आलय.
एक मात्रं आहे सनीभाय आणि शास्त्री दोघेही सचिन बद्दल नेहेमी जास्तच पार्शियल/अतीशयोक्ती समालोचन करतात (प्रेमापोटी). सनी च्या पाऊलावर एक पाऊल पुढे शात्रीबुवा असतात. Happy ऊ.दा:
सचिन ने मारलेला फटका एखाद्या क्षत्ररक्षकाच्या जवळून गेला आणिसीमापार झाला की:
सनी: he excatly knew where the fielder was
शास्त्री: he excatly knew wher the fielder was and he exactly knew what he (sachin) was doing..
तोच फटका ईतर कुणी मारला असेल तरः
सनी: he has picked up the gap there
शास्त्री: that was perfectly placed..

सचिन ने एखाद्या द्रुतगती गोलंदाजाला पुल चा फटका मारला तरः
सनी: he read that ball even before it was delivered. Happy
शास्त्री: tendulkar is now easily reading the bowlers mind.. Happy
तोच फटका दुसर्‍या एखाद्याने मारला तरः
सनी: a nice pull shot comes in the play
शास्त्री: that was ferociusly pulled to the boundary

सचिन ने त्याचा फेमस स्ट्रेट ड्राईव्ह अख्तर्/ली ला मारल्यावरः
सनी: thats as straight as it can get..
शास्त्री: it passed the bowler like a bullet..

असो. एकंदरीत सनीभाय चं ऊतू जाणारं कौतूक आणि शास्त्रीबुवांचा ऊत्साह यामूळे सचिन्/विरू यांनी मारलेल्या अनेक फटक्यांना special effects जोडले जातात. आमची काहीच तक्रार नाही... लगे रहो सन्निभाय! Happy

<< सचिन बद्दल नेहेमी जास्तच पार्शियल/अतीशयोक्ती समालोचन करतात (प्रेमापोटी) >> योगजी,
गिरगावात आमच्या शेजारीं एक मस्त, दिलखुलास वृद्ध गृहस्थ रहायचे. आमच्यासारख्या मुलांतदेखील [ प्राचीन काळीं मी पण लहान होतो !] मिसळायचे, रंगून जायचे. कुणी म्हटल "काय ह्या वयात पोरांत खेळतां ?" तर हंसत म्हणायचे," अरे तो नेहरू मुलात मिसळला, तर काय त्याचे फोटो अन कौतुक ! काय वेगळं करतो रे मी ?" !
एखाद्याचं नांव मोठं झालं कीं त्याच्या साधारण गोष्टी पण असाधारणच असतात, असं वाटतं कांही जणाना ! आपण हंसायचं झालं !! Wink

योगजी पण सचिनच कौतूक कराव तर टोनी ग्रेग ने. काय भाषेचा फुलोरा. जसे रिचर्डस बॅटींग करताना कॉमेन्ट्री करावी तर टोनी कोझियरने. सनी काय किंवा रवि काय शेवटी घाटी इंग्रजी.
सचिनने दुबई ला मॅगराथला डोक्यावरून मारल्यावर "अँड ही इज हाफ हिज साइझ" म्हण्ल्याच आठवतय. विक्रम साठे छान नक्कल करतो. यू ट्यूब वर आहे.
मला तर नेहमी वाटते सारखी एकच मॅच असावी. सचिन ने सेंच्यूरी मारावी , आपण जिंकावे व टोनी ग्रेग कॉमेन्ट्रेटर असावा. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना असावा. व इयान चॅपलही असावा.
शास्त्रीने फक्त टॉसला यावे व मंदीराने फक्त स्माइल करावे Happy
.

केव्हिन ओ'ब्रायन हा उदयोन्मुख महारट्टाळ फलंदाज! माझा एक कडक सॅल्यूट त्याला! इतका विध्वंस मी आजतागायत वनडे मधे पाहीला नव्हता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विजय आवाक्यात येतोय असं वाटल्यानंतर तो जास्त संयमाने खेळायला लागला. आणि इथेच बरेच बॅट्समन मार खातात.

आफ्रिकेच्या त्या नव्या स्पिनर ने "ईम्रान ताहीर" पुन्हा गहजब केलाय...

भारतीय फलंदाज बघत असतीलच..

पाक्/कॅनडा, ह्ह्ह्ह्म्म्म्म "बारीक" लक्ष ठेवायला हवे. Happy

५० चेंडूत १०० हा विक्रम आता कोण मोडू शकेल? abd/viru/yusuf/watto/pollard... ? >> आफ्रिदी

आफ्रिदी सध्या नुसता गोलंदाज म्हणून खेळतोय असं वाटतंय. (तेवढंच पुरे :))

ह्म्म्म्म अवघड दिसतय एकंदरीत.. २३० तरी करतील का? तिसरा पॉ.प्ले. शिल्लक आहे आणि आफ्रिदी पण आहे Happy
कॅनडा २५० चा पाठलाग करू शकेल ? ईं. विरुध्ध केल्या होत्या २४० च्या आसपास.. चिमा आणि चौहान हे त्यांचे मुख्ख्य खेळाडू आहेत.

अवघड.. फारच अवघड... १८४त संपली पाकची इनिंग... कॅनडानी त्यांना हरवायला पाहिजे.. आज शोएब नाहीए...

Pages